लेखांक १० श्री १५६८ अधिक श्रावण
तालीक
अज रख्तखाने राजश्री सीवाजी राजे दामदौलतहू बजानीब हुदेदारानि हाल व इस्तकबाल व मोकादमानि मौजे लोणी बारकर्डियाची प॥ सुपे बिदानद की सु॥ सन सबा अर्बैन अलफ दरीं विले मोरेस्वर गोसावी सेकीन मोरेस्वर हुजूर एऊन इलतिमास केली जे आपणास इनाम ब॥ फर्मान हुमायूनु व ब॥ खुर्द खत वजिरानि दर सवाद मौजेमजकुरी चावर गजशरायनी १ प्रज एसू भोगवटा व तसरुफाती चालिली आहे ए बाबे पेशजी आपण हुजूर एऊन अर्ज केला की भोगवटियाची खुर्द खते आपणापासून फितरतीमध्ये गेली आहेती साल गु॥ सन सीता कारणे मौजेमजकूर साहेबास अर्जानी जाला ह्मणुन हुदेदार ताजिया खुर्द खताचा उजूर करिताति ह्मणुन अर्ज केलियावर हुजरून दुमाले खुर्द खत सादर जाले ते मौजे मजकुरास घेऊन गेलो माहालीचे हुदेदार उजूर करिताति की खुर्द खत लिहिले आहे की भोगवटे व तसरुफाती चालिली असेली तेणेप्रमाणे दुमाले करणे यावरून भोगवटियाची खुर्द खते पाहिजेत ह्मणून उजूर करिताति तरी दरी बाब याजबदल पेशजी अर्ज केला आहे की भोगवटियाची खुर्द खते फितरतीमध्ये आपणापासून गेली आहेत ए बाबे हाली मौजेमजकूरचे मोकदमी अर्जदास्त लिहिली आहे एसियास नजर एनायत फर्माउनु हुदेदार उजूर न करति ऐसे दुमाले खुर्द खत देविले पाहिजे ह्मणून मालूम केले तरी मोरेस्वर गोसावी से॥ मोरेस्वर यास इनाम चावर सुलतानी एक प्रज एसू देखील महसूल नख्तयात व तमाम लवाजिमे व वेठीबिगारी व फर्मायसी व बेलेकटी व + + पटी व पायपोसी व मेजवानी व मोहीमपटी व खर्चपटी व तेलपटी व कानूनी व कदीम व जदीद व तूप व फसकी व सादिलवार व हकलवाजिमे देसाई व सेटे व बाजे कुलबाब कुलकानू नकदी व ऐनजीनसी दुमाले करणे व सदरहू प्रजेचे सेत हाली मोजून हदमहदूद घालून देणे व नख्त + + + + + + कुल दुमालियावरी + + + लागले ढेपेच्या हिसेबाने बसेले ते व गला कमाविसेने एत जाईल तो एणेप्रो। वाराचीवार दुमाले करणे दरहर साल ताजिया खुर्द खताचा उजून न करणे तालीक घेऊन असल पत्र दरमियाने भोगवटा व तसरुफाती + + + + + + + याचा उजूर न करणे मोर्तब सूद
रुजू सुरुनिवीस
सुरु सूद
+ + + + जमादिलाखर