लेखांक १२ १५७१ पौष शुध्द १२
अज रख्तखाने माहाराज राजश्री शाहाजी राजे दामदौलतहू बजानिबु कारकुनानि प्रा। सुपे बिदानद सु॥ खमसैन अलफ माल मेहतरिया चांभार प्र॥ मजकुर हजूरु एऊनु मालूम केले जे प्र॥ मजकुरीच्या चांभारास गहदम सालाबाद सारा घेणे तो ऐन जिनस पायपोसी च घेत असेती नख्त काही आपण देत नसो ऐसे असता आणापासूनु ऐन जिनस जोडे घेत नाहीत दर जोडियास टके १lll. प्रमाणे नख्त घेताति याकरिता आपला काही हाल उरला नाही तरी साहेबी मेहरबान होऊनु सालाबाद प्रमाणे आपणापासूनु ऐन जिनस जोडे च घेतले पाहिजेती नख्ताची कमावीस कुली दूरी च केली पाहिजे प्र॥ मजकूर देखील क॥ बारामतीचे कुल चाभार आपल्या हाताखाले चालेत ऐसे केलिया आपण होनु ७५ पच्याहात्तर आपल्या हकलाजिमियापैकी साहेबाचे बादगीस पेशकश करून यास सालमजकुरी होनु ५० पनास झाडा करून देईन पुढिल साली होनु २५ पंचवीस एणेप्रमाणे झाडा करून देऊनु दरीबाब सरजाम होए मालूम जाले तरी नख्ताची कमावीस साहेबी कुली दूरी च केली असे प॥ मजकुरीचा चांभारापासूनु नख्त एक रुका ने घणे सालाबादप्रमाणे ऐन जिनस पायपोसाचे जोड च यापासूनु घेत जाणे ऐन जिनस जोडे याजपासूनु घेऊनु मुकासाईयास देत जाणे आणि मुकासाईयाच्या आबिया खाले दर जोडीस टके १lll. प्र॥ नख्त लिहीत जाणे कुल चांभारापासूनु एक रुका तो हि नख्त ने घणे व प॥ मजकूर देखील बारामती कुल विलायतीच्या चाभारास ताकीद करून माल मेहतरियाच्या हाता खाले वर्तवीत जाणे हिलाहरकत करील त्यास बरजोर ताकीद करीत जाणे व याची कबुंलाती सदरहू होनु ७५ पंच्याहात्तरी यास सालमजकुरी उसूल करूनु घेणे होनु ५० पनास व पुढिले साली घेणे होनु २५ पंचवीस एणेप्रमाणे दुसाला रुकियाचा रुका झाडा करून घेणे दर हर साल ताजे सनदेचा उजूर न करणे तुह्मी तालीक लेहोनु घेऊनु असल परतोन दीजे प। हुजूर र॥ शाहा अजम हैदरशाहा मोर्तब सुद
छ १० माहे रुजू
मोहरम सुरुनिवीस