[ ४९ ] श्री. १६९७.
पूर्वी राजे थोर थोर जाहाले, त्याची नांवनिशी यादी जाविता. पादशहा झाले त्याचा तपशील पुरुष १७३ एकूण मुदती वर्षे बितपशील. ता। शके १६१९ ईश्वर नाम संवत्सरपर्यंत कली गतकली. बेरीज. वर्षे ४७७९.
तपशील
महाराष्ट्र राजे पुरुष १२० एकूण मुदती वर्षे सुमार ३६७२ |
मुसलमान पातशहा पुरुष ५३ त्रीपन एकूण मुदती वर्षे देखील औरंगशहा शके १६१९ ईश्वर नाम सवत्सरपर्यंत वर्षे ११०७ |
तपशील
राजा युधिष्ठिर व त्याच्या घराणियांतील राजे पुरुष ३० तीस एकूण
मुदती वर्षे बेरीज महिने दिवस
१८५३ ११ ८