पत्रांक ३९२
श्री (मसुदा) १७१७ आश्विन शुद्ध ३
राजश्री बाळाजीपंतनाना गोसावी यांसीः-
सकलगुणालंकरणअखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्रे।। रघोजी भोंसले सेनासाहेबसुभा दंडवत विनंती उपरी. आपणापासून कर्ज घेतले मु।। रुपये ३००००० तीन लक्ष चांदवडी. हे रु।। व सालमारीं सरकारांतून मंडले संस्थान आह्मांस दिलें त्याजबद्दल आपले कारकुनाचा ऐवज करार केला रु।। ५३५००० पांच लक्ष पस्तीस हजार चांदवडी, वि।। नारायण बाबूराव वैद्य, यांसी मुदती.
३००००० अलाहिदा खत आहे त्याप्रें। मार्गशीर्ष वद्य १
५३५००० बशर्त मंडळेयाचा अंमल बसे तोंपर्यंत नारायणराव वैद्य
यांजसी अनामत असावें. याचा फडशा पौष अखर शके १७१९ करून देऊ.
---------------
८३५०००
एकूण सदरहू दोन मुदतीस आठ लक्ष पस्तीस हजार रु।। देऊं. त्यांत पांच लक्ष पस्तीस हजार रु।।याचे अलाहिदा वराड व गोंडवण येथील आह्मीं आपले अंमलावर वराता लिहून दिल्या आहेत. त्याचा ऐवज पावेतों तेथें उपद्रव लागणार नाहीं. याप्रमाणें दोहों मुदतींनीं आठ लक्ष पस्तीस हजार रु।। क्षेपानिक्षेप श्रीरामचंद्रजीचे शफत पावते करूं.