पत्रांक ३९३
श्री १७१७ माघ वद्य ७
मसोदा गाइकवाड यांस पत्र.
विशेष. इकडील ऐवज येणे, त्यास बहूत दिवस जाहले, अद्यापि निर्गमांत येत नाहीं. पेशजी दोन तीन पत्रें पाठविलीं, त्यांची उत्तरेंहि आलीं. तथापि ऐवजाचा निकाल पडत नाहीं. हालीं कारकून पाठवावयाची सिध्धता केली असतां, राजश्री नीलकंठराव अनंत व जावजी पाटील गौळी यांचें ह्मणणें कीं, येविस पेशजी पत्रें रवाना जाहली आहेत, हालीं पत्र लिहून द्यावें, आह्मी लिहितों आणि ऐवजाचा निकाल होये तें करितों ह्मणोन, त्याजवरून, आपणांस लिहिलें आहे. त्यास इतक्यावर सत्वर ऐवजाची सरबरा होऊन यावी. येथील जाबसाल मसलतसीर, ऐवजाची निकड. या प्रसंगी लिहिल्यान्वयें अमलांत आल्यानें, परस्पर घरोबा चालत आला त्यांत अंतर न दिसोन, उत्तरोतर ऐक्यत्वाची वृध्धि राहील. याउपरी उत्तम दिसेल तैसें घडावें. रा। रावजी आपाजी व जावजी पा। येथें निर्गमांत आणून देत, ऐसें तर्तूद जरूर करविली पाहिजे.
छ २० साबान, सन सीततिसैन.