पत्रांक ३९४
श्री. १७१७
यादी सरकार भरणा यास भोंसले यांणीं ऐवज लावून दिल्हा. केशवदास याजकडून हप्ता रु।। ४३३००० पैकीं.
२००००० केशवदास यांजकडून.
२८५०० कित्ता ऐवज लावून दिल्हा त्याजबा।.
१३००० हत्ती नग दोन. ८०००।५०००
१२५०० आंगठी व बाळ्या हि-याच्या रवाना खंडो मुकुंद याजबा।.
३००० बा। नारायण बाबूराव यांस खर्चास.
------------
२८५००
४६६२॥ कर्जजमा, हुंडणावळीबा। गु।। विठ्ठलदास ऐवज रवाना केला त्याजबा।.
-------------
२३३१६२॥
ऐन भरणा सरकार.
१००००० जवाहीर दागीने तीन अन्याबा याजसमागमैं पा। ते.
५५००० पोंहोची हियाची.
३५००० आंगठी हि-याची.
१०००० स्मरणी पाचेची.
५०००० रोख हुंड्या चांदवड गु।। विठ्ठलदास.
----------------
१५००००
७५००० श्रीमंत अमृतराव साहेब यांजकडे.
२०००० कि।। चांदवड.
५५००० कि।। शिक्का गु।। विठ्ठलदास व केशवदास २५०००,
३००००
-------------------
७५०००