पत्रांक ३९१
श्री १७१७ आश्विन शुद्ध ३
याद.
९ सरकार निसबती.
१ मंडले.
१ चौरागड पंन्नास हजाराची जागीर सुद्धां.
१ दस्तावेज पहिले द्यावेत.
१ गंगाथडीचे माहाल लाऊन द्यावेत.
१ किस्त नबाबाकडील बमय कलम.
,, ,, दरबार खर्च
१ नबाबास थैली.
१ गोविंदराव कृष्ण यांस.
१ बुंदेले यांस ताकीदा.
१ भोपाळकरांस पत्र.
----------
९
६ खासगत.
१ सनदा गांवच्या ३.
१ पंचवीस हजारांचे भरतीचे गांव व स्वराज्याची माफी.
---------
२
४ खासगत जातीचे.
१ जलगांव परगण्यांत गांव इनाम वंशपरंपरा.
२ पुण्यांत.
१ हवेली राहण्यास.
१ वाडी व जमीन एक चाहूर इनाम वंशपरे.
---------
२
१ १ असामी चिरंजिवाचे नांवें सरकारची.
---------
४
---------
६