पत्रांक ५००
श्रीगणपती.
१७२१ श्रावण वद्य १
वेदशास्त्रसंपन्न राजश्री लक्ष्मीनारायण दीक्षित स्वामीचे सेवेसी:-
विद्यार्थी बाजीराव रघुनाथ प्रधान नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जावें. विशेष. श्रीचा उत्साह भाद्रपद चतुथींचा सरकारांत आहे. याजकरितां आपणास पालखी पाठविली आहे. तरी आपण सत्वर निघोन यावें. जाणिजे. छ. १८ रबीलावल, सुा मयातैन व अलफ. बहुत काय लिहिणें हे विनंती.