Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

पत्रांक ५४१

श्री.
१७२३ आश्विन वद्य २
पौ छ ११ जावल सने सलास मयातैन, भाद्रपद मास शु।। १३.

अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री रघुनाथ धोंडदेव गो यांसीः-

सेवक बाजीराव रघुनाथ प्रधान नमस्कार. सुा इसन्ने मयातैन व अल्लक. मुंबई व साष्टी वगैरे ठिकाणीं सरकार महालांतून कसाई गुरें नेऊन दुराचरण कर्में करतात. येविशींचे बंदोबस्तास जनाजी बिन विठोजी समले व रामराव मेघ:शाम कारकून यांस हुजुरून पाठविले आहेत. तरी हे कसाई व त्यांचे मिलाफी वगैरे गुरें ता। आठगांव व प्रां साष्टी येथून नेतात, त्यांची चौकशी उभयतां करून सरकारांत समजावितील. त्याअन्वयें हुजुरून आज्ञा करणें ते केली जाईल. तुह्मी येविशीं अडथळा न करणें. जाणिजे, छ १४ जमादिलाखर, आज्ञा प्रमाण. लेखनसीमा.

पत्रांक ५४०

श्री.
१७२३ भाद्रपद वद्य ५
पौ भाद्रपद वद्य ९

विद्यार्थी परशराममट धर्मांधिकारी व मल्हार रामचंद्र कुळकर्णी मोजे कायगांव सां नमस्कार विनंति विज्ञापना येथील क्षेम ता भाद्रपद वद्य ५ पर्यंत आपले कृपेंकरून वर्तमान यथास्थित असे. विशेष. +++ हालीं वर्तमान डाल–टन कंपू पलटण अमदानगर, याचा मुकाम आपले येथें जाला. दीडमास होत आला. त्यास अद्यापि कूच करीत नाहीं ! मनश्वी उपद्रवकरितां ! सरंजामाची चिठी दुसरे वेळेस केली. त्याचा मजकूर मोहगम पूर्वीचे पत्रीं लिहिला होता. त्यानें जबरी करून चिठी प्रो सरंजाम घेतला. आह्मी पंचवीस मंडळी घेऊन लष्करांत गेलो, परंतु त्याचे गांवीं कांहींहि दया नाहीं ! रदबदलीन माणूस चिठी प्रो घ्यावा ह्मणूं लागला. + ++ त्यास, आता कसेंही करून याचे सरदार कर्नेल याचें पत्र फरंगी लिपीचें आलें तर हा कूच करील; नाहीं तर हा मासपक्ष येथून उठत नाहीं. याकरतां त्याचा हरकारा व पत्र घेऊन पाठवावें. सरकार शिंदे यांचें पत्र दाखविलें. परंतु मानीत नाहीं. याकरतां करनैलाचें पत्र आलें पाहिजे. तर शिंवराची पेरणी होईल. यानें मोठी धूम केली. कुणब्याचे गरती बायकोचे आबरू एकदोघींची घेतली !! व गांवांत उपद्रव होतो. तो पत्रीं लिहितां येत नाहीं.+++++++

पत्रांक ५३९

श्री
१७२३ आश्विन शुद्ध १०
पौ छ ८ जावले सन इसने, मु कोपरगांव.

पुा सां नमस्कार विज्ञापना. हवालदार यांणीं पुण्यास पत्रें आह्मांकडेस माणसें विचा......कळवून पाठविलीं. परंतु पत्रें कोणाकडे आणि त्यांत मार काय, हें समजलें नाहीं. ऐकण्यांत श्रीमंतांस व मोरोबादादांस पत्रें लिहिलीं आहेत. हिंमतअल्ली जमादारास, बाळूमियास पत्रें लिहून हीं पत्रें त्याजकडे पाठवा, असें ह्मणत होते. मग, तो जाबसाल राहिला. मग त्यांनी आपलींच माणसें पाठविलीं. त्यास, त्या पत्राचा शोध बाळूमियाकडे करावा, ह्मणजे समजेल. त्यांणी आपल्या श्नेहितांसी पत्रें लिहिलीं असतील, त्याचाही शोध करावा, सनगांविशी लिहिलें होतें. त्यावरून हल्लीं मजुरदारावरून धोत्रजोडे पाठविले आहेत त्याची याद अलाहिदा आहे. यादीप्रमाणें पावलियाचें उत्तर पाठवावें. मातुश्री लक्षुमीबाईकडे तीन हजारांचा नेट लाविला आहे. परंतु, उरफाट्या गोष्टी सांगतील. सोईस येत नाहीं. लक्षुंबाईची प्रकृत परम अवघड, आपणास परस्परें ऐकून माहितगारच आहे. आजपर्यंत किल्यांत होती. आह्मी आंत आलियावर बाहेर पुसोन गेली...तात्या व मी एकत्र होऊन ऐवजाचा साबसाल करणें, तें बाहेर गेलियावर यांचें त्यांचें बोलणें जाहलें. सर्वांच्या मतें संध्यां तीनहजार रुा। बाईनें द्यावे. बाई कोणाचेंच ऐकत नाही! येविशींचा मजकूर पेशजींच्या पत्रीं लिहिलें आहे. उत्तर येईल त्याप्रो करीन. गांव व किल्लां गाद्याचा त्रास करितो. मग, वाम कां करितात, हें न कळे. याची चवकशी तुमची तुह्मीं करावी. आह्मांस चवकशीचें ज्ञान नाहीं. यास्तव बाईस व तात्यांस पुणियास आणविल्यास पा देतों. आपलें व त्यांचे विचारें होईल तसें करावें; व किल्याच्या बंदोबस्तास कोण विश्वासूक असेल तो पा। काम मोठें. प्रामाणिक, एकामी, जातीचा पाहून पाठवावा. त्याचे स्वाधीन किल्ला करून, आह्मी पुणियास येतों. कुसाजी पेशक हुज-या पाठविलात. त्याप्रमाणें येथें येऊन आमचे रजेतलबेंत राहून सांगितल्याप्रों वर्तणूक करून कार्यसिद्धी केली. माणूस बहुत चांगला. प्रसंगाने कळतें. कुसाजीविशीं पेशजीं लिहिलेंच आहे. लिहिल्याअन्वयें हवालदारांचें काम याजकडेस जाहल्यास, दादा! बहुत सुख पावाल, ह्मणोन लिहिलें आहे. युक्तीस येईल तसें करावें. आमचा आग्रह कोणती गोष्टीचा नाहीं. गार्द्यांची चौकशी आह्मांस करा ह्मटल्यास, आह्मी साफ करणार नाहीं. मागें, अंबूनानाच्या चौकशीस आपण पाठबीत होता. परंतु आपण कबूल केलें नाहीं. यास्तव, हालीं करणें तें समक्षच करावें. येथें कारकून मंडळी आहे. त्यांत बुधवेव्हार हशमनीस, कोणाच्या तंट्याबखेड्यांत व लोभांत अगदीं नाहींत. बापूराव बापट कामकाजाच्या उपयोगी मात्र आहेत. पुढें हि बाबूराव उपयोगींच पडावयाचे. शाहणा माणूस, दमाचा, प्रामाणिक आहे. इतर सारे रोजगारेच आहेत ! रोजगार करावासा वाटतो. धन्याचें हित हो अगर अनहित हो, त्याची काळजी त्यांस नाहीं ! रामचंद्र लळतो, रामचंद्र मरसि, रामचंद्र भिकाजीपंत जवराचा (!) मेहुणा व्यंकपा च्यार असामी कोणत्याहि उपयोगाचे नाहीत. दरमहा पैका कोठून द्यावा ? पैक्यास ठिकाण नाही. यास्तव च्यार असामीस सध्या निरोप देण्याविशीं पत्र पाठवावें. काडीचा उपयोग नाहीं ! राजश्री दाजीबा गर्दै यांचे तीन आहेत, आप्त ह्मणोन चालवावें खरें. परंतु यजमानाचें हित करावयाचें ज्ञान नाहीं. आणि बळवंतराव याजकडे जाऊन आमचेंहि अनहित इच्छितात ! असो ! याउपर आमचे नांवें पत्र पा कीं, दाजीबाचे स्वार सध्या पैक्याच्या वाढीमुळें दूर करावें, पुढें ठेवावयास येतील. ठेविले असतां कामास येणार नाहीं. ह्मणोन अलाहिदा पुरवणी दाखवावया उपयोगी लिहाव्या. असाम्यांची वेगळी स्पष्ट लिहून पा म्हणजे असाम्यां बंद घालितों. याउपर पुढें बारीक...... टें समजेल तें लिहून पाठवितों. उत्तर येईल, त्याप्रों करावयास येईल. मृगापासून आजपर्यंत पर्जन्य आठप्रहर नित्य पडतो. शेतें गेलीं. सध्या धारण अडीच पायलीची च्यार महिनें जाहाली आहे. माहागाईमुळे सिबंदीचा रोजम-याचा नेट विशेष होतो. त्याचाहि उपाय नाहीं. गांवांत खर्चामुळें पेशजीं पट्टी करीत होतों. परंतु बखेड्याने गांवांतहि बखेडा होऊन पैंव व रयत पळून गेली. तेव्हां स्थलपत्र जांबेटकरांस देऊन गांवावर आणिलें. हालीं किल्यांत बखेडखोरांस बेड्या घातल्या. हे वर्तमान कोष्टयांनीं ऐकून सलाबत खादली कीं, आह्मीं बखेडा केला होता, पुढें आमचें पारपत्य ऐसेंच करतील. यास्तव दोन च्यार असामी जाबीटीस गेले आहेत. आह्मी तो पट्टीचें नांव घेतलें नाहीं. किल्याप्रकरणींच बंदोबस्तास गुंतलों, त्याची त्यांणीच कांक्षा घेऊन गेले आहेत. वरकड सारे गांवातच आहेत. जाहालें वर्तमान लिहिलें आहे. याऊपर आह्मीं आपले तर्फेनें दिलदिलासा देऊन, गेले त्यांस आणवितों. सारांष.........साधन करावयास जावें तो मसक ( ? ) साधत नाही. अशा गेष्टी किल्याच्या एका बखेड्यामुळें जाहल्या आहेत. कच्चें वर्तमान लिहिलें आहे. कळावें, सेवेसीं श्रुत होय. हे विज्ञप्ति.

पत्रांक ५३८

श्री.
१७२३ श्रावण वद्य ५
पो भाद्रपद शुद्ध १ शके १७२३.

श्रीमंत वेदशास्त्रसंपन्न महाराज राजश्री तात्यासाहेब स्वामीचे सेवेसी:-

विद्यार्थी यशवंतराव दत्तात्रय व नारायणराव बाळकृष्ण कृतानेक सां। नमस्कार विनंती उपरी येथील क्षेम ता। श्रावण वा। पंचमी शुक्रवार जाणून स्वामीचे आशीर्वादंकरून स्वस्थ क्षेम असों. विशेष. कृपा करून आशीर्वाद पत्र श्रावण शुद्ध सप्तमीचें मुजरद हरका-याबराबर पाठविलें तें वद्य तृतीया बुधवारीं संध्याकाळी पावोन दर्शणातुल्य लाभ जाला. मासलाबतखां बहादूर व सुभान खांबाहादूर सहसैन्य साता-याचे शिवारांत उतरले आहेत. शेतांमळ्यांस व गांवास फर्मायश आदिकरून उपसर्ग फार होतो. यास्तव उभयतां सरदारांचे नांवें येथून निक्षून ताकीदा पाठवाव्या. या प्रकरणीं कृपासागर राजश्री राजे रघोत्तमराव राजेंद्रबाहादूर यांसही आपण पत्र लिहिलें. आज्ञेप्रमाणें राजेमवसुफांस समक्ष सविस्तर निवेदन करून, उभयतां सरदारांच्या नांवे निक्षून ताकीदपत्रें, यथास्थित काडीमात्र उपद्रव शिवारांत व गांवांत न व्हावा व हरएक साहिता करीत असावी. श्रीमंत पंतप्रधान याचें गुरुस्थान व याही राज्यांत यांची मान्यता विशेष आहे, ऐसें बहुत अगत्यवादेंकडून लिहिलें असे. इतपर कोने गोष्टीचा उपद्रव होणार नाहीं. ती IराI यादवरावबाबा यांहीं पत्रीं एतद्विषयीं आह्मांस बहुत लिहिलें. ऐसियास, आह्मीं आपले आज्ञांकित प्रसंगानरूप यथानशक्त्या जे सेवा घडेल ते थोडीच जाणतों. राजेंद्रबाहादराचे पत्राचें उत्तरही सेवेसी पाठविलें असे. उभयतां सरदारांस पत्रें पाठविलीं त्यांचा मसविदा या पत्रांत पाठविला आहे. श्रवणगोचर होईल. बहुत काय लिहिणें ? कृपा लोभ असो दिजे, हे विनंती.

पत्रांक ५३७

श्री
१७२३ भाद्रपद शुद्ध प्रारंभ
पौ छ ८ जावल सन इसन्ने, मुा। कोपरगांव.

पुा सां नमस्कार विज्ञापना, पाछापूरचें सांप्रत वर्तमानः सरजेराव घाटगे यांजकडून आपा देसाई निपाणकर याजकडे सांगितलें आहे. आपा देसाई याजकडून निळकंठराव ह्मणोन कमावीसदार आहेत. निळकंठराव, लिंगो केशव व बापू देशपांडे यांचे आप्त आहेत. देशपांडे व कमाविसदार एकलक्षानें चालतात. देशपाड्यांचे व शेखमिराचें वांकडें. तेव्हां देशपांड्यांचें राहणें प्राछापुरी होईना. यास्तव, शेखमिराचें पारिपत्य करावें हा सर्वांचा मानस, यास्तय, दोन हजार लोकांचा जमाव केला. शेखमिरास कळलियावर पहिले चारपांचशे लोक त्याजवळ होतेच. हालीं शैदोनशें नवे ठेऊन यांची त्यांची नवी लढाई झाली ! पहिले लढाईस शखमिरा कचकरला. दुसरे लढाईस निळकंठराव कचरले. यामुळें देशपांडे मंडळी देवजीरुद्रसुद्धां पळून गोकाकेस गेला, दाहावीस माणूस ठार जाहाले, एकादोघांचीं डोकीं मारिलीं. एकास तीरमार करून मारिला, पांच साहा आ कारकून अंकल्याच्या ठाण्यांत कमावीसदाराकडून होते, ते धरून नेले. ते जिवानिशी मारणार ह्मणून बोली आहे. मग यापुढें काय करील नकळे. सांप्रत कित्तूरकर तीनच्यार हजार जमावानिशीं शेखमिरास सानुकूळ जाहाले आहेत. तेव्हां ( बंड १ )++++++ मोठेंच जाहलें. दाहापांच हजार फौज व तोफा ( येऊन ? ) + जांबेटी व कित्तूर व शेखमिरा याचे पारपत्य करतील तेव्हां वस्ती होईल, झाडून तालुका उज्याड, पुंडावा मांडिला आहे. तुह्मी पाछापूरची सनद पाठविणार, तेव्हां सनदेनें अमल बसविणें अर्थ नाहीं. सनद निघाल्यास फौज इकडे येणार, त्यास, सरकारांतून ताकीद करवावी कीं, पाछापूरचें ठाणें खर्च न घेतां बसऊन द्यावें. नाहीं तर, उगीच सनद घेऊन सरकारचा उपकार कामाचा काय ? यामागें परशरामभाऊ मिरजकर यांची फौज या प्रांतीं राहून संस्थानिकांचीं पारपत्यें सालास करीत होते. अलीकडे या प्रांतांत दाब अगदींच नाही, याप्रों जालें आहे. आपणांस कळावें. ह्मणोन लिा आहे. शेवेसीं श्रुत होय हे विज्ञप्ति.

पत्रांक ५३६

श्री.
१७२३ श्रावण शुद्ध ११

पौ छ ८ जावल सन इसने मयातैन, भाद्रपद मु।। कोपरगांव.

शेवेसी लक्ष्मण आपाजी सां नमस्कार विज्ञापना तागायत छ ९ रारवर पावेतों वर्तमान यथास्थित असे. विशेष. ठाणसिंग याजबरोबर पत्रें, किल्यांत बाहेरील झाडून मंडळी लोकसुधां आंत आल्याचें वर्तमान लिहून पा, त्यावरून सविस्तर कळलेंच असेल. महत्कार्य जाहलें ! किल्ला हस्तगत होणें दुरापास्त होतें. परंतु आपले पुण्यप्रतापें कार्य सिध्धी जाहली. अलीकडील वर्तमानः जोतिबा निंबाळकर याजकडेस मोठाच अपराध, याजकरितां पायांत बेड्या घालून कैद केला. व ह्माकोजी ना नांदगीकर व गोंदजी व दादजी ना पेडणेकर, येकूण असामी तीन यांसीं बेड्या घातल्या. व लछीराम याचा भाऊ आनंदराम यास बेडी घातली. सदर्हू पांच असामींस बेड्या घातल्या. शिवाय गोपाळराव बेड्याशिवाय कैद करून ठेविला आहे. बाकी मोठ्याच अपराधाचे च्यार आ सुलतानराव, शिव सावंत, गणोजी वाघ, गणोजी बोरकर मोकळेच सध्या आहेत. त्यास, याचेपुढें कसें काय करावयाचें, त्याविशीं सरकारची आज्ञा घेऊन लिहून पाठवावें. आज्ञाप्रमाणें पुढील कर्तव्य करुं. काल श्रावण शुद्ध १० दशमीस लोकांची हजिरी घेतली. गयाळ असामी बाद घातली. व दोषी पंचवीस तीस असामी दूर केली. आणखी पंनाससाठ आ बदलावयाची आहे. ती एकदमच बाद घालू ह्मटल्यास, ठीक नव्हे. पुढें सोईसोईनें जसें जसें दिसेल तसतसें करूं. बाहेरील सवाशें लोक रायचंद, जुमारामबकस व बारगीर, गोलंदाज व किरकोळ आह्मांजवळ चौकी पाहा-यास आहेत. जिभींत पंनास लोक आरबांचे आहेत. दुर्गाडींत जुमाजमादार पंचवीस लोक सुधां आहेत. बाकी शंभर लोक देहुडी व कचेरी मिळोन आठ प्रहर जवळ असतात. किल्यांतील ब्राह्मण सरदार याचे लोक व भंडारमंडळ व सजणाजीराव यांची अनुकूळता पक्केंपणें आहे. याउपर किल्याविशी आपण किमपि काळजी न करावी. सुलतानराव यांचे वळण * बाळाजीपंत पटवर्धन याजकडे आहे. सध्या दरबारीं चाल बाळाजी पंताची. यास्तव पारिपत्य तो मोठेंच केलेंच पाहिजे, यास्तव सरकार परवानगी घेऊन उत्तर पाठवावें. त्या प्रमाणें करू शेवेसीं श्रुत होय. हे विज्ञापना.

पत्रांक ५३५

श्री.
१७२३ श्रावण शुद्ध ७
पो पत शु।। ७ शके १७२३

राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री व्यंकट रावजी स्वामीचे सेवेसी:-

पो आबाजी नीळकंठ सां नमस्कार विनंति. येथील कुशल तागायत श्रावण शुद्ध ७ पा। वर्तमान यथास्थित असे. विशेष. आपण एक दोन वेळां पत्रें पाठविलीं ती पावलीं. गांवाविशीं लिहिलें. त्यास, राजश्री तात्याकडून अजुरदार आला. त्याजबा पत्र येथून पा तें पावलेंच असेल. येथून कारकून रा बाळाजी गोपाळ मुजरद सेंदव्यास पाठविले. त्यांणीं होळकर याची व पाराजी पंत-बाबा यांची भेट घेऊन गांवचें वर्तमान सविस्तर सांगितलें. नारोगणेश यांचे चिरंजीव यांचीहि भेट घेतली. त्याणीं उत्तर केलें कीं, हे गांव वाघाचे इनामी आहेत. राजश्री येशवंतराव होळकर यांणी तुळसाजी वाघ यांस दत्तपुत्र देऊन सरंजाम त्याचा त्याजकडे सांगावा, असा करार केला आहे. तेव्हां इनामगांव जरी सरंजाम न दिल्हा तरी हे गांव त्याचे त्याजकडेस देणें प्राप्त. त्यांत रदकजीस नेमून भिडेस्तव..........कर यांस कर्ज लाखों देणें आहे. तेव्हां गोष्ट घडत नाहीं. गांवची मोकळीक होणें कठीण. ज्यांचे भिडेस्तव गांव दिल्हे ते पुण्यास राहिले. याप्रमाणें उत्तरें जालीं. काशीराव होळकर निघोन महेश्वरास गेले. याप्रा वर्तमान आहे. पुढें कर्तव्य तें करून कार्य होय तो अर्थ करावा. राजश्री भिकाजीपंत तात्या प्रसंगी असते तरी कांहीं साहित्य करिते. ते पुण्यांत राहिले, तेव्हां गोष्ट विलग पडली. आह्मांकडील वर्तमान तरीः इतके दिवस शिंदे याजकडील उपद्रव होऊन माहाल लुटले गेले. त्यास हाली शिंदे याजकडील फौजसुद्धा पारनर्मदा जाहाले, सरजेरावहि तापी उतरून गेले. शिंद्याकडील उपद्रव येशवंत होळकर इकडे येऊं देत नाहीं. परंतु जिवाजी यशवंत दहा हजार पायदळस्वारांनिशीं वोशागडाहून उतरून मोठा दंगा मांडला आहे. त्यामुळें गांवें बेचिराख, घरें दारें जाळून मोकळीं केली.
पुन्हां दंगा.........जाईल असा अर्थ ठेविला नाहीं. असो.... अखेर श्रावण येतों. भेटीनंतर सविस्तर कळेल कीं, पहिला आहे तोच आहे. कळावें. बहुत काय लिहिणें ? लोभ करावा. हे विनंति.

पत्रांक ५३४

श्री.
१७२३ आषाढ वद्य १२

यादी नारायण बाबूराव वैद्य यांस नागपुरास कामगिरीस पाठविलें. त्यास, इा छ २९ मोहरम सन मयातैन ता मोहरम अखेर सन इहिदे मयातैन पावेतों मारीनेलेच गुा तीची जमाखर्चाची यादी अलाहिदा आहे. त्या यादीस शिलक निघाली आहे. तें सुा इसने मयातैन व अलफ.
रु।
५८६८।।
रु।
यासीं खर्च
३३६४ बाबूराव विश्वनाथ वैद्य यांस पेशजी
नागपुरास भोंसले यांजकडे पाठविलें होतें. त्या जबराबर सरकारचे खासबरदार व उंटें वगैरे होतीं त्यांस इ। छ २८ रो वल सन इहिदे तिसैन ता छ १६ जिल्काद अखेर साल सन खमस तिसैन पावेतों खर्च जाहला तो बा। यादी देवावयाची. छ १६ जिल्हेज सन सबा तिसैन विा। परशराम रामचंद्रः-

रु। ३४२०

पैा वजा खासबरदार दिा हाय यास तैनाते प्रा एक माही कापड आख पावावयाचें त्याबा दर रु। चार आख प्रों नक्त ल्याहावें. ते अडीचपटप्रा नक्त खर्च लिा आहेत त्यास, नक्त चौपट प्रा किंवा अडीचपटप्रा द्यावयाचे याचा दफ्तरचा दाखला निघेल त्याप्रा पावावयाचे. सबब वजा रु।

१०।। जाजी निकम दिा। धारोजी भिकरे.
४५॥ दिा सोमाजी जाधव.
११॥ कृष्णाजी लोढा.
११॥ लंबाजी खांडेकर
११॥ हैबतजी भोसला.
१०।।। नरोजी यादव.
------
४५।
------
५६

बाकी रु।

२५०४॥ नारायण बापूराव वैद्य कामगिरीस
नागपुरास पेशजीं गेले होते. त्याजबद्दल खासबरदार व उंटें सरकारांतून दिल्हे होते. त्यांस इ। छ १७ जिल्काद सन सीततिसैन ता। छ २९ जिल्हेज सन तिसा तिसैन अखेर साल पावेतों खर्च जाहला तो वा याद देण्याची छ १ रो वल सन मयातैन रु। ४५३०
पैकीं रु।।
--------
५८६८।।

नारायण बाबूराव वैद्य यांस रघोजी भोसले सेनासाहेब सुभा यांजकडून ऐवज पावला. त्या पौ पांच हजार आठशें साडे आडसष्ट रु। शिलक राहिली ते जमा धरून सदरहू यादी प्रा खर्च लिहून जमाखर्च करणें.

छ २४ रो वल आषाढ मास सन इसने मयातैन. जमाखर्च करणें.

पत्रांक ५३३

श्री.
१७२३ आषाढ वद्य ३
पैवस्ती आषाढ वद्य ५ बुधवार.

श्रीमंत राजश्री नानाजी स्वामीचे सेवेसी:-

विद्यार्थी परशराभमट धर्माधिकारी सां। नमस्कार विनंती विज्ञापना ता। आषाढ वद्य ३ मंगळवार प्रहर दिवसपर्यंत वर्तमान यथास्थित असे. विशेष. रा सर्जेराव बापू घाटगे यांचे कूच कालच होणार होतें. परंतु कांहीं आरबांचे तंट्यामुळें काल मुकाम जाला. कालच मोठें विघ्र होतें. बावनपागे यांचे भांबड होतें. अरबांसी व त्यांसी कटकट लागली होती. सेवटीं अरबांनीं रु। घेऊन आपले जबरीनें रात्रीं निघून गेले. आज रा सरजेराव बापूंचेंही कूच करून सेंदूरवाधेयास मुकामास गेले. वरकड सविस्तर वर्तमान लिहून पाठऊं, बहुत काय लिहिणें ? हे विज्ञापना.

पत्रांक ५३२

श्रीगजानन,

१७२३ आषाढ वद्य ३
पैवस्ती आषाढ वद्य ५

विद्यार्थी गोपाळभट दामले सां नमस्कार विनंती येथील क्षेम ता आषाढ वद्य ३ मंगळवार, दीडप्रहर दिवस, पावेतों यथास्थित असे. विशेष, सर्जेराव घाटगे फौजसुद्धां कूच करून आज सेंधूरवाद्यास गेले. कूच कालच होणार होता परंतु आरब चाकरीस होते, त्यांची तलब चढली होती, सबब अडून बसले. नंतर तहरह होऊन, तलबेचा फडशा करून दिल्हा आणि रुकसत केले. याजमुळे काल राहिले. आज फौजसमेत गेले. गांवांतून बेगारी माणसे पंचवीसतीस गेले आहेत. मळ्यांतील सालवकडबल वांचलें. सर्व ईश्वरकृपेनें व कैलासवासी नानांचे पुण्यप्रतापें करून पार पडलें, जात्या दुष्टच ! याचा विश्वास आबालवृद्धांस नवता परंतु श्रीरामेश्वरकृपेनें पार पडलें ! बैल साता-यास आहेत, ते उदईक चंद्रोदई तेथून रा। करावयासी आज्ञा व्हावी, ह्मणजे येथें च्यार घटका दिवसास पावतील. +++ हे विज्ञप्ती.