Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५३१
श्री.
१७२३ आषाढ शुद्ध ७
श्रीमंत राजश्री नानाजी स्वामीचे सेवेसी:-
विद्यार्थी परशरामभट धर्माधिकारी सां नमस्कार ता। आषाढ शुद्ध ७ भृगुवार प्रहरदिवसपर्यंत वर्तमान यथास्थित असें. विशेष. काल आपणाकडे पत्र पाठविलें. त्यावर दोंप्रहरा रा सरजेराव घाडगे यांची स्वारी प्रवरासंगमीं दाखल जाली. अगोदर कंपू पुढे आला. त्याची कही प्रवरासंगमांत गेली. त्यांनीं लाकूडफांटा वगैरे फार गर्दी केली. पांचच्यार घरें झोंबाडले. दोंचव घरची पांघरुणें, भांडीं, वस्तभाव वरचेवर हातीं लागले ते नेली. त्यावर खांसा स्वारी आलियावर, चाळीस तुरुक स्वार रखवालीस देऊन, कहीं मारून काहाडली. नंतर वो रा। बाळंभट आपाचे भेटीस गेले. भेट घेऊन हात जोडून उभा राहिला कीं, तुमची आज्ञा होईल तर बसेन. मग आपा बसा ह्मणाले, तेव्हां बसला. भोजन आपांचे घरींच जालें. त्यावर आपानीं सांगितलें कीं, कालेगांवास गंगा उतरावयास जावें. नांवाहि दोनच्यार तिकडेच आहेत. तेव्हां, त्यानें कबूल तर केलें. व लखमापूर, वरखेडे, कायगांव टोंके, प्रवरासंगमास पांचागांवास काडीमात्र उपसर्ग न करणें. तेव्हां त्यानें कबूल तर केलें. परंतु कंपूचा आग्रह आहे कीं, याचघांटें उतरावें. नावाहि सावखेड्यापर्यंत काल आल्या, ह्मणोन बातमी आहे. पुढे रामडोहाचे खडकावरून नाव चालत नाहीं. आज पाणीहि दोन हात उतरलें. त्यापक्षीं नाव तर खडकावर चढणारच नाहीं. मग नाववाल्यांनी युक्तीनें चढऊन आनलियास उपाय नाहीं. परंतु बहुतकरून कालेगांवास जाईलसें दिसतें. परंतु कंपूचा आग्रह आहे. अलीकडे उतरल्यास फार खराबा करतील. काल प्रवरासंगमकरांस शंभर रुो खर्च पडला. शिवाय, तुरुक स्वारास चाळीस रुो पडले, ते सरजेरावानें आपले जवळून दिल्हे. पुढे येथेंच उतरावयाचा बेत जाला, तर सर्वांचे मानस कीं, दोन तुरुक स्वार आणावे. + + + आज पलीकडे सहश्रभोज्यन करणार. दोनतीन मुकाम आहेत. मागाहून नवल विशेष वर्तमान जाल्यास लिहून पाठऊं. + ++ गांवातील लाकूड व......पूल तोफांस नांवेंत घालायाकरितां नेतील. धूमहि करतील, परंतु आपण चिंता न करावी. उतरणें फार करून येथें होईल.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ३६ १६२९ फाल्गुन वद्य १०
राजमंडळ
दि॥ मजमू
रोजकीर्द
सु॥ समान
माहे जिल्हेज छ २३ रोज
सरंजाम दिमत राजश्री जयसिंग जाधव
सेनापति
बार
सरकार परंडे कित्ता माहाल
१ पा। पानगाव १ पा। बेदवडी
१ पा। वांगी प्रा। खानदेश
१ मौजे सावरगांव १ पा। लातूरवाट
देखील हवेली प्रा। पैठण
रुजू सावरगाव १ पा। खुलदाबाद
कसबा प्रा। दौलताबाद
------- ---------
३ ३
सदरहू सनदा छ २३
कित्ता सनदा जिलकाद
१ पा। आंवढा सरकार
वासिंब
तो।
१ मौजे बाभुळगाव ता। माहाल ता।
पेडगांव प्रा। कडेवळित २ १
तानको आत्माजी यास ३ १
मुकासा १
--------- ------- -------
२ ६ २
सदरहू सनदा छ २३
जिलकाद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५३०
श्री.
१७२३ आषाढ शुद्ध ४
विद्यार्थी गोपाळभट दामले सां नमस्कार विज्ञापना ता। आषाढ शुद्ध ४ मंगळवार पावेतों क्षम असों, विशेप, पत्र पाठविलें तें पावलें. सरजेराव महादुष्ट ! कायगांवचे मार्गे आल्यास विश्वास नाहीं ! या अर्थी सातारियाहून भांडीं वगैरे आलीं तीं व कायगांवची भांडीं रा। करावीं व एक मजल मागेंच आहे तो गुरें रवाना करावीं, ह्मणोन लिहिलें. ऐसियास, सरजेराव काल पावेतों जामगांवींच होता. नेवासें वगैरे महालची चुकोती सोनईस बाणाजी शेट्ये याजकडे ठरावयासी सांगितली. त्याजवरून नेवासें वगैरे माहालची खंडणी पंचवीस हजार का ठरले ऐसें परस्परें वदंतेनें ऐकतों. गांडापुरीहून बाळाजी येशवंत यांचे कनिष्ट चिरंजीव गेले आहेत. तिरस्थळीचे बोलणें जाल्यास सोईचें पडेल. याप्रों पत्र सोनईहून काणी गृहस्थानें प्रवरासंगमीं पाठविलें. त्यावरून टोंकेकर व प्रवरासंगमकर व आपले येथील गणोबा धर्माधिकारी सिदू गाईकवाड सोनईस गेले आहेत. तेथील बातमी आज सायंकाळपावेतों येईल. त्यावरून कुचमुकामाचें वर्तमानहि समजेल. कोणत्या मार्गे जावयाचा रोंख, हेंहि समजेल. त्याअन्वयें आज्ञेनुरूप वर्तणूक करावयासी येईल. बहुधा नेवासें व गांडापूर या महालाची चुकोती जाली, त्या अर्थी आपलाले माहाल चुकऊन बेलापुराहून मार्ग निघाल्यास काढतील, असें भासतें. याऊपरे न कळे, + + + हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५२९
श्री.
१७२३ आषाढ शुद्ध २
श्रीमंत राजश्री नानाजी वडिलांचे सेवेसी:-
अपत्यें विनायकाचा सा। नमस्कार विज्ञापना येथील कुशल ता। आषाढ शुद्ध २ पो वडिलांचे आशीर्वादें यथास्थित असे. विशेष. येथें सर्जेराय याचे दंग्यामुळें लोक भयभीत * झाले आहेत. आपले पुण्यानें ईश्वर काय पार पाडील तें खरें ! बहुत काय लिहिणें ? लोभ करावा. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५२८
श्री.
१७२३ आषाढ शुद्ध १
श्रीमंत राजश्री नानाजी स्वामीचे शेवेसीः-
विद्यार्थी परशरामभट धर्माधिकारी सां। नमस्कार विनंती विज्ञापना येथील कुशल ता। आषाढ शुद्ध १ परियेंत आपले आशीर्वादेंकरून वर्तमान यथास्थित असे. विशेष. या सरजेराय घाटगे जामगांवास आले. हें दृष्टीनें माणसें पाहून आलें. बहुतकरून इकडूनच जावयाचा बोलवा आहे. काल प्रवरासं. गमकरांचें पत्र आलें कीं, आमचे येथील च्यार ब्राह्मण जामगांव पावेतों जातात, तुह्मांकडील कोणी पाठवा. त्यावरून दोघां चवघांस विच्यारलें. परंतु काणी जावयास सिद्ध होईना. मग चिरंजीव गणोबा आज पाठविले. ते आज प्रवरासंगमींच राहिले. उदईक तिरस्थळी मिळून दाहापांच ब्राह्मण जाणार, वौ। शास्त्रसंपन्न रा। शास्त्रीबावाही पुण्याहून उदईक जाणार, याप्रमाणें वर्तमान आहे. सरजेरायाची आवई इकडून जावयाची फार आहे. वाटेनें मोठा धूम करतो ! कदाचित् इकडून आला तर च्यार रुपये खर्चवेंच पडला, तर कैसी तजवीज करावी ? येथील विचारें तर सर्व ध्यानांतच आहे. त्यास, जैसी आज्ञा येईल तैसी वर्तणूक केली जाईल. श्रीमंत अमृतराव साहेबही सातळपाथळेयावर पुणतांब्याचे सुमारें आले आहेत. इकडे सुभानखाही सेवगांवचे ल (ग) त्यास आहेत. याप्रमाणें वर्तमान आहे. पुढें होईल तें लिहून पाठऊं. दुसरे पुण्याकडून जरीपटका वगैरे पांचच्यार हजार फौज गारदौंडची नदी उतरून यांचे मागें आले. श्रीमंत मोहोर्तानसीं बाहेर निघाले ! डेरा गारपिरावर दिल्हे. पुढें विशेष वर्तमान आढळल्यास मुजरत लिहून पाठऊं. हे विज्ञप्ती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५२७
श्री. नकल.
१७२३ ज्येष्ठ शुद्ध ३
वेदमूर्ती राजमान्य राजश्री परशरामभट नाना व समस्त ब्रह्मण क्षेत्र प्रवरासंगम स्वामींचे सेवेसी:-
सेवक त्र्यंबकभट सभारंजक मुा। वैजापूर सा नमस्कार विनंती उपरी येथील कुशल ता। जेष्ठ शुद्ध ३ दोनप्रहरपावेतों मुकाम मजकुरीं सर्व मंडळी कुशलरूप असों. विशेष. आपणापासून स्वार जालों ते मुा मारीं दोनप्रहरीं पावलों. यानंतर लष्करचें वर्तमान तरी फत्तेसिंग माने यांची फौज आठ हजार आंपरखुल येथें आहे. मोंगलाईंत कांहीं उपद्रव नाहीं. शिंदे यांची ठाणीं उठोन आपलें ठाणें बसवितात. वेरुळाकडे दोनतीन हजार फौज ठाणें बसवावयासीं गेली आहे. तिचा शोध करून बनलें तर वेरुळाकडे होऊं. इकडील फौज तूर्त कांहीं आपल्याकडे येत नाहीं, वेरुळाकडील बातनी राखीत जावी. धामधूम विशेष कांहीं दिसत नाहीं. एखादें पत्र जोख्यास पाठवावें. तिकडोन बंदोबस्त जाल्यास उपयोगीं पडेल. आपल्याकडील सविस्तर वर्तमान ता। लिा। पाठवणें. स्वस्थ असावें, कळावें. बहुत काय लिा ? कृपा लोभाची वृधी करीत जावी. हे विनंती.
ता।, हेंच वर्तमान टोंक्यास कायगांवीं पावतें करणे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५२६
श्री.
१७२३ अधिक ज्येष्ठ वद्य १२
शेवसीं विनंति. सेवक सदाशीव आपाजी चरणीं मस्तक ठेऊन शिरसांष्टांग नमस्कार विज्ञापना ता। अधिक वद्य द्वादशी मुा। अष्टें स्वामीचें कृपेंकरून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष, अधिक पौर्णिमेचें पत्र स्वामी से लिहिलें आहे तें पावलेंच असेल. येथील मार तर: मिरखां याचा भाचा जमशेरखां व शामहमदखां पठाण यांणीं अक्रा हजार रुो खंडणी घेऊन आणि माहालापासून गांव गांव खंडणी करून पंधरा वीसपर्यंत ऐवज नेला. देवीपु-याचे जवळ जाऊन काम करून गांव जाळून टाकला. खंडणी यजद माहालची ठरली होती, तिचा ऐवज पाठविला. शिवाय आणखी ठेऊन घेतला असतां नेल्या आहेत, सोडूं देत नाहींत. माहालची खराबी बहुत केली. लावणीचे दिवस. एक एक या गांवचे निस्त्रुक बैल एक राहिला नाहीं. दाणा वेगळे गेले. रयतेची या वेळेस बहुत खराबी जाली. खातरजमा करीत आहेत. काय लावणी होईल ती खरी. पेंढारी यांचे स्वार त्याचे फौजेंतूनच कांही माहालांत रखवालीस चालीस आणिली आहेत. पेंढारी यांचे फौजेचा जमाव बहुत जाला आहे. मीरखान यांचीं व होळकराची पत्रें त्यास अणिलीं. परंतु खातरेंत पत्रें ठेविनात व धूम मनस्वी करू लागले. याजकरितां त्यांसी बोलावयाकरितां येथून मीरजीस सो बापूजी गोविंद कमाविसदारांनी पाठविले होते. त्यास कांही ऐवज द्यावा असें ठरऊन स्वार च्याळीस माहालांत रखवालीस आणले आहेत. ऐवज ठरला तो आपणास समजला नाहीं. किती ठरला असेल ती लिहून पाठवीन. सुज्यालपुरचें वर्तमान रो बाबूराव बाबांनी लिहिलें आहे. सविस्तर कळेल. जमशेरखां पठाण याची फौज शिकारपुर परगण्यांत गेली. त्या वेळेस येथून पागे, गांवशिबंदी, सवार कसब्याकडे पाठविलीं. पांचच्यार दिवस तेथें सरंजाम राहिला. पुढें फौज निघून देवीपु-याकडून गेली. शैवसीं विनंती. सेवक सदाशिवचरणीं मस्तक ठेऊन शिरसा नमस्कार विज्ञापना. शिबंदीची रवानगी अष्टयास तेथून माघारी केली. गगा दोंतीन दिवस राहिली. तेव्हांच ही रो रामराव आपाजी देईनात. ह्मणों लागले. *
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५२५
श्री.
१७२३ वैशाख शुक्ल १०
वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री नाना दीक्षित स्वामींचे शेवेसी:-
विद्यार्थी गोविंद भिकाजी गडबोले कृतानेक सां। नमस्कार विनंती येथील कुशल ता। वैशाख शुद्ध १० पर्यंत आपले कृपेकरून मुक्काम कसबें पुणें येथें सुखरूप असों. विशेष. आह्मीं पैठणाहून सडे होऊन निघलों तो चैत्र वद्य एकादशी गुरुवासरी सुरक्षित पावलों. मार्गी पेंढारी वगेरे यांचे दंगे पूर्वी होते ते निवारण जाहले. इतक्याकरितां मार्गाची निभावणी निर्वेध जाहली. पानशे व पुरंधरे फौजेसहीत वाळकीच्या समोर होते. त्यांचा उपद्रव कहीचा मात्र वरकड किमपि नाहीं. +++ आतां दिवसेंदिवस सुबिता दृष्टीस पडत चालली आहे. पेंढार वगैरे खानदेश प्रांती गेलें, आतां सरकारची मात्र फौज पारनेराजवळ आहे. +++ विठोजी होळकर, येशवंतराव होळकर यांचा बंधू. हजार दोन हजारांनिशीं निराळा फुटून, मुलखांत दंगा बहुत केला. गांवचें गांव उज्याड पाडिले. परंतु हल्लीं धोंडोपंत गोखले यांचे चिरंजीवांनीं कइद करून पुण्यास पाठविला. त्यास मार देऊन हत्तीचे पायांसी वैशाख शुद्ध चतुर्थीस बांधोन मारिला. वरकड मजकूर यथास्थित आहे. श्रीमंत राजश्री बाबासाहेब यांची स्वारी लौकरच जनस्थानीं निघावयाचा बेत आहे. च्यातुर्मास वास तिकडेस होईल, असा बेत आहे. शेवेसीं श्रुत होय, हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५२४
श्री.
१७२३ चैत्र वद्य ५
श्रीमंत राजश्री नानाजी स्वामींचे सेवेसीः-
विद्यार्थी परशरामभट धर्माधिकारी सां। नमस्कार विनंती विज्ञापना. येथील क्षेम ता चैत्र वद्य ५ भृगुवारपर्यंत वर्तमान यथास्थित असे. विशेष. आपण गेलियावर काल गुरुवारी पेंढारी कंपूची गडबड बहुत जाली. राहोरीचे मुक्कामी बुधवारी होते गुरुवारी कूच करून खंडाळ्यास, नजीक पुणतांबें, येथें मुकामास गेला, कोन्ही ह्मणूं लागले कीं, आपलें गांवावरून येतो ह्मणून तिन्ही गांव बहुत घाबरले ! श्रीमंत ती त्यांनी मातोश्री माईस व आपा वगैरे मंडळीस गाणगापुरी वाटेस लाविले होतें. पाठऊ नका ह्मटलें. परंतु त्यांचे धैर्य पुरेना, म्हणोन वाटे लाविले. मग सायंकाळीं मागती आणिलें. वाणी याचे हिशेब एकदों रोजां तयार करून पाठऊन देतों. तूर्त बेलदारांस खर्चाची फार अडचण आहे. या करतां तृर्त बाळा गुरुवाबरोबर अगत्य दहा रुपये तरी पाठवावे. अनमान न करावा. आपले वाट्याचा कडबा एकादों रोजांत वसूल करतों. तात्याकडील त्यांजकडे पोंहचवितों. साता-याचा साता-यास पाठऊं. कळावें. बावनपागे यांसी व जरीपटके मे पानसे वगैरेसी लढाई जाली. बावनपागेचा मोड होऊन, तमाम बुणगें लुटलें. बावनपागे सडी फौज पांच सात हजारानसी निघून गेला. याप्रों वर्तमान ज लें. बहुत काय लिहिणें ? हे विज्ञप्ती.
स्वामींचे सेवेसी मल्हार रामचंद्र कुळकर्णीसां नमस्कार लिखितार्थ परिसोन लोभ करावा. वाणीयाचे हिशेब व तगटाची वाटणी तयार करून पाठवितों. हे विज्ञाप्ती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५२३
श्री.
१७२३ चैत्र शुद्ध ३
वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री लक्ष्मीनारायण दिक्षीत स्वामीचे सेवेसी:-
विद्यार्थी यशवंतराव महादेव सां नमस्कार विनंति येथील कुशल ता। चैत्र शद्ध ३ जाणुन स्वकीय कुशल लिहित असिलें पाहीजे. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें. रा जिवाजी यशवंत याचे व कंपूचे दंग्यांतून कायगांवकर यांची तसनस बहुत जाली, ह्मणोन विस्तारें मजकूर लिहिला, तो सविस्तर कळला. ऐशास, ईश्वरी क्षोभ ! त्या गोष्टीस मनुष्याचा उपाय राहिला आहे, असा अर्थ नाहीं. सारांश, दंग्यापूर्वी निघोन साता-यास जाऊन राहिलां ही गोष्ट फार उत्तम केली. कायगांवकर ब्राह्मणाविशीं श्रीमंत राजश्री दादांस सांगावें. साहित्य होईल तेथवर करावें, ह्मणोन लिहिलें. त्यांस, सांप्रतचे दिवस सर्वास काळजीचेच आहेत. त्यांत ही सवड पाहून सूचना करितों. चिरंजीव नारायणराव यांचें लग्नकार्य फाल्गुन वा अष्टमीस उरकून घेतलें. आपणांस कळावें. बहुत कार्य लिहिणें ? लोभ असों दीजे. हे विनंती.