Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ८७ ] श्री. ६ जानेवारी १७२३.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५० शोभकृतनाम संवत्सरे पौष बहुल अष्टमी भौमवासरे क्षत्रियकुलावतस श्री राजा शंभुछत्रपति स्वामी याणीं राजमान्य राजश्री बावाजी सिगाडे यासी आज्ञा केली ऐसी जे - राजश्री भगवतराव अमात्य हुकमतपन्हा यांसी या प्रातें रवाना केले आहेत हे स्वामिकार्याविषयी तुह्मास लिहितील व सांगोन पाठवितील तरी तुह्मीं आपले फौजेनसी यासी सामील होऊन याचे आज्ञेप्रमाणे स्वामिकार्य करणें. बहुत काय लिहिणें.
मर्यादेयं विराजते
सुर सूद बार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ८६ ] श्री. ३ जानेवारी १७२३.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५० शोभकृतनाम संवत्सरे पौष बहुल चतुर्थी मंदवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शंभुछत्रपति स्वामी याणीं देशमुख व देशपाडे तर्फ तारळे यांसी आज्ञा केली ऐसी जे - राजश्री भगवंतराऊ अमात्य हुकमतपन्हा यांसी त्या प्रांतें रवाना केलें आहे. तरी तुह्मीं जमावानसी यांचे आज्ञेंत राहोन स्वामिकार्य करीत जाणें. आणि आपले सेवेचा मुजरा करून घेऊन स्वामीस संतोष पावणें. जाणिजे. लेखनालंकार.
मर्यादेयं विराजते.
रुजू सुरनिवीस
सुरु सद बार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ६१ १६३३ श्रावण वद्य १३
महजर बतारीख ५ जिल्हेज बीहुजूर हजीर मज्यालसी गोत पा। सिरवल बितपसिल
हकीमसरा हजरती काजी सैद महमजाफर वलद काजी
सैद आजीज काजी पा। मजकूर
देसक पा। मजकूर
केदारजी येसवंतराउ निगडे यादव गंगाधर देसपांडे
देसमुख पा। मजकूर पा। मजकूर
वाजी बयाजी गुमस्ते कारभारी खंडोजी बीन जावजी अडलराउ
आ। देसमुख पा। मजकूर + + + बिन सिदोजी अभगराउ
धायगुडे मो। मौजे अहिरे व हराली
सुभानजी बीन सेखोजी येसवंत खान सरनाईक
व + + ये सेटी बीन बाला सेटी नाईकवाडी पा। मजकूर
+ + मजकूर
कृष्णाजी बीन रुदाजी
पाटील सोनवणी मो। मौजे
नाहावी पा। मजकूर
(नांगर)
श्रीसके १६३३ श्रावणमास वदी त्रयोदसी सोमवार सु॥ इसने असर मया अलफ सन हजार ११२१ कारणे जाला महजर ऐसा जे खडोजी बीन + + व जोगोजी बीन बहिरजी इबन बाबजी माहाणेवर चौगुला मौजे पिपरे खुर्द पा। मजकूर व साखराई कोम रमाजी बीन कान्होजी व सुभानजी बीन कान्होजी लोणारे मो। मौजे रुवी पा। मजकूर सिरवलास देसमुख व देसपाडियाकडे येऊन साखराई व सुभानजी मजकूर यानी वर्तमान जाहीर केले की आपला गाउ अजी चालीस वरसे खराब पडिला आहे आपले भाऊ निमेचे तकसीमदार ते हि कालादुकालाने देसावर गेले कोठे आहेती ते न कले आपला भाउ कमाजी बीन लाहुजी लोणारे हा करनाटकात गेला आहे तो तिकडे च राहिला आपली नातवानी मायभोय ह्मणऊन इकडे राहोन मोलमजुरी करून पोट भरितो त्यास दिवाणे गावीचे लावणी बदल तगादा केला आहे त्यास आपले पदरी बैल ढोर एकधर नाही व आपणास अन हि खावयास नाही सिव सेजारी गाव लागले ते आपले गावीची सीव रेटि (ली) ती त्यासी आपण कटकट करितो त्यास पाठीबा भाऊ नाही याउपेरी जागोजी माहाणेवर याचे कर्ज काला दुकला करिता खादले आहे त्याचा हि तगादा आपणास लागला आहे ऐसे कितेक गोष्टी आपले पदरी नातवानीच्या पहिल्या याबदल *
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ६० श्री १६२९ सर्वजित ज्येष्ट शुध्द ७
.॥ स्वस्ति श्री माहराज राजश्री शाहूजी राजे साहेब यांणी राजमान्य राजश्री रुस्तुमराऊ जाधव यांस आज्ञा केली ऐसी जे तुह्मी स्वामीचे आप्तविशई लोक कितेक कार्यास आला ह्मणौन स्वामी कृपाळू होउनु तुह्मास हफ्तहजारी हफ्त हजार स्वार मनसफ मोकरर केली असे यांस सिरस्ता बितपसील
खा। जाती सालीना स्वार हफ्त हजार
बिलमख्ता रु॥ वीस दोनी हजार स्वार पांच हजार स्वार
हजार २०००० सरासरी स्वारीं सरासरी स्वारीं
दर माहे रु॥ दर माहे रु॥
७५ ६०
एणे प्रमाणे मोकरर केले असेती सरकार सिरस्ता दडक प्रमाणे सेवा करून हक पावत जाईल जाणिजे छ ४ रबिलोवल जेस्ट शुध ७ सर्वजित सवछर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ८५ ] श्री. २ जानेवारी १७२३.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५० शोभकृतनाम सवत्सरे पौष बहुल चतुर्थी भृगुवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शंभुछत्रपति स्वामी याणीं राजमान्य राजश्री आपाजी पंडित व रामराव बाळाजी यासी आज्ञा केली ऐसी जे - राजश्री भगवंतराव अमात्य हुकमतपन्हा यासी कीतेक स्वामिकार्याची आज्ञा करून त्या प्रातें रवाना केले आहेत. हे स्वामिकार्याविषयीं तुह्मास लिहितील व सांगोन पाठवितील. तरी तुह्मीं आपल्या जमावानसी यास सामील होऊन यांचे आज्ञेप्रमाणें स्वामीकार्य करीत जाणें. बहुत काय लिहिणें. लेखनालंकार.
मर्यादेयं विराजते.
सुरु सूद बार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ८४ ] श्री. २ जानेवारी १७२३.
प्रधान शिक्का प्रतिनिधि शिक्का.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५० शोभकृतनाम संवत्सरे पौषबहुल चतुर्थी भृगुवासरे क्षत्रियकुलावतस श्री राजा शंभुछत्रपति स्वामी याणीं रा. रखमाजी साळोखी मुद्राधारी व कारकून कोट कोल्हापूर यासी आज्ञा केली ऐसी जे -- रा. खळो नरहर हे उमेदवार होते स्वामिकार्याचे देखोन यांची असामी सभासदात घालून पाठविले आहेत. यांचे चालवणे, हें स्वामीस परम आवश्यक आहे तरी तुह्मीं यांचे हातें स्वामिकार्य घेत जाणें. यास वेतन सालीना देखील चाकर होन पा। ५०० पाचशे रास केले असत. इ।। पैवस्तगी पासून वजावाटाऊ दंडकप्रो । वजा करन उरलें वेतन शिरस्तेप्रमाणें पावीत जाणें यास जमान-- तुह्मीं कोट मजकूर घेणें, जमान कतबा हुजूर पाठवणें.
लेखनालंकार
मर्यादेयं विराजते
रुजू सुरनिवीस
तेरीख १७,
रबिलाखर, सु।। आर्बा अशरीन
बार सुरु सूद बार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ५९ १६१७ मार्गशीर्ष वद्य २
१/३ मो। बंद रास
जाबिता कानू जकाती प्रा। सिरवळ सु॥ सीत तिसैन अलफ सन सलासामधे राजश्री पंत सचिव एही जकाती उभामार्ग व बकाल का। मजकूर यासि हुजरून कौल दिल्हा आहे की जोवरी मोगलाचे ठाणे सिरवळी आहे तोवर कौलप्रमाणे कमावीस करावी ह्मणऊन हुजरून तह करून दिल्हा आहे त्यासि आलीकडे हकदार मोईनप्रमाणे घेत नाहीत त्याबदल सुभाहून तह करून दिल्हा असे याप्रमाणे कामावीस करणे बिता।
कसबेकरी यांसि तह
भूस हर जिनस दर केणी हर जिनस खोबरे
→ पुढे वाचण्यासाठी इथे क्लीक करा
सदरहू प्रमाणे जोवर मोगलाचे ठाणे आहे तोवर कमावीस करावयाची हुजरून सनद सादर जाली आहे त्याप्रमाणे सुभाहून कमावीसदाराची मोईन करून दिल्ही आहे याप्रमाणे कमावीस करणे यामधे तफावत जालिया मुलाहिजा कमाविसदाराचा होणार नाही छ १५ जमादिलोवल मोर्तब सूद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ८३ ] श्री. १ जानेवारी १७२३.
श्री ° ˜
राजा शभुछत्रपति हर्ष- श्री आई आदिपुरुष श्रीराजा
निधान। रघुनाथसुत शभुछत्रपति स्वामी कृपानिधी।
तिमाजी पडित मुख्य तस्य कृष्णाजी परशुराम
प्रधान. प्रतिनिधि.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५० शोभकृतनाम सवत्सरे पौष बहुल द्वितीया सौम्यवासरे क्षत्रियकुलावतस श्री राजा शंभुछत्रपति स्वामी याणी राजश्री देशाधिकारी व कारकून वर्तमान व भावी सुभा प्रा। तारळे यासी आज्ञा केली ऐसी जे---- रा गोविंद नरहरी गोत्र भारद्वाज राशिवडेकर हे बहुत भले मौजे राशिवडे येथे राहतात. श्रीभजनीं तत्पर श्रीज्ञानेश्वरीपारायण करितात कुटुबवत्सल याचे योगक्षेमाची अनुकूलता केलियानें कल्याणावह, याकरिता स्वामी कृपाळू होऊन यास नूतन इनाम कुलबाब कुलकानू, खेरीज हक्कदार व इनामदार करून, मौजे कुरकुली ता। तारळे प्रा। मा । येथें भात जमीन बिघा 6१ एक बिघा रास इनाम करून दिल्हा असे. तरी तुह्मीं सदरहू जमीन यास मोजून चतु सीमा करून देऊन वंशपंरपरेने चालवणें. ये सनदेची तालीक घेऊन अस्सल परतोन देणें.
लेखनालंकार.
मर्यादेय विराजते
रुजू सुरनवीस.
तेरीख १६,
रबिलाखर, सु।। आर्बा अशरीन.
बार सुरू सूद बार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ५८ श्री १६१५
रकमाला
१
--
११
पा। सिरवळ
दस्त कर्यात
मौजे माडकी अज जमीन जुमला चावर २९
जिराईत बागाईत
२८lll. .l.
बाद वजा मौजे मजकुरी पेठ संभापुर वसाहती केली पेठ बांधावयास जागा पाहिजे ह्मणऊन जमीन चावर १ पेठे खाले घरा बादल बाद दिल्हा बा। सनद राजश्री मोरो त्रिमल प्रधान बा। खुर्दखत छ २२ रजब सन सबैन अलफ थल वेताल पैकी चावर १ बाकी जमीन चावर २८
जिराईत बागाईत
२७lll. .l.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ८२ ] श्री. १७२३.
श्री राजा शंभु-
छत्रपति चरणीं
तत्पर । बहिरजीसुत
रखमोजी साळोखे
निरंतर.
अज दिवाण कोट कोल्हापूर ता। मोकदमानी बहिरेश्वर कर्यात हवेल सुहूरसन आर्बा अशरैन मया अलफ मौजे मजकुरीं शंकरगिरी गोसावी हे बहुत थोर अतीत त्यास श्री देवाची भक्त्युत्तमविशिष्ठ ऐसे जाणोन महाराज राजश्री स्वामीनी पेशजी पड जमीन इनाम ०।।० निमचावर दिला आहे त्यांपैकीं कांही कीर्दी जाहली आहे. काहीं जमीन कीर्दी होणें आहे त्यास गोसावीबावास जमीन सदरहूप्रमाणे कुल अवघी नेमून देणे आणि त्याचें इनाम अविच्छिन्न चालवणें. जमिनीस खलेल एकदर न करणें या पत्राची प्रती लिहोन घेऊन असल पत्र भोगवटियास गोसावी यापाशीं लिहून परतून देणें जाणिजे. रवाना मोर्तब सुद.
मोर्तब
सूद.