Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ७५ १५५१ चैत्र शुध्द ३
.॥. स्वस्ति श्रीशके १५५१ शुल्क संवत्सरे चैत्र शुध तृ (ती) या तद्दिनी रामेश्वरभट्टी रंगभट्ट व गोपिनाथ व त्रींबक याचा विभाग ईनामाचा केळा ऐस जे बोरखळी चावर १ किणही चावर .॥. यामध्ये रंगोबा बीघे तीस .।. त्रींबक बीघे तीस .।. रामेश्वरभट बिघे तीस .।. गोपिनाथ चावर पावुण .lll. यास विभाग केळा ऐसा रामेश्वरभट्ट व त्रींबकभट्ट यास बाबेति किणहीचा अर्ध चावर .॥. गोपिनाथ व रंगोजी यास बाबेति बोरखळ चावर येक त्यामध्ये गोपिनाथ पवण चावर .lll. रंगोजी बीघे तीस .।. याप्रमाणे विभाग जाहाळा असे हे सत्य वडिळाचे अर्जित पर सार स्थावर जंगमास संबंध नाही वोळी २८
साक्षी
कृष्णभट शेंडे बाळंभट पुराणिक
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ७४ १५५१ चैत्र शुध्द ३
स्वस्ति श्रीशके १५५१ शुल्क संवत्सरे चैत्र शुध्द तृतीया तद्दिनी रामेश्वरभट्ट व रंगभट्ट व गोपिनाथ व त्रिंबक चित्रांव याच्या इनामाचा विभाग जाला ऐसा जे वडिलाचा इनाम चावर दीढ १॥ यामध्ये गोपीनाथास विभाग पाउण ॥। चावर रामेश्वरभट्टाचे । बिघे तीस त्रिंबकभट्टाचे । तीस बिघे व रंगभटाचे । बिघे तीस यासि किणही बाबति अर्ध चावरामध्ये रामेश्वरभट्टास बिघे । तीस त्रिंबकभट्टास । बिघे तीस येकून अर्ध चवर दोघांस व बोरखळिचा चावर १ येक यामध्ये गोपिनाथास पाण चावर ॥ रंगभट्टास पाउ चावर । येकून चावर येक याणे प्रमाणे जमीन किर्द्दि मामूरी करून ज्याचे त्याणे आपला विभाग भक्षून सुखे असणे हे सत्य दस्तूर रंगभट्ट वोळी येकोणीस १९ हे१ मान्य रामेश्वरभट्टांस असे हे सत्य
साक्षी
कृष्णभट शेडे बाळंभट पुराणिक*
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ९५ ] श्री. १७ एप्रिल १७२८.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५४ कीलकनाग संवत्सरे अधिक वद्य पंचमी सौम्यवासरे क्षत्रिय कुलावंतस श्रीराजा शंभु छत्रपति स्वामी यांणीं समस्त राजकार्यधुरंधर विश्वासनिधी राजमान्य राजश्री भगवंतराऊ अमात्य हुकमतपन्हा यांसीं आज्ञा केली ऐसी जे- तुह्मीं चित्तांत एक प्रकार आणून तेथें श्रीमंत मातुश्री साहेबापाशीं आज्ञा मागता ह्मणोन वर्तमान विदित जालें. तरी तुह्मीं स्वामीचे यखतियारी सेवक आणि साहेबाची ममता विशेषाकारें तुमचे ठायी हें पत्रीं विस्तारें लिहावें तर मनोमन साक्ष असे. तुमचा हेत स्वामीचे ठायीं व स्वामीची ममता तुह्मांवर असे. स्वामी सेवक एक, ऐसे असोन कोणी सागणारांनीं काय सागोन तुमचें चित्ताचा विपर्यास केला हे न कळे ! या उपर कोणेक प्रसग चित्तातं न मानिता समाधान असो देणें. राजश्री पंतीं या राज्यांत श्रम साहास करून कीर्त संपादिली त्याचे पुत्र तुह्मीं आहां. पताचे घराशीं स्वामीचा द्वैत विचार नाहीं, हा निशा असो देणें या उपर चित्तांत संदेह मानाल तरी तुह्मांस पंताची व श्री रामचंद्राची व स्वामीचे पायाची शपथ असे. समाधान असो देणे उदईक साहेबाचा मुकाम गड मुडसिंगी येथें असे. तुह्मीं तेथे जमावानिसी स्वामीचे दर्शनास येणें दर्शनांतीं सर्व चित्ताचा खुलासा होईल समागमें राजश्री कोंडाजी सुभेदार यांसी घेऊन येणें. वरकड वृत्त शेख महंमद आज्ञेप्रमाणें सांगतां कळेल. सारांश गोष्ट जे, साहेबाचा तुह्मांस भरवंसा असिला तर दुसरा अर्थ न समजतां दर्शनास येणें जाणिजे. किमपी लक्ष प्रकारें चित्तांत संदेह न मानितां मुडशिंगीचे मुकामीं दर्शनास येणें. जाणिजे. सुज्ञ असा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ७३ १५५० आश्विन वद्य १२
रवा सूद
(फारसी मजकूर)
अज रखतखाने खुदायवंद खाने अलीशान खा। रणदुला फराहादखा खुलीदयामदौलतहू बजानीब कारकुनानि हाल व इस्तकबाल व देसाईयानि पा। वाई बिदानंद सु॥सन तिसा अशरीन अलफ बो। हरीभट बिन विष्णुभट देउरकर सेकिन का। मजकूर हुजूर येउनु मालूम केले जे आपणास इनाम जमीन चावर नीम ॥ दर सवाद मौजे पसर्णी समत हवेली थल वाकेवाड सीव नजीक सिदनाथवाडी माबलेस्वरमागा्रजवली दो। महसूल व नखतयाती व खा। गला व सारा व बेठ बेगार व फर्माइसी ता। ठाणे व ता। देहाय कारकीर्द दर कारकीर्द वजीरानि माजी मुकासाई ता। सालगु॥ भोगवटे व तसरुफात चालिले असे हालीं पा। मा। साहेबास मुकासा अर्जानी जाला माहाली कारकून दुबाले खुर्दखत मागताती साहेबी अनायत फर्माउनु सदरहूप्रमाणे इनामतीचे दुबाले खुर्दखत देवणे बराय मालुमाती भटमाची खातिरेसी आणून जमीन चावर नीम दर सवाद मौजे मा। दो। महसूल व नखतयाती व खा। गला व सारा व बेठ बेगार व फर्माइसी ता। ठाणे व ता। देहायेसी इनाम सदरहूप्रमाणे भटमाराचे दुमाला केला असे कारकीर्द दर कारकीर्द माजी मुकासाइयानि ता। सालगु॥ भोगवटे व तसरुफात पाहून सालाबाद जैसे चालिले असेल तैसे चि सन तल मा।रास सदरहू प्रमाणे इनाम जुनारकर मा।चे दुबाला कीजे दर हर साल खुर्दखताचा उजूर न कीजे तालीक लेहोन घेउनु असेली खु॥ परतुनु दीजे पा। हु॥ रा। रामाजी पंडित मोर्तब
रुजू शुरुनीस
रुजु दफतरखास
तेरीख २५ बार रवा
माहे सफर बार दफ्तर
सुद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ९४ ] श्री. २४ फेब्रुवारी १७२८.
राजमान्य राजश्री भगवंतराव अमात्य हुकमतपन्हा यांस आज्ञा केली ऐसी जेः-
नारायण हरकारा याजबरोबर तुह्मीं सांगोन पाठविलियाप्रमाणें अक्षरशा विदित करितां श्रुत झासें व शफतपूर्वक निष्ठापूर्वक सेवकपणाचा अर्थ सांगोन पाठविला त्यावरून बहुत संतोष जाहला तरी याच अन्वये दिवसेंदिवस तुह्मीं सेवा करून ममता संपादावी आणि स्वामीनीं अकृत्रिमपणे तुमचे मनोदयानुरूप चालवावें हेंच अवश्यकता आहे दुसरा अर्थ नाहीं. तुमचे वडिलांनीं या राज्यात श्रम साहस करून राज्य रक्षिलें. त्यांचे पुत्र तुह्मी आहा त्याचे प्रमाणेच सर्व भाराभार तुह्मांवर देऊन सेवा घेऊन चालवावें हेंच उत्तम आहे एैशास. स्वामी तीन वर्षे स्वारीस होते. प्रस्तुत आगमन जाहलें. तुह्मीं दर्शनास येऊन सतोषी करावें हें चित्तांत आहे. त्यास, श्रीचा उत्साव रामनवमीचा आला आहे. येथें येऊन सपादावा हें स्वामीचें चित्तांत विशेषेकरून आहे. तुह्मीं चित्तांत कांहीं संदेह न मानितां स्वामीवर भार घालून यावें. उत्सावप्रसंगीं कर्जवाम होईल तर श्रीकृपेनें कर्ज फारीक होईल. तुह्मीं मागील जाले गोष्टीचा खेद चित्तांत न आणावा. स्वामीचा तो चित्तांत कोणे येक गोष्टीचा संशय नाहीं. मध्यस्ताचा विचार तर, या उपरी तुह्मीं आपलें यश अपेश धन्यावर घालोन दृढतर विचार करून यावयाचें करणें सर्व मान अपमान व तुह्मांस बरें वाईट ते गोष्टीस खासा स्वामीच मध्यस्त धनी आहेत. तुह्मीं या उपरी किमपि संदेह न मानितां यावयाचें करणें. रा० गोपाळ रामभाऊ यांसीं दर्शनास नावेक चालवावयाविसी सांगोन पाठविलें. येवरून आज मंदवारी प्रात. काळीं दर्शनास आणून समाधान करून वस्त्र दिल्हें. ज्याचे वडिलांनीं राज्यांत सेवा केली त्याचें चालवावें हेंच आवश्यक. ऐशास तुमचे आगमनानंतर तुमचे विचारें जो प्रसंग करणें तो केला जाईल. तुमचे येण्याचे प्रसंगास येथून कोणास पाठवावयाचें ते लिहून पाठवावें. त्याप्रमाणें रवाना करून पाठवूं, येविसी तपशिलें सुबजी भोसले वा। मूळ व नारायण हरकारा यासि आज्ञा केली असे. आज्ञेप्रमाणें सांगतां कळेल. तदनुरुप उत्तर सत्वर पाठवावें. सकलादेविशीं सांगोन पाठविले. सकलाद न मिळे यास्तव स्वामीचा फर्गोल पांघरता पाठविला असे. घेवणे. जाणिजे. रवाना चंद्र २४ माहे रज्जब. सुज्ञ असा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ९३ ] श्रीगोपाल. १७२८.
राजश्री पंतआमात्य हुकुमतपन्हा गोसावी यांसींः -
सकल गुण अलंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नेll. उदाजी चवाण हिंमतबहादर ममलकतमदार कृतानेक दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशललेखनाज्ञा केली पाहिजे. यानंतर रा० रामभाऊ यांजबरोबर कितेक अर्थ मुखोत्तरें व पत्रीं लिहून पाठविलें. पाहोन सकल अर्थ अवगत झाला. ऐशास आह्मीं पुरातन तुमचे दुसरा अर्थ किमपि नाहीं. दूरस्थ असिलों तरी चित्तवृत्ती आपलेठायीं निर्विकल्पवृत्तीनें असे. तेथें इतर पदार्थ कल्पना नाहीं. आह्मीं आपले मैत्र ह्मणविल्यास मैत्रीस अंतर सहसा न घडे. एतद्विशींचा प्रसंग सविस्तर राजश्री रामभाऊ यांसीं सांगितला आहे. सांगतां विदित होय बाबतीच्या अमलाचा चौका बसवावा, याविसीं सिरोळ अकीवाट दोहीं स्थळीं अधिकारी ठेविले आहेत. त्यास आज्ञा करणें ती केली आहे. यथाशक्त्या चाकरीस अंतर करणार नाहींत. वरकड प्रसंगास आह्मीं कोठेंहि असलों तरी समीपच आहों, ये रीतीनें चित्तांत असो द्यावें. प्रसंगास चुकतों असें नाहीं. विशेष काय लिहावें कृपा असो. हे विनंती.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ९२ ] श्री. १७२८.
राजमान्य राजश्री भगवंतराव रामचंद्र यांसीः-
आज्ञा केली ऐसी जे - तुह्मीं विनंतिपत्र पाठविलें, तें प्रविष्ट झालें. लिहिला अभिप्राय सर्व कळों आला. व गोविंद वेंकटाद्री पाठविलें याणीं तुमचा भाव गर्भ विदित केला ऐशास, तु्ह्मीं राज्यांतील पुरातन सेवक. वडील परंपरेनें सेवा करीत आला आहां. ज्यामधें धण्याची रजावदी त्याप्रो। वर्तावें, उचित, ऐसें असता अवलंबिला प्रसंग तुह्मां योग्य आहे ऐसे नाहीं अैशानें कोणाचे परिणाम लागले आहेत ? या उपरी त-ही धण्यासी निष्ठा धरून आज्ञेप्रमाणें वर्तणूक करणें आपल्या कदीमाईस बोल न लागे तो विचार करणें तेही तुमचे पूर्ववतप्रों। सर्वस्वें चालवीतील सूज्ञ असा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ७१ श्री
सकल तीर्थस्वरूप अखंडितलक्षुमी माहामेर राजश्री वेदमूर्ति रंगोजी भट चित्राउ स्वामी गोसावियासि
सेवके किंकरे बापुजी पटेल मौजे कोडोली साष्टांग दंडवत विनंति वि॥ ल्याहाव्या कारण ऐसे उपरी आह्मासी नालगुतचे वेथेकरिता बहुत असो तरी स्वामीचे हस्ते + + बरे होणार ह्मणोन आइकिले१
लेखांक ७२ १५४८ पौष शुध्द १४
तालीक
अज दिवाण हिसार जाउळी ता। मोकदमानी मौजे वोझरडे मु॥ हिसार मजकूर बिदानद की हर्ची सुरुसन सबा असरीन अलफ नारायणभट बिन गोपीनाथभट चित्राउ सो। का। मजकूर बा। खुर्दखत सालगु॥ मौजे मजकुरी इनाम जमीन चावर .॥. सालाबाद चालिले असे पाहून दुंबाला केले असे दुंबाला कीजे
तेरीख १२ माहे रबिलाखर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ७० १५४५ चैत्र वद्य ७
शके १५४५ रुद्रोदगरी नाम सवछारे चैत्र वदी सप्तमी वार भुर्गवार तदीनी गोपीनाथभट बिन रुद्रभट चित्राव यासि रामेस्वरभट वा नारायणभट वा रगभट चित्राव लेहून दिल्हे खडपत्र ऐसे जे तुमचे वा आमचे वाडे दोनी २ ते वाटून घेतले तुमचे विभाग, पिटकेचे सेजारील वाडा अराधेचे सेजारील वाडा अर्ध विभाग असे ते दोही वाडे त्यामधे तुमचे विभागात तुह्मी असणे आमचे विभागात आह्मी असोन वा तुमचे वा आमचे वडिलाचे इनाम चावर १॥. दीडी
बोरीखल चावर कणई चावर नीम
१ .॥.
यामधे चावर .lll. तुह्मास विभाग आमचे .lll. विभाग ते तुमचे विभाग सदरहू पाउणा चावर तुह्मी भक्षिजे आमचे चावर .lll. आह्मी त्रिवर्ग भक्षून येणेप्रमाणे विभाग केले असे तुह्मास व आह्मास अर्थअर्थ समंध नाही स्थावराचे विभाग येणेप्रमाणे जाहाले जंगम तरी वडीलानी वाटून दिल्हे होते आता तुह्मास वा आह्मास काही समंध नाही हे खंडपत्रसती वोळी २२
बिहुजूर
नारायण जोसी पाणदरेकर पिलाजीपंत आराध्या
नागोजी नारायण पिटके रामाजी कासीकर
हस्ताक्षर
रामेश्वरभट्टास पत्रप्रमाणे मान्य
नारायणभट्टांस मान्य पत्रप्रमाणे
रंगभट्टास मान्य गोपाळास मान्य
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ६९ १५४३ वैशाख वद्य ५
स्वस्ति श्रीशके दुर्मति संवत्सरे वैशाख वदि पंचमी तद्दिनी नारायणास व रंगोबास व गोपिनाथास रामे चित्रावे विभाग नवि किनही व बोरखळ यामध्ये गोपिना(था)चा अर्थ व तीघाचे अर्ध यामध्ये वीस वर्षे अमच्या पुत्रास व अह्मास सबध नाही विसा वर्षाउपेरि अपळा विभाग नुतन साधिळा असे व जुने ते कुळ माहासुल असेल तो घेउन
गोहि
रामाजजि काशिकर