Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ९१ ] श्रीरामचंद्र समर्थ ९ जून १७२७.
° ˜
श्रीरामचंद्रचरण
नीलकंठसोनदेव
शरण
नेमणूक सनदा गल्ला सरदारी किल्ले गगनगड सुमासमान अशरीन मया अलफ गल्ला देसरी सोळुलें मापें नागली वरिया भात.
(पुढील मजकुर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
एकूण गल्ला देसरी सोळुलें मापें साडेअठाविस खंडी चार मण रास चाकरी माफीक देणें. जाणीजे छ १ जिलकाद. निदेश समक्ष.
लेखन सीमा
समुल्लसति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ६८ १५४२ आश्विन शुध्द ७
अज रखतखाने खोदायबंद खाने अलीशान हैबतखान दामदौलतहू ता। आतामली नायब गैबत वा कारकुनानि पा। वाई बिदानद सु॥ सन सलास असरीन अलफ इनाम जमीन सेत वा मला + + बाजेबाब
जमीन सेत वा मला बाजेबाब जकायती
चावर ११५ बकाल प्रज बैल १५
सेत दर सवाद मला दर सवाद गती
का। मजकूरु कसबा बिघे सारपायपोसी पा। मजकूर
दो। माहासूल चावर १५ बाजे तकसीम जकायती
चावर १ गला मोर्तबत का। पारघाट
विस्वा मोर्तबत कैइ व पारघाट
केणीचे गोणीसी रुके २
भुसाचे गोणी १ पानाचे नगाबा पाने १०
पाणी माळी पसकी वा उकाल का। मजकूर विलायती दलवाई नामजाद सुदामसेटी बिन सोनसेटी पाटणे पा। मजकूर बिमोजीब खुर्दखत रखतमाने मोकरम मुतने रवा अस्त बायद के एशाबनोकी बाहमा दस्तूरु अज जाहात जुबदतुल मजकूर दिल्हे असे भोगवटा व तसरुफाती ता। सालगु॥ चालिलेप्रमाणे भोगवटा व तसरुफाती पाहून दुबाला कीजे तालीक लिहून घेऊन असली परतौनु दीजे मो।
तेरीख ५ माहे जिलकाद इहिदे अशरीन व अलफ
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ९० ] जलसेन श्री. ७ सप्टेंबर १७२५.
° श्री ˜
राजाशिवसेवेसीतत्पर
संताजीसुतपिराजी
घोरपडे निरंतर
आज्ञापत्र समस्तसेनाधुरंधर विश्वासनिधी राजमान्य राजश्री पिराजी घोरपडे ता। मोकदमानी, मौजे बहिरेश्वर, हवेली कोल्हापूर, सु।। सन सित् अशैन मया अलफ - मौजे मजकुरी श्री थोर देवस्थान आहे. तेथील पूर्वी उत्साह नंदादीप नैवेद्य पूजा पुरस्कार चालत होती.
अलीकडे धामधुमीमुळें राहिली होती. ऐशियास, तुज राजश्री रामचंद्र पंडित हुकुमतपन्हा यांहीं इनाम जमीन सनदा करून दिल्या आहेत.
श्री देवास जमीन शंकरगीर परंपरा दुर्गानाथगीर
चावर ०ll० गोसावी ते मठ बाधून राहतील.
यास भंडा-याकारणें जमीन ०ll०
येकूण एक चावर जमीन दिली आहे त्याप्रों। बिलाकुसूर चालवणें कोणीं हिला हरकत करील त्यास ताकीद होईल श्रीचा देवद्रोह लागेल थोर देवस्थान आहे यास खलेल कोण्हीं करावयास गरज नाहीं. सुरळीत चालवणें जाणिजे छ १९ रबिलाखर.
बार लेखन
सीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ६७ १५३६ पौष शुध्द ६
हैबतखान
अज रखतखाने खोदायवद खाने अलीशान साहेब दामदौलतहू ता। अता मलीक नायब गहत वा कारकुनानि पा। वाई बि॥ हृर्ची सु॥सन खमस असर अलफ जमीन नीम चावर .॥. दर सवाद मौजे पसर्णी अमाल पा। मजकुरु स्थल वाकेडेवाडी नजीक सिदनाथवाडी माहबलेस्वरमार्ग जवली बा। इनाम साबीका बो हरीभट बिन विस्णुभट देउरकार सेकीन का मजकूरु बाद ऊ औवलियाद अफवाद बमोजीब भोगवटा खुर्दखत रखतखाने मोकरम दो। माहासूल वा नखतखाती वा रवा गला वा सारा वा बेठ बेगार फर्मायस व ता। ठाणा व ता। बेठ मुतने रवा अस्त बायद की एशाबनाकी सालाबाद ता। सालगु॥ जैसे चालिले असेल तैसे च साल मजकुरास दुबाला कीजे तालीक लिहून घेउन असली परतोनु दीजे
तेरीख ४ माहे जिल्हेज
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ६६ १५३२ पौष शुध्द १२
(फारसी मजकूर)
अज दिवाण पा। वाई ता। मोकदमाने वा रया मौजे एकदे पा। मजकूरु सु॥ सन इहिदे असर अलफ जमीन चावर .॥. नीम दर सवाद मौजे मजकूरु ता। इनाम बो। अकणाभट बिन दामोदरभट जुनारदार सेकीन कसबे परणेमजकूरु बादजु औलियाद व अफवाद तुह्मी मौजे खुर्दखत रा। मुतने रवा अस्त बाएदी की एशाहानोकी जमीन मा। दे॥ माहासूल नखतयाती वा लावाजिमात व कदीम खर्च वा इलेकी बा। कुलबाब दिल्हे असे दुबाला केले असे दुंबाला कीजे तालीक लिहुन घेऊनु असल परतोनु दीजे मोर्तब सूद
तेरीख १० माहे सौवाल
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ६४ १५२३ आषाढ शुध्द ९
+ + + + प्लव संवत्सरे आषाढ शुध्द ९ नवमी बुधे तद्दिनी नरशिंभट्टास नरा + + + टी लेहून दिल्हे की अमचा बाप एकनाथभट्टे तुमचा बाप रंगभट्टयास पसर्णीच्या इनामपैकी बिघे १५ पंधरा दिल्हे आहेत ते आपणही दिल्हे मनापासून अर्थाअर्थी तुह्मास अह्मास कलहास संबंध नाही याचा साक्षी हे सत्य
लेखांक ६५ १५२६ श्रावण वद्य १४
हईबतखान
अज रखतखाने खोदायवंद खान अलीशान दामदवलतहू
ता। अता मलीक नेबगैदार वा कारकुनानि पा। वाई बिदानद की हर्ची सु॥ खमस अलफ जमीन नीच चावर .॥. दर सवाद मौजे मालगाऊ ब॥ इनाम बो। अबदुल चस्मकोर बिन बाद ऊ औलियाद आआद ऊ बमोजीब भोगवटा खु॥ रा। इजानेब दर साल अर्बा मुर्तन रवा अस्त बायेद की एशा बजो की जाबाती सन तल मजकुरासी दिल्हे अस भोगवटा तसरुफती पाहून दुबाला कीजे तालीक लिहून घेउनु असली परतौनु दीजे
तेरीख २७ माहे रबिलोवल
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
वांई-चित्राव
लेखांक ६३ १४९५ आषाढ वद्य ८
साक्ष
केदार जुगाई
श्रीसके १४९५ वरिसे श्रीमुखसवछरे अस्याडि वद्य अस्टमी वार बुधिवार तदिनी बहुत देसक लिहिले ऐसे बितपसील
मियानु अलम महालदार
दिवाण अला
जाउजी बिन + + + पटेल मोकदम कसबे परेळी बालोजी बिन कान्हो पटेल मोकदम अंबाडे बु॥ जाउजी मोकदम मौजे बनवडी पीलजी बिन बालोजी मोकदम सोनवडी विठोजी बिन अवघडोजी मोकदम अरे खेलो पटेल मोकदम मौजे पोगारडी गारो पटेल मोकदम मौजे दरे माहादु पटेल मोकदम मौजे फेवड लामजी बिन सिदोजी मोकदम अंबाडे खुर्द लुखोजी एळोजी मोकदम राजपुरी दादो पटेल बिन नागो पटेल मोकदम बोरण बोलो पटेल बिन भाइदे पटेल मोकदम अंबिले बाबसेटी सेटिया पा। मजकूर जोगसेटी माहाजन पा। मा। खलो मेहतरी तेली का। मा। सोनजी भणसी मोकदम का। पाटघर दादू पटेल मोकदम कलबे नागो पटेल वाईगुडा का। नित्रल कुकजी मोकदम मौजे लुमणे पोल चागो पटेल मोकदम वा भाना पटेल मौजे दहीवड दादा पटेल मोकदम अस्टे रामाजी मोकदम मौजे कामती बाउजी मोकदम मौजे खरडी साउजी मोकदम मौजे कामर्थल |
नि॥ नांगर नि॥ नांगर नि॥ नांगर नि॥ नांगर नि॥ नांगर नि॥ नांगर नि॥ नांगर नि॥ नांगर नि॥ नांगर नि॥ नांगर नि॥ नांगर नि॥ नांगर नि॥ तागडी नि॥ तागडी नि॥ घाणा नि॥ नांगर नि॥ नांगर नि॥ नांगर नि॥ नांगर नि॥ नांगर नि॥ नांगर नि॥ नांगर नि॥ नांगर नि॥ नांगर |
हे समस्त देसक पा। परएळी केले समेपत्र ऐसे जे विठोजी देसाई पा। मजकूर यासी वा नाइकोजी भांडारी देसगतीचे + रिखतीचे टकटक करितो नाइकजीमजकुराचे वडिलवडिलानी पेसजी कदी सलाबाद देसगती अथावा चौगलकी चालविले नाही देसगती विठोजीचा व घरचे मिरासी यासी आह्मी चुको तरी आपले वडिलाचे सत्या सुकृत साक्ष असे नाइकजीमजकुरासी तालुक नाही सत्या आमचे बेचाळिसाचे असे सही
बार्मदगार निशाणी शंख
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ८९ ] श्री. ८ सप्टेंबर १७२४.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५१ क्रोधी नाम संवत्सरे आश्विन शु ।। प्रतिपदा इंदुवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शंभुछत्रपती स्वामी याणीं कमाविसदारान व लोकान दिगत पंचोत्रा यासी आज्ञा केली ऐसी जेः-
° श्री ˜ ˜ °
राजाशंभुछत्रपति श्रीआईआदि
हर्षनिदान । रघुना पुरुषश्रीराजा
थसुततिमाजीपडि शिवछत्रपतीस्वामि
तमुख्यप्रधान कृपानिधी।तस्य
परशुरामत्र्यंबक
प्रतिनिधि
मौजे सोलकूर ता। तारले हा गांव राजश्री रामगव दादाजी यासी स्वामीनी इनाम दिल्हा आहे. पंचोत्राही देऊन तुह्मांस हें आज्ञापत्र सादर केले असे तरी तुह्मीं हें जाणून मौजे मजकुरास पंचोत्र्याचा तगादा न लावणें. निदेश समक्ष.
मर्यादेयं
विराजते.
सुरसुदबार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ६२ श्रीसकरप्रसन १६३४ वैशाख शुध्द ४
राजश्री यादोपंत देसकुलकर्णी पा। सिरवल
गोसावी यासी
॥ श्नेहकित बाजी बीन हसाजी अवारी पाटील मौजे अजणुज पा। मजकुर सु॥ सन ११२१ कारणे कागद ले(हो)न दिल्हा ऐसा जे आपली बिटिक सोनी हीस बाजी पा। असवलीकर यासी दिल्ही होती किमती रु। ८
आठ आणी जकाती त्याणे वारावी ऐसी करून दिल्ही एक महिना ठेविली आण जकातीचे निगाड रु।९ नव बनाजीपती आपणावरी रोखा केला त्याणे वारावे ते वारिले नाही आण बटीक माघारी दिल्हे ते आपण घेऊन सिरवलास आलो त्यास रा। रघुनाथपती बनाजीपंतास व पाणेसारे बोलाऊन जकातीचे ली॥ वारिले आण तुह्मास आपण बटीक ति सदरहू किमतीप्रमाणे तुह्मास दिल्ही असे यासी कोणी मुजाम होईल त्यास आपण वारून हे कागद ली। सही छ २ रबिलाखर हा। रत्नाजी बहीरव पानसा कुलकर्णी मौजे भादेली
गोही
र + + + +
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ८८ ] श्री. ३१ आगष्ट १७२४
स्वस्तिश्री राज्याभिषेक शक ५१ क्रोधीनाम संवत्सरे भाद्रपद बहुल अष्टमी भानुवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शंभूछत्रपति स्वामी याणीं राजमान्य राजश्री यशवंतराव गोपाळ व दामाजी हरी यासी आज्ञा केली ऐसी जे :-
राजश्री रामराव दादाजी हे स्वामीच्या राज्यांतील पुरातन एकनिष्ठ सेवक स्वामीच्या पायांशीं त्रिकर्णशुद्धीनें निष्ठा धरून सेवा करीत होते. यांचें चालवणें हें स्वामीस परम आवश्यक, याकरितां स्वामी यावरी कृपाळू होऊन यांस नूतन इनाम कुलबाब कुलकानू हालीपट्टी पेस्तरपट्टीसहित, खेरीज हकदार व इनामदार करून, मौजे सोलंकुर ता। तारळें हा गांव इनाम अजरामरहामत करून दिल्हा असे मौजे मजकूर मा। निले वंशपरपरेनें इनाम अनभवितील. तुह्मीं मौजे मजकुरास तोसीस तगादा लागो न देणें. जाणिजे. बहुत काय लिहिणें.
मर्यादेयं
विराजते.
सुर सुद बार.