[ ८३ ] श्री. १ जानेवारी १७२३.
श्री ° ˜
राजा शभुछत्रपति हर्ष- श्री आई आदिपुरुष श्रीराजा
निधान। रघुनाथसुत शभुछत्रपति स्वामी कृपानिधी।
तिमाजी पडित मुख्य तस्य कृष्णाजी परशुराम
प्रधान. प्रतिनिधि.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५० शोभकृतनाम सवत्सरे पौष बहुल द्वितीया सौम्यवासरे क्षत्रियकुलावतस श्री राजा शंभुछत्रपति स्वामी याणी राजश्री देशाधिकारी व कारकून वर्तमान व भावी सुभा प्रा। तारळे यासी आज्ञा केली ऐसी जे---- रा गोविंद नरहरी गोत्र भारद्वाज राशिवडेकर हे बहुत भले मौजे राशिवडे येथे राहतात. श्रीभजनीं तत्पर श्रीज्ञानेश्वरीपारायण करितात कुटुबवत्सल याचे योगक्षेमाची अनुकूलता केलियानें कल्याणावह, याकरिता स्वामी कृपाळू होऊन यास नूतन इनाम कुलबाब कुलकानू, खेरीज हक्कदार व इनामदार करून, मौजे कुरकुली ता। तारळे प्रा। मा । येथें भात जमीन बिघा 6१ एक बिघा रास इनाम करून दिल्हा असे. तरी तुह्मीं सदरहू जमीन यास मोजून चतु सीमा करून देऊन वंशपंरपरेने चालवणें. ये सनदेची तालीक घेऊन अस्सल परतोन देणें.
लेखनालंकार.
मर्यादेय विराजते
रुजू सुरनवीस.
तेरीख १६,
रबिलाखर, सु।। आर्बा अशरीन.
बार सुरू सूद बार.