लेखांक ६० श्री १६२९ सर्वजित ज्येष्ट शुध्द ७
.॥ स्वस्ति श्री माहराज राजश्री शाहूजी राजे साहेब यांणी राजमान्य राजश्री रुस्तुमराऊ जाधव यांस आज्ञा केली ऐसी जे तुह्मी स्वामीचे आप्तविशई लोक कितेक कार्यास आला ह्मणौन स्वामी कृपाळू होउनु तुह्मास हफ्तहजारी हफ्त हजार स्वार मनसफ मोकरर केली असे यांस सिरस्ता बितपसील
खा। जाती सालीना स्वार हफ्त हजार
बिलमख्ता रु॥ वीस दोनी हजार स्वार पांच हजार स्वार
हजार २०००० सरासरी स्वारीं सरासरी स्वारीं
दर माहे रु॥ दर माहे रु॥
७५ ६०
एणे प्रमाणे मोकरर केले असेती सरकार सिरस्ता दडक प्रमाणे सेवा करून हक पावत जाईल जाणिजे छ ४ रबिलोवल जेस्ट शुध ७ सर्वजित सवछर