Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ५७ श्रीशंकर १६१५
नेहटणी मौजे नायगाव प्रा। सिरवळ सु॥ अर्बा तिसैन अलफ अज जमीन-जुमला → पुढे वाचण्यासाठी इथे क्लीक करा
*
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ८१ ] श्रीरामचंद्र. १७२०.
यादी. पहिले बोली आहे जेः --
सातायिपासून जिला घ्यावा, गडकिल्ले कोट स्वाधीन करून देऊ, ऐसें महाराज राजश्रीचें वचन आहे स्वहस्तें यादी आहे शपथ देऊन आणिलें त्यास, येथें धणियास विचार पडला. समर्थ लोकीं वचन दिलें तें सत्य करावें, हें उत्तम आहे. पुढें राज्य सुटेल सेवा घ्यावी. याचें संकटच पडलें असेल, तर निदानीः-
(पुढील मजकुर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ५६ १६१५
पा। सिरवळ
दस्त कर्यात
गाव गना
रकमाला
१
---
७
मौजे खंडाले अज जमीनजुमला जिराती चावर २६ बाद बजा वाजट चावर ८ सबब मौजे मजकूर जमीन वाजट वाढत होती त्यासि पेसजी कारकीर्दीस हजरत मिया रहीम महमद इदलशाही किलेदार पा। मा।र यानी मौजे मजकुरीची जमीन मोजून वाजट बाद दिल्ही बा। कौल बिनाव मोकदम मौजे मजकूर छ २२ रजबू सन तिसा अर्बैन अलफ व कारकीर्दी माहाराज राजश्री सीवाजी राजे साहेब याचे वेळेस राजश्री मोरो त्रिमल प्रधान यानी पा। मजकुरास एऊन कीर्दी परगणीची मोजून धारा बाधोन दिल्हा ते समई सारा गाव मोजून मसाती केली वाजट जमीन बाद पडिली ते खरी जाली त्यावरून मशारनुले पत स्वामीने मोकदमास कौल देऊन वाजट जमीन बाद दिल्ही चावर ८ बाकी जमीन चावर १८
खालीसाती चावर इनामती चावर
१५।- १। मोकदम
.।- कुलकर्णी
१ पाडेवार
-।. निगा विहीर
---------
* २lll
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ८० ] अलीफ. २२ सप्टेंबर १७१९.
राजे शाहू याणीं बादशाही कृपेस आपला सत्कार समजोन जाणावें कीं, सांप्रत थोरले बादशाह यांस तापाचा आजार होऊन कैलासवासी जाले आणि ईश्वरकृपेनें आह्मीं राज्याधिकारी जालो. सा। तुह्मास फर्मान लिहिला आहे. तरी तुह्मीही येविशीचा सतोष मानून पेशजी प्रो। इकडील लक्षात वागवण्यात आपले बढतीचे कारण समजोन अलीखान वजीर व त्याजकडील उमराव यांसी सख्य राखून सुभेदार व ठाणेदार यास मदत देत जावी आणि असा बंदोबस्त राखावा कीं, कोणीही मुफसद बादशाही मुलखात बंड न करूं शके. छ १९ जिलकाद, सन १ जुलूस.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ७९ ] अलीफ. ३० जून १७१९.
राजे शाहू याणीं बादशाही कृपेस आपला सत्कार जाणोन समजावें की, सांप्रत थोरले बादशाह याणीं कैलासवास करण्यापूर्वी तीन चार दिवस आह्मीं दौलतीचा अधिकार करावा असे सांगितलें. त्याजवरून छ २० रजब सन ११३१ रोज शनिवार तक्तनिसीन जाहालों आणि खजिना व हुकूम शिक्का वगैरे स्वाधीन जाला. याजकरितां तुह्मास हा फर्मान लिहिला आहे. तरी तुह्मीं एविशीचा संतोष मानून पूर्ववत् लक्षात वागण्यांत आपले कल्याण जाणावें. आणि अलमअलीखान वजीर व त्याजकडील कामगार व ठाणेदार यासी मदत देऊन असा बंदोबस्त राखावी की, बादशाही मुलखात बंडें वगैरे कोणतेही रीतीनें खराब न करीत. छ. २७ रजब, सन १ जुलूस.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ५५ १६१५
प्रा। सिरवल
दस्त मलिकआबर रकमालार
कर्याती
मौजे न्हावी अज जमीन जुमला चावर सुमार १/१०
४९
ता।
ऐन चावर वाजट जमीन चावर
४१ ८
वजा बाद वाजटजमीन बाद दिल्ही कारकीर्दी इदलशाही अमल मिया रहीम महमद किलेदार ठाणे मजकूर यानी मौजे मजकूरची मसाहाती करून वाजट जमीन बाद कौल बिनाव मोकदम मौजे मजकूर छ २२ रजब सन तिसा अर्बैन अलफ हाली कारकीर्द राजश्री सिवाजी राजेसाहेब राजश्री मोरो त्रिमल प्रधान यानी पो। मजकूरची मसाहती करून कीर्दी जमीनीस धारा बाघोन दिल्हा ते समई मौजे मजकूरचे वाजट जमीन बाद पडली आहे ते खरी खोटी मनास आणिली गाव मोजून मसाहती केली वाजट जमीन गावावरी चडिली ऐसे तहकीक करून मौजे मजकूरच्या मोकदमास सनद करून दिल्ही जमीन चावर ८ बाकी जमीन चावर ४१ → पुढे वाचण्यासाठी इथे क्लीक करा
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ७८ ] अलीफ. १५ मार्च १७१९.
सर्व शूरात श्रेष्ठ, सर्व उमरावात थोर, इस्लामाचे रक्षक, शाहू राजे यांणीं बादशाही कृपेस आपला सत्कार समजोन जाणावे की -- सांप्रत अमीरुलउमराव याणी अर्ज केल्यावरून तुमचे कदीम राज्यांतून दहा लक्ष रुपये पेषकषी द्यावयाचें मुकरर करून हा फर्मान तुह्मास लिहून दिल्हा असे. तरी पेषकषीचा ऐवज, चौथाई रोख घेऊन, बाकी किस्तीप्रमाणे द्यावा आणि सदोदित इकडील लक्षात वागोन मुलकाची आबादी व मुफसरांस तबी पोहोचवीत जावी व इकडील दौलतीची किफायत करण्यांत आपलें कल्याणाचे कारण जाणावे छ ४ जमादिलोवल, सन १ जुलूस, सु।। सन ११३१ हिजरी.
अलीफ.
यादी महाराज यांजकडे महालेराजेकदीम पेशजीप्रमाणें राजे शाहूकडे दिल्हे. त्याची पेषकष दहा लक्ष रुपये ठरविली. त्याप्रमाणें चौथाई हस्तगत जाल्यावर द्यावी, आणि बाकी ऐवज किस्ती बाकीप्रमाणें. त्याप्रमाणे सरकार आज्ञा जाहाली ते महाल सदतीस.
(पुढील मजकुर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ५४ १५९४ श्रावण शुध्द १
नकलेची नकल
महजर शके १५९४ विरोधीकृतनाम संवछरे श्रावण शु॥ १ पाडवा ते दिवसी वाटणी जाली ऐसी जे बिहुजूर बितपसिल
कारकून प्रांत मजकूर →पुढे वाचण्यासाठी इथे क्लीक करा
सु॥ सालस सबैन अलफ या विद्येमाने वाटणी जाली ऐसी जे विठोजी बी॥ गाखोजी व बापुजी बी॥ बाजी व बरवाजी बी॥ आपाजी व लखमाजी बी॥ अपाजी निगडे प्रा। मजकूर हे आपआपणामधे वृत्तीबदल भाउत होते ऐसीयासी हुजूर जाऊन राजश्री साहेब बदगीस आपली हकीकत कुल सागून साहेबी मनास आणून आपणास कारकुनाचे नावे खुर्दखत देऊन माहालास पा। माहली कारकून व गोत श्री देव याचे देवळी बसोन समजाविश केली त्याप्रो। आपण चालावे आपला हक कजीमा इनाम एकूण बेरीजेची वाटणीचा तह दिल्हा देहे ५ बी॥
हक गाव गनां →पुढे वाचण्यासाठी इथे क्लीक करा
या खेरीज तूप बीज जुते बकरे नीमे
सदरहूप्रो। वाटणी करून दिल्ही असे याप्रमाणे लेकराचे लेकरी खाऊन सुखरूप असणे दिवाणातून तश्रीफ मानपान विठोजीस दिल्हे असे त्यावर बहीरजी बीन अपाजी निगडे यासी विचारिले की तुह्मी महजर दाखविला त्यात वडिलपण विठोजी बीन गोरखोजी याजकडे लागले असता तुह्मी वडिलपण अनभविता याचा विचार काये आहे तो सागणे त्यावरून बहिरजी निगडे बोलिले की विठोजी बीन गोरखोजी यानी वाटणी केली तेसमई आपला बाप अपाजी बीन मलजी चदीस गेले होते ते तिकडे च च्यार पाच वरसे होते तिकडून गावास आलियावर सावे वरसीं विठोजी बीन गोरखोजीस बोलिले की मी वडील असता तुह्मी वडिलपण आपल्या नावे काढिले याउपरी तुह्मी आह्मी हुजूर रायगडास माहाराज राजश्री स्वामी थोरले साहेबसनिध जाऊन तेथे तुमचा आमचा निवाड होईल ह्मणोन दोघे हि निघोन कसबे. हरणसास ता। वेलवड खोरे येथे जाऊन राहिले तेथील देशमुखानी उभयतास वर्तमान विचारिले की तुह्मी कोठे जाता त्याजपासीं उभयतानी आपले वर्तमान सागितले त्यावरून तेथील देशमुखानी उभयतास वर्तमान विचारिले की तुह्मी कोठे जाता त्याजपासी उभयतानी आपले वर्तमान सागितले त्यावरून तेथील देशमुखानी उभयतास पुरसीस केली की तुह्मी दिवाणात जावे ऐसे नाही आह्मी व गोत बसोन हे स्थळी तुमची समजावीस करून त्यास रजावद असिलेस तरी राजिनामे लेहून देणे त्यावरून उभयताने राजी होऊन राजीनामे लेहून दिल्हे त्यावर गोताने ये गोष्टीचा मजकूर मनास आणून उभयताची समजावीस करून महजर अपाजी बीन मलजी याजपासी देविला तो त्यानी दिल्हा दोन महजर आपल्या बापापासी दिल्हे त्या ता। आपाजी बीन मलजी वडिलपण आनभवित आले ते मृत्य पावले त्याचे मागे आपण हि वडिलपण अनभवितो त्याजवरून बहिरजी निगडे यासी विचारिले की हरणसच्या गोताचा महजर दाखवणे यावरून त्यानी गोत महजर आणून दाखविला तेथें मजमून बितपसिल
महजर शके १६०२ रौद्रनाम सवत्सरे मार्गस्वर वद्य अष्टमी सुक्रवार ते दिवसीं हजिर मज्यालसीस स्थल कसबे हरणस ता। वेलवंडखोरे → पुढे वाचण्यासाठी इथे क्लीक करा
येणेप्रमाणे हर दो जणानी तकरिरा लेहून दिल्ह्या यावर समस्त गोतवाले ब्राह्मण मिलाले श्रीच्या देवली बैसून मनसुबी मनास आणिता अपाजी बी। मलजी नाईक निगडे वडिल घर होय विठोजी बी। गोरखोजी धाकटे घर होय ऐसे असोन विठोजी बी। गोरखोजी निगडे यानी वडिलपणाचा कारभार केला तरि ये गोष्टीस बहुतसे काही अतर पडिले नाही कारभार केला तरी ये गोष्टीबदल वडिलपण कोण्ही घेणार नाही मग हर दोजणास जमान घेतो विठोजी बी॥ गोरखोजी यात जमान कृष्णाजी नाईक सिलीमकर देशमुख ता। गुंजण मावल व आपाजी बी॥ मल्हारजी नाईक निगडे यासी जमान राघोजी बी॥ कृष्णाजी डोहार वेलिसदार देशमुख मौजे जोगवडी ता। वैलवड खोरे ऐसे जमान गेतले जे गोत न्याये निवाडा होईल तेणे प्रो। वर्तावे त्यास हिलाहरकती करील तो गोताचा खोटा दिवाणचा गुन्हेगार असे कतबे लेहून मग सदरहु दोघाजणाचा बसून निवाडा केला ऐसा जे अपाजी बी॥ मलजी निगडे वडिल घर यासी मानपान विडा टिला व सिका सांगर व वडिलपणास जमीन एक चावर व पाच होन आहेत ते खाऊन वडिलपणाचा कारभार करावा व विठोजी बी। गोरखोजी निगडे धाकटे घर यासी काहीं वडिलपणासी व कारभारास समध नाही आपले तक्षीम धाकटेपणाची जे येईल ते खाऊन असावे ऐसा निवाडा करून हरदोजणाचे प्रमाणे महजर केला असे यासी हिला हरकत जो करील तो गोताचा खोटा दिवाणचा गुन्हेगार व दिवाणात वण होन ५०० पाचसे देणे सु॥ इहिदे समानीन अलफ हा महजर सही
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ५३ १५६५
सु॥ अर्बा अर्बैन अलफ कारणे महजर (लेहोन दिला ऐसा जे)
तिमाजी पुरोशोतम देसकुलकणी पा। सिरवल हे दोघे आपणामधे आपण देशुलकणाबदल व गाउकुलकरणाबदल भाडत होते ह्मणउनु निवाडियाकारणे साहेबापासी आले साहेबी सदरेहून हजीर मजालसी या देखता दोघाजणाचे बोल मनास आणिता तिमाजी पुरोशेतम बोलिले जे आपला आजा लुखो विठल त्यासी दोग पुत्र वडिल रामाजीचा आजा कान्हो व धाकटा आपला बाप पुरखोवा ऐसे रामाजीचे व आपले एक घर आसोन रामाजी देसकुलकरणाचा निमे वाटा व गाउ कुलकरणाचा वाटा व इनामतीचा वाटा आपणासी देत नाही तरी साहेबी रामाजीस सागोन निमे देसकुलकरण व गाउकुलकरण निमे व सेते निमे ऐसी देविली पाहिजे ऐसे तिमाजी बोलिला हे बोल हजिर मजालसी खातिरेसी आणून हजीर मजालसी रामाजी विठलसी पुसिले जे तुझे व तिमाजीचे घर एक होउनु व्रीतीच वाटा तिमाजीस कायेबदल देत नाहीस ऐसे पुसिले त्यावरी रामाजी विठल बोलिला जे तिमाजी देसकुलकरणाचा व गावकुलकरणाचा निमे तकसीमदार होय ऐसे आसोन आपणच घेता तरि हा आपला आन्याये जाला आहे तरी साहेबी देसकुलकरण व गावकुलकरण व इनाम ऐसी निमे वाटोन आपणासी द्यावी व निमे तिमाजी पुरोशेतमास देणे ऐसे रामाजी बोलिला येणेप्रमाणे दर दो जणाचे बोल मनास आणोनु दोघाजणास देस कुलकरण व गावकुलकरण व इनाम सेत व मला व मानमाननुक याचा येणेप्रमाणे निवाडा केला बितपसिल देसकुलकरणी दोघे हि कागदपत्री दोन्ही नावे लिहीत जावे आधी रामाजी विठल त्याचे नाव लिहिणे मग तिमाजी पुरोशेतमाचे लिहिणे व दिवाणीतील तश्रीफ व पाने जे हरयेक ठाईची व टिला व हरयेक मानमाननुक आधी रामाजी विठल यासी यामधून तिमाजी पुरोशेतमास येणेप्रमाणे मानमाननुक घेणे देसकुलकरणाचा हकलाजिमा व बाजे व्रीतीते दो ठोइ दोघानी येणेप्रमाणे वाटून खाणे तपसिल
रामाजी विठल यासी वाटा दिल्हे
देखील बापभाऊ
→पुढे वाचण्यासाठी इथे क्लीक करा
येणेप्रमाणे निवाडा केला आहे त्याप्रमारे हर दोजणी लेकुराचे लेकुरी खाऊनु दोघाजणी देसकुलकरण चालवणे हिलाहरकती न करावी हिलाहरकती करून निवडिलेप्रमाणे जो वर्तेना त्याणे दिवाणात होन पाचसे देणे हा महजर सही
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ७७ ] अलीफ. २० फेब्रुवारी १७१९.
सांप्रत अर्ज जाला कीं राजश्रेष्ठ राजे शाहू इकडील लक्षात वागोन पधरा हजार स्वारांनसी दक्षिणेचे सुभ्याची कुमक राखितील. त्याजवरून सहा सुभे दक्षिणेचे, त्यांची चौथाई सदरहू स्वारांचे खर्चाबद्दल घेत जावी असें ठरले ऐसियास, किल्लेदार, मामलतदार, जहागीरदार व करोडे वगैरे वर्तमान व भावी याणीं सुभेमजकूरची चौथाई त्यांस देत जावी ताकीद छ २२ रबिलाखर, सन १ जुलूस, सुll सन ११३१ हिजरी.