Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
१ नबाबाजवळ गोविंदराव काळे यांचे बोलणें केलें कीं नाशरिनमुलुख यास सुचना जाऊन त्याणीं आमचे लक्षाप्रमाणें चालावें, व आमचें राजकारणास अनुकूळ असावें. बाजीरावसाहेव राज्यावर आले ह्मणजे खर्ड्याचे स्वारीस जो मुलुख घेतला आहे तो परत देऊं व ऐवज येणें ठरला आहे तो सोडून देऊं, असें ठरल्यावरून ते नानाचे राजकारणास अनुकूळ होऊन नाशरिनमुलुख यांस नानाचे लक्षानें चालण्याविशीं सूचना केली; त्याजवरून नाशरीन यांणीं परशरामभाऊ यास द्यावयाकरितां ऐवज परड्यास आणविल होता तो परड्यास तसाच ठेविला; दिल्हा नाहीं.
१ बाबा फडके यांजकडे ऐवज पाठऊन हुजरातचे फौजेस खर्चास आंतून देऊन फौज त्याणीं आपले लक्षांत लाऊन घेतली.
१ बाजीरावसाहेब शिंद्याचे लस्करांत होते, त्यास ऐवज खर्चास पाठविला. त्यांचे लक्ष आपल्याकडे होतें ते दृढ करून घेतलें. बाजीरावसाहेब यांणीं आपले बंडांत दोन तीनशें लोक जमा केला.
१ मानाजी फाकडे बाजीरावसाहेब यांचेजवळ शिंदे यांचे लष्करांत होते, त्यांस खर्चास पाठविलें. त्यांणीं कांहीं लोक आपले जवळ जमा केले.
१ शिंदे यांणीं पागनीस यांस कैद करावें, व बाबा फडके यांणीं परशरामभाऊ यांस कैद करावें असा संकेत होऊन श्रावण वद्य ८ छ, २२ सफरी शिंद्याची फौज तयार जाली व फडके यांजवळ हुन्नजरातची फौज तयार होऊन आली, इतकि यांत पागनीस सावध होऊन त्यांणीं आपले लष्करचा बंदोबस्त केला व परशरामभाऊ हुशार जाले. त्याजवरून फडके यांची फौज माघारी गेली. नंतर परशरामभाऊ यांणीं फौज व पागेचे सरदार यांस गोडी व जरब देऊन फोडाफोड केली आणि बाबा फडके यांस भाद्रपद वद्य १२ बुधवार छ. २५ रबीलावली कैद करून चाकेण किल्ल्यांत पाठविलें; घराची जप्ती केली; नारोपंत चक्रदेव पळोन गेले; ते मशरीन याचे लष्करांत जाऊन काठीकर, शिलेदार यांचें गटांत राहिले. मालाजी घोरपडे व निळकंठराव परभु, परशरामभाऊ यांचे लक्षांत आले नाहींत सबब त्यांचें घराचे आसपास चौक्या ठेऊन धरावयाची मसलत केली परंतु ते आपले मजबुदीनें राहिले; आणि फौजसुद्धां निघोन वाई प्रांतीं गेले.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
चिमाजी अप्पा यांस वस्त्रे जाल्यावर नानासः पुण्यास येण्याविशीं बाळोबा पागनीस यांचा रुकार घेऊन परशरामभाऊ यांणीं सांगून पाठविलें. त्यावरून नानांचें बोलणें पडलें कीं भाऊंनीं आपले चिरंजिवास येथें पाठवावें. त्याजवळ बोलणें होऊन ठरेल तसें करावयास येईल ह्मणोन सांगितलें; त्याजवरून परशरामभाऊ यांणीं आपले चिरंजीव हरी परशराम यास नानाकडे रवाना केलें. त्यांणीं सडे जावे. ते पांच हजार फौजेनिशी शिरवळास गेले; त्याजवरून नानाचे मनांत फौजेसुद्धां येतात तेव्हां कांहीं दंगा करावयाची मसलत दिसती असा अंदेशा आला, व बाबा फडके यांणींही सांगून पाठविलें कीं आपण करणें तें सावधगिरीनें करावें, व आणखीही लोकांनीं बातमी सांगितली त्याजवरून वैशाख वद्य ३० छ, २८ जिल्कादी मुहूर्त न पहातां तेथून सडे निघोन प्रतापगडास गेले आणि घाटबंद्या करून माहाडास गेले.
१ नाना निघोन गेले ही बातमी येतांच बाळोबा पागनीस यांणीं परशरामभाऊस सांगितलें कीं नानास धरावयास पलटण देतों. तुह्मीं आपलीं फौज पाठवून नानास धरावें; तेव्हां भाऊंनीं सांगितलें, की तूर्त असें करावयाचें नाहीं. नाना अनकुळ नच होते तरी मग तसें करूं असें सांगितले, परंतु नानाचे भाऊचे दिवसेंनदिवस वाकडेपणा वाढत चालला त्याजवरून परशरामभाऊ यांणीं नानाचे वाडे व सरंजाम जप्त केले.
१ शिंदे यास खर्चास ऐवज द्यावयाकरितां परशरामभाऊ यांणीं कर्जपट्टी शेहरांत केली.
१ शिंदे यांचे लस्करची लाही वगैरे मुलकांत होऊन रयतेस उपद्रव फार होऊ लागला,
१ परशरामभाऊ यांणीं-मोकळें करून खरड्याचे स्वारीस ऐवज नवाब यांचे सरकारांतून घ्यावयाचा ठरला त्यापैकीं येणें राहिला तो ध्यावयाचा ठरविला. मोकळे होऊन गुळ टेंकडीजवळ राहिले. त्याणें आपले जवळ हैद्राबादेहून कांहीं फौज आणविली व कांहीं पुण्यांत नवी ठेविली. त्या फौजेंत हुजरातचे फौजेचे लगतीचीं फौज नारोपंत चक्रदेव यांणी फार पाठविली.
१ नाना माहाडोस गेल्यावर त्यांणी मसलत केली.
१ रायगड वगैरे किल्ले लक्षांत राखोन किल्ल्यांचा बंदोबस्त केला.
१ रायाजी पाटील यांचे हातून दवलतराव शिंदे यांशीं राजकारण करून पागनीस यांस कैद करावें आणि बाजीरावसाहेब यांस मोकळें करावें, शिंदे यांणीं फौजेसुद्धां हिंदुस्थानांत जावें ह्मणजे दाहा लक्षांची जाहागिर वे नगरच. किल्ला द्यावा असें केले; त्यावरून राज्यकारण जमलें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ११२ ] श्री. १७३०.
राजमान्य राजश्री भगवंतराव पंडित यांसी आज्ञा केली ऐसी जे - तुह्मीं विनंतिपत्र पाठविलें तें प्रविष्ट झालें. लेखनार्थ अक्षरशा अवगत झाला. तुह्मांकडून गोविंद व्यंकटाद्रि आले, यांणीं विनंति केली त्याजवरून सविस्तर कळों आलें. ऐसियास, चिरंजीव राजश्री संभाजी राजे यासी भेटीस आणावयाबद्दल चिरंजीव राजश्री फत्तेसिंग भोंसले व राजश्री श्रीनिवास पंडित प्रतिनिधि व राजश्री नारो रामचंद्र मंत्री व राजश्री बाळाजी बाजीराऊ रवाना केले आहेत हे चिरजीव राजश्री यास घेऊन येतील तुह्मांसही हुजूर दर्शनास यावयाची आज्ञा करून राजश्री भवानीशंकर मोरेश्वर यास पाठविले आहे हे स्वामींची आज्ञावचनें सांगतील तरी तुह्मीं कोणेविशीचा संदेह चित्तांत न आणितां पत्रदर्शनी स्वार होऊन हुजूर दर्शनास येणें तुमचे मनोदयानुरुप विवेक करून दिल्हा जाईल कदाचित् बनाव न बसे तरी तुह्मांस तुमचे स्थळास याल तैसे पोहोंचाऊन दिल्हे जाईल नि सदेहरूप पत्र पावेल ते क्षणीं स्वार होऊन येणें विलंबावरी न घालणें कितेक आज्ञा करणें ते गोविंद व्यकटाद्रि यांस केली आहे. सागतील त्यावरून कळों येईल जाणिजे. सुज्ञ असा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ८४ १५६२ ज्येष्ठ वद्य २
→पुढील मजकुर वाचण्यासाठी इथे क्लीक करा
सकलगुणसौजनी माहा राजमानी राजश्री वेदमुहूर्ती राजश्री रंगभट चित्राव सेकीन का। वाई गोसावीयाचे सेवेसी सेवक कासी रंगनाथ खोत जकाती पा। मजकूर सास्टांगी नमसकार विनंती वयाकारणे ऐसे उपरी हाजीर मजालसी सरगुऱ्हो वा नाईकवाडी पा। मजकूरु सु॥ इहिदे अर्बैन अलफ कारणे लेहून दिल्हे दानपत्र ऐसा जे तुमचे देवापासी नंदादीप रोजीना तेल
।. अपण अपले बकामधे तुह्मासी दिल्हे असे आपण वटीतो तो चालवीन आपणामागाते जो कोण्ही होईल त्याणे चालवावे या दुसमान होईल त्याने हि चालवावे जो कोण्ही इस्कील हिंदु करील त्यासी गाईचे आण असे मुसलमान होउनु मोडील त्यासी मुसाफेचे आण असे जो कोण्ही खोत होईल त्याणे चालवावे हे कागद सही
कासी रंगनाथ
खोत बिकलम
तेरीख १५ माहे सफर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १११ ] श्री. २८-१०-१७३२.
राजश्री भगवंतराव पंडित अमात्य हुकुमतपन्हा गोसावी यांसीः -
सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य
स्ने।। फत्तेसिग भोसले दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लेखन केलें पाहिजे विशेष पत्र पाठविलें प्रविष्ट होऊन लेखनार्थ अवगत झाला व कितेक वर्तमान रा गोविंद व्यंकटाद्रि यांनीं निवेदन केलेवरून कळले. ऐसियास राजश्री स्वामीनी तीर्थरुप राजश्री काकासाहेबांस आणावयास राजश्री नारबा यास व राजश्री प्रतिनिधीस रवाना केलें आहे ते लौकरीच दर्शनास येतील आणि आपल्याकडेही राजश्री भवानीशंकर यांस पाठविलें आहे. आपण आलियावरी त्यांचें व तुमचें सौरस्य आपल्या मनोदयानुरुप करून द्यावें. कदाचित् मनोदयानुरूप गोष्टी घडो न ये तरी आपल्या स्थलास आपल्यास आज्ञा देऊन पाठवावें, ऐसा निश्चय करून आपल्यास पत्र लिहिलें आहे. तरी राजश्री स्वामीच्या पत्राचा अर्थ मनांत आणून आपण अविलंबे दर्शनास आलें पाहिजे. दर्शनानंतर ज्या गोष्टी आपले चित्तीं आहेत त्या होऊन येतील. तरी कोणेविशीं चित्तांत सदेह न आणितां अविलंबें दर्शनास आले पाहिजे. रवाना छ १९ जावेल. बहुत काय लिहिणें. लोभ असो दीजे. हे विनंती.
लेखनावधिमुद्रा.
˜ °
श्रीशिवशंभुस्वामिनि
शाहूभूपेशपार्थिवोत्तंसे ।।
परिणतचेतोवृत्ते: कत्तेसिंग-
हस्य मुद्रेयम् ।।
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ११० ] श्री. ६ एप्रिल १७२९.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५५ सौम्यनाम संवत्सरे चैत्र बहुल चतुर्थी रविवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शंभुछत्रपति स्वामी याणीं समस्तराजकार्यधुरंधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री भगवंतराऊ अमात्य हुकुमतपन्हा यासी आज्ञा केली ऐसी जेः-
तुह्मीं हालीं विनंतिपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन लिहिलें वृत्त विदित जालें. ऐशास रत्नागिरीबाबत हत्ती आपण स्वामीस नजर करून रत्नागिरीचा प्रसंग आपले स्वाधीन जाल्यावरी आधीं हे गोष्ट कर्तव्य, आपण कांहीं आपाजीराव नव्हों, ह्मणून तुह्मीं कितेक नारोराम हरकारा व मल्हारजी सूर्यवंशी यांसमागमें सांगोन पाठविलेंत, त्यावरून यदर्थी अपूर्व कार्य आहे कीं, तुह्मीं सेवक असेच आहा । वडीलवडिलापासून स्वामिकार्यप्रसंगें धण्यास संतोषी करून आपली नामना संपादित आलेस, तेथें वरकड गोष्टींचे अगाध आहे ऐसें नाहीं त्यास, तुह्मीं रत्नागिरीचा प्रसंग उत्तर लिहून हातीं घेऊन बावड्यास आलेस, हत्ती स्वामीस देणार, ऐसें वर्तमान परस्पर व तुह्मांकडील येथें आले गेले त्यांनीही सांगितलें. तेव्हां तुह्मीही बोलिले होतेस तदनुरुपच हे चर्चा आहे, ऐसें स्वामींनी मनांत आणून ज्योत्याजी दळवी यासमागमें हत्ती पाठवून द्यावयाविशीं लिहिलें त्यावरी तुह्मीं जोत्याजी दळवी व सूर्याजी खाडे व मल्हारजी सूर्यवंशी यांसमागमें सांगोन पाठविलें कीं, हत्ती नजर करीतच आहो, त्यास गोपाळराव यांचे समाजविसीस स्वामींनी एक हत्ती द्यावा व आपला अभिमान धण्यास असावा, ये गोष्टीचे अभय शपथपूर्वक आपणास असावे ह्मणून सू।न पाठविलेंत त्यावरून स्वामींनीं तुह्मास बेलरोटी पत्र पाठविले गोपाळरायास एक हत्ती द्यावयाची गोष्ट ती सामान्य केली आणि तुह्मांकडील आले होते त्याजवळ राजश्री नानाजी वैद्य व केशव त्र्यंबक याचे विद्यमानें निश्चयपूर्वक होऊन जोत्याजी दळवी व तुकोजी व मल्हारजी यास तुह्माकडे पाठवून दिलें प्रस्तुत तुह्मीं हुजूरचे पत्रीं लिहिलें कीं, नानाजी वैद्य व केशव त्र्यंबक यांस लिहिलें आहे ते विदित करितील त्यावरून त्यास तुह्मीं काय लिहिलें ह्मणून मनास आणितां, जें तुह्मीं लिहिलें तें अव्यवस्थच लिहिलें । तरी हे चर्चा कांहीं स्वामींनी केली नसतां, तुह्मीं ऐसें काल्पनिक ल्याहावें हें उचित नव्हे. तुह्मीं होऊन बोलिलेस आणि स्वामीस सांगोन देखील पाठविलें कीं, आपण आपाजीराऊ नव्हों. त्यास, गोपाळरायाचे समजाविसीची ही गोष्ट स्वामींनी मान्य केली होती. किंबहुना, गोपाळराव स्वामीची आज्ञा घेऊन जाऊं लागले तेव्हां त्याणींही विनंति केली ते समई त्यासही स्वामींनीं सांगितलें कीं, भगवंतराव यांचें दर्शन जाहल्यावरी तुमचेंही समाधान स्वामी करितील, परंतु तुह्मीं शेवट ऐशी गोष्ट केली. त्यास, क्षुद्र मनुष्याचे बोलें वर्तता । आजवरी क्षुद्राचे विचारें जें जालें तें तुमचें तुह्मांस ठाउकें आहे. पुढेंही प्रत्ययास येईल. वरकड स्वामींनी क्रियापूर्वक तुमचें चालवूं ह्मटल्यास स्वामीकडून अंतर होणेंच नाहीं. परंतु तुमचें तुह्मांसच अनुभवास येईल. वरकड हत्तीचा विषय बहुतसा नाहीं. स्वामींनीं हत्ती बहुत मिळविले, बहुत पाळिले, आणखीही पाहिजेत ते मिळतील. परंतु तुह्मींही होऊन सांगोन देखील पाठविलेंत त्याचा परिणाम लवकर कळला हें बरेच जालें. आपाजीराव आपण नव्हों ह्मटलेंत. त्यास, आपाजीरायानीं करायाचें तें केलें स्वामीस कांहीं हत्तीचें अगत्य आहेसें नाहीं. हत्ती तुह्मांस असो देणें आणि आपलें समाधान असो देणें. स्वामीस हत्ती मिळतील. कांहीं चिंता नाहीं. तुमचें समाधान राहिलें. ह्मणजे सर्व झालें. येविशीं जोत्याजी दळवी यास आज्ञा केली, सांगतां कळेल. सुज्ञ असा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ८३ १५६२ आषाढ शुध्द १
श्रीशके १५६२ विक्रम संवत्सरे आषाढ शुध्द प्रतिपदा तद्दिनि घाटंभटी आउजि चित्रावासि लेहुन दिल्हे ऐसे जे अमचे इनाम येकसरामध्ये बिघे ३२ असेति त्ये तु भक्षुण घे भक्षुन हे अमचे सत्य स्वस्ताक्षरा सत्य
साक्षी
गोविंदभट माहाबलेश्वरकर
गोविंदभट्ट जानभट्ट
नारायणभट्ट सातपुते
भानभट दिघे
नरशिंभट्ट चित्राव
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १०९ ] श्री. ३ एप्रिल १७२९.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५५ सौम्य नाम संवत्सरे चैत्र बहुल प्रतिपदा गुरुवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शंभुछत्रपति स्वामी याणीं समस्तराजकार्यधुरंधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री भगवंतराऊ अमात्य हुकुमतपन्हा यांसी आज्ञा केली ऐसी जेः-
तुह्मीं विनंतिपत्र तुकोजी खाडे व मल्हारजी सूर्यवंशी यां समागमे पाठविलं ते प्रविष्ट जाहलें. आपण स्वामीचे हुकुमबारदार सेवक, स्वामीचे आज्ञेपेक्षां विशेष आपणांस कांहीं नाहीं, धनसंपदा सर्व स्वामीची आहे, आपण साहेबांचीं लाविली झाडें आहों, आपला अभिमान स्वामीस आहे, उतगेमातगे चाकर नहों, ह्मणून कितेक तपसिलें निष्ठापूर्वक लिहिलें ते सविस्तर विदित जालें व तुह्मांकडील हरदू जणांनींही केले. ऐशास तुह्मीं जे लिहिलें तें यथार्थ आहे तुह्मांस स्वामीचे आज्ञेपेक्षां कांहीं विशेष आहे किंवा तुह्मांजवळ जे धनसंपदा आहे ते स्वामीची, एतदर्थी कांहीं अन्यथा आहे ऐसें नाहीं जो स्वामीचा मनोदय तेच तुह्मांस परमावश्यक आहे. तेथें उतगेमातगेपणाची संभूति ही तुह्मांकडे येणें नाहीं. स्वामीचीं लाविलीं झाडें ह्मणविता तद्भतच स्वामींस पूर्ण तुमचा अभिमान आहे त्याप्रमाणें तुमचें साभिमानपणें चालवायास स्वामी अंतराय कदापि होऊ देणार नाहीत. येविशी हल्ली जोत्याजी दळवी वा। मुल तुह्मांकडील एकजण यासमागमें बेलरोटी पाठविली आहे. येविशीं विशदेकरून ल्याहावें तरी मनोमन साक्ष आहे. तत्रापि दर्शनानंतरही कळेल. हालीं पाठविले आहेत हे आज्ञेप्रमाणें जबानी सांगतां कळेल व गांवांविशीं लिहिलें तरी राजश्री नारो हणमत तुह्मांकडे गेले आहेत. त्यास त्या गांवचा प्रसंग ठाऊका आहे. तथापि ते हुजूर आल्यावरी त्याजवळ आज्ञा केली जाईल. वरकड कोणेविशीं संदेह धरावासें नाहीं. जें जें स्वामी बोलिले आहेत त्यास सर्वात्मना तफावत होणार नाहीं येविशी राजश्री नानाजी वैद्य व राजश्री केशव त्र्यंबक लिहितां कळेल. जाणिजे. सुज्ञ असा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १०८ ] श्री. २७ फेब्रुवारी १७२९.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५५ कीलक नाम सवत्सरे फाल्गुन शुद्ध दशमी गुरुवासरे क्षत्रियकुलावंतस श्रीराजा शंभुछत्रपति स्वामी याणीं समस्तराजकार्यधुरंधर विश्वासनिधी राजमान्य राजश्री भगवंत राऊ अमात्य हुकमतपन्हा यांसी आज्ञा केली ऐसी जेः-
तुह्मीं विनतिपत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहलें राजश्री मोरेश्वरराव यांणीं मागती खटला आरंभिला वस्तभाव ओळखिली आहे, ते देत नाहीं स्वामीनी न्याय्यत त्यास आज्ञा करावी अंगानिराळे टाकिलें, ऐसें सत्य असलिया आपण पाहून घेऊ, ह्मणून कितेक तपसील लिहिले तें विदित जाहलें ऐशास, तुमचे घरगुती प्रसंग घरचेघरीं त्याणीं तुह्मीं समजावें. स्वामीकडे या गोष्टीचा काहीं गुंता आहे, ऐसें नाहीं. ह्मणून पहिलेंच तुह्मांस लिहिलें तथापि तेंच तें तुह्मी लिहितां. स्वामींनी अंगानिराळें टाकिलेसें सत्य असलिया पाहून घेऊं ह्मणून लिहिलें तरी मौरेश्वररायाचें अगत्य धरून तुमचा प्रसंग अगानिराळा टाकिला, ऐसें तो कांहीं जालें नाहीं. न्यायत: सांगावें, त्यास, तुह्मी उभयतांहि सन्निध नाहीं. सन्निध आल्यानंतर न्यायताही सांगणें तसें सांगितले जाईल. गांजिलें पळें, नवांजिलें मरें । साहेबीं पायीं लोटूं नये ह्मणून कितेक लिहिलें. तरी ऐसें लिहावेसे काय जालें आहे सर्व प्रकारें तुमचें चालवावयास स्वामीपासून अंतराय कांहीं होत नाहीं. यलकेचीसाल व बाव्याच्या शेंगा व काठ्या पाठविल्याप्रमाणें प्रविष्ट जाहल्या. वरकड मल्हारजी सांगतां कळेल. बहुत लिहिणें तरी सुज्ञ असा.
मर्यादेयं
विराजते.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १०७ ] श्री. १७ फेब्रुवारी १७२९.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५५ कीलकनाम संवत्सरे फाल्गुन शुद्ध प्रतिपदा इंदुवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शंभुछत्रपति स्वामी याणीं समस्तराजकार्यधुरंधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री भगवंतराव अमात्य हुकुमत्पन्हा यांसी आज्ञा केली ऐसी जेः -
तुह्मी विनंतीपत्र पाठविलें तें प्रविष्ट जालें. पूर्वी राजश्री रामचंद्र पंडित यांवरी धण्यांनी दया केली. त्याणीही निष्ठेनें राज्यांत सेवा केली आपणही स्वामीचे सेवेसी अंतर केलें नाहीं. याकरितां स्वामींनीं आपला अभिमान असेल तरी चालवावें. घरफुट झाली आहे. राजश्री आपाजीराव याणीं आपल्या बारगीरवस्ता रत्नागिरीस होत्या त्या आटोपिल्या आहेत. त्या त्यास आज्ञा करून देववाव्या. ह्मणून कितेक आद्यंत विस्तारेकरून लिहिले तें अक्षरश: विदित जालें. ऐशास, तुह्मीं जे लिहिलें तें अवघें यथार्थच लिहिलें. त्यांत कांहीं अन्यथा आहे ऐसें नाहीं. तुमचे वडिलीं सेवा केली त्याप्रमाणें तुह्मींही सेवा करावी स्वामींनी तुह्मांवरी कृपा करून चालवावें. तुमचें जगनामोश तुमचें वडिलाप्रमाणें व्हावें, हेंच स्वामीस अगत्य. त्याप्रमाणें स्वामींनी तुमचे चालवावयास अंतर केलें ऐसें नाहीं. आणि पुढेंही स्वामीस तुमचें चालवावें ये गोष्टीचा अभिमान अगत्य आहे. ऐसें असोन तुह्मीं इतकें पाल्हाळयुक्त ल्याहावेंसें काय आहे घरफुटीचा प्रसंग तर हा विचार तुमचे घरचा आहे यास स्वामीनी काय करावें. वरकड तुमचे हुद्दा मामला बहुमान यास स्वामीकडून अंतर जालें नाहीं. पुढेंही होणार नाही. येविशीं समाधान असो देणें. मल्हारजी सूर्यवंशी याजवळ आज्ञा केली आहे. सांगतां कळेल बहुत लिहितों तरी तुह्मीं सुज्ञ असा.
मर्यादेयं
विराजते.