[ ८६ ] श्री. ३ जानेवारी १७२३.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५० शोभकृतनाम संवत्सरे पौष बहुल चतुर्थी मंदवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शंभुछत्रपति स्वामी याणीं देशमुख व देशपाडे तर्फ तारळे यांसी आज्ञा केली ऐसी जे - राजश्री भगवंतराऊ अमात्य हुकमतपन्हा यांसी त्या प्रांतें रवाना केलें आहे. तरी तुह्मीं जमावानसी यांचे आज्ञेंत राहोन स्वामिकार्य करीत जाणें. आणि आपले सेवेचा मुजरा करून घेऊन स्वामीस संतोष पावणें. जाणिजे. लेखनालंकार.
मर्यादेयं विराजते.
रुजू सुरनिवीस
सुरु सद बार.