Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४६ १६५२ कार्तिक शुध्द १
तालीक
स्वस्ति राज्याभिषेक शके ५७ साधारण संवत्सरे कार्तिक शुध्द प्रतिपदा मंदवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीराजाशाहू छत्रपति स्वामी याणी राजश्री बापूजी श्रीपती यासि आज्ञा केली ऐसी जे मोरो बापूजी बेलसरे ज्योतिषी व कुलकर्णी मौजे जेजूरी वगैरे देह ता। कडेपठार पा। पुणे व पा। सुपे यासि हुजूर कसबे उबरजेच्या मुकामी स्वामीसन्निध एऊन विनंति केली की पूर्वी आपल्या वडिलाचा व खाड्याच्या जोतिषकुलकर्णाचे वृत्तीचा कजिया लागला होता त्यास माहाराज राजश्री थोरले कैलासवासी स्वामीचे कारकीर्दीस राजश्री दादाजी कोंडदेऊ नामजाद किले कोंढाणा यांपासीं इनसाफ इ. इ. इ.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ७२ ] श्री. १० जुलै १७१४.
श्रीरामचरण
नीलकंठ सोनदेव
शरण.
आज्ञापत्र समस्तराजकार्यधुरधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री रामचंद्र पडित हुकमतपन्हा ताहा कमाविसदार मौजे नांदवडे ता। खारा पाटण सुहर सन खमस अशर अलफ वेदमुर्ती राजश्री अनंतभट्ट बिन महादेवभट्ट उपनाम मुंडले, गोत्र नैधृत्य, सूत्र आश्वलायन, हे भले सत्पात्र आहेत. यांच्या कुटुंबाचा योगक्षेम चालिला पाहिजे. ह्मणून यांसी पूर्वी मजकूरपैकीं वृत्ती दाभोळी करी ६० साठची दिल्ही आहे. त्या खेरीज हालीं राजश्री छत्रपति स्वामीनीं राजश्री अनाजीपंतांच्या धारियानें दाभोळी करी २५ पंचवीसाची पड जमीन देविली आहे त्यावरून हें आज्ञापत्र सादर केले आहे. तरी सदर्हू पंचवीस करीची जमीन राजश्री अनाजीपंताच्या धारियानें पड जमीन अवल दूम, सीमा, तिन्ही प्रतीची मोजून देविली आहे. येविषयीं किल्ल्याच्या कारकुनास अलाहिदा पुत्र आहे त्याप्रमाणें ते पडी जमीन खेरीज हकदार करून मोजून देवितील. त्याप्रमाणें वतनदारांचें ठिकाण खेरीजकरून देऊन यास व यांचे पुत्र उत्तरोत्तर चालवणें नवीन पत्राचा आक्षेप न करणें. या पत्राची तलीक लेहून घेवून असलपत्रं परतून वेदमूर्तीजवळ देणेंं. छ ४ जमादिलाखर. निदेश समक्ष.
लेखनसीमा.
समुल्लसति.
बार सुरुसुद बार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ७१ ] श्री. १७१४.
पूर्वी मोंगलाई पादशाही प्रबळ असतां अवघे यवनकर्मे या भूमंडळी होत होतीं. देव, ब्राह्मण, गाई याचे उच्छेद जाले. तेव्हां श्री देवास संकट पडोन शहाण्णव कुळचे मराठे होते त्यांत जातिवंत मराठे पाहून भोसले, जाधव, निंबाळकर, मोहिते, घाटगे, घोरपडे, पालकर, गुजर, अहीरराव, शिरके, माहाडीक, काकडे, भाडवळकर, काटे, ऐसे एकवीस कुळ आईचे व एकवीस कुळ बापाचे निवड करून हिंदुपत सूर्यवंशी व सोमवंशी नेमून राज्यपदवी दिली. त्यामध्यें ईश्वराचे भजनी तत्पर, गाईब्राह्मण याचे प्रतिपालक, अभिमानी, निरंतर भावरत, साधू, सज्जन, भले, रयत प्रतिपालक, दुष्टांचा नि पात करणार, ऐसे योजून, ईश्वरें राजश्री मालोजी राजे भोसले यांसी स्वप्नी अभय देऊन, प्रत्यक्ष गोसावियाचे रुपें येऊन, दर्शन शिखरीं देऊन, भजनास लाविलें. त्यांची स्त्री मातु श्री उमाव्वा, साठे यांची कन्या होती. उभयतांचे निष्ठाकर्म पाहोन सत्तावीस पिढ्यांचे भोसले याचे वंशी राज्यपद दिलें मालोजी राजे यांनीं शिखरीं तळें बांधिले, जीवन केले, जनयात्रा येऊं लागली, इमारती केल्या, व राजश्री लिंगोपंत ब्राह्मण होते, त्यांस देव वरद होऊन त्याणीं बारव पाडिली. ईश्वर संतोषी होऊन मालोजी राजे याचे वंशी पुत्रसंतान दिले राजश्री शहाजी राजे भोसले व राजश्री स्वरूपजी राजे भोसले उभयता बंधूः-
(खालील मजकुर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६५३
श्रीलक्ष्मीकांत प्रा.
१७२५ माघ शुद्ध १
वेदमूर्ती राजश्री अनंत भटजी दाजी व केसोपंत स्वामीचे सेवेसी:--
पो बाजी विठ्ठल सा नमस्कार विनंति येथील कुशल ताा माघ शुद्ध १ मा देऊळगांव, पो लोहगांव, नजीक गंगातीर, जाणोन स्वकीय कुशल लेखन करीत गेले पाहिजे. विशेष. सांप्रत तुम्हांकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. तरी सविस्तर ल्याहावे. ऐशियासि, आपण येथून कूच करून म जलदरमजल फौजेसमागमें श्रीमंत पंतप्रधान यांजकडे जात असो. दुसरे राजश्री नरहरपंत सुभेदार यांणी पत्रे सरकारची ताकीदी वगैरे वैद्याचे वकिलाची वगैरे दिल्ही आहेत. ते पावतील. परंतु, यांतहि जीव नाहीं. असो. तुह्मी आपले मालमतीचा गुंता जैसा जाणाल तैसा उगऊन घेणे. बहुत काय लिहिणे १ लोभ असों दीजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६५२
श्रीलक्ष्मकांत.
१७२५ पौष शुद्ध १४
राजश्री नारायेण बाबूराव गोसावी यांसी:-- दंडवत विनंती उपरी. तुह्मी चिठी पाठविली ती पावली. लिहिला मजर कळला. त्यास, आंग्रजांसीं तह दोरमदार करून जाला. त्यांजकडून आ. तां अगलीक व्हावी, ऐसे राहिले नाही. पलटणे चाकर होतील, हा संशय तुझांस होता. त्यास, श्रीदयेने तो प्रकार जाला नाही व आझी केला नाही. तहाचा तपशालहि, तुह्मांकडील ग्रहस्थ येथे आहेत, त्यांचे लिहिल्यावरून कळेल, मसलतीचे प्रकर्मी तुह्मीं व राजश्री श्रीधर लक्ष्मण व कृष्णराव माधव ऐसे त्रिवर्ग. त्यांत कृश्णराव माधव याचा प्रकार श्रीजीने तैसा केला ! आतां राहतांना तुह्मीं उभयतां आहां. तुमचे मनांत जो जो अंदेश होता, तो कोणताहि एक नाहीं. पुढे धैर्य धरून चालणें आहे. ज्या स्थळीं तुह्मी जाण्याचे योजिले होते, त्याप्रों जाणे तों जालें असेल. परंतु, तुमची भेट जालियानंतर हे सर्व प्रकार बोलण्यात येतील, तेव्हां सविस्तर समजण्यांत येईल. धैर्य व विचार तुह्मांसारखियांनी सोडू नये. जैसे लिहून पाठविले तैसे मनांत तुह्मींही ठेऊन असावें. राा छ १२ माहे रमजान * नारायण रावजी ! तुह्मांस माझे लिहिनें हेच की, जें कर्ने ते काळावर नजर देऊन केले. त्यास, आतां सर्व माझे तुह्मी. जे जे सोबती आहां त्यांहींनीं धैर्य व मसलत चुकू नये. हे तुमची व माझी व उभयतांची बोलीं जाहलीच होती. याप्रमार्ने उद्दोग असावा. तिघांतून एकाचा प्रकार तैसा जाहला. यास श्रीसत्ता प्रमान ! परंतु तुह्मी उभयेत आहां. तेव्हां धैर्य व मसलतीस न चुकतां वरचेवर इतला देत जावा. व भैटहि एखादे त-हेने सत्वर होईलच फार काय लिहूं ? बहुत काय लिहिणे १ हे विनंती. मोर्तबसुद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४५ श्री १६४८ आषाढ शुध्द ९
स्वस्ति श्रीराज्याभिषेक शके ५३ पराभव संवछरे आशाढ सुध ९ नवमी इंदुवासरे क्षत्रियकुळावतंस श्रीराजा शाहू छत्रपति स्वामी याणी राजश्री देशाधिकारी व लेखक वर्तमान व भावी प्रात सुपेबारामती यासि आज्ञा केली ऐसी जे माहादाजी बिन संभाजी इ॥ बावाजी काटे देशमुख प्रा। मा।र याजवर हुजूर याचा भाऊ धर्मोजी वा। मानसिंग इ॥ सामराज काटे देशमुख प्रा। मा।र फिर्याद जाले की आपले घर वडील आपले मूळपुरुष बावाजी काटे त्याचे वडील लेक धर्मोजी काटे व धाकटे संभाजी काटे हे उभयता श्रीरंगपट्टणी दौलता करून होते वतनावर गुमास्ता अंताजी होता व मनसूरखान होता त्यास कसबे सुपे एथील मोकदमानीं विजापुरीं पातशाहाचे दरबारी फिर्याद केली की पा। सुपेबारामती एथील देशमुखीचे वतन आपले आहे हे वर्तमान हरदू गुमास्तेयानीं धर्मोजी काटे यासि लिहिले तेव्हा धर्मोजी काटे बोलिले की हाती काठी धरून आपण वाद सांगावा की काय तेव्हा संभाजी काटे बोलिले जे वतन थोर आहे जाऊ देऊ नये असे ह्मणून संभाजी काटे विजापुरास एऊन वाद सागून वतन राखिले इ. इ. इ.
वतन संपादण्यास खर्च पडला तो संभाजी काटे यानें दिल्हा बिता।
कित्ता खर्च होन | कित्ता खर्च होन | ||
१००० | परवाना इदलशा पातशा। | २५०० | सनद माहाराज राजाराम साहेब |
१००० | परवाना माहाराज राजश्री शाहाजीराजे साहेब | ४५०० | सनद माहाराज शाहूजी राजे मुकाम चंदनवंदनगड |
१००० | परवाना आतशखान | १४०० | राजश्री शंकराजी पंडित सचिव |
१००० | परवाना माहाराज राजश्री सीवाजी राजे | १८५० | सनद मकरमतखान |
५० | दरबारखर्च सोयरी बाईस दिल्हे | २००० | सनद मिर्जा राजा |
३०० | संकराजीराम सुभेदार | १५०० | सनद राजा भोज |
-------- | १२०० | सनद अनसोजी घाटगे | |
४३५० | २०० | औरंगजेब पातशा | |
५५० | सिंगमण किलेदार पा। सुपे | ||
--------- | |||
१५७०० | |||
साधनाचे कागदपत्र बिता। सदन बामोहर माहाराज राजश्री शाहाजी राजे |
खुर्द खत बनाम संभाजी मोहिते हवालदार पा। सुपे याचे नावे बमोहर माहाराज राजश्री शाहाजी राजे |
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६५१
श्री.
१७२५ पौष शुद्ध ४
विज्ञापना ऐसीजे. इंग्रजांचीं व यांचीं बोलणी होऊन निश्चयांत आली.
* कलमें विा-
वरधेपलीकडे जो प्रांत तो तुम कटक व वराड आह्मीं घेतलेच आहे
चा तुह्मांकडे असावा कलम १. ते माघारें द्यावयाचें नाहीं. कलम १.
मंडले संस्थानाविशींचे आह्मी गावेलगड व नरनाला यांचे सरंबोललो
असतो. परंतु तुह्मीं राजश्री जामाचा प्रांत इतकें तुम्हांस दिल्हें.
पंतप्रधान यांची नुकसानी केली हे तुह्मांकडे असावे. १.
नाहीं. सबब तेहि तुह्मांकडे असावे १ आमचे द्वेषी असतील त्यांची
फरासिस अथवा इंग्रज कोणी तु. साथ तुह्मीं करू नये. कलम १.
सांपाशी आल्यास त्यास नोकर ठेऊ आमचा वकील तुह्मांपाशी व तु
नये. कलम १. मचा आह्मांपाशी असावा. कलम १.
आह्मांवितिरिक्त राजकारण कोणीकडे
तुह्मीं ठेऊ नये. कलम १.
सदर्हूप्रमाणें निश्चयांत आलें, ऐसें ऐकिलें. त्याजवरून विनंती लिा आहे. याशिवाय आणखी काय असेल तें समजेल तसें लिहून पाठऊं. शेवेसी श्रुतहोय. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६५०
श्रीलक्ष्मीकांत.
१७२९ पौष शुद्ध २
पो छ ३ माहे रमजान सन १२०४ मु। विचरणी.
राजश्री बाबूराव विश्वनाथ गोसावी यांसी:-
दंडवत विनंती उपरी, मंडले व नबाबाकडील जाबसाल दोन आम्हांकडील करून घेन्याचे आहेत. याचे बोलनें दरबार खर्चाचे वेगळें वेगळें जेव्हां ठहरले ते मुख्त्यारीनें ठहरवावें. मंजूर असे. याचा अंदेशा हरगीज न कर्ने. येविसी उभयतां तुम्हांसी बोलतील ते मनांत ठेऊन मुख्त्यारीनेंच कर्ने, रा। छ
१ माहे रमजान, हे विनंती *
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६४९
श्री. (मसूदा.) १७२५
मार्गशीर्ष वद्य ५
श्रीमंत राजश्री पंत प्रधान यां प्रतिः-
रामचंद्र दीक्षित व लक्ष्मीनारायण दीक्षित कृतानेक आशीर्वाद. येथील क्षेमे ता मार्गशीर्ष कृष्ण पंचमी पावेतों क्षेत्र कायगांव येथें खुशाल असों. विशेष, माधवराव त्र्यंबक दीक्षित पटवर्धन याचा काळ जाल्याचें वर्तमान ऐकून चित्तास खेद जाला. ईश्वरेच्छा प्रमाण ! देवाब्राह्मणांचें संस्थान आणि आपले पदरचे, त्यापक्षीं त्यांचा अभिमान आपणांसच आहे. संगोपान करून संस्थान चालविलें पाहिजे. बहुतां ब्राह्मणांचें हें ठिकाण आहे. आह्मीं पूर्वापार पुणियास येतों तेव्हां या स्थळाव्यतिरिक्त कोठें राहत नाहीं. वर्षदोन वर्षेपावेतों राहणें जालें, तरी आतिथ्य आदर औपचार येथेंच होतो. ऐसें बहुत विप्रमंडळीचें स्थळ आहे. यांची स्त्री गरोदर आहे. बहुत ब्राह्मणांचे आशीर्वादें पुत्रच होईल. तथापि ब्रह्मसूत्र प्रमाण. धर्मसंस्थापना कृपाळु होऊन केली पाहिजे सारांश, हें देणें आह्मां ब्राह्मणांस दिलें पाहिजे. बहुतां दिवसांपासोन धर्माचे स्थान आपलें आहे. देवब्राह्मणाचे संस्थानाचे संरक्षण करणार आपण आहेत. कारभारी बहुत दिवसांचे. त्र्यंबकराव दीक्षित यांजपासून चांगलेच आहेत. दीक्षितांचा काळ जाला, तें समई माधवराव दीक्षित पांच वर्षांचे होते. त्या दिवसापासून कारभारी यांनी अकृतृमी सेवा करून व्यवहार चालविला. हें सर्वश्रुत असेलच. प्रस्तुतहि तेच कारभारी आहेत. निर्वाहा करणें आपल्याकडे आहे. बहुत काय लिहिणे ? हे आशीर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ६४८
श्रीलक्ष्मीकांत.
१७२५ कार्तिक शुद्ध १
पुा राजश्री नारायणराव वैद्य गोसावी यांसीः-
दंडवत विनंती उपरी. कारभारी यांचे प्रकर्णी सरकारचे मनांत येऊन, राजश्री नारायण येशवंत यांणीं लिहिलें हें फार चांगलें आहे. यांतून पुढेमागें उपयोगहि आहेत. ईश्वरें सर्वज्ञता दिल्ही आहे. याजवरून, मी आपले जागीं खातरजमा पक्की ठेऊन आहें. यांतील कित्तेक तपशील मशारनिलेस लिहिला आहे. ते विनंती करतील, म्हणोन लिहिलें तें कळलें. व मशारनिलेनींहि ते मच्याप्रमाणें तपसीलेंकडून विनंती केली. त्यास, जैसे तुमच्या लिहिण्यांतील बेत होते, त्याचअन्वयें एकएक प्रकार उगवण्यांत आला आणि उत्तरें समपंक लिहिलीं आहेत. तुमचे लिहिण्यांत कोणते एक उगवण्यांत गुंता ठेविला नाहीं. काय अडचणीचे प्रकार आहेत ते आपले आपल्यास सोसून, माणसाचे अवताब राखून, आपलें करणें द्रिष्टीस पडावें. व या करण्यांतून ऐसा फायेदा, हा लौकिकीं दिसावा. याचे पोटांत सर्व कांहीं समजतील. व अहोरात्र काळजी या गोष्टीची बाळगून आहों, ती दूर होईल. व असें करण्यांतून उपयोग मागें पुढें आहेत. हेंच जाल्यावर, सहजच आपलें करणें सर्वांचे नजेरेस आलें. मग, या संतोषाएव्हडा दुसरा संतोष नाहीं. अहोरात्र हीच विवंचना व साहस करून असों. तुह्मी या वागणुकींतील. तेव्हां इतकेंहि करून दाखवाल याच अर्थी ऐशा रीतीनें परस्परें हा योग आपले बुद्धीकडून ठेविला आहे. ईश्वर तैसा दिवस सर्वांस समजावयाजोगा कधीं आणील ! कारभारी यांसी आजवर जीं जीं बोलणीं जालीं, व ते जे जे प्रकार बोलले, व उपयोग करून देण्याचें झटलें, ते ते सर्व तुमच्या ध्यानात आहेत. येथून कोणताएक गुंता व लिहिण्यास बाकी ठेविली नाहीं. आतां एवढें करण्यातून काय उचित असेल तें करून दाखवावें. ही कळकळ तुमची तुह्मांस असावी. येविसींचे मजकुराची आज्ञा व संभाषण जें करावयाचें तें राजश्री नारायेण येशवंत यांसीं केलें आहे. त्याप्रमाणें ते तुम्हांस लिहितील, त्याजवरून कळेल. व राजश्री सदाशिव बापूजी यांसी जे जे प्रकार लिहिले आहेत त्यांचें मनन होऊन त्यांचीं उत्तरें समर्पक यावीं. हें सर्व तुह्माकडेस आहे. येविशीं+ल्याहावें, ऐसें नाहीं. रा छ २९ माहे जमादिलाखर. हे विनंती, मोर्तबसुद.