[ ८७ ] श्री. ६ जानेवारी १७२३.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ५० शोभकृतनाम संवत्सरे पौष बहुल अष्टमी भौमवासरे क्षत्रियकुलावतस श्री राजा शंभुछत्रपति स्वामी याणीं राजमान्य राजश्री बावाजी सिगाडे यासी आज्ञा केली ऐसी जे - राजश्री भगवतराव अमात्य हुकमतपन्हा यांसी या प्रातें रवाना केले आहेत हे स्वामिकार्याविषयी तुह्मास लिहितील व सांगोन पाठवितील तरी तुह्मीं आपले फौजेनसी यासी सामील होऊन याचे आज्ञेप्रमाणे स्वामिकार्य करणें. बहुत काय लिहिणें.
मर्यादेयं विराजते
सुर सूद बार.