लेखांक ५९ १६१७ मार्गशीर्ष वद्य २
१/३ मो। बंद रास
जाबिता कानू जकाती प्रा। सिरवळ सु॥ सीत तिसैन अलफ सन सलासामधे राजश्री पंत सचिव एही जकाती उभामार्ग व बकाल का। मजकूर यासि हुजरून कौल दिल्हा आहे की जोवरी मोगलाचे ठाणे सिरवळी आहे तोवर कौलप्रमाणे कमावीस करावी ह्मणऊन हुजरून तह करून दिल्हा आहे त्यासि आलीकडे हकदार मोईनप्रमाणे घेत नाहीत त्याबदल सुभाहून तह करून दिल्हा असे याप्रमाणे कामावीस करणे बिता।
कसबेकरी यांसि तह
भूस हर जिनस दर केणी हर जिनस खोबरे
→ पुढे वाचण्यासाठी इथे क्लीक करा
सदरहू प्रमाणे जोवर मोगलाचे ठाणे आहे तोवर कमावीस करावयाची हुजरून सनद सादर जाली आहे त्याप्रमाणे सुभाहून कमावीसदाराची मोईन करून दिल्ही आहे याप्रमाणे कमावीस करणे यामधे तफावत जालिया मुलाहिजा कमाविसदाराचा होणार नाही छ १५ जमादिलोवल मोर्तब सूद