Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ७६ ] श्री. १७१६.
° ˜
श्रीआईआदिपुरुष
श्रीराजा शिवछत्रपति
कृपानिधि । तस्य परशराम
त्र्यंबक प्रतिनिधि.
यादी वतनी मजमू श्रीपाद स्वामी सत्यपूर्ण पन्हाळ्याच्या मुक्कामीं सन खमसांत गाव बहुल चतुर्दशी शिवरात्रीचे दिवशीं आले ते समयीं आपली वतनी मजमू दिली होती. त्याचें पत्र सालमजकुरी सन सीतामध्यें पाठवून दिले ते जमा वतनी मजमू पत्र १.
शिक्का शिक्का
वतनी पत्र मजमू सत्यपूर्ण श्रीपाद स्वामी या कडील करून दिल्हें तें जमा पत्र १.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ५२
निंबाजी नाईक निंबाळकर याचा शिक्का
इहिदे खमसैन मया व अलफ
प्रा। सुपे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ७५ ] श्री. २१ मार्च १७१६.
श्रीमत महाराज राजश्री पंत स्वामीचे सेवेसीः-
विनति सेवक गोविंद रंगनाथ कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना स्वामीचे कृपावलोकनेकरून चैत्र शुद्ध नवमी शुक्रवारपर्यंत सेवकांचें वर्तमान मु ।। कल्याणीं यथास्थित असे विशेष महाराजाचे दर्शनास वेदमूर्ती राजश्री कान्हो पाध्ये औरगाबादेहून आले त्याबरोबरी आह्मी आपल्या वतीनें प्रसगाचे वर्तमान स्वामीचे सेवेसी लिहोन पाठविले होते, त्यावरून विदित जाहलें असेल व स्वमुखें उपाध्येबावानी निवेदन केलें त्याप्रमाणे अभ्यंतर्गत अवगत जाहले असेल परतु त्याप्रमाणें पारिपत्य होऊन आलें नाही. आह्मीं अवग्र एक मासपर्यंत मार्ग लक्षिला. त्याउपर आह्मी निजामउन्मुल्ख व तुरुकताजखान यांची आज्ञा घेऊन स्वार होऊन गेलों. तेव्हा तेथल्या कर्जदारानी अडविलें. त्यांची निशा करावयास अवग्र पंधरा दिवस लागले. शेवट रुपयास जमान गणेश विश्वनाथ आमचे जावाई यांस ठेवून स्वामीकडे यावयास तयार जाहलों. तों संगमनेरीहून खान अजम महमद उमरखान सुभेदार प्रांत संगमनेर व नाशिक व कल्याणभिवडी याचें पत्र तुरुकताजखान यांसी व आह्मांस आलें कीं, गोविंद पंडित वकील यांसि पाठविणे, वतनाचा अमल देऊन. त्याजवरून आह्मीं छ १५ मोहरमीं स्वार होऊन संगमनेरास आलों, तों उमरखान बागलाणांत मौजे अभोणें नजीक करेलीमोरेली येथें जाऊन वेढा घालून बैसले होते. तेथें आह्मी जाऊन वेढा घालून बैसले होते. तेथें आह्मी जाऊन त्यांची भेट घेतली. स्वामीचे तर्फेनें त्यास पत्र व अष्टगोळी सल्ला दिधला. बहुत समाधान पावला. त्यांजवर अंमलाचे जफ्तचिठी मागितली ते ह्मणों लागले कीं , आह्मांस सेरणी काय देता ? तेव्हां आह्मी बहुत प्रकारे रदबदली केली. परतु हे मोंगली लोक, त्यांहींमधे पठाणतरीन, आपला हेका न टाकित । दुसरी गोष्ट पूर्वींल कारभारी , जे नुटअल्लीखानापाशीं होते, ते हल्लीं याजपाशीं आहेत त्यांणीं पूर्वील कबुलायतीची हकिगत त्यांस जाहीर केली. त्याप्रमाणे मागों लागला. तेव्हां आह्मीं बोलिलों कीं, दरबारीं औरगाबादेस खर्च आह्मांस बहुत लागला याकरितां आह्मांस पांच हजार रुपये देवत नाहीं. तेव्हां निदान प्रसंग जाणोन आह्मांशी शामजी महादेव व रामाजी गोविंद दिवाण यांसी खानानें रदबदलीस घालून पांच हजार रुपये करार केले आहे. याखेरीज त्याचे नायब कल्याणीचे अजम कालेखान व पातशाही दिवाण शरीफ अल्लीखान व चौधरी व कारभारी व किरकोळी लोक ऐसे मिळोन दोन हजार रुपये पाहिजेत वग हजर करावयास कापड हजारा रुपयांचें पाहिजे. एकूण सहा हजार रुपये खर्च करावे, तेव्हां तो। सोनवळाच्या अदकाराचा अंमल दरोबस्त हातास येतो आणि सुरळीत धंदा चालतो. त्यास ऐवज तो मिळत नाहीं अगर सावकारही मिळत नाहीं या प्रांतीं काळ बहुत विषम पडला आहे याकरिता रुपयांस कोण्ही बघत नाहीं. वतनाचें कार्य तो महत् कष्टेकरून कळसास आणिलें आहे, परंतु सहा हजाराकरिता तटोन पडलें आहे महाराजांस असत्य वाटेल, याकरितां कोणे जातीनें रुपये खर्च होतील त्याची नावनिसीची याद अलाहिदा पाठविली आहे, त्यावरून विदित होईल व महाराजास उमरखान यांनी पत्र लिहिले आहे. त्याजवरून श्रुत होईल त्यास, स्वामी ह्मणतील कीं, तुह्मांस ऐवज देविला होता, तो आणवून कार्यसिद्धि करावी होती तरी, स्वामीने रायाजी प्रभूकडे पाच सहस्त्र रुपये देविले. त्यांत आज ता। हजार रुपये पावलें. त्याचा खर्च कैसा जाहला ह्मणीजेल तरी, रा। काशीपंत बुंदखानी याचे गुजारतीचे कर्ज रुपये ४९२ फारीख केले. तेव्हां ते गेले. त्याजवर निजामन्मुलुख आले. त्यांची भेट घेतली तेव्हा त्याचे दरबारी खर्च जाहला. एकंदर जाहला रुपये २०४। बाकी राहिले. रुपये, त्यापैकीं उमरखानास शेला व किरकोळी नजर व चोपद व खिजमतगार मिळोन खर्च जाहला रुपये ५४ ।। . बाकी निवळ ऐवज राहिला तो लोकांदेखील आमच्या पोटास खर्च जाहाला, रुपये २४९।. ऐसे हजार रुपये खर्च जाहले त्याखेरीज आपणास कर्ज रुपये ८३७ जाहले आहे बाकी रुपये रायाजी प्रभूकडे चार हजार राहिले त्याबद्दल अवरंगाबादेहून त्याजकडे चार वेळां पत्रें व मनुष्यें पाठविलीं परतु त्याजपासून एक रुपया प्राप्त नव्हें. हाली बाळाजी विश्वनाथ याच्या कमाविसदारांनीं रायाजी प्रभूचा प्रांत बळकाविला; आणि प्रभूचे कमाविसदार होते ते पळोन रायाजी प्रभूपाशीं गेले. धामधूम बहुत गगथडीस जाली ते पत्री काय ह्मणोन लेहावी ? हें वृत्त सविस्तर रा. कानो पाध्ये यांस श्रुत आहे, त्यांस स्वामीनें विचाररिलें पाहिजे आता तरी खंडेराव दाभाडा व रायाजी प्रभु व नरसोजी मो-या व राजजी थोरात ऐसे एकत्र होऊन, गंगाजी त्रिंबक याचे फौजेस सामील होऊन, त्यासमवेत फौजेनसी येवलें प्रातें खंडेराव दाभाडे याच्या लेकी दोन व सासू व मेहुणा ऐशीं माणसें सहा अंबोजी देशमुख यांणीं धरिलीं आहेत. तरी सोडवावयास आले आहेत. कोणाचे चाकर हाहि निर्वा कळत नाहीं, ऐसा प्रसंग जाला आहे याउपर आह्मांस रायाजी प्रभु कोठून रुपये देऊं पाहातो ? स्वामीच्या वतनाचें कार्य तो रुपयावीण अटकलें आहे आह्मीं तो रुपयांचे तरतुदेबद्दल उमरखानाचा निरोप घेऊन फाल्गुन वदि दशमीस कल्याणास आलों. मागाहून खानही येणार आहेत. रुपयांकरितां स्वामीचे शेवेसी विनती पत्र लिहिलें असे. तरी, कृपाळू होऊन सध्यां पोतांतून वतनाच्या अमलाबद्दल ऐवज तूर्त रुपये ६००० पाठविले पाहिजेत या उपर अनमान करावयाचा प्रसग नव्हे. नाहीं तर अपकीर्ति होते. विशेष लेहावें तरी स्वामी धनी आहेत. सेवेसी श्रुत होय.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ५१
सनदा वतन
देसपांडेपण
नि॥ बाबूराऊ
साहित्य सनदा शाहिदीच्या
(१) महजर मोकदमी मौजे सीरठाणे बै॥ कनकोजी बिन धाकोजी निमे मोकदम (व) सुभानजी बिन माहादजी निमे मोकदम दर अमल संभाजी मोहिते हवालदार व दादाजी रखमागद मजूमदार शाहिदी दसखत आहे बिता। देसकुलकर्णी विठल माहादेऊ (व) त्रिंबक गोमदेऊ बतारीख ११ शवाल सु॥ सन खमस खमसैन अलफ ऊर्फ १०५५ शके १५७६ जय नाम संवच्छरे याची असल मोकदममजकुराजवळी आहे प्रसंगी नकल आहे सनद १
(२) महजर बो। बाळाजी पा। मौजे लोटे व मौजे कान्होळे बु॥ दर अमल संभाजी मोहिते सरहवालदार व दादाजी रखमागद मजूमदार यावर शाहिदी दसाखत आहे बाबदेभट व रामचंद्रभट धर्मादकरणी (व) देसकुलकर्णी विठल माहादेऊ व त्रिंबक गोमदेऊ बतारीख ३ माहे जिल्हेज सु॥ सलास खमसैन अलफ उर्फ १०५३ याची असल मोकदममजकुराजवळी आहे त्याची नकल असे सनद १
(३) महजर तकसीम मोकदमी मौजे सागवी बो। राघोजी अठोले दर अमल सिदी सरूर हवालदार व शंकराजी गोविंद मजूमदार यावर दसखत आहे माहादाजी लखमदेऊ व हरि विष्णु बतारिख २७ माहे जिल्हेज सु॥ सन ॥सबा सलासीन अलफ १०३७ याची असल अठोलेमजकुर याजपासी आहे व नकल बमोहर काजी मखदूमशाह असे सनद १
(४) महजर सेत मिरासी अभंगराव नाईकवाडी उखो मोकररी मौजे रिस्यामध्ये आहे दर अमल आगा हसन हवालदार यावर दसखत आहे माहादेव लखमदेऊ देसकुलकर्णी ह्मणौन एक नाव बतारिख ६ जिल्हेज सु॥ सन समान अशरीन अलफ ऊर्फ १०२८ याची असल बहीरजी बाबर याजपासी आहे प्रसंगी नकल असे सनद १
(५) वाटणी तर्फ मोकदम कार्हाटी चांदगुडे व वाबिळे दर अमल पादशाही यावर दसखत आहे रामाजी बावाजी व देवाजी त्रिंबक बतारिख सु॥ सन ११०७ फसली याची असल आहे दस्तुर देवाजी त्रिंबक सनद १
(६) महजर मोकदम मौजे माळशिरस बो। रामाजी व बापोजी यादव दर अमल अनसोजी घाटगे फौजदार व सिंगमल मनसबदार यावर दरखत आहे विठल माहादेव व त्रिंबक गोमदेऊ बतारिख आहे रबिलाखर सु॥ सन समान सितैन अलफ १०६८ सन हजार १०७७ याची असल आहे सनद १
(७) महजर तकसीम मोकदमी मौजे काळवीरे बो। खडेराऊ पेशवे जेजोरी दर अमल मुधो मायदेऊ सरहवालदार व गोविंद मुदगल नायब ठाणेदार व नरहर अनत मजूमदार यावर दसखत आहे की माहादेव लखमदेऊ व हरि विष्णु देसकुलकर्णी महजर बतारिख ७ जमादिलावल सु॥ सन तिसा सलासीन अलफ १०३९ याची असल आहे सनद १
(८) महजर मोकदमी मौजे सावळ बो। साऊजी बिन जैतजी अटोळे दर अमल यासीनखान फौजदार बतारीख ६ माहे रबिलावल सु। सन ११०१ सन ३५ जलूसवाला यावर दसखत आहे रामाजी बावाजी देसपांडे सदरहू महजरामधे कदीम जुना महजर होता त्याचा उध्दार आहे बिता।
(९) महजर मोकदमी सावळ बो। साऊजी अठोले मौजे सिरसोफळ यासि कोडजी बिन कमाजी अलहाली मोकदम मौजे सावह याने महजर करून दिल्हा बतारिख खरीदी खुश रजा दर अमल तिमाजीपत हवालदार व चितोपत मजूमदार निजामशाही हकीम यावर दसखत आहे की माहादेव लखमदेऊ व विष्णु हरदेऊ देसकुलकर्णी तबारिख छ ५ रजबू सु॥ सन तिसा अलफ सन १००९ याची असल असे सनद १
(१०) परवाना बमोहर खान अजम फरहादखान निजामशाही बनाम माहादे लखमदेऊ दर बाब लावणी व बेहबुदी अमल व जलदी तहसील ऐवज जमाबदी अज कफर बतारिख छ ६ जिलकाद सु॥ सन समान७ अशरैन अलफ १०२८ याची असल आहे सनद १
(११) खुर्द खत बमोहर मलिक अजम मलिक अजमतनमुलुक बनाम लखमो जनार्दन दर बाब ईनाम जोतिश जमीन चावर १ व रोजमरा जकाती व रासीचा कुडव अज कफर बतारीख छ १० मोहरम सु॥ सन समान समानैन तिसा मया ९८८ याची असल आहे सनद १
(१२) खुर्द खत बमोहर मलिक अबर बनाम कारकून व देसाई दर बाब महजर करून देणे बै॥ कजिया कोता व पिसर मेगो कोतो अज कफर बतारिख छ ५ जिलकाद सु॥ सन तिसा अशरीन अलफ ऊर्फ १०२९ याची नकल बमोहर काजी मखदूमशाह सनद १
(१३) महजर बमोहर हाली मवाली दर अमल मलिक अबर बो। कजिया कोता व पिसर मेगो कोतो खोटा केला माहादे लखमदेऊ यानी सनद केली अज कफर बतारिख छ २७ माहे शवाल सु॥ सन तिसा अशर अलफ ऊर्फ १००९ याची नकल बमोहर काजी चिमनशाह आहे सनद १
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ५०
जोतिषाचा आर्या
अनुकूल मित्र बुधासी परम सुखें सूर्य शुक्र हे दोन्ही ॥
प्रतिकूल चंद्रा वाचुनिं स्पर्धी ग्रह दूसरा नसे कोण्ही ॥४॥
जो गुरु सकळ द्विजाचा मंगळ शशि सूर्य मित्र हे ज्याचे ॥
बुध शुक्र शत्रु असतां वाटे भय त्यासि ब्रह्मतेजाचे ॥५॥
शुक्रासि मित्र दोघे बुध शनैश्वर समान लोभाचे ॥
चंद्रार्कदर्शनाते पावतसे तो समान लोभाते ॥६॥
बुध शुक्र मित्र ज्याचे श्रेष्ठ सर्व ग्रहामधे शनि जो ॥
रवि शशि मंगळ शत्रू ज्याचे भय अंतरी न मनी जो ॥७॥
ज्याचे अंतर्यामी बर्तत अभिमान विप्रवेशीचा ॥
तो दीनदयाळ दिनकर स्वामी महाराज सिंह राशीचा ॥८॥
वागत मनि मंद ज्याचे सित स्वभावा उमाधवा प्रिय मी ॥
ह्मणति मज रजनिपती तो ग्रह शनि राज कचिा स्वामी ॥९॥
जाता शरण जयासी ब्रह्मस्वापासुनी करी मुक्त ॥
तो ग्रह मंगळस्वामी वृश्चिक मेषासि शोभतो युक्त ॥१०॥
चतुर्थभुवनी ज्याचा सत्य ग्रहमंडलात सन्मान ॥
तो षठ भी रासी लाजे वक्ष्यग्रह बुधराज यजमान ॥११॥
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ७४ ] श्री. १३ सप्टेंबर १७१५
राजश्री यादोजी पडवळ नामजाद व कारकून, किल्ले गगनगड, गोसावी यासीः-अखडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नेहाकित रामचंद्र नीळकंठ आशिर्वाद व नमस्कार सु।। सीत अशर मया व अलफ. आर्जोजी कुसुरकर परागंदा होऊन आजरे विलातीस गेला होता. त्यास अभय देऊन आणिला आणि गांवावर पाठविला आहे. तुह्मीं याचें चालवून याच्या वतनाची सेवा गांवावरी घेऊन, गांवाची किर्दी महामुरी होऊन, ऐवज किल्यास पावेतों करणे याणें विनंति केली कीं, आपण वतनदार आहे, पूर्वीपासून आपला विस्वा व गांवीं जमीन चालत होती ते चालवावया आज्ञा करावी. त्यावरून आज्ञापत्र सादर केलें आहे. बीll
विस्वा जकाती मोंगल शहाआलम जमीन मौजे कुसुर
कोंकणांत उतरला तोपावेतों चालला, त्या १ पावाची भाटी.
अलीकडे चालत नाहीं, तरी स्वामींनी १ बसकेची भाटी.
चालवावा, ह्मणोन , त्यावरून पत्र सादर १ दखल ठिकण.
केलें . तरी पेशजी ३
चालत होतें त्याप्रमाणें चालवणें --- जमीन बिघे ५ हे
. १ पेशजी चालली असेल त्याप्रमाणें चालवणें. १
याप्रमाणें याचे मनास आणून चालवणें आर्जोजी खरा माणूस आहे यापासून अंतर पडलें असेल, तें क्षमा करून अभयपत्र सादर करून आणून पाठविला आहे. तुह्मीं याचे चालवावया अतर न करणें गांवची कीर्दी माहामुरी याचे हातून बरी करवणे याचे चालवावया अंतर न करणे छ २४ रमजान बहुत काय लिहिणें.
सुरुसुद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४९
इनामती फर्मान व खुर्द खते वजिरानि हाय दरवज बदल इनाम बाबदेउ भट बिन लक्षमीधरभट जोसी धर्मादकारणी का। मा। व चंद्रभट बिन अंत भट जोसी कसबे मजकुरु हुजुरु एउनु मालूम केले जे आपणास इनाम बिता।
बाबदेऊभट बिन लक्षमीधरभट जोइसी जमीन दर सवाद कसबे मजकुरु
सेतची मोली प्रज चावर एक प्रज जाऊ
विस्णुहरदेऊ कुल- पाटील बिन नरस पाटिल
कर्णी का। मा। सेत भोडवा चावर १
१ बा। खडसर बागा
यत बाब टके १५
दफात
अंबराई पैकी रोजमुरा जागा
पेंडी का। मा। दर माहाल जकाती
१ चौत्रा का। मा।
दररोज रुके ६
चंद्रभट बिन अंतभट जोसी का। मा। जमीन चावर एक प्रज साऊजी भोडवा चावर .॥- नीम व रतनोजी भोडवा चावर नीम -॥- एकूण चावर १
यासी भोगवटे इस्तक बिल निजामशा ता। आजि
फर्मान निजामशा फर्मान एदिलशा
१ १
याकूदखान खुर्दखत याकूदखान खारटी खुर्दखत
१ १
खेळोजी राजे खुर्दखत माहाराजसाहेब खुर्द खते कार-
१ कीर्दी पेसजी व कारकीर्दी हाली
बाजे वजीर खुर्दखत खुर्द खते
१
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४८ श्री १६८३
नकल
पुणा शास्त्रीपासी एणप्रो। लिहिले
राजीनामा बो। गोरखोजी बिन सुभानजी बिन उरसील मौजे सिंगापूर प्रा। सुपे सुरसन ११७१ कारणे साहेबाचे सेवेसी राजीनामा लेहून दिल्हा ऐसा जे आपणामधे व संताजी बिन गोमाजी पाटील उरसील मौजे मजकूर याजमध्ये मोकदमीचा कजिया आहे ह्मणोन साहेबापासी आलो त्यास साहेबी आज्ञा केलीकी जमान व तकरीरा व पुरसीर तकरीरा देणे त्याजवरून दिल्या यासि वडील आपले गोरखोजी उरसील बेदरी पातशाहापासी चाकरी करीत होते त्याजमागे त्याचे पुत्र राहूजी व संभाजी साळोखी उरसील हे हि करीत होते त्यास राहूजी व संभाजी साळोखे उरसील यानी चाकरी चांगली ह्मणोन गाव मोकासा दिल्हा तो पेरणे दिल्हे तेथे पाटिलकी वाळकियाची होती त्याजपासून पाटिलकी निमे खरीद करून घेतली आणि आपण चाकरीस गेले त्याजवर चाकरी चांगली केली मग पातशाहा मेहरबान होऊन दुसरा गाव मोकासा दिल्हा तो मौजे सिंगापूर प्रा। सुपे हा गाव दिल्हा तेहा पाटिलकी रखटियाची होती त्यास कर्ज होन पाचशे दिल्हे आणि खत करून घेतले मग बाकी मोकासियाची होन च्यारसे राहिली याचा वायदेरोखा घेतला एकूण होन नऊसे जाहाले तेव्हा आपण रखटे पाटील यासी तगादा केला की पैका देणे यासि रखटे पाटील बोलिले की पैका द्यावयास अनुकूल नाही व जिनजितरब हि नाही परतु आपण आपल्या स्वसंतोषे पाटिलकी देतो त्याजवरून पाटिलकी दिल्ही (राहूजी व संभाजी बेरदी चाकरीस गेले कालान्तरे गावी आले) आपले मूळचे अडनाव साळोखी अलीकडे उरसील पडले उरसील पडावयास कारण आपला वडील संभजी मर्द माणूस होते त्याच्या उरास सल निघाले ह्मणोन उरसील पडले उरास तीर लागला होता तो उपटोन काढिला तो तीराचे फळ आत राहिले दोन वरसे होते तो एक दिवसी न्हावी आगास तेल लावावयास गेला तो त्याने देखिले मग पुरसो लागला की काहाडतो काढिले तेव्हापासून उरसील आडनाव पडले. आपली वंशावळ
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ७३ ] श्री. १ सप्टेंबर १७१५.
˜ °
श्रीरामचरण
नीलकंठ सोनदेव
शरण.
राजश्री यादोजी पडवळ नामजाद व कारकून, किले गगनगड गोसावी यासीः- अखडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री रामचद्र नीलकंठ आशिर्वाद व नमस्कार सु ।। सित अशैरन मया अलफ मा। कान्होजीराऊ व बापूजीराऊ राणे हे अजिरे प्रांती होते त्यांस पूर्वी पत्रे तुह्मी पाठविलीं होती व हुजरूनही पाठविलीं होती त्यास, यांणी किल्ल्याचे गावी व वरकड गावीं उपद्रव केला होता याकरितां सकोच धरीत होते व चांदजीने यास बुद्धि देऊन नेले. त्यावरी वतनी प्रसग आहे तो अवघियानीं विभागे घ्यावा. तोही होऊन न ये याकरितां बाहेर राहिले त्यास सोंप्रत दहावर येऊन निष्ठेनें वर्तावें ह्मणून चित्तीं धरून विनंतीपत्र पाठविलें त्यावरी सर्व अन्याय क्षमा करून अभयपत्र पाठविलें. त्यावरून भूधरगडचे मुकामीं भेटीस आले भेटी जालीं राजदर्शन केले. त्यास रत्नगिरीहून लोकांविशीं लिहिलें. त्यावरून कान्होजीराव खासा व उभयताचे लोक पंचवीस रवाना केलें. ते स्वार होऊन गेले. त्यास, यांचा सरंजाम याप्रो। लोक असे. त्याप्रमाणें गाणें चालवणें.-
मौजे सागुलवाडी मोकासा जमावास खारापाटण तर्फेचे गोविंद टिपसोडी व
उभयतांच्या दिली. राजपत्र सादर आहे. घाट बावडा येथें चोरघे आहे त्यास
तु्ह्मीं याकडे चालवणें तेथें उपद्रव चांदजीच खातो. हे ते चुलत भाऊ. तक्षिम
किरकोळ यास एकंदर लागो न देणें. १ देत नाहीं. याकरितां याणीं विनंति केली
जमीन इनाम पेशजी देविली होती कीं, निमे, त्याचें निमे आपलें उभयतांचें
ते चालत नाहीं ह्मणोन विनंति केली. वतन आहे तें चालवावें. त्यावरून
त्यास, तूर्त रत्नागिरीस रवाना केले. आज्ञापत्र सादर केलें आहे. तरी याचे
ह्मणोन मेहेरबान होऊन इनाम जमीन भात विभाग असतील त्याप्रमाणें तुह्मीं गावगन्ना
पडिपैकीं देविली, बिघे : - व जकात्यास सागोन देवणें. चांदजीराव५ नांदवडे. इस्किल करील तर त्यासही माकुल करून
५ नांदणे. सांगणें. हर्शामर्श याचा त्याचा वाढो न
२ सेरपे देणें. १
-------१२
हें तुह्मीं नेमून देऊन बिलाकुसूर चालवणें.
याप्रमाणे बिलाकुसूर चालवणें तूर्त कबिले पाउसाचे आणितां नयेत. याकरितां राहिले पुढें कबिले घेऊन येतील. आपल्या वतनावरी राहतील तुह्मीं सर्वाविशीं यांचें चालवीत जाणें छ २४ रमजान बहुत काय लिहिणे.
लेखनसीमा
समुल्लसति
सुर सुद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ४७ १६८२
कारकीर्द अमल पातशाही जाल्या पा। सुपे व बारामती कर्यात पा। मा। सा। जुनर
अमल निजामशाही
दस्तुरखान अमल सन सबा समानीन तिसा मया एकूण अर्बी सन ९८७ याचे हिजरी मोगली सन ९९६
१
अमल याकूदखान मोकासाई सन इहिदे इशरीन अलफ सन १०२१ एकूण हिजरी सन १०३०
२
सुभा अमल बडे मलिक नि॥ दौलताबाद प्रा। मजकुरी आले व सिदी बिलाल व फरोज यासी जागीर पा। मजकुरी देह २१ जाली त्यानी कर्यात बारामती केली सु॥ सन १०३१ ता। १०३२
३
त्यावरी हैबतखान व लखो बाबाजी हवालदार अमलदार जाले ता। सन १०३३
४
अंमल एदिलशाही
अलीखान व सरफराजखान सन १०३४
५
अमल शाहाजीराजे भोसले यास जागीर जाली पा। पुणे व पा। सुपे दादाजी कोंडदेव पा। पुणे सुपियाकडे अमलदार पाठविले त्यांची नांवे
१ हणमंतराव साठे
१ त्यावरी हैबतराव
१ त्यावरी सरनवाजखान
१ त्यावरी खेळोजीराजे भोसले
१ त्यावरी एकोजी मोहिते
सु॥ सन खमस सलासीन अलफ
हिजरी सन हजार १०४४ ता।
-------
५
६
याउपरि राजश्री सीवाजी राजे या प्रांती राहिले ते समई सुपियांत संभाजी मोहिते हवालदार व दादाजी रखमांगद मजमदार होते ता। सन हजार १०६७ सुपियांत १
बारामतीस कान्हो पद्मनाभ हवालदार इ॥ सन १०६१ ता। सन हजार १०६७ - १
७
त्यावरी पुढे सीवाजी राजे यानीं संभाजी मोहिते धरिले मुलूक घेतला ठाणे बैसविले यादो सिधनाथ हवालदार व चोंडाजी व एसाजी गणेश हवालदार सन हजार १०६७
८
यावरी अबजलखान याने सीवाजी राजियावरी मोहीम केली त्याची ठाणी उठऊन आपले ठाणेदार पाठविले सिदी बिलाल व पांढरे सन १०६८ ता। सन १०७०
९
अमल मोगलाईच्या नामजादी दिल्लीहून आपल्या अमीरल- उमराऊ शास्ताखान आला ते समई मुलूक तमाम वोस जाला सुभा जेजुरीस आला तेथून चाकणेचा किला सर केला त्यावरी सिदी बिलाल सुभा करून आपले तरफेने ठाणियास पा। त्याने कौल देऊन कोट सुपियात मुस्तेद केला आपण मग इंदापुरास गेला राघो माहादेव हवालदार ठेविला सन हजार १०७१
१०
त्यावरी शास्ताखानाने सरफराजखान पुणियाहून नामजाद पा। बारामतीस सिदी बिलाल याणे ठाणे बैसविले जागीर देह २१ माणको बल्लाळ हवालदार व एसो नारायण मजमूदार सन १०७२
११
त्यावरी मिर्जा राजा आला सु॥ सीत सितैन अलफ हिजरी सन हजार १०७५ ते समई खिदरखान याणी ठाणे अकळूजेस बैसविले बारामतीस मानुल्लाखान आला कोट बाधला शके १५८७ विश्वावसु संवछरे सन हजार १०७५
१२
त्यावरी सीवाजी राजियानी धामधुम केली पुरंधरीहून स्वारिया करून मुलूक वोस पाडिला बेचिराख केला त्यावर दलेलखान व बाहादूरखान आले यानी पेडगावी कोट बांधला मुलूक वोस पाडिला ता। सन १०९२
१३
त्यावरी हजरत अलमगीर पातशाहा खासा दक्षणेस आले सन हजार १०९३ त्यावरी बारामती ठाणेदार जाले नावनिसी बि॥
१ हणमंतराव निंबाळकर सन हजार
१०९३ ता। सन हजार ११०३
१ यासीनखान सन हजार ११०४
ता। सन हजार ११११
१ सिलेमानखान सन हजार १११२
ता। सन १११३
१ यासीनखान मागती बदल जाहाले
सन १११४ ता। सन ११२०
१ रमाजी निंबाळकर यासी जागीर
सन ११२१ ता। सन ११२८
पावेतो
-------
५
१४
याउपरि अमल स्वराज्य जाले सन हजार ११२९
१ नारो प्रल्हाद छंदोगामात्य
इ॥ सन ११२९ ता। सन
११३२
१ हरि यादव सन ११३३
ता। सन ११३४
१ चिमणाजीपंत धायगुडे सन
११३५ ता। सन हजार ११३७
१ राजश्री पंत सचिव सन ११३८
ता। सन ११५२
१ रा। बाबूराव सदाशिव सन ११५३
ता। हाली सन ११६९ आहेत
१५