[ ८२ ] श्री. १७२३.
श्री राजा शंभु-
छत्रपति चरणीं
तत्पर । बहिरजीसुत
रखमोजी साळोखे
निरंतर.
अज दिवाण कोट कोल्हापूर ता। मोकदमानी बहिरेश्वर कर्यात हवेल सुहूरसन आर्बा अशरैन मया अलफ मौजे मजकुरीं शंकरगिरी गोसावी हे बहुत थोर अतीत त्यास श्री देवाची भक्त्युत्तमविशिष्ठ ऐसे जाणोन महाराज राजश्री स्वामीनी पेशजी पड जमीन इनाम ०।।० निमचावर दिला आहे त्यांपैकीं कांही कीर्दी जाहली आहे. काहीं जमीन कीर्दी होणें आहे त्यास गोसावीबावास जमीन सदरहूप्रमाणे कुल अवघी नेमून देणे आणि त्याचें इनाम अविच्छिन्न चालवणें. जमिनीस खलेल एकदर न करणें या पत्राची प्रती लिहोन घेऊन असल पत्र भोगवटियास गोसावी यापाशीं लिहून परतून देणें जाणिजे. रवाना मोर्तब सुद.
मोर्तब
सूद.