Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
१ कारकून अजमासें ५००० असामीं.
१ निसबत दप्तर हुजुरचे, २ निसबत खाजगीवाले. ३ निसबत तोफखाना, ४ निसबत पुणे सुभा, ५ निसबत पागा, ६ निसबत हाशम, ७ निसबत गारदी, ८ निसबत शिलेदार, ९ कारकून शिलेदार, १० माहाला निहायचे, ११ सरंजामी माहालचे, १२ किल्ले हायचे.
----
१२
१ हाशमी लोक पुण्याचे बंदोबस्तास चौकी पाहाण्यास, त्याचे काम नारायणराव हाशमनिस व विनायक नारायण आगाशे, अजमासे असामी २०००
१ कित्ता लोक. १ जासूद व बेलदार वाघोपंत अवीकर निसबत फरास खाना याजकडे.
२ खास बारदार गुणे याजकडे.
३ कामाठी व तबेलेदार नारो शिवराम खासगीवाले यांजकडे कारकून गोविंदपंत कामाठी.
४ व प्यादे गोविंद हरी सबनिस यांजकडें,
५ खासंजिलीब अबाजी बल्लाळ ठोसर याजकडे,
६ शहरचे रखवालीस शिपाई व बरेड काम त्रिंबकराव नारायण परचुरे यांजकडे.
------
६
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ८७ १५६९ आश्विन शुध्द ७
(फारसी मजकूर)
कौलुनामे अज दिवाण पा। वाई ताहा विठोजी बिन + सु + मजी पाटणा पा। मजकूरु सु॥सन समान अर्बैन अलफ कारणे दिल्हा कौलुनामा ऐसा जे तुझा दाईज सीवाजी बिन आकोजी पाटणा येउनु उभा राहिला जे विठोजी आपली पाटणेपणाची निमे तकसीम जोरी करून खातो आपणासी देत नाही ऐसे बोलिला मग देसाई व देसकुलकर्णी व सेटिये माहाजन पचनगर बैसोन मुनसफी पाहाता थोर थोर कतखुदा लोक बोलिले जे सिवाजीचा चुलता कमाजी व जाखोजी तकसीम खात होता पुढे दिवाणीचे नफर मजकुरावरी बाकी होती याबदल परागदा होउनु गेले ते बाकी विठोजीपासी दिवाणे घेतलि त्यातागाईत विठोजी सारी तकसीम खात होता हाली सिवाजी मजकूर उभा राहिला त्याचे तिसरी तकसीम त्यासी फिटते मग सदरहू पचनगराचे गोहीसाक्षीवरून सिवाजीचे तिसरी तकसीम सिवाजीचे दुबाला केली तुझे दोनी तकसीम तुझे दुबाला करून सेरणी देणे ह्मणउनु लाविले मग तुझे बाबे दताजी गगाजी देसाई पा। मजकूरु इलतमेसी केले जे साहेबी गोतपती न्याय करून हर जो जणाचे बरहक मुनशफी करून सिवाजी मजकूराचे तकसीम एकी त्याचे दुबाला केले ते त्याणे खाउनु असावे व विठोजी मजकुराचे दुबाले दोनी तकसीमा करून दिवाणनफराई करावी त्यासी दिवाणामधे यावया समध नाही ऐसी मुनशफी करून शीरणी देणे ह्मणउनु लाविले तरी नफर मजकुरु गैरमवसरदार मवसर हाल पाहून सीरणी बाधलिया नफर मजकूरु उसूल करून जगला जाईल व दिवाण नफराई करील बराय मालुमाती दखई खातिरेसी आणुउनु सेरणी बाधले होनु ३०b तीस हे बेरीज उसूल करून देउनु दिवाण नफराई करून तुवा आपलिया दोनी तकसीमा खाउनु सुखे असणे सिवाजी मजकुरु आपली एक तकसीम खाउनु जगत सालाबाद जैसे देत होता तैसे देउनु असेल तुझे दिवाणकारबारात दखल होवया निस्बती नाही तुवा कोणेबाबे शक अदेशा न करणे कौलु आहे
तेरीख ५ माहे रमजान
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
१ गारदी नेहमीं पुणें मुक्कामीं चाकरीस अजमासें १०००० दाहा हजार यांचे सरदारांची नांवनिशीं.
१ मुसामोत्री व मुसाकुरास मुसाजलले; २ मुसावास; ३ मुसापीत; ४ मुसाजरंज; ५ शामिरखान रोहिले; ६ सय्यद अमद अरब नाना फडणस याजकडील; ७ बळवंतराव काशि; ८ विनायक नारायण परांजप; ९ राघो विश्वनाथ गोडबोले
१ मुत्सदी व कारभारी.
१ नाना फडणीस; २ बाबा फडके; ३ नारोपंत चक्रदेव; ४ गोविंदराव काळे; ५ गोविंदराव पिंगळे; ६ गोविंदराव बाजी; ७ बहिरो रघुनाथ मेहंदळे; ८ अबा शेलूकर; ९ राघोपंत गोडबोले; १० दादा गद्रे; ११ महिपतराव चिटणीस; १२ नारो निळकंठ .मजमदार; १३ गोपाळराव मुअशी; १४ चिंतोपंत देशमुख; १५ त्रिंबकराव परचुरे; १६ अत्या गुरुजी; १७ बापुजी बल्लाळ लेले; १८ भाऊ सरंजामी; १९ गोविंदपंत आपटे; २० विठ्ठलपंत वाकनीस; २१ तिमाराव पारसनिस; २२ पांडुरंगपंत ढमढेरे; २३ बन्याबा शिरोळकर; २४ शिवरामपंत थत्ते; २५ सदाशिव भट दिवाणजी; २६ मोरोपंत गडबोले; २७ गणेशपंत मटांगे निबसत खाजगी; २८ रामचंद्र नारायण तुळशीबागवाले; २९ दादो हरी मराठे; ३० चिमणाजी खंडेराव.
------
३०
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ११७ ] श्री. १७३०.
राजश्री भगवंतराव पंडित अमात्य यासीः -
प्रति सौभाग्यादि संपन्न उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहिणें यानंतर तुह्मी पत्र पाठविलें तें पावोन लेखनार्थ अवगत जाला. आह्मा बंधु ह्मणविलें त्याचा अभिमान धरून उर्जित करावे ह्मणून कितेक तपशिलें लिहिलें व स्वमुखें रा शिवाजी मल्हार याणीं मुखवचनें अर्थ निवेदन केला. ऐशास, तुह्मीं पुरातन राज्याची सरक्षणे करून यशें विशेषात्कारें संपादिलीं. त्यांतून विशेष सेवा करून दाखवून मजुरा करून घ्याल हा पूर्ण निशा आहे बंधु ह्मणविलें त्याचाही सार्थ अभिमान आह्मांस आहे कोणेविशीं अतराय होणार नाही. अमाधान असो देणें वरकड सविस्तर मानिल्हे यास आज्ञा केली आहे हे मुखवचनें सांगतां कळों येईल. जाणिजे छ. ५ रमजान . बहुत लिहिणें तर सुज्ञ असा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ११६ ] श्री. १७३०.
सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री भगवंतराव पंडित स्वामी गोसावी यांसीः-
पोष्य बाजीराव बल्लाळ कृतानेक नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत असलें पाहिजे. विशेय आपण पत्र पाठविलें तें पावोन संतोष जाहला. राज्यांतील विचार प्रसंग व थोरपण संरक्षण व्हावयाचा व कितेक वरकड विचार विस्तारें लेख केला. व रा। संभाजी पडवळ आले याणीं मुख वचनें निवेदन केलें. त्याजवरून साकल्य अर्थ कळला. ऐशास, आमचा विचार आपणासी आणि सारखा आहे असें नाहीं. कायावाड्मनसा आपले अभीष्ट असेल तेंच करावें हें अत्यावश्यक आहे. परंतु राज्यांतील विचार प्रसंग प्रस्तुत कोणे प्रकारचा जाहला आहे, तो आपणास न कळेसा काय ? सारांश, आह्मीं उत्तरप्रांतें गेलों होतों ते आलों. राजश्री स्वामीचे दर्शनास जाऊन तेथें आपला प्रसंग सविस्तर राजश्री स्वामीस विनंति करून आपले साहित्यास सर्वथा आह्मांपासून अंतर होणार नाहीं. आह्मीं आपणाखेरीज नाहीं. एतद्विषयींचा कितेक अर्थ रा. संभाजी पडवळ यांस सांगितला आहे. हे आपणास निवेदन करतील. याजवरून कळों येईल. बहुत काय लिहिणें. लोभ असो दीजे. हे विनंति. आह्मीं सातारियास आलियावरी मा।रनिलेस आह्माजवळ पाठवून दीजे. ही विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
निसबत सर लष्कर.
खुद्द अप्पाजी मोरे सर लष्कर; हैबतराव आठोळे; मानाजी व यशवंतराव गाढवे, हणमंतराव आठोळे; हणमंतराव गिन्यानजी आठोळे; बनाजी आठोळे; जिवनसिंग लाडू; जैबतराव माहार्णवफर; मानाजी बळवंतराव देवकांते; सुभानराव वाघमोरे; जिजाजीराव काडे;
निसबत फत्तेसिंग भोसले; खुद्द जातेसिंग भोसले; अनंतराव शिर्के, माणिकराव चिमणाजी धायगुडे; अमृतराव अरंगर; येशवंतराव पांढरे विठोजी माले; शिदाजी जाधव; तुलजाजी पवार; माधवराव बावने; माळोजी बंडगर; भगवंतराव बंडगर; होनाजी बंडगर; शिंदेराव वगैरे सोळसकर; संताजी शितोळे; अनंतराव मचाले; रघुनाथराव निळकंट.
माधवराव भापकर; मिरखान टोके; मालोजी घोर्पडे; रुस्तुमराव जाधव शिंदखेडकर; गोविंदराव निळकंट; हणमंतराव अदमणे; जानोजी ढमढेरे; गणोजी शिर्के; बोधेमंडळी; रंगराव माहादेव वडेकर; शंकरराव नरसिंह वगैरे लेलेमंडळी; शिदोजी बाबर; रामजी व विठोजी भाळेराव; आवजी कवडे; हैबतराव खताळ; खंडेराव भोसले; गंगाधर शंकर पुरंधरे; बळवंतराव नागनाथ.
-----
११०
१ मोठे सरदार.
१ दवलतराव शिंदे; अलिज्या भाहादूर; २ काशिराव होळकर; ३ रघोजी भोसले नागपुरकर; ४ समशेर बहादूर; ५ बुंदले.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ११५ ] श्री. १७३०.
राजमान्य राजश्री भगवंतराऊ अमात्य हुकमतपन्हा यासी आज्ञा केली ऐसी जेः -
तुह्मीं नारायण हरकारा यासमागमें विनंति सागोन पाठविली याप्रमाणें विदित करितां श्रुत झाली. ऐशास, स्वामीस तुह्मापेक्षां दुसरे अधिकोत्तर कांहीं आहे ऐसे नाहीं तुह्मी चाकरी करावी आणि दिवसेंदिवस उर्जित करून चालवावें हेंच अवश्यक आहे. तुह्मांस पेशजी क्रिया दिली तेच आहे दुसरें काही नाही रा गोपाळ रामभाऊ याचा प्रसग सागोन पाठविला तर उत्तम ते धण्याचे चाकर. त्यांचें चालवावें हें आवश्यक येविशी ता । मल्हारजी सांगता कळेल याउपरि येथील प्रसगास तुह्मीं चित्तांत सशय मानावा ऐसे नाहीं स्वामीचे आगमन बहुतां दिवशीं झालें, दर्शनास येऊन संतोषी करणे येविशीं स्वमुखे मल्हारजीस आज्ञा केली असे. नारायणास सत्वरीच पाठवितो. सुज्ञ असा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
१ सरंमजामी फौजेचे सरदार, थोर लहान.
१ निळकंठ माहादेव पुरंधरे व त्रिंबकराव महिपत वगैरे पुरंधरे. २ नरसिंह खंडेराव विंचुरकर. ३ गोपाळराव त्रिंबक राजे बाहाद्दर. ४ खंडेराव त्रिंबक ऐढेकर, ५ पटवर्धन मंडळी परशराम रामचंद्र व रघुनाथराव निळकंट व चिंतामणराव पांडुरंग वगैरे. ७ पांडुरंग बाबूराव बारामतीकर, ८ रघुनाथराव बळवंत नायगांवकर.
सिद्धेश्वेर महिपत बिनिवाले; कृष्णराव बळवंत ऊर्फ अप्पा बळवंत; अनंत भिकाजी रास्ते; काशिराव गणपत रास्ते; गणपत अनंतराव मेंदळे उर्फ अन्याबा बापू; माधवराव रामचंद्र; गणपतराव विश्वनाथ व सखाराम येशवंत पानशे; त्रिंबकराव अमृतेश्वर पेठणे; परशराम पंडित प्रतिनिधी; पथला निसवत बाळाजी जनार्दन; पथला निसबत हरी बल्लाळ फडके; छत्रसिंग व भाऊसिंग टोके; विठ्ठलराव रामचंद्र व बळवंतराव अप्पाजीराव अबीकर; माहिपतराव वगैरे धुमाळ; कृष्णाजी रणदिवे; माहादाजी नाईक निंबाळकर; दवलतराव निंबाळकर हणमंतराव भोसले जितिकर; मल्हाराव सोमवंशी हासाजी व गिर्जाजी आठोळे; रामराव चितळकर; कृष्णराव साळुखे खंडेराव वगैरे सोमवंशी; हैबतराव सोमवंशी; हेंबतराव ढमढेरे; नारायणराव ढम: ढेरे; दादजी वगैरे शिताळे अवसरीकर; खंडेराव वगैरे शिताळे कुशेगांवकर; शिताळे नेहावकर; संभाजी व जोत्याजी जाधराव; जिवाजी आठोले; अनंतराव थोरात; अमसिंग जाधवराव; संभाजी राऊत; कृष्णाजी बाबूराव दाभाडे; रघोजी वगैरे भोसले साखरीकर; माणिकराव वगैरे धायगुडे; रायाजी जाधव, अंनतराव पोवार; हणमंतराव जाधव भुईजकर; सटवाजी व सुलतानजी धायभर; जानोजी व प्रीताजी शेकर; शेख महमद; कृष्णराव भगवंत; भोयटे मंडळी नसिराबादकर; खेत्रोजी भोयटे; सखोजी शिर्के; तुकोजी अनंतराव; बळवंतराव व विठलराव पवार; गोविंदराव व द्वारकोजी पवार; बाळजी व मालजी भोसलें; चंद्रराव पवार; राणोजी पवार विश्वासराव शिवराव धिराजी पवार; मल्हारजी पवार; तुकोजी व सदाशिव पवार मानाजी फुकडे;
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक ८६ १५६८ फाल्गुन वद्य
(फारसी मजकूर)
अज सरकार फैज आसार आली हजरत खुलीद जिलालजलालहू तहरीर याफ्त बजानेब मशुरुल अनाम चादोराम हवालदार व कारकुनानि व देसमुखानि पा। वाई बिदानद की सु॥सन सबा अर्बैन व अलफ दरीविले बेस्मी गोपीनाथभट बिन रामेस्वरभट तबीब जुनारकर सो। कसबे पा। मजकूर हुजूर येऊन मालूम केले जे आपणासि इनाम जमीन चावर १॥ दीढ देखील माहसूल व नखतयाती बितपसील
मौजे बोरखल मौजे किण्ही जमीन चावर
जमीन चावर एक १ नीम .॥.
बिमोजीब खुर्दखत मोकासाइयानि माजी भोगवटा तसरुफाती तागाईत सालगुदस्ता चालिले आहे हाली पा। मजकूर आली हजरत साहेबासी मोकासा आर्जानी जाहाले माहाली कारकून खुर्दखताचा उजूर करिताति दरीबाब खुर्द होय ह्मणून मालूम जाहाले बराय मालुमाती खातिरेसी आणून गोपीनाथभट बिन रामेश्वरभट तबीब जुनारदार मजकूर यासि इनाम जमीन चावर १॥ दीढ दर सवाद दु मौजे पा। मजकूर सदरहू देखील बाबहाय सदरहू बिमोजीब खुर्दखत याकुतखानपासोन ता। रणदुलाखान मोकासाई माजी भोगवटे खुर्दखत पाहोन दुबाला केले असे माहाली भोगवटा तसरुफाती कारकीर्दी दर कारकीर्दी सालाबाद तागाईत साल गुदस्ता चालिले असेल त्यानेप्रमाणे दुबाला कीजे हर साला खुर्दखताचा उजूर न कीजे तालीक लेहोन घेऊन असल परतोन दीजे
तेरीख २४ माहे सफर सन सबा आरबैन
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
१-थट्ठी: रामचंद्र नारायण पुसुभा यांजकडे,
२ पोते व जामदार खाना शामराव गोविंद पोतनीस यांजकडे.
१ मुत्पाक कोठी, नारो कान्हो ठोसर यांजकडे.
१ जिनसखाना व वैद्यशाळा बाबूराव करमरकर यांजकडे.
१ वाकनिसी विठ्ठलराम वाकनीस यांजकडे.
१ पुस्तकशाळा गोविंदपंत आपटे यांजकडे.
१ न्यायाधिशी व राजाध्यक्षता यज्ञेश्वरशास्त्री द्रविड, अपाशास्त्री यांचे बंधु यांजकडे.
१ यज्ञशाळा राघो सदाशिव शेवडे.
१ सबनिशी गोविंद हरी बर्वे.
-----
१७.
येणेंप्रमाणे कारखाने होते.
१ पागा १ हुजरांत घोडीं अजमासें दाहा हजार १०००० यांचे सरदार, यांची नांवनिशीं.
१ पागा, हुजूर, हरी इच्छाराम, व लक्ष्मण गंगाधर, १ पागा हुजूर गोविंदराव सदाशिव. १ अनंतराव बाबर. १ सटवाजी मांजरे, १ अनंतराव सोमवंशी, १ व्यंकटराव रघुनाथ. १ बहिरजी मुळे, १ महिपतराव रघुनाथ; १ जगंनाथ रघुनाथ. १ बळवंतराव मुंढे; १ भिकाजी जनार्दन; गंगाधर गणेश; १ बळवंतराव नारायण; १ मिरा माहात; १ मर्दुजा माहात; १ गणेश बाजीराव; १ अवधूतराव सोमवंशी;, बाजीराव गोविंद; १ जैतुजी बाबर; १ येशवंत सूळ; १ गणेश हरी; १'रावजी फडर्ते; १ हायबतसिंग कृष्णसिंग; १ राघो गंगाधर; १ माणकाजी भोयटे; १ यशवंतराव देव; १ नारायण भिकाजी; १ मानी पायघुडे; १ हनमंतराव गावडे; १ सुलाजी वरांडे; १ बळवंतराव सुब्राव; १ हायबतराव पलोड; १ कृष्णाजी नारायण; १ उमाजी वाघ; १ लक्ष्मणसिंग; १ निळकंठराव जगताप; १ हैबतराव शंकर; १ पांडुरंग विठ्ठल; १ रामचंद्र सदाशिव, १ महादजी शिंदे; १ सावजी निंबाळकर; १ सग्याबा निंबाळकर १ येशवंतराव ताकपीर; १ भास्कर जगन्नाथ १ तुको अनंतराव; १ विश्वासराव चिंतामण; १ चिमाजी जताप; १ रंगो शामराज; १ विठ्ठल मल्हार; १ सखोजी सूल; १ सयाजी मुळे, १ भिवराज यवत, १ खंडेराव बल्लाण; १ पिराजी शिताळे; १ जावराव भोयटे; १ मुधाजी भोयटे; १ सुभानराव शिंदे; १ आबाजी अनंतराव; १ विसाजी गणेश; १ गमाजी निबाळकर; १ अमृतराव गावडे; १ मनसिंगराव जगथाप; १ बळवंतराव नागनाथ इदापूरकर; १ पर्वतराव भालपकर; १ विठ्ठलराव निकम, १ दौलतराव काठे; १ बळवंतराव थोरात. १ निळकंठराव रामचंद्र, १ बाबुराव अनंत. १ राघो बापूजी; १ कान्होजी खल्हाटे; १ गिरजाजी बरगे; १ जगन्नाथ केशवः । १ बळवंतराव नागनाथ लिमगांवकर. । १ रामजी भोयटे; १ दादू माहात; १ धोंडे मल्हार; १ राघोजी पटारे; १ शिबराव कडेकर; १ गोपाळ बापूजी; १ लक्ष्मण त्रिंबक; १ रंगराव पुरुषोत्तम पानशे; १ रामचंद्र शिवाजी, १ खंडेराव बल्लाळ पुरंधरे; १ चिंतामणराव पांडुरंग; १ माधवराव परशुराम; १ अवधुतराव पेशवंत; १ अबाजी कृष्ण शेलुकर; १ अबाजी गणेश बेहेरे. १ परशराम महादेव कुंटे; १ धोंडो बल्लाळ गोखले.
-----
९३