Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

[ ११४ ]                                            श्री.                                             ३ जुलै, १७३०.

विनति उपरि येथील कुशल आषाढ बहुल चतुर्दशीपावेतो यथास्थित असे विशेष. आपण लिगो रघुनाथ यासमागमें पत्र पाठविले ते पावले. त्याउपरि त्याची रवानगी करावी तों स्वामीकडे अगोदर आह्माकडील राजश्री आनंदराव पाठविले होते ते व आपणाकडील रा. रामाजी शिवेदेऊ पत्रे घेऊन आले. अनुक्रमें दोनही पत्रांवरून व मानिल्हेच्या मुखातरावरून आद्यत कळोन समाधान झालें. ऐशास, आपण राज्यांतील धुरंधर, धन्यानी दिवसेंदिवस कृपा करावी, हेच उचित आहे. प्रसंगोपात्त जें होणार त्यास ईश्वरइच्छा, तथापि आपणानिराळे कोणी नाहीत प्रस्तुत सविस्तर अर्थ माहाराज राजश्री स्वामीचे सेवेसी विदित करून उभयतांस दर्शन करविलें . याजकडूनही जो अर्ज करवणें तो करवून अवघा अर्थ श्रवण झाला. त्यास, सारांश, गोष्ट, स्वमीकडून सभ्य मनुष्य येऊन बोलीचाली व्हावी, याकरिता धन्यास विनंती केली. त्यावरून राजश्री नारो केशव यास आणावयाविशी हुजुरून आज्ञा झाली आहे व उभयतांसही, धन्यानीं स्वमुखें आज्ञा केली असे. तरी कोणेविशीं संदेह न धरितां नारोपंतास येथवरी पाठवून द्यावें. बोलीचालीमुळें बनाव होऊन आल्यास मग कांहीं चिंताच नाहीं. ही गोष्ट नव्हे तेपक्षी नारोपंतास निश्चयात्मक पावून देऊन मागील प्रसंगाकरितां कोणी पाय घेत नाहीं ह्मणून लिहिलें तरी तो विचार आणिक होता. आतां आह्मीं आहों आमची रीत आपणास न कळे ऐसें नाहीं. तरी सत्वर मानिल्हेस पाठविलें पाहिजे. येविशीं सविस्तर मानिल्हे सांगतां कळो येईल. मुख्य धनी याची दया संपादन घ्यावी, यांत सर्वही स्वामीचें स्वहित आहे. येविशी मानिल्हे सांगतां कळो येईल. बहुत काय लिहिणें. कृपावर्धमान केली पाहिजे. हे विनंति.

साबणे रुद्राजीपंत बोलिले भोगाचे विचारितील तरि आह्मावरि घाला आह्मी सागोन त्यावरि हुजुरुल कारकूनी भोग विचारिता आपण पत्रे आणिली नाही परभारे विजापुरून आलो तुह्मास सदेह असेल तरि वाईचे यारिदी आले असेति त्यास विचारणे तीही त्यास पुशिले तीही दसत अमल दाखविला + + रुजु झाले नारायणभट्टासि मागती खाने पाचारून नेउन सागाते महालदार देउन खुर्दखत देउन बनाजीपताचेथे पाठउन दिल्हे नारायणभट्ट खुर्दखत घेउन नवा ठाणदारासागाते वाईस येउन इनाम दस्तीबाद करून भक्षू लागले या उपरि बापूस मी बोलिलो नारायणभट्ट येईल अण पद्मणभट्टाबाबति खुर्दखत मागोन देइन ह्मणत होतासि तरि मागीतले की नाही तो बोलिला म्या मागावे तरि खालिलेकडे गेलो तिकडे दोनि महिन्ये लागले आता मागोन देइन ऐसे ह्मणोन नारायणभट्ट व्याख्यान सागत होता त्यास मागीतले तुजजवळि पद्मणभट्टे खुर्दखत दिधले ते दे रगोवास देइन ह्मटिले आहे त्यावरि नारायणभट्ट बोलिला ते पत्र कार्यास नये रगोवा घेउन काय करील त्याचा इनाम तरि मुरादखाने बिदुमाधवास दिधला आता व्यर्थ कटकट करून काय बापू बोलिला पत्र तो देतो यत्‍न करील नारायणभट्टे पत्र दाखविले बापू बोलिला कागद दे नारायणभट्ट बोलिला तुझे मनी इतके आहे तरि म्या पिपरी तिसा बिघ्याची अर्ध्द चावर करून दिधली तो पाउ चावर दे मग हे घे नाही तरि उगाच अस याउपरि मी जवळि गेलो बापूस धामास चाल ह्मटिले मग तो मी घोमास जाता पत्राचे काय केले तो बोलिला ते पत्र कार्यास नयेसे झाले त्यावरि नारायणभट्ट आठ वरिषे वाचला असता वाडे व इनामाची खडपत्रे साविसा वर्षाचा कागद बापू पासून लेहून घेतला नारायणभट्ट मेल्याउपरि ही खडपत्रे केली ते काळी पर पसरणीची गोष्टी केली नाही याउपरि स्वार्थ धरून पसरणीचा व्यवहार उद्भविला आह्मी पिंपरीचा उद्भविला व तुज पसरणीस सबध नाही ह्मटिले त्यावरि बापू मेला त्याचे पुत्र ही झगडले अती कृष्ण जोशी मध्ये पडोन समजाविले त्याची ताबगिरी पिंपरी बाबति पत्रे त्यास दिधली हा काळपर्यत उगेच होते आता मागुती कळह करिताति तरि पूर्वी बापूने मज पदमणभट्टाच्या पाउ चावराचे खुर्दखत देइन ह्मणउन बोलिला होता यास साक्षी नारायण जोशी आहे पर त्याचे लिहिले नाही व व्यवहार सागावला ह्मणजे गई करिताति तरि ज्या प्रकारे त्यापासून मज पदमणभट्ट पत्रविभाग प्राप्‍त होय ऐसे त्यास मन पूत लेहून देउन त्यापासून पत्र लेहून घेउन याच पत्राच्या बळे त्याशी व्यवहार सागोन जेथे पद्मणभट्टाचा पाउ चावर लागेल तो माझा मी घेइन बापूस व बापूच्या मुलास सबध नाही ऐसे करीन जरि त्याच्या मनासारिखे लेहुन ने दी तरि त्यापासून मज लिहिले प्राप्‍त नव्हे हा काल पर्यंत उपेक्षा केली ज्ये पिंपरी बुडेल याउपरि उपेक्षा करिता नये याकरिता मनास ये तैसे आमोजीस व येकोजीस पत्र लेहून देतो व त्यापासून पत्र लेहून घेतो जाणिजे व तुह्मास जो पिंपरीबाबति पाउ चावर देवविल तो पद्मणभट्टाचे पाउ चावराचे पत्र तुह्मास मागेल अथवा जो पिंपरीच्या पाउ चावराचे पत्र नारायणभट्ट नरशिगरायास सागोन अर्ध चावराचे करून दिधले नाही ऐसा जो रवा काढील तो तुह्मास पद्मणभट्टाचे पत्र मागेल परतु जो दसत अमल व दस्त व तुमच्या इनामाचे खुर्दखत पाहून शेणोपणधर्मे मुनशिबी करील तो तुमचा इनाम घा ह्मणेना वकिळातीने जी मुनशिबी करील तरि त्यास चालेना यात ईश्वरेच्छा प्रमाण                                               साक्षी

पद्मणभट्टाबाबति खुर्दखत तरि नारायणभट्ट मेल्याउपरि मी महाबळेश्वरास गेलों माघारि या बापूनें खुर्दखताचा बोकचा अपल्या घरास नेला त्यामध्यें होते मीं महाबळेश्वरून आलो इनाम वाटिले खुर्दखताचा बोकचा मजपाशी दिधला तो खुर्दखत पाहिले त्यापरिते देखिले नाही

येकवीरा

[ ११३ ]                                          श्री.                                          १७३०.

श्रीमंत राजश्री पंत अमात्य हुकमतपन्हा स्वामीचे सेवेसी - विनति सेवक द्वारकोजी यादव कृतानेक विज्ञापना विनंती स्वामीचे दयेनें वर्तमान यशास्थित असे विशेष आपण पत्र पाठविलें तें श्रीमंत सकळसौभाग्यादिसंपन्न मातुश्री बाईस हेवांस विदित केलें. त्याचें प्रत्युत्तर पाठविलें आहे. त्यावरून अभिप्राय कळों येईल. मुख्य गोष्ट स्वामी थोर आहेत, आणि आह्मीं सामान्य सेवक, असें असोन आह्मांस खोल पाण्यांत घालावयाचें नव्हतें. यद्यपि ही थोरपणें स्यामींचीच आहेत त्याचें निदर्शन कीं, आपला कोणी भला माणूस कारकून विश्वासूक इमानीइतबारी व विनंतपत्र ऐसें हुजूर पाठवून द्यावें. येथील मर्जीमाफक स्वामींनी वर्तणूक करावी. बोलल्या वचनाप्रमाणें कार्यभाग घडोन हें यश स्वामींनीं आह्मांस द्यावें, नाहीं तरी वारंवार स्वामीकडील पत्रे येतच आहेत. एकवेळ मल्हारी आला. दुसरे खेपेस दुसरा माणून पाठविला, असे असतां धन्यास तरी कोणप्रकारें अर्ज करावे ? मुख्य गोष्ट, धन्याचे पायाशीं निष्ठा धरून आणि आपलेंसें करून घ्यावें यांतच उत्तम, लौकिकही बराच आहे. याउपरि स्वामींनी दुसरें तिसरें कांहीं ह्मणों नये. धन्याचे पायाशी दृढ निश्चयें मिठी घालावीं. त्याणीं तुमचे सर्वप्रकारें चालवावें. येणेकरून उभयपक्षींही बरें दिसतें नाहींतरी तुमचें विनंतिपत्र हुजूर येणें तें आह्मां लघु मनुष्यास स्वामींनीं गौरव दिल्ह्यासारिखा आह्मांस यश द्यावें कारकून विश्वासू इमानीइतबारी ऐसा सत्वर पाठवावा विलंबावरी घातल्यानें एक प्रकारें दिसतें. इतके दिवस झालें तें झालें याउपरि स्वामींनी विलंबावरी घालावें ऐसें नाहीं. स्वामीचें वचन ह्मणजे शापादपि. शरादपि ऐसे आहे. आह्मांस यश देऊन धन्याची तुमची गोडी होय तो अर्थ करावा. विशेष लिहावें तरी स्वामीस मानमार्ग न कळेसा काय आहे ? जेणेंकरून लोकोत्तर यशकीर्ति आह्मां लघु मनुष्यास सांगितल्यास सागितल्यासारिखें घडावें हे उत्कठा आहे. यश दिल्हें पाहिजे हे विज्ञापना याउपरी जे पूर्वी झालें तें उत्तमच झालें. जरीकरितां आपले विचारे गोडी करावी असें असले तरी पत्राचें उत्तर व कारकून ऐसें सत्वर पाठवावे. नाहीं तैसें पत्राचें उत्तर पाठवावें, ह्मणजे आह्मासारख्याची स्थित राहील आधींच आमची इजत थोडकी ते रक्षिलियानें बरें यास्तव साफ जाब सत्वर पाठवावा दिवसगत लावावीशी नाहीं. तथापि हा विचार न होय तरी, आपण सरकारकून, हे धनीच आहेत, तेथे आह्मीं काय ल्याहावे ? हे विज्ञापना.

येणेंप्रमाणें मजकूर जाले.

१ श्रीमंत बाजीराव रघुनाथ प्रधान यांस मार्गशिर्ष शु।। ६ पेशवाईचीं वस्त्रै होऊन पंत प्रधान झाले, ते समई सरकारची दौलत व मनुष्यें कांहीं होतीं बी।।

१ सरकारचे कारखाने,

१ तोफखाना सखारामपंत पानशे व त्यांचे पुतणे गणपतराव विश्वनाथ पानशे वगैरे.

१ खुद्द सखारामपंत.                 १ गणपतराव विश्वनाथ,
१ माधवराव कृष्ण,                   १ जयवंतराव
-----                                            ------
 २                                        २
                      -------------
                       ४
१ याजकडे होता. दारुगोळा तोफाचे गाडेसुद्धां गोलंदाज, खलासी गाडीवान वगैर कामगार मणसें व रखवालीचे
गाडदी, खर्चास माहाल व गांवगाड्याचे बैलसुद्धा कारखाना तयार होता.

१ पिलखाना.
१ सरदार भगवंतपंत दर्शनी.
१ सरदार अलीमाहात

कारभारी रामचंद्रपंत गाडगीळ,
----


एकूण दोन कारखाने मिळोन हत्तीपत अजमासें १०० शंभर यांचे चाकरीची माणसें व हत्तीचा सरंमजामसुद्धां तयार.
१ उष्टरखाना नि॥ गणपतराव मोरेश्वर सरंमजामसुद्धां ऊंजफर अजमासें १५०० पंधराशें.

१ फरासखाना नि॥ राघोपंत अंबीकर यांजकडे खडर्याचे स्वारीस डेरे व रावट्या वगैरे सरंजाम तयार केला तो, व दलंबादल डेप्यासुद्धां सरंजाम कायम.

१ शिलेखाना काम सदाशिवपंत वाकणकर यांजकडे.

१ नारो शिवराम खाजगीवाले कारभारी, गणेशपंत मटंगे याजकडे कारखाने.

१ कोठी, २ लकडखाना, ३ इमारत, ४ बागा, ५ पेठा पुण्याच्या, ६ कुरणें, ७ वहींत कोठी, ८ रथखाना, ९ शिकारखाना, १० देवस्थान पर्वती, ११ नळाचा काखाना, १२ दारुखाना.
------
१२

येणेंप्रमाणें कारखाने होते.

१ श्रीमंत बाजीरावसाहेब व चिमाजीअप्पा व नाना फडणीस व रघोजी भोसले व दवलतराव शिंदे व तुकोजी होळकर व मशरीनमुलुख, मानाजी फाकडे व घोरपडे, पाटणकर, निंबाळकर, हुजरांत पागेचे सरदार यांच्या भेटी कार्तिक वद्य १२ स जाल्या.

१ श्रीमंत बाजीराव रघुनाथ यांस पेशवाईची वस्त्रें आणावयास सातारीयास अबा शलूकर गेले होते, त्यांणीं वस्त्रें व शिकेकटार आणिलीं, तीं मसनदीवर ठेऊन मार्गशिर्ष शु॥ ६ सोमवार छ. ४ जमादीलाखरीं तेरा। घटका रात्रीस मुजरे करून घेतलीं. बाजीराव रघुनाथ पंत प्रधान जाले. पुढें फागुन अखेरपर्यंत मजकूर जाले ते
.

१ गोदिंदराव गाईकवाड यांस वस्त्रे जाल्याचें पत्र बाजीरावसाहेब यांणीं छ, २५ जमादिलाखरचे पाठविलें. त्यांत छ. ४ जमादिलाखरीस वस्त्रें जालों असें लिहिलें आहे. त्या पत्राची नक्कल तात्या मजमदार यांजवळ आहे त्याजवरून.

१ बाजीरावसाहेब यांची स्त्री, धोंडोपंत मंडलीक यांची कन्या मृत्यु पावली, तिची क्रिया डे-यांत लष्करांत पौषमाशीं केली.

१ माघ श्रु॥ ५ गुरुवारीं छ. १८ साबाजी बाजीरावसाहेब व चिमणाजी अप्पा व अमृतराव व त्यांचे पुत्र विनायकराव व अमृतराव यांची स्त्री अशीं पहाटेस गजराचे वेळेस पुण्यांत शनवारचे वाड्यांत दाखल जालीं. वाड्याभोंवतीं चौकी शिंदे यांजकडील तोफा व पलटणचे लोक होते.

१ बाजीरावसाहेब यांचे लग्न फाल्गुन माशीं जाले. कन्या दाजीबा फडके यांची; नांव राधाबाई ठेविलें.

१ बाळाजी जनार्दन बुधवारचे चावडीजवळचे वाड्यांत यरंडवणें येथून राहिले. कारभार त्यांचे विद्यमानें चालला. परशरामभाऊ यांणीं कर्जपट्टी लोकांवर घातली. हातीं तिचा वसूल चालविला. शिंद्यास पैसा द्यावयाचा होता तो त्यांस देत गेले.
-----

१ अप्पासाहेब व परशरामभाऊ पुण्याहून निघोन गेले. नंतर तेच वेळेस त्रिंबकराव नारायण परचुरे कोथरूडचे बागेंत होते त्याणीं येऊन पुण्याचा बैदोबस्त केला. बहिरोपंत मेंहदळे सापडले त्याची बेहुरमत केलीं, त्यास व त्यांचे पुत्र अन्याबा यांस धरून कैद केले वे परशरामभाऊ यांजकडील लोकांस धराधर फार केली, कैदेंत ठेविलें, त्यांची घरें लुटून सरकारांत आणिलीं; शहर हावालदील जालें.

१ श्रीमंत बाजीरावसाहेब हिंदुस्थानांत रवाना केले, ते केसो गोविंद यांचे बेलापुरापर्यंत गेले होते, त्यांस शिंद्यानें आपले लष्करांत माघारें आणिलें. येते समंई कोरेगांवचे मुक्कामीं बाजीराव साहेब छ, १४ जमादिलावली येऊन तेथून नाना फडणीस यांस चिठ्ठी पाठविली. तिची नक्कल राबिसन साहेब यांचे कागदांत सापडली. त्यांतील मजकूर कीं आमची स्वारी कोरगावांस आली, तुमचे येणें न जालें त्यांस पुण्यानजीक येऊन राजश्री दवलतराव शिंदे, अलीजा बाहादूर व अजमल उमराव बाहादूर यांसुद्धा भेटीस येणें. दुसरें सरकारचें हिताकारतां तुमचे वचन ज्याशीं गुंतलें असेल तें वचन सरकारचें गुतलें. खातरजमेनें लौकर यावें. आपले विच्याराखेरीज कांहींएक घडावयाचे नाहीं. याप्रमाणें चिठ्ठी पाठविली.

१ अमृतरावसाहेब पुण्यास आणिलें.

१ बाबा फडके चाकणेस होते ते पुण्यास आले.

१ श्रीमंत बाजीरावसाहेब, चिमणाजी अप्पा. अमृतराव साहेब यांच्या भेटी मुंढव्याचे मुक्कामीं जाल्या. कार्तक वद्य ७ सोमवार छ, २० जमादिलावेल.

१ नाना फडणीस यांशीं शिंदे अनकूळ जाल्यामुळें त्यांचें राजकारण सिद्ध झाले. व बाजीरावसाहेब यांची चिठ्ठी गेल्यावरून नाना फडणीस जलदीनें माहाडाहून निघोन पुण्यालगत यरंडवणे येथे येऊन मुक्कामास आले. बाजीरावसाहेब यांचा भरवसा नाहीं, याजकारितां मशीनमुलुख यांस दरम्यान घेऊन नवाई यास बाजीरावसाहेब याची चिठ्ठी देविली; त्याचा मसुदा राबीसन साहेब यांजवळचे कागदांत सांपडला. त्यांतील मजकूर कीं बाळाजी जनार्दन फडणीस यांस आम्हाकडून त्यांचे ज्यानास व हुर्मतीस अपकार होईल येविशीं. त्यांस संशय; यास्तव मशारनिल्हेची खातरजमा आह्मीं आपल्याकडून करविली त्याप्रमाणें आपण केली. त्यांस बाळाजी जनार्दन यांजकडून आमचे जातीस व दौलतीस व पंत प्रधानीस व खावंदगिरीस व तेज्यास सबाह्य अंतर वाकडे होऊं नये. पंत ---आम्हाजवळ असेल अथवा सोईस न पडल्यास स्नानसंध्येस नेमाप्रमाणें निरोप दिल्हा जाईल. त्यांचे ज्यानास व मालास व हुर्मतीस सबाह्य वाकडे होणार नाहीं व चित्तांत येणार नाहीं. त्याजवरून नानाची खातरजमा होऊन कारभार त्यांचे विच्यारें होऊं लागला.

इतुक्यात मुल्ला ताजदीचे ठाणे फिरले रघोवा पिटक्याच्या हाते खुर्दखत त्यापासून काढून घेतले व अर्ध चावराच्या व पाऊ चावराच्या मिसली ५ करुन घेतल्या याउपरि मी बापूस बोलिलो मज वडिलाचा ही इनाम देसि नाव तुज सागाते येतो तेथून ही काही देसि ना तरि आह्मी काय करावे तो बोलिला तुज ही ऐसे च येखादे ठाई करून देईन वडिलाचे इनाम तरि पडिले आहे ऐसे मज बोलोन नारायणभट्टास समाचार सागितला त्याणे ह्मटिले मी तुज सागतच होतो त्या सागाते नेव नको आता तर्‍ही शहाणेपणेर् वत्तावे यावरि मी नारायणभट्टापाशी व्याख्यानास बैशिलों उदाहरण घातलें चुकलो तोडावरि मारिले पुस्तक हिरोन घेतले मी घरात गेलो दुसरे दिवशी अमचेथे देव ते मार्गो धाडिले म्या गणेश ठेऊन वरकड दिधले त्याकरिता शिव्या देउ लागला आईने ह्मटिले उग्याच शिव्या का देतोस मग आपण सोविळा हाती देवाचा सपुष्ट घेउन आइ विटाळिशी तीवरि टाकिला तीस पाई धरून वोढून घराबाहिर टाकिले मज घराबाहेर घातले दोघे घराबाहेरि गेलो मामाचे घरी राहिलो भक्षायास नाही मग आईस मामाचेथे ठेऊन खडकीस गणेशपंतापाशी गेलो वर्षे २ राहिलो वैद्यक ह्मटिलें यावरि गावास आलों मामाचेथे राहिलो तेथे बापू येऊन समजाऊन आणिले तो हैबतखानाचा किरका झाला होता ते लोक अवघे पळोन गेले नारायणभट्ट विज्यापुरास गेला होता बापू व मी गावी असता दळपतरायाचा उपाध्या पदमणभट्ट त्याणे बापूस लिखित धाडिले जे पसरणीस माझा इनाम पाउ चावर आहे तो तुज दिधला असे पत्र नारोबाचे हाती पाठऊन देतो तो कागद घेऊन दफतरास गेला दफतरदारास दाखविला त्यामध्ये येक दोघ बोलिले जे पदमणभट्ट हरामखोराचा भट्ट त्याचा इनाम दिवाण ज्यास देईल त्याचा व तुह्मीं ही बहुत स्वार्थ करू नका पिंपरी व तळये जिरो द्या मग बापू घरास येऊन मज बोलिला पद्मणभट्टाबाबति तूं हे इनाम घे तुज आणिक नाहीं नारोवा येईल मग पत्र देईन म्या बरे ह्मटिले याउपरि नारायणभट्टे विज्यापुरास जाते वेळे रुद्राजीपत मजुमदाराची भेटि घेउन त्यास ह्मटिलें अपण्यास काहीं येथे वृत्ति नाही तरि महाराजाच्या भाग्याचा वाटा हा च जे नवे दस्त अमल घेउनु यादीदी कटकास जाताति तरि त्यात जे धकेल ते योजून लिहाल तरि तो आधार करून देसायाची अर्दास घेउनु राजश्री रखमाजीपंताची किताबति घेउन कटकास जाईन महाराजाचा यत्‍न माझे अदृष्ट याउपरि मजुमदारे पसरणीस दसत अमलात उगेच नारायणभट्ट ॥ चावर ह्मणउन लिहिले त्यावरि नारायणभट्ट विज्यापुरास गेला रखमाजीपताची किताबति घेतली तव पदमणभट्टे खुर्दखत त्यापाशी दिधले ते ही सागाते घेउन खडकीस गेला बानाजीपतीं व श्रीपतिराये याकूतखानास भेटविले बहुत सन्मान केला देसायाची अर्दास व किताबति दिधली श्रीपतिराये अर्ध चावराची परवानगी घेतली दफष्तरनास गेले तो वाईचे यारीदी रुद्राजीपंत साबणे भेटले त्यास समाचार सागीतला जे खुर्दखताची परमानगी झाली

१ शिंदे यांचे फौजेंत फितूर जाला. बाजीरावसाहेब यांजवळही लोक जमा जाले, व मानाजी फाकडेही लोक जमा करूं लागले; तेव्हां कोणे वेळेस बाजीरावसाहेब यांस काढून नेतील हा भरंवसा बाळोबा पागनीस यांस पुरेना. याकारितां बाजीराव साहेब यांचे तीन दिवस पाणी बंद करून त्यांचे बाडांत लोक होते ते काढून देऊन बाजीरावसाहेब यांस हिंदुस्थानांत पाठविण्याकारितां रवाना केलें, ते केसो गोविंद यांचे बेलापूर पावेतों गेले.

१ मानाजी फाकडे यांचे भोंवतें पलटण तोफा ठेऊन त्याचे पाणी बंद करून त्यांस काढून दिल्हे, ते वाई देशीं जाऊन फौज जमा करून राहिले. मालोजी घोरपडे व निळकंठराव परभु, अगोदर गेलेच होते. व बज्याबा शिरवळकर यांस माहाडाहून नानानीं वाई प्रांतीं पाठविलें, ते सारे एक होऊन फौज जमा केली, खर्चास देत होते.

१ भोसले यास नानानीं माघारें आणविलें. येणेंप्रमाणें नानानीं माहाडास राहून मसलत केली.

१ नानाचे राजकारण सिद्ध होऊन अश्विन वद्य १२ गुरुवार छ० २५ रबिलाखरी चिमणाजी माधवराव वाड्यांत असतां शिंदे यांणीं बाळोबा पागनीस यांस कैद करून चक्रदेव यांजबरोबर शिंदे, मशरीन मुलुख यांची फौज येऊन, परशरामभाऊ यास जाग्यावर धरावें असा नारोपंत चक्रदेव यांचा बेत होऊन, परशरामभाऊ वैद्य (यास?) नारोपंत चक्रदेब यांणीं चिट्ठी पाठविली ती जासुदानें चुकून परशरामभाऊ पटवर्धन यांस दिल्ही पाहून ते सावध होऊन अप्पासाहेब यांस बरोबर घेऊन विठ्ठलवाडीकडे गेले, तिकडून जुन्नरास गेले; वाटेस घोडनदीचे काठीं--कुळकर्णी यांचे घरीं अप्पासाहेब यास लाहीपीठ घेतलें. त्या कुळकर्ण्यास शंभर रुपयांची जमीन द्यावयाचा करार केला होता परंतु ती पावली नाहीं. नारोपंत चक्रदेव, परशरामभाऊचे मागें जुन्नरास गेले. तेथें परशरामभाऊ अप्पासाहेबसुद्धां किल्यावर जाऊन राहिला. खालीं नारोपंत चक्रदेव फौजसुद्धां गेले. तर दुसरे रोजीं चक्रदेव याणीं बाण किल्ल्यावर लाविले. ते बाण जेथें घोडी फार होती त्यांत पडल्यामुळें बहूत हावालदिल होऊन बोलणें लाऊन अप्पासाहेब यांस चक्रदेव यांचे हवालीं केलें आणि अनंतराव रास्ते यांस जामीन देऊन परशरामभाऊ त्यांचें हवाली जाले. रास्ते यांणीं त्यास भीमातिरीं मांडवगण फुराट्याचे आहे तेथें नेऊन ठेविले, अप्पासाहेब यांस चक्रदेव यांणीं पुण्यालगत भांबवड्यास आणून ठेविलें. छ. १७ जमादिलावेल कार्तिक वद्य ४ शुक्रवार, राघोपंत यांस कैद करून किल्ल्यावर ठेविले.

लेखांक ८५                                                                                                                                      १५६२ माघ शुध्द १०                                                 
 
2 1 स्वस्ति श्री शके १५६२ विक्रम संव(त्स) रे माघ शुध्द दशमीस त्र्यंबकास रंगभट चित्रावे लेहून दिधले जे पूर्वी बापू समागमे बुबाचेथे उपचारास मी जात असता ती सवतीच्या पुत्रास उपचार केला तीणे होन २ व शेल्यास होन १ पिंपरीवरि लेहून द्याव्यास तुबाजीस आज्ञा केली त्यावरि बापू बोलिला याचे वारिचे अपण्यास पुढे चाले ऐसे इनामाचा कागद दे मग ते बोलिली मज खेळखाना फार गाव लाहान तेथे इनाम देयिना बापू बोलिला तुझे गावीं वाजट भूमि आहे तूज तीचे काही येत नाही त्यातून विश्वे ३० तिसाचे खुर्दखत दे पुढे आह्मास कामा येईल तुज प्रस्तूत मागो ना मग तीणे तुबाजीस परवानगी दिधली त्यासी सूत्र पहिलेच केले होते त्याणे खुर्दखत लिहिता त्यामध्ये पाउ चावरास ४५ टके व गल्ला मण ॥। घातले ऐसे भोगवट्याचे कागद । चावराचे चारि पाच वर्षे केले पर काही प्राप्‍त होत नव्हते याउपरी खडकीस बापू ग्रामकळहसबधे गेला पाउ चावराची खुर्दखते केली गावास आला मुधोपतास दाखविली तीही ह्मटिले ही रुजू पडेतना याउपरि मुल्ला ताजद्दीचे ऐले मिसली कराव्या गेला त्याणे खुर्दखत पाहिले तो बोलिला अवघ्या इनामदाराचीं खुर्दखती बेरीज नाही यातच बेरीज कां इतक्यात पिपरीचा कुळकरणी आला होता त्यास पाचारिले तुझा दस्त काढि ह्मटिले दस्त वाचिविला तो त्यामध्ये हा इनाम वाद नाही ऐसे देखोन बोलिला ऐसे इनाम ताबगिरी करिता त्याउपरि खुर्दखत बगलेस घातले मिसली फाडून टाकिली त्यास बोलिला घरास जा बापू घरास येऊन तुझा बाप नारायणभट त्यास समाचार सागितला दोघी विचार करून मुधोपताचेथे गेले समाचार सागीतला ते बोलिले मी पूर्वी च तुह्मास बोलिलो आता तातडि करू नका याचे शीघ्र च ठाणे फिरणार आहे पर तुह्मी तीचे अर्ध्द चावराचे खुर्दखत मागा ह्मणजे पचेचाळीस टके पुढे तर्‍ही रुजू पडतील नाही तरि बेरीज तर्‍ही घालऊ नका मग घरास आलो (या) उपरि तुबाजीची भेटि घेतलि त्यास बोलिले हे वर्तमान ऐसे झाले तरि तुह्मी बुबुमाची खुर्दखते अर्ध्द चावराची ४ करून घाला तरि काळातरी कार्यास येतील तो बोलिला तीस हा अर्थ सागता नये ते कटकास जाते वेचाचे आह्मास लिगाड लाविले अवघा गाव हिडिलो भोयास द्याव्या होन २ मिळेतना मग नारायणभट्टे अपले जोडे बापूचे हाती दिधले त्याणे तुबाजीस दिधले त्याणे सराफाचेथे मोडिले होन २ घेउनु तीच्या भोयास दिधले तीस सागीतले रामेश्वरभट्टाचे होन दोनी कळातरे घेतले यास कतबा देणे व यास भोगवट्टयाचे कागद पाहिजेत ते देणे तीणे द्या ह्मणउन बोलिली त्यावरि त्याणे भोगवटे व दो होनाचा कतबा आणून दिधला याउपरि विज्यापुरून नरशिगराव पेशवे वाईस आले त्यास नारायणभट्टे हा सर्व वृत्तात सागीतला तो बोलिला हा ठाणदार अमचा जानीब नव्हे याशी आह्मास कामे बोलता नयेत मी कटकास जातो तुह्मी मज सागाते या तुह्मास ताजे खुर्दखत करून देईन नारायणभट्ट बोलिला मज येता नये व्याख्यान राहील तरि तिमाजीपत तुमचे खासनीस त्यापशि पत्र देतो तो तुह्मास स्मरण देईल महाराजे तेथून करून पाठविल्या उत्तरोत्तर पुण्यपुरुषार्थ घडेल मग तिमाजीअधीन पत्र केले कटकास जाउन महिन्या २ दोमध्ये धाडून दिधले

 

१ शिंदे यांचे फौजेंत फितूर जाला. बाजीरावसाहेब यांजवळही लोक जमा जाले, व मानाजी फाकडेही लोक जमा करूं लागले; तेव्हां कोणे वेळेस बाजीरावसाहेब यांस काढून नेतील हा भरंवसा बाळोबा पागनीस यांस पुरेना. याकारितां बाजीराव साहेब यांचे तीन दिवस पाणी बंद करून त्यांचे बाडांत लोक होते ते काढून देऊन बाजीरावसाहेब यांस हिंदुस्थानांत पाठविण्याकारितां रवाना केलें, ते केसो गोविंद यांचे बेलापूर पावेतों गेले.

१ मानाजी फाकडे यांचे भोंवतें पलटण तोफा ठेऊन त्याचे पाणी बंद करून त्यांस काढून दिल्हे, ते वाई देशीं जाऊन फौज जमा करून राहिले. मालोजी घोरपडे व निळकंठराव परभु, अगोदर गेलेच होते. व बज्याबा शिरवळकर यांस माहाडाहून नानानीं वाई प्रांतीं पाठविलें, ते सारे एक होऊन फौज जमा केली, खर्चास देत होते.

१ भोसले यास नानानीं माघारें आणविलें. येणेंप्रमाणें नानानीं माहाडास राहून मसलत केली.

१ नानाचे राजकारण सिद्ध होऊन अश्विन वद्य १२ गुरुवार छ० २५ रबिलाखरी चिमणाजी माधवराव वाड्यांत असतां शिंदे यांणीं बाळोबा पागनीस यांस कैद करून चक्रदेव यांजबरोबर शिंदे, मशरीन मुलुख यांची फौज येऊन, परशरामभाऊ यास जाग्यावर धरावें असा नारोपंत चक्रदेव यांचा बेत होऊन, परशरामभाऊ वैद्य (यास?) नारोपंत चक्रदेब यांणीं चिट्ठी पाठविली ती जासुदानें चुकून परशरामभाऊ पटवर्धन यांस दिल्ही पाहून ते सावध होऊन अप्पासाहेब यांस बरोबर घेऊन विठ्ठलवाडीकडे गेले, तिकडून जुन्नरास गेले; वाटेस घोडनदीचे काठीं--कुळकर्णी यांचे घरीं अप्पासाहेब यास लाहीपीठ घेतलें. त्या कुळकर्ण्यास शंभर रुपयांची जमीन द्यावयाचा करार केला होता परंतु ती पावली नाहीं. नारोपंत चक्रदेव, परशरामभाऊचे मागें जुन्नरास गेले. तेथें परशरामभाऊ अप्पासाहेबसुद्धां किल्यावर जाऊन राहिला. खालीं नारोपंत चक्रदेव फौजसुद्धां गेले. तर दुसरे रोजीं चक्रदेव याणीं बाण किल्ल्यावर लाविले. ते बाण जेथें घोडी फार होती त्यांत पडल्यामुळें बहूत हावालदिल होऊन बोलणें लाऊन अप्पासाहेब यांस चक्रदेव यांचे हवालीं केलें आणि अनंतराव रास्ते यांस जामीन देऊन परशरामभाऊ त्यांचें हवाली जाले. रास्ते यांणीं त्यास भीमातिरीं मांडवगण फुराट्याचे आहे तेथें नेऊन ठेविले, अप्पासाहेब यांस चक्रदेव यांणीं पुण्यालगत भांबवड्यास आणून ठेविलें. छ. १७ जमादिलावेल कार्तिक वद्य ४ शुक्रवार, राघोपंत यांस कैद करून किल्ल्यावर ठेविले.