Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
१ श्रीमंतांचे वाड्याभोंवते पलटचे लोक होते ते उठोन गेले.छ. १ रमजान सरकारचे लोक आबा काळे यांचे निजबतीचे पलटणचे चौकी पहा-यास बसविले.
२ दौलतराव शिंद याणीं सखाराम घाडगे सरजेराव यांचे कन्येशीं लग्न केलें नांव बायजाबाई ठेविलें. समारंभ मोठा झाला फाल्गुनमास. व बाळाबाई चितोळे यांची कन्या यशवंतरावदाभाडे सेनापति यास दिली. लग्न मार्गशीर्षमाशी झालें. ।
३ नानाचे निसबतीची मंडळी वाड्यांत कैदेंत होतीं त्यापैकीं त्रिंबकराव परचुरे याणीं बाळोजी कुंजर याचे विद्यमानें आपले जवळचें सारें द्रव्य सरकारांत समजाऊन त्यापैकीं तीन लक्ष रुपये शिंद्याकडे रोकड होते ते दिले; आणि श्रीमंताचा निरोप घेऊन फाल्गुन व॥ ६ गुरुवारीं छ. १९ मनाजी काशीयात्रेस गेले. खामगावचे अन्नछत्र त्याचे होते त्याची नेमणूक चालवावी व कल्याणपैकीं त्याचे हुजूरचे दप्तरचे आसामी बाबचे दोन हजार रुपये दरसाल त्रिंबकराव जिवंत आहे तो काशीस पाठवावें. याचा करार श्रीमंतांनीं करून सनदा दिल्या. नानास कैद केल्यावर अमृतरावसाहेब याणीं कारभार करावा असें त्याचें मनांत होतें. परंतु दौलतराव शिंदे याचें लक्ष बाजीरावसाहेब यांजकडे व बाजीरावसाहेब यांचें मनांत रावसाहेब याणीं मुखत्यारी करावी असें नव्हते. याजमुळें रावसाहेब यांचें मनांत वांकडेपणा येऊन जुन्नराजवळ गणपतिचें दर्शनास जावयाचे निमित्तानें बाहेर डे-यास फाल्गुन शुद्ध ११ छ. १९ रमजानी जाऊन राहिले.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
१ श्रीमत महाराज छत्रपति.
२ करवीरकर महाराज ३ सेनासाहेब व सुभा. ४ गोविंदराव गाईकवाड ५ टिपू. ६ मालीट इंग्रज मुंबईकर. ७ फिरंगी गोंवेकर,८ जंजीरेकर हापशी.
-----
८
सदरहुप्रमाणें यादीची नकल महिपतराव चिटणीस याजवळ आहे, त्याजवरून लिहिलें असे. नाना कांहीं दिवस शिंद्याचे लष्करांत होते. तेथून नगरचे किल्ल्यांत पाठविले.
१ नाना, शिंदे यांचे लष्करांत गेल्यावर श्रीमंतानीं बाबा फडके, आप्पा बळवंत नारोपंत चक्रदेव, गोविंदराव पिंगळे व नारो निळकंठ मुजुमदार, त्रिंबकराव परचुरे, नारायणराव वैद्य चिटणीस. वगैरे सारे मंडळीस वाड्यांत बोलावून कैद केलें.
२ कारभार, रावसाहेब यास घेऊन बाजीरावसाहेब जातीनें आपणच करूं लागले. तारिख आपणच घालों लागले. फौजेचें काम बाळाजीपंत पटवर्धन यांजकडे सांगितलें. अमृतरावसाहेब यांचे लक्षानें कारभारांत गोविंदराव काळे व शिवराम नारायण थत्ते वागों लागले.
३ परशराम रामचंद्र यांचे सरंजामाची जप्ती मोरो बापुजी यांजकडे सांगितली छ १७ रजब.
४ कोंकणचा सरसुभा विनायकराव अमृतेश्वर याचे नांवे करून वस्त्रें दिली छ १० साबान, सरसुभ्याचें काम अमृतरावसाहेब याणीं गणपतराव जीवाजी जोग यांजकडे सांगितलें.
५ करवीर महाराज फौजसुद्धां तासगांवास उपद्रव करून कर्नाटकांत जाऊन पेशवे यांचे मुलखांत ठाणें घेतली लुटले. व वल्लभगड किल्ला घेतला. बेळगांवास उपद्रव केला. त्यांजविशी मुरारजी पवार याजबराबर बाजीरावसाहेब याणीं पत्रें करवीर महाराज व रघुनाधराव माने यास पाठविली; त्यांत मजकूर ठाणीं सोडून घ्यावीं व ऐवज घेतला असेल ते माघारा प्यावा व मुलखास उपद्रव करूं नये ह्मणोन छ. १२ साबान सनसमानिची पत्रें गेलीं त्याचीं उत्तरें महाराजांची व माने यांची आली. त्यांत वल्लभगड हवाली करून घ्यावयास कोणी पाठवावा. ह्मणजे त्याचे हवाली करून मुलखास उपद्रव होणार नाहीं ह्मणोन आली. त्याच्या नकला महिपतराव चिटणीस यांजवळ आहेत व करवीकर यांची फौज टिपुसुलतान याचे मुलखांत जाऊन मेल बिदनुर तालुका लुटुन व वरकड तालुक्यांत उपद्रव केला येविषयीं त्यास ताकीद होऊन लूट केली आहे ती ठाणे देऊन पुढें उपद्रव न करीत असें व्हावें ह्मणोन टिपुसुलतान याचें पत्र आलें. त्याचा जाब कोल्हापूरकरांचे सरदारास निक्षून ताकीद रवाना केली. असे ह्मणोन छ, २७ सफर सन तिसांत गेला आहे त्याची नकल महिपतराव चिटणीस यांजवळ आहे त्यांजवरून नानाफडणवीस कैद झाल्यावर छ १२ साबनचे पत्र गाईकवाड यांस गेले. त्यांत दुसरा अमलदार अमदाबादेस रवाना होत आहे. तोंपावेंतों आबाजी कृष्ण यांजकडील कारकून, यांस वसूल घेऊन द्यावा ह्मणोन सदरहूची नकल चिटणीस यांजवळ आहे. त्यांजवरून.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
१४ कुलाब्याचे संस्थान रघोजी अंग्रे याचे तिर्थरुप येसाजी अंग्रे रेवदड्यांस राहात होते. त्याचा दावा संस्थानावर नसतां बाबूराव आंग्रे, दवलतराव शिंदे याचे मामा त्या आग त्यानें श्रीमंताची परवानगी घेऊन, येशवंतरावाकडे हरीपंत भावे याजवर बराबर पलटण देऊन कुलाब्याचा किल्ला शिंदे याणी घेऊन बाबुराव आंग्रे यास दिला. राघोजी आंग्रे याचे हवाली केलें. त्याणी कैदेंत ठेविलें. नंतर दस-याचे दिवशीं श्रीमंतानीं संस्थानची वस्त्रें बाबुराव आंग्रे यांस देऊन वसई सरखले किताब दिल्हा.
१५ परगणे होनगुंद माहाल तोफखाना याकडे सरंजामास होता. तें ठाणें घ्यावयाकरितां रायचुराहून मुदगलकर याणीं तोफा व फौज आणविली. सबब धोंडोपंत गोखले फौज बाळगून कर्नाटकांत होते, त्यास होनगुंदचे कमाविसदारानीं कुमकेस बोलाविलें. त्यावरून गोखले याणी फौजसुद्धां जाऊन मुगदलकरासी लढाई दिली. तोफा पाडाव करून आणिल्या. त्यावरून गोखले यास सर्फ राजीचें पत्र रजबचें पत्र गेलें. त्याची नकल चिटणीसाजवळ आहे त्यावरून बाजीरावसाहेब यांची मिजाज कायम नाहीं. पहिल्यानें शिंदे याशी राजकारण केलें नंतर पुण्यांत नानाची भेट होतांच त्यास मिळोन शिंद्याशीं बिघडलें. पुढें नाना कारभार करीत असतां त्याजविषयीं अनेक प्रकारें वाकडेपणा मनांत आणू लागले. त्यास अनुमोदन अमृतरावसाहेबाचे पडत गेले. व सर्जेराव घाटगे साह्य मसलतीस झाले. तेव्हां नानास शिंदे याणी कैद करावें असें केलें. त्या राजकारणांत नानाचे भरंवशाचे यशवंतराव घोरपडे मिळाले. त्यानीं शिंद्याविषयीं नानाची खातरजमा केली. शिंदे नानाचे घरीं आले. मेजवान्या देऊन . सफाई दाखविली. तत्राप नानास भरंवसा न येई. तेव्हां मुकरेसाहेब . याजकडून शिंदे याणीं इनाम देऊन लष्करांत मेजवानीस यावें असें ठरविलें. पौष वद्य १३ राविवारीं छ, १२ रजबा शिंदे यांचे लष्करांत वानवडीवर . मेजमेजवानीकरतां गेले. तोंपावेतों नानास धरावयाचे शिंदे याणी मुलारेसाहेब यास कळों दिलें नव्हतें. नाना लष्करांत दाखल जाहल्यावर कळविलें. त्यावरून त्याचें बोलणें पडलें कीं, ही गोष्ट होणार नाहीं. तेव्हां दवलता शिंदे याणीं मरासद अल्ली वैद्य याजपासून त्याशीं बोलोन रुकार घेतला. मुलारेसाहेब लाचार होऊन रुकार दिला. नंतर नानास व त्यांबरोबरचे मंडळीस कैद केलें. शिबंदिचे लोक काढून दिले व कांहीं पळून आले. नानाचे वाडे व सरंजाम वगैरे श्रीमंतानीं जप्त केले. सरंजामाच्या जप्तीच्या सनदा मुजुमदार यांचे घरीं बार आहेत; व बाळाजी जनार्दन याचे निष्टत अंतर दिसले. सरकार लक्षाची वर्तणूक नाहीं. याजकरितां दौलतराव शिंदे आलीजा बहादर यास आज्ञा करून मशारनिल्हे नजरबंद केलें. तुह्मास कळावें, आपले स्नेहाचे सिलसिले सरकाराशी पूर्वीपासोन आहे त्याप्रमाणें असावें ह्मणोन पत्र छ, १२ रजवान बाजीरावसाहेबांनीं पाठविली. ती तपशील.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
त्याजवर नानाचा करार करून दिली. त्याजवर नानाचा करार नव्हता. याजकरता रघोत्तमराम यास नानाची चिट्ठी लिहिली. त्यांत लिहिलें आहे आहे कीं जे समयीं तुह्मीं याद आणाल तेव्हां करार करून देऊं; ती याद सही व मान्य असें. यादीवर आमचे हातचा करार नाहीं ह्मणोन दवला बहादर संशय घेतील, यास्तव हें करारचें पत्र लिहिल्याप्रमाणें आमलांत येईल ह्मणोन छ. १७ राविलाखरचें पत्र त्याची नक्कल राबीसन साहेब यांजवळचे कागदांत आहे. चवदा कलमाचा तपशील लागला नाहीं. व नाना पुण्यास आल्यावर मशिरीन मुलुख याजपासून पाच कलमाची याद करून घेतली आहे त्याचाही तपशील सांपडला नाहीं.
१२ तुकोजी होळकर याचा काळ श्रावण वद्य ८ मंगळवारीं झाला. क्रिया काशीराव होळकर याणी केली. छ. २१ सफर पुढें काशीराव व मल्हारराव यांचे बनेना, मल्हारराव आपली फौज थोडीशी घेऊन दाभाडे यांजवळ राहिले त्याजकडे आंतून नानाचें लक्ष. याजकरतां काशीराव होळकर याणीं दौलतराव शिंदे यांस ऐवज रोख व मुत्सद्दी यास दरबार खर्च व इनाम गांव द्यावयाचे कबूल करून मल्हारराव यास धरावयाचे ठरविलें. त्यांजवरून शिंदे याणी धरावयास फौज पाठविलीं, परंतु मल्हारराव याणी शिपायगिरी केली. जमेत थोडी यांजमुळें मारले गेले भाद्रपद व।। ९ छ, २२ रबि । लावक. त्याजवळ लाख रुपये बोली करून एक शिपाई चाकरीस होता तो ठार पडला. आणखी लोक मारले गेले. लोणीकर होते ते ठार पडले. त्याची बायको शितोळे याची लेक लोणीस हेती, तिला वर्तमान समजतांच तिणें प्राण सोडला. यशवंतराव होळकर पळोन गेले. मल्हारराव याची बायको जिजिबाई गरोदर होती. त्यास घेऊन मल्हार शामजी कारभारी पुण्यांत येऊन कुमठे यांचे वाड्यांत राहिले. जिजाबाई प्रसूत होऊन पुत्र झाला. त्याचे नांव खंडेराव होळकर ठेविलें.
१३ गणपतीचा उत्साह वाड्यांत झाला. गणपति पोंचवावयास श्रीमंत पायउतारा गेले यामागें अंबारीत बसून जात होते.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
६ चिमणाजीअप्पाचें पहिलें लग्न छ. १८ जिलकाद वैशाख वद्य ५ मंगळवारीं झालें. मोरोपंत दामले यांची कन्या नांव सिताबाई ठेविलें.
७ रघोजी भोसले सेनासाहेबसुभा आषाढ वद्य ४ गुरुवारीं १८ मोहरमीं नागपूरास जावयाकरतां निरोप दिला. सबब गढेमडळ चोरोगडसुद्धा त्यास घ्यावयाचे नानानीं ठरविलें. त्याच्या सनदा पेस्तर स. २७ जिल्हे दिल्या असेत.
८ श्रीधर लक्ष्मण मुनशी व कृष्णराव माधव व रामचंद्रदादा निसबत रघोजी भोसले यास परगाणे जळगांव प्रांत व-हाडेपैकीं देहे ८ इनाम दिले स. १७ सफर.
९ बाळाजीपंत पटवर्धन व भिवजी काळे यांस पागा दिल्या.
१० पर्वतीची दक्षणा चार खासे बसून वाटावयास प्रारंभ केला.
११ मशिरीन मुलुख यास हैदराबादेस जावयास निरोप श्रीमंताचा घेतल्याशिवाय गेले. खरड्याचे स्वारीस नबाबाचे सरकारचा मुलुख घेतला होता तो नानानी बाजीरावसाहेब यांजकडून माघारा देविला. रुसकतीवांचून देऊं लागले. त्याचे मनांत वाकडेपणा नसावा. दोस्ती साफ चालावी, ह्मणोन सदाशिव माणकेश्वर यास पत्र श्रीमंताचे गेलें त्यांत लिहिलें आहे. मशिरीन मुलुख हैदराबादेस गेल्यावर नुरुदी हुसनखान ऊर्फ बोडखान याचे बंधु नबाब निजामजंग याखे निसबतीस वीस हजार फौज व परांडानल दुर्ग किल्ले त्याचे हवालीं झाले. सलाबतखान व सुभानखान वगैरे फौज निजाम जंग याचे तेनातेस आली. निमामजंग याजवळ नानानीं आपले तर्फे जनार्दन शिवाजी मस्कर व त्रिंबकराव साठे यांस ठेविलें. फौजेची छावणी पंढरपुराचे आसपास सरहोदवर भीमा पार होतीं. पुढें नाना फडणवीस मृत्यु पावल्यावर मस्कर यांस निजामजंग याणीं कैद केंलें. पुढें निजामजंग यास हैदराबादेस बोलावून घेऊन किल्याची घालमेल केली, व फौज त्याची दूर झाली. महाडास नाना असतां गोविंदराव भागवत याचे विद्यमानें चवदा कलमांची याद नबाब यास मखलाशीची करार करून दिली.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
१७१९, पिंगलनाम संवत्सरे, सुरुसन, समान तीसैन मया तैन व अलफ, सन १२६०, संवत १८५४, राजशक, १२४ इसवी १७९७ व १७९८.
१ नाना फडणीस घराहून कारभार करीत, त्रिंबक नारायण परचुरे यांजकडे तारिख घालावयाचें काम, नारोपंत चक्रदेव नानाचे व श्रीमंताचे मध्यें जाण्यायेण्यास होतें, व फौजेचें काम त्यांजकडे होतें.
२ आमदाबादचा सुभा चिमाजीआप्पा याचें नांवें करून केशव कृष्ण यांजकडे मामलतीचें काम सांगितलें होतें. तें दूर करून आबाजी कृष्ण शेलूरकर यांजकडे सांगितलें छ. १९ सवाल,
३ दादा गद्रे याणीं सदाशिव पेठेंत देवालय मुरलीधराचें बांधले त्याची आर्चा वैशाख शुद्ध १० शनवार छ. ८ जिल्कादी केली ते दिवशी मेस्तर बेट यांचे पलटणचे लोकांची व अर्बाची कटकट त्या देवळाजवळ होऊन शेंपन्नास मनुष्यें ठार पडलें. नंतर मुसोमोन्नम व शाहामीरखान दरम्यान पडून कज्जा तोडला. कज्जाचें कारण विशेष नव्हतें. देवाजवळ आरब राहात होते, तिकडून मेस्तर बैण्याचे लोक जाऊं लागले. त्यांस आरबानें मना केलें, तें त्यांनीं ऐकलें नाहीं. त्याजवरून लढाई सुरू झाली.
४ नगरचा किल्ला व दाहा लक्षांची जहागीर शिंदे यास देऊं करून करार नानानीं केल्याप्रमाणें त्यास दिली. मोरो बाबुराव फडणीस त्या किल्ल्यांत आटकेस होते, त्यास तेथून काढून त्रिंबकास ठेविलें.
५ चिमाजीअप्पा याचे दत्तविधान फिरवून चिमणाजी माधवराव होते ते चिमणाजी रघुनाथ केले. महादेव दिक्षित आपटे व यज्ञेश्वरशास्त्री द्रवीड याणीं दत्तक करावयास शास्त्रार्थ सागितला. त्यांजवर बाजीरावसाहेब यांची बेमर्जी होऊन दरबार मना केला.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
२ शिंदे याचे पलटणांत फराशीस बहुत आहेत. टिपूशीं मसलत याकरतां हा आंदेशा आहे. हिंदुस्थान दूर असतें तर चिंता नव्हती. नबाबाचे सरकारांत फराशीस होते, त्याची जेमत नबाबानी आपले आकत्यारांत आणून त्यास काढून दिलें तेंही आपला निभाव न लागे याजकरतां कंपनीचे सरकाराशीं सफाईकरून त्याचे फौजेंत राहिले. यावें उत्तर नानाचें आलें कीं शिंदे याचे खानगीचे तरतुदींत आहों.
३ कर्णेल बोललें कीं टिपूकडे श्रीमंताची पत्रें जाण्याचा शशीक भारी आहे. असें कलम त्यांतून व चिमपटणाहून बातमी आली. बहुशा वकील गेला असेल यावरून संशम आमचे मनांत आहे. नानानीं उत्तर केलें कीं श्रीमंतास विचारून सांगूं.
-----
३
१ जनरल कलकत्तेकर याचे पत्र पेशवेसरकारांत छ. २२ जमादीला आलें त्यांत मजकूर. आमचें पत्राचें जाबांत मजकूर हा कीं टिपूसुलतान याशीं तिन्ही शीरक सरकारांतून करार आले. त्यांत खुलष नसतां सुलतान मवसुफाकडून हारकत नाहीं. रात आली ताजुक आहे. रयतेची आबादी व मुलखाची नीगा हावजी मजूर खातर असे. सुलतान महसुब यास पत्र लिहिण्याची तदबीद व हारीफाचे गैरेचालीस हुशारी व निगाहाबजी मुनसब टिपूसुलतान याणीं करारांत खलष आणिल्यास तिनी सरकारांत द्यावें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
४ बडे खानाची चिठ्ठी गोपाळराव भगवंत याचे नावें आली. त्यांत मजकूर कर्णेल साहेब बदादूर याणी सांगितले आहे कीं दौलतराव शिंदे याजकडील पेंढारी नबाब असफजहा बहादुर याचे तालुक्यांत हंगामाकरतां व शिंदे याचे कारभारी याचा इरादा ऐकण्यांत येतो कीं नबाबचे तालुक्यांत खटला रहावा, नबाब सर्व प्रकार कंपनी सरकारचे सर कतीविषयीं सामील व सराफ आहेत. त्यापक्षीं नबाब साहेबाचे मुलुख व महालाचे संरक्षण कंपनी बहादुरचे सरकारास लाजीम आहे. त्याचा इतजा काशी मल्हार याचे विद्यमानें दौलतराव शिंदे यास लोक श्रीमंताचे खिजमतीस तवमदारूनमहा सैतक करावी ह्मणोन चिट्टी छ. ६ जिलहेज सन तिसा ती सैनात-आली तिची नक्कल राबीसन यांचे कागदांत आहे. त्यावरून.
१ टिपू सुलतानावर पलटणीची स्वारी कंपनी सरकार नबाब पेशवे या तिन्ही सरकारानी सरकतीनें केली. तेव्हां तहनामा त्यावर टिपू सुलतान मारेसबंदरचे फराशिसासी माराकत व रिफाकतीचे कौल करार करून त्याची नेमत कुमकेस आणिले व इंग्रजाचे सरकाराशी लढाईचा इरादा ठेवून फौजेची तयारी केली. त्याजवरून तिनीशरीक सरकारांतून मसलत करावयाची तदबीर केली. त्याप्रकरणीं वकीलाचे जबाबास सवाल आले व जनराळाची व नबाबाची पत्रें आली. त्याच्या नकला व तरजुमे वगैरे राबीसन साहेब याजवळचे कागदांत निघाले. त्यावरून मसलत प्रकरणीं मजकूर साराश लिहिला आहे.
१ कर्णेल प्रालकर यानी छ. १८ जमादी केवल सन तीसतिसैन । आश्विन व॥ ५ मीस नाना फडणीस याजकडे येऊन सवाल केले व त्याचे जबाब आले. तीं कलमें येणेंप्रमाणे—
१ टिपूचे मसलत प्रकरणी तीन महिने श्रीमंताशीं बोलत आहों. आपल्यास इनाम असेल, आपले सरकारांत घरचे मझ्याकमुले याचा विचार कांहीं दिसत नाहीं. फरासीस टिपू यास सामील आल्यावर मसलत जड पडल्याची तदबीर व्हावी. त्याचे उत्तर नानानी केलें कीं, हे पहिलें करारांतच आहे. परंतु तिन्ही सरकारची पत्रें टिपूस पाठवावयाचे ठरलें होतें त्याचें काय झालें ? टिपूकडील उत्तर येते ह्यणजे पुढील अर्थ समजतां त्याजवर कर्णेल बोलले हें कलम त्यांतून जाब आला नाहीं. जनराकचे ख्यालांत असे असेल कीं, अगोदर तयारी करून मग पाठवावें. उत्तर समर्पक न आल्यास विचार करणें तो करावा. उत्तर आल्यावर मग तयारी करण्यास लागावें. तें ठीक नाहीं. असें कियासा वरून दिसतें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
शके १७२१ सिद्धार्थी नाम संवत्सरे, सुरु सन मया तैन व अलफ सन १२०९ संवत १८५६, राजशक १२६ इसवी सन १७९९ व १८००.
१ चैत्र व॥ २ रविवारीं शंकरराव रघुनाथ सचीव भोरास मृत्यु पावले. मरतेसमंई दत्तक पुत्र घेतले त्याचें नांव चिमणाजी शंकर ठेविलें. येविषयीं शंकरराव रघुनाथ सचीव यांचें पत्र नानास आलें आहे त्याजवरून. छ. १५ जिल्काद.
२ दौलतराव शिंदे यांनीं बायाचा समेट व्हावा याकरतां बाळोबा पागनीस व धोंडोबा व बनी मोदी नगरांत कैदेंत होते त्यांस नगराहून सोडून आणिलें ते चैत्र वद्य ३ सोमवारीं छ. १६ जिल्कादी वानवडी वाड्यांत येऊन भेटले. त्यास वस्त्रें जवाहीर दिलें. आणि कारभारांत घातलें. नंतर बाळोबातात्या व बाबुराव आंग्रे व आबा चिटणीस त्रिवर्ग मिळून बायाचा समेट करविला. बाया जेजूरी आलीकडे रोज बुधवार भाद्रपद व॥ ७ मीस येऊन राहिल्या. बाळोबा वगैरे वानवडीस आले. नंतर बायानीं सांगोन पाठविलें कीं, आमचे जवाहीराचे सजोग आहेत ते आह्माकडे या मुक्कामीं पाठवावें ह्मणजे आह्मी लष्करांत येऊं. त्यांजवरून बाळोबा तात्यानीं शिंदे यास सांगून बायाचे सजोग बायाकडे पाठविलें. ते घेऊन बाया कूच करून वानवडीस न येतां पैठणबाब गांवचे सुमारें गेल्या. तेव्हां शिंदे यानीं बाळोबा तात्यास विचारलें, त्यांनीं सांगितलें कीं गेल्या तरी चिंता नाहीं. असें बोलोन नारायणराव बक्षी यांस बायाचे लष्करांतून बोलावून आणिलें व फौजही फोडून आणिली. बाबूराव आंग्रे यांची रवानगी कुलाब्यास करून सारा कारभार पागनीस करू लागले, बाया गंगेकडे गेल्या,
३ अप्पा बळवंत चैत्र व॥ ३० छ. २८ जिल्कादी पुणें येथें मृत्यु पावले. मरणसमयीं दत्तक पुत्र घेतला. त्याचें नांव बळवंत कृष्ण ठेविलें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ ११८ ] श्रीबालकृष्ण. १७३०.
राजश्री भगवंतराव पंडित अमात्य हुकमतपन्हा यासीः-
प्रति सौभाग्यादि संपन्न बाईसाहेब उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लेखन करणें. विशेष. शिवाजी मल्हार याजसमागमें विनंतिपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन लेखनाभिप्राय अक्षरशा अवगत जाहला. दर्शनास यावयाचा मजकूर लेख केला. ऐशास येविशीं राजश्री स्वामीस विनंति करून पेस्तर आज्ञापत्र सादर केलें जाईल तुमचें सर्वप्रकारें साहेबास आवश्यक आहे. तुह्मास वस्त्रें पाठविलीं आहेत. त्यांची यादी अलाहिदा आहे, तेणेंप्रमाणें घेऊन उत्तर पाठवावें. तुह्मीं जिनस पाठविला तो प्रविष्ट जाहला , व मागाहून मोहे नारळ सुमार ७ सात पाठविले तेही प्रविष्ट जाहले . जाणिजे छ ९ रमजान. बहुत काय लिहिणें. लेखनसीमा.
रजु सही.