[ १११ ] श्री. २८-१०-१७३२.
राजश्री भगवंतराव पंडित अमात्य हुकुमतपन्हा गोसावी यांसीः -
सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य
स्ने।। फत्तेसिग भोसले दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लेखन केलें पाहिजे विशेष पत्र पाठविलें प्रविष्ट होऊन लेखनार्थ अवगत झाला व कितेक वर्तमान रा गोविंद व्यंकटाद्रि यांनीं निवेदन केलेवरून कळले. ऐसियास राजश्री स्वामीनी तीर्थरुप राजश्री काकासाहेबांस आणावयास राजश्री नारबा यास व राजश्री प्रतिनिधीस रवाना केलें आहे ते लौकरीच दर्शनास येतील आणि आपल्याकडेही राजश्री भवानीशंकर यांस पाठविलें आहे. आपण आलियावरी त्यांचें व तुमचें सौरस्य आपल्या मनोदयानुरुप करून द्यावें. कदाचित् मनोदयानुरूप गोष्टी घडो न ये तरी आपल्या स्थलास आपल्यास आज्ञा देऊन पाठवावें, ऐसा निश्चय करून आपल्यास पत्र लिहिलें आहे. तरी राजश्री स्वामीच्या पत्राचा अर्थ मनांत आणून आपण अविलंबे दर्शनास आलें पाहिजे. दर्शनानंतर ज्या गोष्टी आपले चित्तीं आहेत त्या होऊन येतील. तरी कोणेविशीं चित्तांत सदेह न आणितां अविलंबें दर्शनास आले पाहिजे. रवाना छ १९ जावेल. बहुत काय लिहिणें. लोभ असो दीजे. हे विनंती.
लेखनावधिमुद्रा.
˜ °
श्रीशिवशंभुस्वामिनि
शाहूभूपेशपार्थिवोत्तंसे ।।
परिणतचेतोवृत्ते: कत्तेसिंग-
हस्य मुद्रेयम् ।।