Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
चैत्र शु. १ शनिवार शके १७१७.
विनती विज्ञापना. दौलांनी बोलण्यात आणिले की 'हे दिवस होळीचे आहेत. आपण मंडळी सुधा येथे येऊन नाच रागरंग पाहावा' याप्न फार आग्रह केला. यावरुन छ १६ घाबानी दौलांकडे रात्री गेलो. दौलांनी आपले हवेलीपुढे पेक चबुत्रा हजार माणसे बसावया जोगा विस्तीर्ण केला आहे. छ मारी नवाब दौलाकडे येणार म्हणोन दोलांनी राज्याजीचे जाग्यावर फर्ब अलाहिदा करउन नाच रागरंग तेथे आम्हांस बसावयाची जागा केली. इतक्यांत नवाबांनी दौलांकडे सांगुन पाठविलें की 'आज आमचे येणे होत नाही. तुमचा समारंभ होऊ द्यावा.' त्यावरुन राज्याजीकडील जागा तयार केली होती ते राहिले. दौलाचे चबुत्रावरच नाच सुरु जाला. राज्याजी - दिकरुन सर्व मंडळी व दौला होते, अबीर कुमकुम्याचे खाने आणोन पुढे ठेविले, त्याची मार जाली. दोनप्रहर पर्यंत नाच रागरंग जाला. रा छ २९ षाबान हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
चैत्र शु. १ शनिवार शके १७१७.
विनंती विज्ञापना. मंगळवार पेटेंत नवाब दाखल जाल्यानंतर तमाम कारखानेज्यात चराईस जाण्याचा हुकुम जाला. त्यावरुन फिलखान, पुतरखाना व बैल, रथ, गड्या, छकड्याचे व जिनसीकडील येथुन पंधरा वीस कोस कौकस प्रांतीं व कुहीर वगैरेकडे रवाना जालें. राा छ २९ बाबान हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
चैत्र शु. १ शनिवार शके १७१५.
विनंती विज्ञापना. आदवनी रायचूर येथील मोजदाद करण्याकरिता येथुन यांनी मुस्तकीम जंग व मिर्धे सवाउक यांस रवाना केले ते जाउन भाजदादीचा फर्द पेशजी नवाबाकडेस पाठविली. परंतु रायचुरांत मोहबत जंगा. कडील सिबंदी स्वार बारगीर गाडद व प्यादे यांनी तलबचे यैवजाकरितां हंगामा केला. किल्याचे दरवाजे बंद केले. हे वर्तमान मुस्तकीमजंगांनी लिहिले. त्यावरुन असद अलीखान यांची रवानगी फौज जामयत सुद्धा रायचुराकडे केली. खान मार येक दोन मजल गेले. इतकियांत मुस्तकीम जंगाचा अर्जी नवाबांस आली की * रायचुरांतील सिबंदीचा गवगवा होता तो सफा जाला. तोड पडली, खजीना जवाहीर सुद्धां वगैरे सरंजाम घेऊन मी निघोन लौकरच हाजुर पहचतों या प्रो अर्जी आल्यावरुन असदअलीखानास यांनी पत्रे पाठऊन मावारे आणविलें. खान मार छ २३ रोजी बेदरास आले. मुस्तकीम जंग माहबतजंगाकडील अनवरादौला बहादीवान कारभारी या समागमें बेऊन छ २७ रोजी बेदरास आले. घोडौं व टें व यैवज जवाहिर कापड व सिलेखाना वगैरे तरंजाम आला. बतास हाथी रायचुरचे व येथुन नवाबांकडून बावीस हाथी भारबारदारीस गेले. कुण चौपन हाथी व सरंजाम सेने, रुपें, नगद पैवज जवाहीर मरुन आले र॥ छ २९ षाबान हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १५३ १५९८ मार्गशीर्ष वद्य १
राजश्री आमाजी कान्हो हवालदार व कारकून सा। हवेली गो गोसावी यासि
अखंडितलक्षोमीअलंकृत राजमान्य
सेवक एसाजी मल्हारी सुभेदार व कारकून पा। वाई नमस्कार सु॥सन सबा सबैन अलफ बा। पत्र राजश्री सरसुभेदार माहालानिहाय तेथे आज्ञा की वेदमूर्ती नरसींभट बिन रंगभट जुनारदार सो। का। मा। हुजूर येउनु मालूम केले जे आपणास इनाम जमीन चावर ॥ दर सवाद मौजे पसर्णी सा। हवेली पा। मा। सालाबाद चालिले आहे तरी साहेबी दुमाले केले पाहिजे ह्मणउनु तरी त्याचा इनाम सदरहू गावी आहे त्यास सालगु॥ प्रमाणे बा। भोगवटा मनास आणउनु दुमाले करणे तालीक लेहून घेउनु असल परतून दीजे ह्मणउनु आज्ञ आज्ञेप्रमाणे दुमाले केले आहे दुमाले कीजे छ १४ सौवाल तालीक लेहून घेउनु असल परतून दीजे मोर्तब सूद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
चैत्र शु. १ शनिशर शके १७१७.
विनती विज्ञापना, गजीद्रगड तालुकियापैकी घोरपडे यांचे तशफात तालुका आहे त्यास श्रीमंताचे सरकारची व राजश्री परशरामपंतभाऊ यांचं पर्ने पेशजी दिल्हीं असतां इकडील तालुका बागुवस्त करीतात. याजकरितां अहासनखान यांस जभियत सुद्धां रवाना केले. याची इतला लिहिण्याविषई तुह्मांस सांगितल्याप्रमाणे तुम्ही लिहिले असेल. यास फार दिवस जाले. अद्याप श्रीमंतांकडुन जवाब आला नाही. हल्ली पापंगापंत अमील तो गनींद्रगड यांचे पत्र आले की पेशजी तालुक्याचे बंदोबस्तीकरितां पुणियास राय, राव ह्मणोन कारकुन पाठविला होता. दोन तीन महिने तेथे राहुन श्रीमंताचे सरकारची ताकीदपत्रे गडकरी यांस आणिलीं तीं दिल्ही असतां ठाण देण्यास दिकत. त्यावरुन सांप्रत नलिवंगल येथील किल्यास अलीहासनखान यांनी मोर्चे दिल्हे आहेत. याप्रो लिहिले आहे म्हणेन दौलाचे बोलण्यांत आले. रा छ २९ घाबीन विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
चैत्र शु. १ शनिवार शके १७१७.
विनंती विज्ञापना. दौलाचे बोलण्यांत आलें कीं सिकंदरज्याहाबाहादुर साहेवजादे यांचे षादीकरितां श्रीमंतांनी येण्याविषई हजरतीनी पत्रे पेशजी रवाना केली. त्यास फार दिवस जाले; अद्याप त्यांचे जबाब आले नाहीत. नवाबाची इंतजारी हजरत करितात. श्रीमंतांस तुम्हीं विनंती लेहुन षादीचे मुकदम्याच्या पत्राचे जबाब बसबब लौकर येत ऐसे टप्यावर लौकर लिहावें, ह्मणेन बोलण्यात आले. त्यावरुन विनंती की बेविषई. आज्ञा येईल त्याप्रों यांसी बोलण्यात येईल. उत्तराषिषंई आज्ञा सत्वर जाली पाहिजे, रा छ २९ पाबान हे विज्ञापना,
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १५८ ] श्री. श्रीविठोबा.
रघुवीर. ५ एप्रिल १७३८.
राजश्री भगवंतराऊ रामचद्र, भारद्वाज गोत्र, आश्वलायन शाखा, गोसावी यांसीः --सकलगुणालंकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री नागसावंत भोंसले सरदेसाई पा। कुडाळ व माहालानिहाय दंडवत विनंति उपरि, शालिवाहन शके १६६० कालयुक्त नाम संवत्सरे चैत्र बहुल त्रयोदशी सौम्यवासर सु।। समान सलासीन मया अलफ, दिल्हें वतनपत्र ऐसाजे आपली व आमची किल्ले गगनगडच्या मुकामीं भेट समारंभें करून जाहाली. ऐशास, कैलासवासी राजश्री रामचंद्र नीलकंठ यांचा व तीर्थस्वरूपांचा राजश्री खेमसावंत भोंसले सरदेसाई याचा ऋणानुबंध विशेषाकारें चालत आला त्याप्रमाणें उभयपक्षी चालत आहे अभिवृद्धीने ऋणानुबंध चालावा, आमचें साहित्य आपण करावें, आपलें साहित्य सर्व प्रकारें आह्मीं करावें. वंशपरंपरेनें अकृत्रिमतेंत काहीं न्यूनता पडों न द्यावी, येविशीं श्रीसंनिध शपथपूर्वक बोलीचाली जाहली आहे. त्यास, आह्मांकडून किमपिहि तफावत पडणार नाहीं. आपल्याकडून तफावत न पडावी घरोब्यानें ऐक्यतेनें उभयपक्षीं सुधामत चालावा. यास अंतर पडणार नाहीं. आपली आमची भेट प्रथमत जाहली. अमचे चित्तास बहुतच संतोषावह जाहाला यावरून तुह्मांस आह्मीं आपले आत्मसंतोषें होऊन प्रात कुडाळ येथील देशकुळकर्ण्याची वतन देहाय कर्याती देखील जकायती दिल्हे असे यास वतनी बाहवी ता।.
इनामगांव दरोबस्त. हक्कदरसद्देहोन निमे. बीमयेत इनाम ठिकाण.
१ ----------------------- -------------------------- ---------------------------
------------------------ ---------------------------
------------------------ ----------------------------
------------------------- जकात दर बैली.
-------------------------
लाजमा पानमानपद्धत प्रा। कलम १.
येणेप्रमाणें दिल्हे असे तुह्मी व तुमचे पुत्रपौत्रादि वंशपरपरेने देशकुळकर्ण्याचे वतन अनुभवून भोगवटा करून सुखरूप राहणें सदर सरदेशकुणकर्ण्याची वतने आहे तीं कूलीं तुह्मांस देऊं.
स्वदत्तां परदत्तां वा यो हरेच्च वसुधराम्।
षष्ठीवर्षसहस्त्राणि विष्ठाया जायते कृमिः।।
स्वदत्ताननुपालकाः परदत्तापहारकाः।
ते नरा नरकं यान्ति यावच्चंद्रदिवाकरौ ।।
शिक्का.
राजश्री नार दळवी. राजश्री निलापा देसाई ता।
खानापूर.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
चैत्र शु. १ शनिवार शके १७१७.
विनंती विज्ञपना. राजश्री कल्यः पराव हरराव यांस यांनी रुखसत देउन पुण्याकडे रवाना केलें. ३ २३ घाबानी येथुन मारनिले मैलारास जाऊन राहिले, दर मजल जाणार. हरराव यांस पाठवावयाचे कारण बारीक रितीने शोध कारतां समजण्यांत आलें. महादजी सिंद यांचा नवाबासी तहनामा दोस्तीचा पेशजी जाला आहे. त्यांचा काल जाला. हाली दौलतीवर राजश्री दौलतराव सिंदे कायम जाले. त्यांस पूर्ववतुप्रमाणे दोस्तीचा सिलसिला प्यारी राहावी. पहिला तहनामा जाला त्याप्रमाणें सांप्रत नवा तहनामा दौलतराव यांचा व्हावा या विषईचे साधनार्थ करुयाणराव व बाबाराव तेथे आहेत. कितेक बारीक मोठे प्रकार लिहिण्यांत कोठवर लिहावे ? खान करीस्त दौलांनी हरराव यांस बोलण्यांत आणुन रवाना केलें. कल्याणराव व बाबाराव यस सर्व मरातब बोलुन अब चिटणसि यांचे विद्यमाने सिल. सिला व नवीन तहनामा पकेपणे करुन घ्यावा, सा हरराव यांची रवानगी केली. जितका प्रयत्न तितका करून पाहावा, हे कारण कुफिया समजण्यांत भालें. रा छ २९ षाबान हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
चैत्र शु. १ शनिवार शके १७१७:
विनंती विज्ञापना. आषज्या उलमुलुक नवाबचे हुकुमाप्रम आमचे हे व्यास आले, त्याजला ज्याफत केली.
४ कारचोबी पोर्चे,
१ चौरा.
१ ज्यामेवार,
१ पटका.
१ गोषपेच.
------
४
१ दुधाला.
१ किनाखाच.
१ जवाहिर सरपंच.
------
७
सदरहु प्र छ, २६ षाबानीं दिल्हे छ २९ षाबान हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १५२ १५९८ मार्गशीर्ष शुध्द १५
राजश्री एसाजी मल्हार सुभेदार पा। वाई गो।
मशहुरुल अखंडितलक्षुमीअलंकृत राजमान्य सेवक राघो बलाळ सरसुभेदार नामजाद सुभेहाय सु॥ सबा सबैन अलफ आपदेभट बिन विस्णुभट चित्राउ सो। का। वाई यानी हुजूर येऊन सागीतले की आपले इनाम दर सवाद दु॥ मौजे पा। मा। जमीन चावर १
अवल
मौजे खेड सा। मौजे तडवले सा। कोरेगाउ
कोरेगाउ चावर .॥. चावर .॥.
येणेप्रमाणे सालाबाद चालत आले आहे बा। रु॥ गुदस्ता ऐसीयास साल मजकुरी कारकून ताजा सनदेचे उजूर करितात ह्मणौन सांगीतले तरी भट मजकुराचे इनाम चावर एक सालाबाद प्रमाणे दुमाला केले असे दुमाला कर्णे
तालीक लेहून घेऊन असल इनामदार मजकूरास फिराऊन दीजे मो।हे विनंती
तेरीख १३ माहे सौवाल
शौवाल