श्री.
चैत्र शु. १ शनिवार शके १७१५.
विनंती विज्ञापना. आदवनी रायचूर येथील मोजदाद करण्याकरिता येथुन यांनी मुस्तकीम जंग व मिर्धे सवाउक यांस रवाना केले ते जाउन भाजदादीचा फर्द पेशजी नवाबाकडेस पाठविली. परंतु रायचुरांत मोहबत जंगा. कडील सिबंदी स्वार बारगीर गाडद व प्यादे यांनी तलबचे यैवजाकरितां हंगामा केला. किल्याचे दरवाजे बंद केले. हे वर्तमान मुस्तकीमजंगांनी लिहिले. त्यावरुन असद अलीखान यांची रवानगी फौज जामयत सुद्धा रायचुराकडे केली. खान मार येक दोन मजल गेले. इतकियांत मुस्तकीम जंगाचा अर्जी नवाबांस आली की * रायचुरांतील सिबंदीचा गवगवा होता तो सफा जाला. तोड पडली, खजीना जवाहीर सुद्धां वगैरे सरंजाम घेऊन मी निघोन लौकरच हाजुर पहचतों या प्रो अर्जी आल्यावरुन असदअलीखानास यांनी पत्रे पाठऊन मावारे आणविलें. खान मार छ २३ रोजी बेदरास आले. मुस्तकीम जंग माहबतजंगाकडील अनवरादौला बहादीवान कारभारी या समागमें बेऊन छ २७ रोजी बेदरास आले. घोडौं व टें व यैवज जवाहिर कापड व सिलेखाना वगैरे तरंजाम आला. बतास हाथी रायचुरचे व येथुन नवाबांकडून बावीस हाथी भारबारदारीस गेले. कुण चौपन हाथी व सरंजाम सेने, रुपें, नगद पैवज जवाहीर मरुन आले र॥ छ २९ षाबान हे विज्ञापना.