Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १४५ १५९७ माघ शुध्द १२
तालीक
(फारसी मजकूर)
अज दिवाण पा। वाई ता। मोकदमानि मौजे पसर्णी सा। हवेळी पा। मजकूर सु॥सन सीत सबैन अलफ दरवज बदल इनाम बो। नरसींहभट बिन रंगभट चित्राउ सो। कसबे मजकूर यास इनाम जमीन चावर -॥. नीम दर सवाद मौजे मजकूर थल वाकेवाडी नजीक सिदनाथवाडी दो। मो। ना। व खा। गला व तूप व बेलकटी व मो। खर्च व ईद सुभराती व कार गुजारी
मु॥ कुलबाब कुलकानु बा। खु॥ मोकासाइ माजी चालिले प्रमाणे दुमाले केले असे दुमाला कीजे बा। भोगवटा मिसेली ठाणा दर सालगुदस्ता चालिले प्रमाणे दुमाले केले असे दुमाला कीजे तालीक लेहून घेउन असल मिसीली परतून दीजे मोर्तब सूद
तेरीख १०
जिलकाद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १५३ ] श्री. १५ आक्टोबर १७३७.
यादी. राजश्री भगवंतराव अमात्य हुकुमतपन्हा याजकडील बोली येणेंप्रमाणें करार. सुहूर सनं समान सलासीन मया अलफ, माहे रजबः-
बाबतीचा वसूल हुजूर सालमजकुरीं जाहला आहे. तो तुह्मीं हुजूर ऐवज द्यावया केला आहे.
यांत मजुरा देऊ. वरकड राहिला ऐवज हुजूरचा तुह्मीं ठेवा जिल्हेबाबतचा मामला पूर्ववत्
चालत आहे. त्याप्रमाणें तुमचा तुह्मांस करार. कलम १.
तुमच्या इजतीमाफक समयानरूप बहुमान करूं. कलम १.
अळते, रुकडी येथील बाबती व मौजे हातकणंगलें हें द्यावे ह्मटलें,
तर तुह्मीं धणी, अर्जवून घेऊन संतोषी केल्यावर स्वामी कृपाळू
होऊन देतील. कलम १..
पूर्ववत् तुमची खेडीं व वतनें आहेत. त्यास सावगांव खेरीजकरून तुमचीं
तुह्मांस करार केलीं असत. कलम १..
मजमूचा हुद्दा तुमचा तुह्मांस
करार कलम १.
तुमचे कारकून व चाकर
जिल्हेनिसबत व बाजे जे असतील ते
तुमच्या ताबिनात करूं कलम १.
तुमच्या चाकरापासून कतबे घेतले आहेत
कीं, तुह्मांकडे चाकरीस जाऊं नये. त्यास
ते कतबे तुमचे तुह्मांस देऊं. चाकर
ताबिनांत करावे. कलम १.
येणेंप्रमाणें सात कलमें करार केलीं आहेत. यांत कांही लढा नाहीं. याप्रमाणें स्वामी चालवितील. तुह्मीं दिन प्रतिदिनीं अकृत्रिम मनोभावे एकनिष्ठेनें सेवा करावी. स्वामी कृपाळू होऊन तुमचे दिनप्रतिदिनीं उर्जित करितील तुह्मीं निष्ठेनें सेवा करून स्वामीस संतोषवावें सर्व प्रकारें स्वामी चालवितील छ १ रजब.
लेखनसीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १४४ १५९७ माघ शुध्द १२
(फारसी मजकूर)
अज दिवाण पा। वाई ता। मोकदमानि देहाय पा। मजकूर सु॥सन सीत सबैन अलफ दरवज बदल धर्मादाउ बो। नरसीभट बिन रंगभट चित्राउ सो। कसबे मा।र यास धर्मादाउ बा। खु॥ मोकासाई माजी व हाली कारकीर्दी साबीका दर साल सन समान सितैन अलफ छ ६ रबिलाखर सादर जाहाले प्रमाणे भोगवटा मिसेळी ठाणा दर साल गुदस्ता सालीना बा। खुर्दखत सादिलवारपैकी होन १० दहा
१ गोवे १
माहागाउ
१ मौजे खेड १
सिवथर
१ बोरखल १
अरोले
१ कोरगाउ १
अरफाल
------ २ पसर्णी
४ --------
६
येणेप्रमाणे सालगु॥ चालिलेप्रमाणे दुमाले केले असे दुमाला कीजे अवलाद अफवाद चालवीजे तालीक लेहून घेऊन असल परतून दीजे मोर्तब सूद
तेरीख १०
जिलकाद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १४३ १५९७ माघ शुध्द १२
(फारसी मजकूर)
अज दिवाण पा। वाई ताहा मोकदमानी दुदेह
मौजे खेड मौजे तडवले बु॥
सा। कोरगाउ पा। मजकूर सु॥सन सीत सबैन अलफ दरवज बदल इनाम बो। अपदेभट बिन विस्णुभट चित्राउ सो। का। मजकूर यास इनाम जमीन चावर
मौजे खेड चावर .॥. मौजे तडवले बु॥ चावर ॥.
येणेप्रमाणे दो। मा। ना। व खरीदी गला व तूप व बाजे उजुहाती कुलबाब कुलकानू दुमाले बा। खु॥ वजीर मोकासाई माजी चालिले प्रमाणे दुमाले केले असे बा। भोगवटा मिसेली ठाणा दर साल गुदस्ता चालिले प्रमाणे दुमाले केले असे दुमाले कीजे तालीक लेहून घेऊन असल मिसेली परतून दीजे मोर्तब सूद
तेरीख १०
जिलकाद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १५२ ] श्री.
˜ श्री °
श्रीमत्कान्होजीसंभूत-
शंभो. शत्रूज्जिगीषतःll
वर्धिष्णूराजरेखेव मुद्रा
भद्रा विराजते ll
राजश्री भगवंतराऊ अमात्य हुकमतपन्हा गोसावी यांसीः -सकलगुणांलकरण अखंडितलक्ष्मी अलंकृत राजामन्य स्ने ।। संभाजी आंगरे सरसुभेदार आरमार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन केलें पाहिजे. विशेष. राजश्री यादोपंत याज बराबरी पत्र पाठविलें त्यावरून व मानिल्हे याणीं जबानी सांगितल्यावरून सविस्तर अर्थ कळों आला. सारांश, " तीर्थरूप श्रीकुणकेश्वरीं बहुत काल राहिले होते त्यांचा प्रतिपाल राजश्री कैलासवासी सरखेल याणीं करून नियत करून दिल्हा होता. त्याप्रों । किंबहुना तदाधिक्य तुह्मीं अंतर केलें नाहीं. प्रस्तुत तीर्थरूपास वैकुंठवास जाहला. मागें श्रीस्थलीं त्यांची मुलेंमाणसें व अधिष्ठान आहे त्यांचे सर्वाविशीं पूर्वापार व हाली निवतप्रों। चालवावयास अंतराय न करावा, ह्मणोन कितेक तपशिले लिहिलें तरी तीर्थरूप कैलासवासी याणीं जो नियत करून दिल्हा होता त्यास आह्मांपासून अंतर आजिपावेतों जाहलें नाहीं पुढेंही होणार नाहीं. नूतन पत्राचा विचार लिहिला तरी पुत्रप्रों। सालमारी गुंता ठेविला ऐसें नाहीं. पेस्तरही राहणार नाही. पत्राप्रों। निर्वाह करावाच लागेल. वरकड मोईनपैकीं कांहीं गल्ला राहिला आहे तो झाडेयानसी देवावा ह्मणोन लिहिलें. तरी हिशेबप्रों गल्ला बाकी राहिला असेल तो गलबतावरून देवगडास पाठवून मनुष्यास प्रविष्ट करून टाकण तीर्थरूपानीं जिनगेबद्दल ठेविला आहे तो पाठवावा ह्मणोन लिहिलें तरी टाकण सरकारांत ठेविला नाही सरकारात असता तरी पाठविला जाता त्याचे वृत्त रा. भास्कर गोसावी यास ठाऊक आहे आपणास श्रवण करितील. त्यावरून कळेल. बहुत ल्याहावें तरी आपण सुज्ञ आहेत. हे विनंति.
मोर्तबसूद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १४२ १५९६ मार्गशीर्ष वद्य १०
(फारसी मजकूर)
अज दिवाण पा। वाई ता। मोकदमानी देहाय मौजे पसर्णी सा हवेली मौजे वोझर्डे सा। हवेली मौजे एकसर सा। मुर्हे
पा। मजकूर बिदानद सु॥सन खमस सबैन अलफ दरवज बदल इनाम बो। नारायणभट बिन गोपीनाथभट चित्राउ जुनारदार सा। का। मजकूर यास इनाम जमीन चावर १।२ दर सवाद देहाय बिता।
मौजे पसर्णी चावर .॥. मौजे वोझर्डे चावर .॥.
मौजे एकसर बिघे .।२
येणेप्रमाणे बा। खुर्दखत वजीर मुकासाइयानी माजी चालिले प्रमाणे बा। खुर्दखत हाली कारकीर्दी साबिका दर साल सन समान सितैन अलफ छ १ मोहरम दर साल मा। पौ छ २४ मिनहू सादर जाहाले प्रमाणे भोगवटा मिसेली ठाणा दर साल गु॥ छ १ रमजान जैसे चालिले असेल तेणे प्रमाणे
असल परतून दीजे मोर्तब
तेरीख २३ माहे रमजान
रमजान
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १५१ ] श्री. १७३६.
राजश्री भगवंतराव पंडित अमात्य हुकुमतपन्हा गोसावी यांसीः -सकलगुणांलकरण अखंडितलक्ष्मी अलंकृत राजामन्य स्ने।। सभाजी आगरे सरखेल सरसुभेदार आरमार रामराम विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असलें पाहिजे. विशेष. आपण बावाजी करवडा व विठोजी पाटणकर यांजसमागमें मुखवचनी कितेक एकात्म (ते) च्या व पुढे मनसबा कर्तव्य पदार्थ सांगोन पाठविला. त्याप्रमाणें हरदूजणानी अक्षरशाहा आह्मापाशी निवेदन केलें ऐशास, आपला आमचा स्नेह अकृत्रिम होऊन आला व भेटीही जाहल्या तेसमयीं कितेक इष्टापूर्तीची भाषणें जाहली फेरो न ये राजकार्यप्रयोगप्रसंगीं सामील व्हावें साभिमान अनकूलता करावी ऐशी कितेक पदार्थे भाषणे जाहली त्याच अन्वयें हालीं आपण सागोन पाठविले. तरी याहून विशेष काय आहे ? आपला व आमचा एक हात निश्चयेकरून जाहाला तरी वरकड पदार्थे शत्रूचा पराभव व्हावया अगाध काय आहे ? परंतु एकात्मता पूर्ती चित्तापासून असावी. कां ह्मणजेल ? तरी, राजश्री बाजीराव पंडित प्रधान याणी बेलभाकर पाठविली व आह्मीही त्यांस पाठविली तथाप तो अर्थ एकीकडेस ठेवून, मुडा बसवून, इमानास खता केली. व इमानरोटी देवून मुडकरी यांणीं बेइमान केली. ऐसा विचार तुमचा आमचा नसावा. जो स्नेह कार्य मनसबा बंधुत्व संपादणें तें कार्य खामखा करावेंच करावें. बंधुत्व तो कितेकांनीं विपर्यास लहान मनुष्यानें अथवा थोराने घातलें तरी परस्पर चित्तारूढ करू नये सहोदर बंधुपमाची पदार्थ चालोन एकाने सामील व्हावें. साहित्य करावें. ऐसें आपल्या चित्तापासून असेललेयास फिगेन तफावत न पाडावी ऐसे पूर्ते आपलें मन शोधून पाहावें आणि आह्मीं माणसें पाठविलीं आहेत. यासमागमें आपल्या जिवाळ्याचा माणूस बरा शहाणा असेल तो पाठवून द्यावी. ह्मणजे, आह्मीही आपलेकडील भला माणूस श्रीकानोबाचा बेल भाकर पाठवून देवून आणि आपला आमचा एक हात करून आपले व आमचे योजिले मनसबे सिद्धीस न्यावे. याउपरि दुसरा विचार आमचे चित्तीं नाहीं. एवढें लिहिण्यास कारण कां ह्मणिजेल ? तरी पूर्वी एका दोहींकडून बेलभाकरीचा अन्वय, जाहला तो प्रसिद्ध आपणास कळलाच आहे. रघुनाथ प्रभू याणेंही दोन वेळां बेल काढून दिला. आणि बेइमानी करून खादल्या अन्नाचा निस्तरा देतो आहे याचाही परिणाम श्रीकृपेनें होईल, तो आपल्यास कळोन येईल. आपला आमचा स्नेह आजीकालीचा नाहीं. पूर्वी कैलासवासी तीर्थरूप याचा व आपल्या तीर्थरूपाचा स्नेह कोणे रीतीनें चालिला, व त्याणीं कोणे कोणे प्रसंगीं साहित्य केलें, एक एकास ते न चुकले त्यांचे पुत्र तुह्मीं आह्मीं एकात्मतेनें वर्तावें, शत्रूस पादाक्रात करावे, घरोब्यानें चालोन दुस-याचा हात शिरों देऊं नये, उचित असे सर्व अर्थ आह्मीं आपले चित्तापासून लिहून पाठविले आहेत. सविस्तर चित्तारूढ करून आपणही याच अन्वयें आपल्या चित्ताची प्रशंसता करून फिरोन यास अंतर न पडे एैसें करून, सदर्हू लिहिल्याप्रमाणें भला माणूस बेलभाकर पाठवून द्यावीं तदनुरूप येथूनही पाठवून देवून यास अतंर सहसा होणार नाहीं याउपरि आपल्या थोरपणास योग्य असेल तें करावें रा। छ ३ जमादिलाखर. बहुत काय लिहिणें लोभ असो द्यावा. हे विनंति
लेखनसीमा.
˜ °
श्री शाहूनृप-
हर्षेण कानोजीत-
नुजन्मन. आंगरे -
सरखेलस्य शंभोर्मुद्रा
विराजते ll
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १४१ १५९६ मार्गशीर्ष शुध्द १
अज दिवाण पा। वाई ता। मोकदमानी दुदेह मौजे बोरखली सा। नीब मौजे किणही सा। कोरगाउ पा। मा। बिदानद सु॥सन खमस सबैन अलफ दरवज बदल इनाम बो। नरसीभट बिन रगभट व एकनाथभट बिन रामेस्वरभट चित्राउ जुनारदार सो का। मा। यास इनाम जमीन चावर १॥ दीड दर सवाद दुदेह मौजे बोरखल चावर१ मौजे किणही चावर .॥. येणेप्रमाणे दो। मा। नखतयाती व (खा। गला) व तूप व बाजे उजुहाती + + + + + + + + + + रबिलाखर सादर जालेप्रमाणे भोगवटा मिसेली ठाणा दर साल गुदस्ता१ छ ८ श्मजानु जैसे चालिले असेल तेणेप्रमाणे सन तल मजकूर अवलाद व अफवाद चालवीजे तालीक लेहून घेउन असल परतून दीजे मोर्तब सुद
तेरीख ३० माहे शाबान
शाबान
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १५० ] श्री.
˜ श्री °
श्रीमत्कान्होजीसंभूत-
शंभो. शत्रूज्जिगीषतःll
वर्धिष्णूराजरेखेव मुद्रा
भद्रा विराजते ll
राजश्री नारो पंडित गोसावी यांसीः -सकलगुणांलकरण अखडितलक्ष्मी अलंकृत राजामान्य स्ने ।। संभाजी आंगरे सरसुभेदार आरमार रामराम विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन केलें पाहिजे. आमची स्वारी रामदुर्गी होणार आहे ते समयीं श्रीची व आपली भेटी होईल. वरकड आपणाजवळ दक्षिणावर्ती शंख आहे ह्मणोन आइकतों. ऐशास, आपले आशीर्वादाची एक वस्त आह्माजवळ असावी, त्याजकरितां हें पत्र आपणास लेहून माहादो बाबाजी पाठविला आहे.तरी स्वामीनी सदय होऊन आशीर्वादक शंख अगत्यरूप पाठविला पाहिजे. आपण तपस्वी, थोर. आपले हातींची वस्त आह्मांजवळ असावी तेणेंकरून सदासर्वकाळ स्वामीचें स्मरण राहील याजकरिता प्रसादात्मक पाठवावी. सदासर्वकाळ पूजा करून नमस्कार करू, तेव्हां आपलें स्मरण दिन प्रतिदिन होईल ते केलें पाहिजे सुज्ञाप्रति विशेष काय ल्याहावें. कृपा वर्धमान करावी. हे विनंति.
मोर्तबसूद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १४० १५९६ मार्गशीर्ष शुध्द २
अज दिवाण पा। वाई ताहा मोकदमानी देहाय पा। मजकूर बिदानंद सु॥सन खमस सबैन अलफ दरवज बदल धर्मादाउ नरसीभट बिन रगभट चित्राउ सो। का। मा। यास धर्मादाउ बा। खु॥ वजीर मोकासाइयानी माजी चालिले खुर्दखत हाली कारकीर्दी साबीका दर साल सन समान सितैन अलफ छ ६ रबिलाखर सादर जाहाले प्रमाणे भोगवटा मिसेली ठाणा छ ८ माहे रमजानु दो। तूटपटी सादिलवारपैकी सालिना होन १० दाहा बि॥
१ मौजे गोवे १ मौजे माहागाउ
१ बोरखल १ सीवथर
१ १ अरफल
येणेप्रमाणे सालगु॥ जैसे चालिले असेल तेणेप्रमाणे सन तल मजकूर अवलाद व अफवाद चालवीजे तालीक लेहून घेउन असल परतून दीजे मोर्तब सूद
तेरीख ३० माहे शाबान
साबान