श्री.
चैत्र शु. १ शनिवार शके १७१७.
विनंती विज्ञापना. मंगळवार पेटेंत नवाब दाखल जाल्यानंतर तमाम कारखानेज्यात चराईस जाण्याचा हुकुम जाला. त्यावरुन फिलखान, पुतरखाना व बैल, रथ, गड्या, छकड्याचे व जिनसीकडील येथुन पंधरा वीस कोस कौकस प्रांतीं व कुहीर वगैरेकडे रवाना जालें. राा छ २९ बाबान हे विज्ञापना.