Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १५७ ] श्री. १७३८.
राजमान्य राजश्री भगवंतराव पंडित यासी आज्ञा केली ऐसी जेः-
तुह्मी विनंतिपत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहाले. राजश्री तुळाजी आंगरे यांच्या पारपत्यास सेवकाकडून अंतर होईल ऐसें नाही, स्वामींनी दृढ अभिमानें सर्व प्रकारें साहित्य करावें, मुलास अन्नवस्त्र द्यावे, ह्मणोन विशदें लिहिलें ऐशास, तुह्मीं राज्यातील पुरातन सेवक, तुमचें सर्व प्रकारें आवश्यक तुमचे हाते सेवा घेऊन उर्जित करावें, हेच स्वामीचें मानस आहे तरी तुह्मी योजिला मनसुबा सिद्धीस पावणे ह्मणजे तुमचे चालवावयास स्वामीपासून अतर होईल ऐसे नाही सविस्तर अर्थ राजश्री यशवंतराव महादेव खासनिवीस लिहितील त्याजवरून कळेल नारळ व पाने पाठविली ती यादीप्रमाणें प्रविष्ट जाली सुज्ञ असा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १५१ १५९७ फाल्गुन शुध्द २
(फारसी मजकूर)
अज दिवाण ठाणे सा। हवेली पा। वाई ता। मोकदमानी मौजे पसरणी सा। मजकूर सु॥ सीत सबैन अलफ वेदमूर्ती राजश्री नरसीभट चीत्राव याचा इनाम मौजे मजकुरी आहे त्यावरि कुलबाब जमा बेरीज बि॥
नखत होनु गला तूप कडबा
१३lll -lll२ll२ ४।९ १७६
यापैकी वजा दुमाले केले असे बि॥
नखत होनु गला मण तूप कडबा
३-।. .।३॥।१
२।१३॥ ८८
बाकी बेरीज बिता।
नखत होनु गला तूप कडबा
१०॥=। -।३॥।१ २।१३॥ ८८
सदरहू येणेप्रमाणे दुतर्फा वसूल जो जाहाला असेल तो मनास आणुन वजा देणे जाजाती तगादा न लावणे छ १ माहे जिल्हेज
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १५६ ] श्री. तालीक.
राजश्री तुळाजी आंगरे सरखेल गोसावी यासीः -सकलगुणालंकरण अखडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने।। बाळाजी बाजीराव प्रधान आशीर्वाद विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित गेलें पाहिजे. विशेष. राजश्री कृष्णराऊ पंडित अमात्य याजकडील गाव खेडी पुरातन इनाम आहेत व किल्ले गगनगडचे घे-यांचे गांव वगैरे यांची वतनें त्या प्रांतीं आहेत त्यांचा वसूल तुह्मांकडे जात होता. त्यावरून येथून पत्र आपणास पाठविलें कीं , यांच्या तालुक्यास उपद्रव करावा ऐसें नाहीं. ह्मणून लिहिलें त्यावरून याच्या दुमाल वतनें सालमजकुरीं केलीं ऐसें असोन हल्लीं नानाप्रकारें उपद्रव आरंभिला, हबशीपट्टी ह्मणोन रोखे केले आहेत, ह्मणोन लोक आले. तरी पुरातन कान्होजी आंगरे याणीं यांच्या तालुक्यास तिळतुल्य उपसर्ग किल्याच्या तनख्यास देखील केला नाहीं व हबशीट्टीही घेतली नाहीं. ऐसें असतां तुह्मीं हरएक निमित्य ठेवून उपद्रव करावा हे गोष्ट उचित नाहीं. हालीं हें पत्र आपणास लिहिलें असे. तरी रोखे केले असतील ते मना करून पंडितमशारनिल्हेच्या निसबतीस कोणेविशीं उपसर्ग जाहाल्याचा बोभाट वारंवार न ये ते गोष्ट केली पाहिजे रा । छ २० मोहरम. बहुत लिहिणें तरी सुज्ञ असा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १५५ ] श्री.
राजमान्य राजश्री तुळाजी आंगरे सरखेल यासी आज्ञा केली ऐसी जेः-
सुभा प्रांत राजापूर व सुभा प्रात दाभोळ हे दोन्ही प्रांतांचा जिल्हा हुजुरून राजश्री गोविंदजी भोसले याजकडे आहे त्यास हरदू सुभ्याचा अंमल हुजुरून राजश्री भगवंतराऊ पंडित अमात्य यासी सागितला आहे हे दोन्ही प्रांतात एकदर आकार होईल त्याची निमे शामळाबाबत ऐवज वसूल घेतील तुह्मीं मुताबीक होऊन आमलास खलेल कराल तरी न करणें येविशीचें अवश्यक स्वामीस आहे. तुह्मी जाणतच आहा. तुमचे तर्फेनें अमलास तिळप्राय खलेल झालिया स्वामीस मानणार नाही, ऐसे जाणून मानिल्हेकडे सुरळीत अमल चालो देणे. हुजूर बोभाट न ये ते गोष्टी करणें . सुज्ञ असा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १५० १५९७ माघ शुध्द १२
(फारसी मजकूर)
अज दिवाण पा। वाई ता। मोकदमानी देहाय पा। मजकूर सुरुसन सीत सबैन अलफ दरवज बदल धर्मादाउ बो। नरसीभट बिन रगभट चित्राउ सो। का। मजकूर यास धर्मादाउ बा। खु॥ मोकासाइयानी व हाली कारकीर्दी साबिका दर साल सन समान सितैन अलफ ६ रबिला (खर) सादीर जाहाले प्रमाणे भोगवटा मिसेली ठाणा दर सालगु॥ सालीना बा। तूटपटी सादीलवार पैकी होन १० दाहा बि॥
१ गोवे १ माहागाउ
१ मौजे खेड १ सीवथर
१ बोरखल १ अरोले
१ कोरगाउ १ अरफूल
---- २ पसर्णी
४ -----
६
येणेप्रमाणे सालगु॥ चालिलेप्रमाणे दुमाले केले असे दुमाला कीजे अवलाद अफवाद चालिवीजे तालीक लेहून घेऊन असल परतून दीजे मोर्तब सूद
तेरीख १०
जिलकाद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १४९ १५९७ माघ शुध्द १२
तालीक
(फारसी मजकूर)
अज दिवाण पा। वाई ता। मोकदमानी मौजे देहाये
मौजे बोरखल सा। मौजे कण्हई सा।
नींब कोरगाउ
पा। मा।र सुरुसन सीत सबैन अलफ दरवज बदल इनाम नरसीभट बिन रगभट व एकनाथभट बिन रामेस्वरभट चित्राउ सो। का। मजकूर जमीन चावर १॥ दर सवाद ऊ दहाय
मौजे बोरखल चावर १ किण्हई चावर ॥
पा। मा। यास इनाम बा। खु॥ रा। छ ७ जिल्हेज पौ छ १७ मोहरम दर साल गु॥ सन इसने सादर असे जे जमीन चावर सदरहू दे॥ माहसूल नखतयाती व खा। गला व ऊद व बाजे बाबा खु॥ वजीरानी चालिलेप्रमाणे चालवीजे तालीक घेऊन असल परतून दीजे ह्मणून रजा रजे बा। भोगवटा मिसेली ठाणा दर सालगु॥ छ २९ सफर जमीन चावर दीड दो। बाबहाय दुबाले केले असे दुबाले कीजे तालीक घेऊन असल परतून दीजे मोर्तब सूद
तेरीख १०
जिलकाद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १५४ ] श्री. १७३९.
राजमान्य राजश्री भगवंतराव पडित अमात्य यासी आज्ञा केली ऐसी जेः-
राजश्री तुळाजी आगरे सरखेल यांच्या पारपत्याविशी तुह्मास पेशजी आज्ञा केली व वरचेवर राजश्री यशवंतराव महादेव खासनिवीस लिहित गेले त्यावरून तुह्मीं अगेज करून राजश्री गंगाधर पंडित प्रतिनिधि व सामत यास सामील करून घेऊन आंगरियाच्या मुलकात स्वारी केली आहे.लांजेपर्यंत मुलूख मारला ह्मणून खासनिवीस यांनीं विनंति केली व परस्परेही वर्तमान विदित जाहले. त्यावरून स्वामी संतोषी जाहले. तुह्मी कार्यकर्ते सेवक, स्वामीच्या मनोदयानुरूप मनसबा कराल हा स्वामीचा निशाच आहे. तरी योजिला मनसुबा पोक्ता करून जागा दम धरून, गोवळकोट, अंजनवेल, विजेदुर्गपर्यंत मुलूख मारून, दोन चार स्थळें मातबर हस्तगत होऊन, सरखेल देहावर येऊन , सावताचे किल्ले व मुडाडोंगर व सरकारचे गोवळकोट, अंजनवेल, बाणकोट, मंडणगड व शामळाचे तक्षिमेचा ऐवज स्वामीस देत, पेशजी स्वामींनीं त्यास दिल्हें आहे ते घेऊन आज्ञेप्रमाणें वर्तत, ते गोष्ट करणें. ज्या गोष्टीनें स्वामीच्या मनोदयानरुप कार्य घडे ऐसें जालियानें स्वामी तुमचें उर्जित करावयास अंतर करणार नाहींत. केवळ उभे धावेनें चार महाल आलियानें त्याचें पारिपत्य जाहलें ऐसें नाहीं दोन महिनेपर्यंत मुलुखांत राहून, बंदरकिनारादेखील मुलूख मारून, दोन चार जागे हातास येत, ऐसा विचार करणें. गोवळकोटपर्यंत फौज आली ह्मणजे हुजुरूनही साहित्य होईल. राजश्री तुळाजी आंगरे सरखेल यांच्या समाधानार्थ येथून हरकोणाचीं पत्रें गेलीं तरी ते गोष्ट न जाणणें आगरे यांचें पारपत्य करावें हा हेत स्वामीचा पूर्ण आहे स्वामीचे आज्ञेप्रमाणें मनसुबा जाहलियावर सावताचा बहुमान करणें तो स्वामी तुमच्या मनोदयाप्रमाणेंच करितील येविशीं त्यांचेही मनोधारण करून प्रारंभिला कार्यभाग स्वामीचे आज्ञेप्रमाणे सिद्धीतें पाववून स्वामी संतोषी होत, आंगरियाचे पारपत्य होऊन हालखुद वर्तत, ते गोष्ट करणें, ह्मणजे सेवेचा मजुरा होऊन तुमचें उर्जित करावयास स्वामी सहसा अंतर करणार नाहीत सुज्ञ असा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १४८ १५९७ माघ शुध्द १२
(फारसी मजकूर)
अज दिवाण पा। वाई ताहा मोकदमानि मौजे पसर्णी सा। हवेळी पा। मजकूर सुरुसन सीत सबैन अलफ दरवज बदल इनाम बो। नरसीहभट बिन रगभट चित्राउ सो। कसबे मजकूर यास इनाम जमीन चावर .॥. नीम थल वाकेवाउी नजीक सिदनाथवाउी वाट माभलेस्वर दर सवाद मौजे मा। दो। मा। ना। व खा। गला व ऊद बेलकटी व मोहीमखर्च व ईद सुभराती व कार उजाटी व हेजीब नु॥ कुलबाब कुलकानू बा। खु॥ खु॥ मोकासाई माजी चालिले प्रमाणे दुमाले केले असे दुमाला कीजे बा। भोगवटा मिसेळी ठाणा दर सालगुदस्ता चालिले प्रमाणे दुमाला केले असे दुमाला कीजे तालीक लेहून घेऊन असल परतून दीजे मोर्तब सूद
तेरीख १०
जिलकाद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १४७ १५९७ माघ शुध्द १२
(फारसी मजकूर)
अज दिवाण पा। वाई ता। मोकदमानी मौजे देहाय
मौजे बोरखल मौजे किण्हई सा।
सा नींब कोरगाऊ
पा। मा। सु॥ सीत सबैन अलफ दा। बदल इनाम नरसीहभट बिन रगभट व एकनाथभट बिन रामेश्वरभट चित्राउ सा। का। मा। जमीन चावर १॥ दर सवाद दुपेटा
मौजे बोरखल (चावर) १ मौजे किण्हई चावर .lll.
पा। मा। यास इनाम बा। खु॥ रा। छ ७ जिल्हेज पौ। छ १७ मोहरम दर सालगु॥ सन इसने सादर असे जे जमीन चावर सदरहू दो। माहासूल व नखतयात व खा। गला व ऊद व बाजे बाबा खु॥ वजीरानी चालिले प्रमाणे चालवीजे तालीक घेऊन असल परतून दीजे ह्मणून रजा रजे बा। भोगवटा मिसेली ठाणा दर साल गु॥ छ २९ सफर जमीन चावर दीड दो। बाबहाय दुबाला केले आहे दुबाले कीजे तालीक घेऊन असल परतून दीजे मोर्तब
तेरीख १०
जिलकाद
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १४६ १५९७ माघ शुध्द १२
(फारसी मजकूर)
अज दिवाण पा। वाई ता। मोकदमानि दुदेह
मौजे खेड मौजे तडवले बु॥
सा। कोरगाउ पा। मजकूर सु॥ सीत सबैन अलफ दरवज बदल इनाम बो। अपदेभट बिन विस्णुभट चित्राउ सो। का। मजकूर यास इनाम जमीन चावर १
मौजे खेड चावर .॥. मौजे तडवले बु॥ चावर .॥.
येणेप्रमाणे दो। मा। ना। व खा। गला व तूप व बाजे उजुहाती कुलबाब कुलकानु दुमाले बा। खु॥ वजीर मोकासाई माजी चालिले प्रमाणे दुमाले केले असे बा। भोगवटा मिसेली ठाणा दर साल गुदस्ता चालिले प्रमाणे दुमाले केले असे दुमाला कीजे तालीक लेहून घेउन असल मिसेळी परतुन दीजे मोर्तब सूद
तेरीख १०
जिलकाद