श्री.
चैत्र शु. १ शनिवार शके १७१७.
विनंती विज्ञापना. दौलाचे बोलण्यांत आलें कीं सिकंदरज्याहाबाहादुर साहेवजादे यांचे षादीकरितां श्रीमंतांनी येण्याविषई हजरतीनी पत्रे पेशजी रवाना केली. त्यास फार दिवस जाले; अद्याप त्यांचे जबाब आले नाहीत. नवाबाची इंतजारी हजरत करितात. श्रीमंतांस तुम्हीं विनंती लेहुन षादीचे मुकदम्याच्या पत्राचे जबाब बसबब लौकर येत ऐसे टप्यावर लौकर लिहावें, ह्मणेन बोलण्यात आले. त्यावरुन विनंती की बेविषई. आज्ञा येईल त्याप्रों यांसी बोलण्यात येईल. उत्तराषिषंई आज्ञा सत्वर जाली पाहिजे, रा छ २९ पाबान हे विज्ञापना,