श्री.
चैत्र शु. १ शनिवार शके १७१७.
विनती विज्ञापना. दौलांनी बोलण्यात आणिले की 'हे दिवस होळीचे आहेत. आपण मंडळी सुधा येथे येऊन नाच रागरंग पाहावा' याप्न फार आग्रह केला. यावरुन छ १६ घाबानी दौलांकडे रात्री गेलो. दौलांनी आपले हवेलीपुढे पेक चबुत्रा हजार माणसे बसावया जोगा विस्तीर्ण केला आहे. छ मारी नवाब दौलाकडे येणार म्हणोन दोलांनी राज्याजीचे जाग्यावर फर्ब अलाहिदा करउन नाच रागरंग तेथे आम्हांस बसावयाची जागा केली. इतक्यांत नवाबांनी दौलांकडे सांगुन पाठविलें की 'आज आमचे येणे होत नाही. तुमचा समारंभ होऊ द्यावा.' त्यावरुन राज्याजीकडील जागा तयार केली होती ते राहिले. दौलाचे चबुत्रावरच नाच सुरु जाला. राज्याजी - दिकरुन सर्व मंडळी व दौला होते, अबीर कुमकुम्याचे खाने आणोन पुढे ठेविले, त्याची मार जाली. दोनप्रहर पर्यंत नाच रागरंग जाला. रा छ २९ षाबान हे विज्ञापना.