Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

श्री.   
चैत्र शु. ३ गुरुवार शके १७१६.

विनंती विज्ञापना. छ २ घावानी रात्री दौलांकडे गेलो होतो. राज्याजी व रावरंभा वगैरे होते. दोन घटिका वैठक जाली. इतक्यांत दौलाचे चबुत्र्यावर फर्घ तयार होऊन नवाब आले. बरामद जाले व मजला बोलाउन घेतलें. मर आलम असद अलीखान वगैरे तमाम दरबारची मामुलीं इसमें होती, कितेकांच्या नजरा नवराज्यासमंधे जाल्या असद अलीखानाचे पुत्रास खिताब मनसव वगैरे खानीचेही खिताब सर्फराजी जाली. पुन्हा भांडाचा नाच होता. नबाव मजकडे पाहुन बोलिले की तुम्हीं खाना पाठविला तो बहुत पसंद. त्यापैकीं येक येक पदार्थाचे वर्णन करुन तारीफ केली. दौलाही त्यांस अनुमोदन देत गेले. दोन घटिका बैठक जाली. लोदीखान वगैरे लोकांचे नजराची दाटी होती. साहा घटिका रात्री नवाब बरखास जाले. आणिखी बोलिले कीं येकवेळ बहुत पदार्थ असले ह्मणजे यथास्थित स्वाद सर्वांचा समजत नाहीं. मी सांगुन पाठवीन ते वेळेस दोनतीन पदार्थ करुन पाठवीत जावे, ह्मणजे स्वाद समजेल. जसी आज्ञा होईल त्याप्रमाणे पदार्थ करुन पाठवीन अणोन बोलुन निरोप घेतला. र॥छ २ माहे रमजान हे विज्ञापना.

लेखांक १५६                                                                                                                              १५९८ मार्गशीर्ष वद्य २
                                                                                                                                                 
राजश्री भीमाजी मल्हारी हवालदार व कारकून सा। कोरेगाऊ गोसावीयासि

2 1 अखंडितलक्षुमीअलंकृत राजमान्य

सेवक एसाजी मल्हारी सुभेदार व कारकून पा। वाई नमस्कार सु॥ सबा सबैन अलफ बा। सनद राजश्री राघो बलाल सरसुभेदार माहालनिहाय छ १३ माहे सौवाल पौ छ १४ माहे सौवाल तेथ आज्ञा की वेदमूर्ती नरसीभट बिन रगभट व एकनाथभट बिन रामेस्वरभट चित्राउ सो। कसबे वाई यानी हुजूर येउनु मालूम केले जे आपले इनाम जमीन चावर २ बि॥
मौजे बोरखल चावर १                                   मौजे किणई चावर ..
पसर्णी ..

एकून दोनी चावर आपले इनाम सालाबाद आहे तरी साहेबी दुमाले मिसली कारकुनास दिल्हे पाहिजे ह्मणौउनु तरी याचे इनाम सदरहू गावी आहे त्यास सालगु॥ भोगवटा मनास आणून भोगवटेप्रमाणे दुमाले करणे अनमान न करणे तालीक लेहून घेउनु असल फिराउनु दीगर धर्मादाउ इनाम जा। मा। आहे ते साल गु॥ प्रमाणे दुमाले करणे ह्मणउनु अग्न तरी अग्नेप्रमाणे मौजे किणही सो। कोरे गाउ चावर -॥- नीम बा। भोगवटा सालाबा(द) प्रमाणे दुमाले केले आहे दुमाले कीजे तालीक लेहून घेउनु असल परतोन दीजे छ १५ सौवाल मोर्तब सूद

 

 153                                                        156

[ १५९ ]                                        श्री.                                           २९ नोव्हेंबर १७३८.
                                                                                                   तालीक.                                    

राजश्री जानोजीराव निंबाळकर गोसावी यासीः -
1उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित असिलें पाहिजे राजश्री भगवंतराऊ रामचद्र व राजश्री मोरेश्वर रामचद्र व राजश्री शिवराम रामचंद्र यांचे कुळकर्ण व जोशीपण पुरातन मौजे तांदळी ता। राजणगाव येथील असतां नारो दत्तो व यादो तुकदेव पानगे कुळकर्णास व जोशीपणास नडले होते, आणि कज्या करीत होते त्यावरून मौजे मजकूरचे मुकादम व समाकुल पाढरी बलुते हुजूर आणून इनसाफ मनास आणिता पंडितमशारनिल्हेजें वतन कुळकर्ण व जोशीपण खरे होऊन पानगे खोटे झाले त्यावरून पडितमानिल्हेचे वतनपत्र अलाहिदा करून दिले आहे. तरी तुह्मीं आपलेकडून अमलदारास ताकीद करून कुलकर्ण व जोशीपणाचे वतन सुरळीत चाले तें केले पाहिजे पानगे यास वतनाशीं कज्याकटकट करावया सबध नाही त्याणी यजीदखत लेहून दिल्हे आहे तर पडितमानिल्हेचे वतन सुरळीत चालवणें ह्मणवून अमिलास पत्र देविलें पाहिजे रा । छ २७ शाबान बहुत काय लिहिणें.

श्री.
चैत्र शु. ३ गुरुवार शके १७१६.

विनंती विज्ञापना. बेदरचे किल्यांत नबाव पेशजी राहिले, त्या जायाच्या दुरुस्ती करुन दिवाणखाना व येक दोन मकाणे चांगली तयार केली. मंगळवार पेंट येथे नबाव छ ११ षाबानी दाखल जाल्यापासन वीस दिवस राहिले. सांप्रत माहे रमजान, राजे यांचा महिना. सैर शिकारीस जाणे येणे यांत लोकांस तसदी. यांजकरिता हा महिना किल्यांत राहावे, वैसी तजवीज ठरुन कुल असबाब छ १ रमजानी किल्यांत रवाना केला. छ २ रोज गुरुवारी पांच घटका प्रथम दिवसां नवाब हाथीवर पिस्ताई आंबराईमध्यें सवार जाले. खवासींत दौला व मीर अल। उभयतां होते. सात घटिका दिवसां किले बेदरचे हवलांत दाखल जाले, रमजानचा महिना किल्यांत राहुन मागता मंगळवार पेटेंत येउन राहण्याचाही बेत आहे. मंगळवारांतील जाग्याचा बंदोबस्त चौकी पाहारे आहेत. र॥छ २ माहे रमजान हे विज्ञापना.

लेखांक १५५                                                                                                                              १५९८ मार्गशीर्ष वद्य २
                                                                                                                                                 
राजश्री एसाजी राम हवालदार व कारकून सा। नीब गोसावी यासी

2 1 अखंडितलक्षुमीअलंकृतराजमानी

सेवक एसाजी मल्हारी सुभेदार व कारकुनानी पा। वाई नमस्कार सु॥ सबा सबैन अलफ बा। सनद राजश्री राघो बलाल सरसुभेदार माहालनिहाय छ १३ माहे सौवाल पौ छ मा।र माहे सौवाल तेथ अगन्या की वेदमूर्ती नरसींभट बिन रंगभट व एकनाथभट बिन रामेस्वरभट चित्राउ सो। कसबे वाई यानी हुजूर येउनु मालूम केले जे आपले इनाम जमीन चावर २305बि॥

मौजे बोरखल चावर १                            मौजे किण्ही चावर ..
पसर्णी चावर .॥.

एकून चावर दोनी आपले इनाम सालाबाद चालिले आहे तरा साहेबी दुमाले मिसली कारकुनास दिल्हे पाहिजे ह्मणउनु तरी याचे इनाम सदर गावी आहे त्यास सालगु॥ भोगवटा मनास आणून भोगवटेप्रमाणे दुमाले करणे + + + + + + तालीक लेहून घेऊन असल परतोन दीजे ह्मणउनु अग्न अगनेप्रमाणे मौजे बोरखल सा। नींब जमीन चावर १ एक दुमाले केले असे दुमाले कीजे बा। भोगवटा सालाबाद पाहून दुमाले कीजे तालीक लेहून घेउन असल परताने दीजे छ १५ माहे सौवाल मोर्तब सूद

 

 153                                                        156

छ माारी, दुस-या प्रकर्णी येक पत्र.

–श्रीमंत राजश्री---------------रावसाहेब
--स्वामीचे सेवेसी --------

विनंती.-सेवक गेविंदराव कृष्ण कृतानेक साष्टांग नमस्कार विनंतीं विज्ञपना. सागाइत छ २९ माहें षाबानपर्यंत मुआबदेर येथे स्वामीचे कृपावलोकनेकरून सेवकाचे वर्तमान यथास्थित असे. इकडील कितेक वर्तमान अलाहिदा पत्रांत लिहून सेवेसी पाठविलं त्याजवरुन ध्यानात येईल. सांप्रत राजश्री नाना यांचे सांगण्यावरून रघोतमराव नबाबाकडील यांणी पुर्णियाहुन नबाबास व मुषीरुलमुलुक यांस स्वराज्याचे कलमबंदीचे फडच्याविसी पत्रे लिहिली, त्याजवरून नबाबांनी व कारभारी यांनी मजकुर बोलण्यांत आणिला व अदवनीचे स्वराज्याचे फडच्याविस पत्र राजश्री नाना थम नवाबांनी पत्र लिहिलें ।

कलमबंदी प्रकर्णी गोविंदराव भगवंत यांस पत्रं लिहिली. हा सर्व मजकुर सविस्तर लिहिला आहे. राजश्री नाना शेत निवेदन करतील, त्याजवरुन ध्यानांत येईल. उत्तराविस आज्ञा जाली पाहिजे. सेवसीं श्रुत हाय हे विज्ञापना,

र॥छ २ माहे रमजान रवानगी टप्यावरुन.
श्रीमंत रावसाहेब यांस मामुली हवाल्याचे पत्र,

यार घटिका दिवस शेष अतां नवराज्यांची साअत हैदराबादेहुन नवाजवं. अलीखानाने पोषाग तयार करउन पाठविला तो गुजरा ( णिला ). च्यार घटिका दिवस राहतां पोषाग घेऊन नवराज्याचा समारंभ शुरु जाला. दौलाची अर्जी गुजरली. पांच घटिकां रात्री नवाब जनान्यासहित दौलाचे मकानास आले. बरामद होऊन दौला व मीर आलम व सलाबतखां वगैर इसमांचा सलाम जाला. नवरोजीच्या नजरां दौलां वगैरेनीं केल्या. दिल्लीवाले कंचनीचा नाच जाला. बहलोलखान वगैरेस खिताब सर्फराजी जाली. अतषबाजी रोशनी पाहून प्रहर रात्री आपले हवेलीस गेले. छ १८ रोज शुक्रवारी दोन घटिकां दिवसां नवाब सवार होऊन शिकारीस गेले. तेथुन उमदा बेगमचे बागांत आले आमराईमधे भोजन व आराम करुन येक प्रहर पांच घटिका दिवसां हवेलसि आले. रात्री दौलाची अर्जी गुजरली. येक प्रहर पांच घटिकेस कंचन्याचे नाचाचा बंदोबस्त होऊन नाच व अतषबाजी जाली. छ १९ रोज मंदवारी येक प्रहर येक घाटेकां दिवाणखान्यामधे नवाब बरामद जाले. रायराया यांनी खाना पाठविला, तो गुजरला. येक प्रहर पांच घटिकेस बरामद होऊन मीर पोलादअली व सुभानअली व तेमुरअली व झुलफुकारअली साहेव जादे च्यार यांच्या ख्वाबगामध्यें बलाऊन घेतले. त्यांनी नजरा केल्या. भोजन जालें, च्योर साहेब जादे यांस च्यार फुलाचे हार दिल्हे. त्यांस वाटें लाविलें. ते आपलाले मकानास गेले. पागेकडील बारागरांच्या नजरा घेऊन दोन प्रहरास बरखासे जाले. रात्री दौलानी अर्ज गुजरली, जनान्याचा बंदोबस्त व नाच होता. छ २० रोजी रविवारी चौघे साहबजादे यांचे जनान्याची याद केली. ते जनाने देवढाने येऊन त्यांचे भोजन जालें. दिवसां दरबार नाही. रात्री चार वटिकेस नवाब दौलाचे मकानास आले. जनान्याचा बंदोबस्त होउन दौलांचा व गफुरजं. गचा व मीर आलम याचे जनान्याचा नजरा जाल्या. सात वटिकेस चां. दणीचे फर्मावर नवाब बरामद जाले. दौला व मारआलम व रायराया वगैरे मामुली लोकांचा सलाम जाला. नजराही कियेकांनी केल्या. रानीची याद केली. ते आले. सलाम जाला, दिलेवाले कंचनीचा नाच होता. दौला, रावजी । मीर आलम तिघांस खिलवत होते. येक प्रहर पांच घटिकेस बरखास जाले, छ २१ रोज सोमवारी प्रातःकालीं नवाब सवार होउन नागझरीस गेले. सैर करुन येक प्रहर चार बटिकेस आले. रात्री खैर सला. छ. २२ रोज मंगळवारीं तीन घटिका दिवसां नवाब सवार होउन गेले. सैर करुन येक प्रहर पांच घटिकेस आले. प्रहर दिवस असतां किल्यांतील छपरास आग लागुन दोन चार घरे जळाली. रात्री पांच वटीकेस दौलाचे मकानास..नवाब गेले. साहेबजादे व दौला पागावाले वगैरे मामुली इसमांचा सलाम होउन नजरा जाल्या. रावजीची याद केली. ते आले. दौला व रावजी उभयतांसी खिलवत जालें. साहेबजादे आदिकरून मनसब व खिताब सर्फराजी जाली. कंचन्याचा नाच होता. येक प्रहर पांच वटिकस बरखास जाले. छ २३ रोज बुधवारी तीन घटका दिवसां नवाब सैर करावयास गेले. येक प्रहर च्यार घटिकेस आले. च्यार घटिका दिवस राहतां असद आलखान आल्याचा अर्ज जाला. मगरबाचे समंई मीर पोलादअली वगैरे साहेबजादे चैथे हजर होउन त्यांनी सर्फराजीच्या नजरा केल्या. चौघांस गुलाबाचे हार दिल्हे. ते आपले ठिकाण्यास गेले. पांच घटिका रात्री नवाब दौलाचे मकानास आले, दौला व असद आलीखान वगैरे लोकांचा सलाम जाला, असद आलीखा व त्याचे पुतण्यास खिताब मनसत्र सर्फराजा जाली. दिलेवाली कंचनीचा नाच पाहुन येक प्रहर पांच घाटकंस हवेलीस गेल, छ २४ रोज गुरुवारी तीन घटिका दिवसां नवाब सवार होउन अभानुदीन साहेबाचे गुमजाकडे गेले. पागीवाले व अर्जबेगी वगैरेचा सलाम जाला । सवदागरी उट कसे पंचावन पाहिले. पसंद करुन दाग करण्याचा हुकूम जाला, गुमजापुढे पैनास रु देउन येक प्रहर दान घटिकेस हवेलीस आले. 

रात्रीं दौलाची अर्जी गुजरली, छ २६ रोज शुक्रवारी देन घटिका दिवसां बामणी बादषाहचे गुमजाकडे नवाब सवार होउन गेले. तेथून बंदै नवाबाचे वस्तादाचे गुमजापासीं जाउन शंभर रु॥ पुढे ठेविले. कबरेवर किमखावी चादर वातला. फात्या देउन भेाजन जालें. दीन प्रहरीच अमलांत हवेलीस आले. रात्रौ दैलाची अर्जी गुजारली. छ २६ रोज मंदवारी व्यार घटिका दिवस नवाब बागामधे जनान्यासहित गेले. आषज्याउलमुलुक दारोगे बवचीखान यासे खाना यहतीयातीने रावजीकडील घेउन येणेंयाचा हुकुम जाला, ते आले. ते खाना घेऊन नवाबांकडे गेले. भोजन जालें, देान प्रहरास हवेलीस आले. रायचुराहून मुस्तकीमजंग व अनवरुदाला वगैरे आले. खजीन वगैर सरंजाम अदानी रायपुरचा आला, अर्ज जाला. रा छ २९ षाबान हे विज्ञापना.

लेखांक १५४                                                                                                                              १५९८ मार्गशीर्ष वद्य १
                                                                                                                                                 
राजश्री अमाजी कान्हो हवालदार व कारकून सा। हवेली गोसावीयासि

2 1 अखंडितलक्षुमीअलंकृतराजमान्या

सेवक एसाजी मल्हारी सुभेदार व कारकून पा। वाई नमस्कार सु॥ सबा सबैन अलफ बा। पत्र राजश्री              सरसुभेदार माहालानिहाय तेथे आज्ञा की वेदमूर्ति नरसीभट बिन रगभट व एकनाथभट बिन रामेस्वरभट जुनारदार सो। का। मा। हुजूर येउनु मालूम केले आपणास इनाम जमीन चावर ॥ दर सवाद मौजे पसर्णी सा। हवेली पा। मा। सालाबाद चालिले आहे तरी साहेबी दुमाले केले पाहिजे ह्मणउनु तरी त्याचा इनाम सदरहू गावी आहे त्यास सालगु॥ प्रमाणे बा। भोगवटा मनास आणौन दुमाले करणे तालीक लेहून घेउनु असल परतून दीजे ह्मणउनु आज्ञाप्रमाणे दुमाले केले असे दुमाला कीजे छ १४ सौवाल तालीक लेहून घेउनु असल परतून दीजे

 

श्री.
चैत्र शु. १ शनिवार शके १७१७.

विनंती विज्ञापना. कडपे प्रांती जमीदार मुफसद यांनी जमियत धरुन हंगाम केला. याचे बोभाट नवाबांकडे आल्यावरुन असद अलीखान यांस जमियत सुध कडप्याकडे बंदो xxx ( पुढील पृष्ठे गहाळ झाली आहेत.) पृष्टांक ३४९.

( गु ) लाबाची फुले आली ती गुजरली. रात्री दोन घटिकेस चौबी बंगला उभा करविला. छ १४ रोजी सोमवारी च्यार घटिकां दिवसां नवाब बंगल्यामधे बरामद जाले. पागावाले व अर्जबेगी वगैरे लोकांचा सलाम जाला. नाच पाहुन प्रहराचे अमलांत बरखास जाले. रात्री दोन घटिकेस दलांनी सिकंदरज्याहा साहेब जादे यांस पोषाग येक खाने व जवाहिर किस्त येक व मिटाई पान फुले वगैरे सरंजाम मुनीमुदौला समागमें पाठविला. तीन घटिकेस नवाब दौलाचे मकानास आले. दौला व मीर
आलम व पागावाले व रामराया वगैरेचा सलाम जाला. कंचन्याचा नाच । होता. दौला व मीर आलम यांसी बोलणे होऊन येक प्रहर च्यार वटिका रात्रीं बरखास जालें. छ १५ मंगळवारी तीन घटिका दिवसां नवान सवार होऊन नागझरीकडे गेले, सैर करून उमदा बेगमचे बागांत आले. भोजन होऊन येक प्रहर साहा घटिकां दिवसां हवेलीस आले. रात्री दौलाच अजी गुजरली, छ १६ रोज बुधवारी दोन घटिकां दिवसां नवाब सवार होऊन शिकारीस चिते समागमे घेऊन गेले. शिकार जाली नाही. नागझरीस येऊन तेथे भेाजन करुन आराम केला. (प्र) हरास हवेलीस आले. रात्री दौलाची अर्जी गुजरली. तीन घटिकेस बंगाल्यामध्ये नवाब बरामद जाले. पागावाले अर्जबेगी वगैरेचा सलाम जाला, नाच कंचन्याचा भाउचा व अतषबाजी व रोशनी जाली. छ १७ रोज गुरुवारी पांच घटिका दिवसां नवाब नागझरीकडे सैर करुन येक प्रहर पांच घटिकेस आले.

श्री.
चैत्र शु. १ शनिवार शके १७१७.

विनंती विज्ञापना. शिमग्याचे दिवसांत पागावाले यांस नाच पाहण्याकरितां वर्षास आम्हीं बोलावीत असत. त्याप्रों सालमारी घांसीमियां व अजमखान व सर बुलंदजंग यांस बोलाविलें. अजमखान घांसींमया यांनी नवाबांच परवानगी घेऊन छ १४ घाबानी रात्रीं आले. नाच रागरंग जाला, सर बुलंदजंग यांनी सांगोन पाठविलें की हजुरची परवानगी घेऊन उदईक येतो, त्याप्रो जंग मजकुर छ १८ रोजी आले होते. नाच पाहुन अतरे पान दान देऊन रुसकत केले. राा छ २९ माहे घाबान हे विज्ञापना.