श्री.
चैत्र शु. १ शनिवार शके १७१७.
विनंती विज्ञपना. राजश्री कल्यः पराव हरराव यांस यांनी रुखसत देउन पुण्याकडे रवाना केलें. ३ २३ घाबानी येथुन मारनिले मैलारास जाऊन राहिले, दर मजल जाणार. हरराव यांस पाठवावयाचे कारण बारीक रितीने शोध कारतां समजण्यांत आलें. महादजी सिंद यांचा नवाबासी तहनामा दोस्तीचा पेशजी जाला आहे. त्यांचा काल जाला. हाली दौलतीवर राजश्री दौलतराव सिंदे कायम जाले. त्यांस पूर्ववतुप्रमाणे दोस्तीचा सिलसिला प्यारी राहावी. पहिला तहनामा जाला त्याप्रमाणें सांप्रत नवा तहनामा दौलतराव यांचा व्हावा या विषईचे साधनार्थ करुयाणराव व बाबाराव तेथे आहेत. कितेक बारीक मोठे प्रकार लिहिण्यांत कोठवर लिहावे ? खान करीस्त दौलांनी हरराव यांस बोलण्यांत आणुन रवाना केलें. कल्याणराव व बाबाराव यस सर्व मरातब बोलुन अब चिटणसि यांचे विद्यमाने सिल. सिला व नवीन तहनामा पकेपणे करुन घ्यावा, सा हरराव यांची रवानगी केली. जितका प्रयत्न तितका करून पाहावा, हे कारण कुफिया समजण्यांत भालें. रा छ २९ षाबान हे विज्ञापना.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)