Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
चैत्र शु. १३ गुरुवार शके १७१५.
विनंती विज्ञापना. अदवानीस नवाबांनी मुस्तकीमजंग यांस मोजदाद कन पाठविण्याकरितां रवाना केले. त्यांनी जाऊन मोजदाद खजाना व नगदी, जवाहीर, सोने, रुपें, हाथी, घोडे, पागा, रथ, हत्यारे सुधां मोजदाद करुन याद पाठिवली. चौपन्न लक्ष रोकड, सिवाय साने, रुपें व जवाहिर दागिने, घाइ। पागेचीं येकंदर चौदासे; पैकी सातसें सरस व सातसे निरस, हाथी पस्तास, तोफा वगैरे कुल आसबाब अदवानी व रायचूर संस्थानचा तीन करोडीचा मालयत लिहिली आली. रायचूर येथे सिबंदी मोहबतजंगाकडील स्वार व पागेचे बारगीर व गाडद व प्यादे यांनी रायचुरचे किल्याचे दरवाजे बंद करुन गोळी वाजवितात. तलबेचे ऐवजाचा फडशा जाल्यासिवाय किल्याचा दखल देऊ नये, अस अटा बांधिला आहे. हे वर्तमान आल्यावरून येथून यांनी असद आलिखान यास त्यांचे जमियत सुधां व बराबर मुसारेहमुकडील गाडद येके हजार देऊन रवानगी छ ११ साबानी केली आहे. व्यंकट सुरापुरकर यांस ताकीद गेली आहे की तुह्मीं अमद अलीखान यांस सामिल होणे. खान मार कुच करुन येथुन छ मारी गेले. रा छ १ १ हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
चैत्र शु. १३ गुरुवार शके १७१५.
र।। छ. ११ माहे षाबान डांकेवरुन रवानगी,
श्री.
श्रीमंत रावसाहेब यांस मामुली हवाल्याचे पत्र.
विनंती विज्ञापना, नवाब छ ११ साबान शुक्रवारी जनवाड्याहुने प्यार घटका प्रथम दिवसां सवार जाले. खवासामध्ये दौला व मीर अलम हाथीरख मखमली लाल अंबारीमध्ये होते. प्रहर दिवसां वेदर येथील मंगळवार पेठेत चार पांच मुकाम करुन बोरोचीस जाण्याचा मनसबा आहे. तेथुन गंमा पेठेसही जावयाचा बेत. रंगंमा पैट ह्यणजे हैदराबादचा नीट रुख आहे. अद्यपा कोणता येक निश्चय नाही. ठरेल त्याप्रमाणे विनंती मागाहुन लिहिण्यांत येईल. रा छ, ११ माहे साबान हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १३५ १५९५ मार्गशीर्ष शुध्द १०
(फारसी मजकूर)
अज दिवाण पा। वाई ता। मोकदमानी दुदेह मौजे बोरखल सा। नीब मौजे किणही सा। कोरगाउ पा। मजकूर सु॥ अर्बा सबैन अलफ दरवज बदल इनाम बो। नरसीभट बिन रगभट व एकनाथभट बिन रामेस्वरभट सो। का। मजकूर यास इनाम जमीन चावर १॥ दीड दर सवाद दुदेह
मौजे बोरखल चावर १ मौजे किणही चावर .॥.
एणेप्रमाणे दो। माहासूल नखतयाती व खा। गला व तूप व बाजे उजुहाती कुलबाब कुलकानू बा। खुर्दखत मुकासाइयानी माजी व खुर्दखत हाली कारकीर्दी साबिका दर साल सन सलास छ ६ माहे रबिलाखर सालगु॥ सादर जालेप्रमाणे भोगवटा मिसेली ठाणा दर सालगु॥ छ १२ रजबू जैसे चालिले असेल तेणेप्रमाणे सन तल मजकूर अवलाद व अफवाद चालवीजे तालीक लेहून घेऊन असल परतून दीजे मोर्तब सूद
तेरीख ८ माहे रमजान
रमजान बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री. चैत्र शु. १२ बुधवार शके १७१५
श्रीमंत राजश्री-------------------राव
माहेब स्वामीचे सेवेसीं......................
विनंती. सेवक गोविंदराव कृष्ण कृतानेक साष्टांग नमस्कार विनंती विज्ञापना. तो छ १० माहे षाबान मुकाम जनवडी येथे स्वामीचे कृपावलोकनेकन सेवकाचे वर्तमान यथास्थित असे विशेष. सरकारांतुन छ १६ माहे रजबचें पत्र सादर जालें तें छ २६ माहे मारीं पावले. त्यांत माहादजी सिंदे यांस आठ दहा दिवस पर येत होता. नंतर वायूची भावना होऊन माघ शुदः प्रयोदशी प्रहर रात्री देवाज्ञा जाली. सरकारचे पदरचे मातबर सरदार होते, ईश्वरी इच्छेस उपाय नाही. ह्मणोन आज्ञा. ऐसियास यासंबंधे नवाबास सरकारचे थैलीपत्र होते ते नवाबांकडे मी जाऊन प्रविष्ट केले. पत्र वाचून पाहिल्यानंतर नवाबांचे बोलण्यांत आलें कीं ६ माहादजी राव सिंद राव पंत प्रधान यांचे सरकारचे मातबर उमदा सरदार, हिंदुस्थान प्रांत कामेही मोठी मोठीच अंमलांत येऊन बंदोबस्त खातरखा केला. असे मनुष होणे दुर्लभ ! याप्रो बोलले. सिंदे यांचे नातु दौलतराव, त्यांस त्यांचे दौलतीची बाहाल सर्फराजी सरकारांतून होउ! याचा मार नवाबांचे पत्र होता, तो पाहून बोलले की बाहाली सर्फराजी होणे उचित आहे. सिंयांची बहुत तारीफ नवाबन के, नंतर बोलले की “ नजर घेतल्याशिवाय सर्फराजा केली हे मोठी गोष्ट केली. याजवर मी उत्तर केलें नोकर खाविंदाचे कामावर ज्याफिषानी करुन चाकरी करत त्या नोकराचे मुलाची सर्फराजी खाविंदांनीं न केलीयास मग खाविंदी ती काय? दुसरे नोकराचा दिल साहेबचाकरीस कसा वोदेल! वावि (द) आपले नोकरास लेंकराप्रमाणे संरक्षण करितात ही नजर आहे। अणोनच नौकर ज्याफिषानी करावयास हजर आहे. श्रीमंताचे सरकारची हमेषापासून ही चाल आहे ऐसे खचून बोलिलों, याजवर नवाब थोडेसे कळत न कळत बसून बोलिले की तुह्मीं बोलती हैं दुरुस्त आहे. रा छ, मार सेवेसीं श्रुत होय हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १३४ १५९५ मार्गशीर्ष शुध्द १०
(फारसी मजकूर)
अज दिवाण पा। वाई ताहा मोकदमानी कसबे वाई पा। मजकूर बिदानद सु॥सन अर्बा सबैन अलफ दरवज बदल इनाम बो। गिरमाजी त्रिबक इनामदार सा। का। मजकूर यास इनाम जमीन चावर १ एक दर सवाद का। मजकूर देखील महसूल नखतयाती व खा। गला व तूप व बाजे उजुहाती कुलबाब कुलकानू बा। खु॥ वजीर मुकासाइयानी माजी चालिले प्रमाणे खुर्दखत हाली कारकीर्दी साबिका दर साल सन समान सितैन अलफ छ ६ माहे रबिलाखर पौ छ सादर जाहाले त्याप्रमाणे बा। भोगवटा मिसेली ठाणा दर साल गु॥ छ ५ रजबू जैसे चालिले असेल तेणेप्रमाणे सन तल मजकूर अवलाद व अफवाद चालवीजे तालीक लेहून घेऊन असल परतून दीजे मोर्तब सूद
तेरीख ८ माहे रमजान
रमजान बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
चैत्र शु. १२ बुधवार शके १७१५.
छ १ ते छ, १० साबान पावेतों नवाबाची मामुली अखबार,
श्री.
चैत्र शु. १२ बुधवार शके १७२५.
श्रीमंत राजश्री-------------रावसाहेब
--स्वामीचे सेवेसीं-------------------
विनंती. सेवक गोविंदराव कृष्ण कृतानेक सां नमस्कार विनंती विज्ञापन ता। छ १० माहे सावानपर्यंत मु। जनवाडा येथे स्वामीचें कृपावलोकनेकरुन सेवकाचे वर्तमान यथास्थित असे विशेष. सरकारांतुन छ २६ माहे जमादिलावरची पत्रे, नवाबाचे पत्राचा जाब-इंग्रज प्रकर्णी दफातीचा सहित रवानगी जाली. ती पत्रे छ ४ रजब पावली आज्ञेप्रो खरीतापत्र प्रविष्ट करून यासंबंधे मजकुर यांस बोलण्यात आला. सरकारचे थैलीपत्राचा जबाब मागितला. तजवीज ठरून तयार करवून देवितों ऐसे बोलिले. त्यास त्याजवर इकडून जबाबविषई निकड केली नाहीं. जबाब लौकर घेऊन पाठविण्याची आज्ञा आल्यास निकड करून जबाब घेऊन रवाना करीन. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १३३ १५९५ मार्गशीर्ष शुध्द १०
(फारसी मजकूर)
अज दिवाण पा। वाई ता। मोकदमानी देहाय पा। मा। सुरुसन अर्बा सबैन अलफ दरवज बदल धर्मादाउ बो। नरसीभट बिन रगभट चित्राउ सा। का। मजकूर यास धर्मादाउ बा। खुर्दखत वजीन मुकासाइयानी चालिले प्रमाणे खुर्दखत हाली कारकीर्दी साबिका दर साल सन समान सितैन अलफ छ ६ रबिलाखर पो छ सादर जालेप्रमाणे भोगवटा मिसेली ठाणा दर सालगु॥ छ ५ रजबु सालिना बा। तुटपटी सादिलवारपैकी होनु १० दाहा बिता।
१ मौजे गोवे १ मौजे माहागाउ
१ मौजे खेड १ मौजे सिवथर
१ बोरखल १ अरुले
१ कोरगाउ १ अरफाल
----- १ पसर्णी
४ ---------
६
येणेप्रमाणे सालगु॥ चालिले असेल तेणेप्रमाणे सन तल मजकूर अवलाद व अफवाद चालवीजे तालीक लेहून घेऊन आसल परतून दीजे मोर्तब सूद
तेरीख ८ माहे रमजान
रमजान बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
चैत्र शु. १२ बुधवार शके १७१५.
विनंती विज्ञापना. दौलतराव सिंदे यांनी दैवलांस व नवाबांस पत्रे कारकुनासमागमें कल्याणराव व बाबाराव यांचे पत्रांसहित हरराव यांजकडे आली. त्या कारकुनास प्रथम दीलांस भेदऊन छ, ७ साबानी नवाबाची मुलाजमत केली. पत्रे प्रविष्ट करुन जिनस, नवाबांस पाषाग, बिलेरी रिकाम्या, प्याले, व मोमबतीचे दुघलां येक शालो याप्रो जिनस गुजरा णिली, ऐसें वर्तमान ऐकिलें. हरराव याचे मारफात गुजरले. त्याजवरून बोलण्यांत की दौलतराव यांजकडुन आलें, मनांत येण्यास हेच कारणही आहे. र॥ छ, १० षाबान हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
चैत्र शु. १२ बुधवार शके १७१५.
विनंती विज्ञापना, करोडगिरीचे काम कृष्णमा यांचा पुत्र व त्याचे नायब हासन अलीखां यांजकडे होते ते तगीर करुन सिदी इमाम यांचा साडू नूर महमदखां यांजकडे करार होऊन छ ५ साबानीं त्यास करोड गिरीचा खिलत दिल्हा. करोडगिरी व पंचत्रा देन्हीही कामें नूर महमदखां यांजकडे जालीं. ॥ छ, १० घाबान हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १३२ १५९५ मार्गशीर्ष शुध्द १०
(फारसी मजकूर)
अज दिवाण पा। वाई ता। मोकदमानी मौजे पसर्णी सा। हवेली पा। मा।र सु॥ सन अर्बा सबैन अलफ दरवज बदल इनाम बो। नरसीहभट बिन रगभट चित्राउ सो। का। मजकूर यास इनाम जमीन चावर ॥ नीम दर सवाद मौजे मजकूर थल वाकेवाडी नजीक सिदनाथवाडी वाट माभलेस्वर दर सवाद मौजे मजकूर दो। माहासूल नखतयाती खा। गला व तूप व बेलेकटी व मोहीमखर्च व ईद कार गुजारी व हेजीब मु॥ कुलबाब कुलकानु बा। खुर्दखत वजीर मुकासाइयानी माजी चालिलेप्रमाणे खुर्दखत हाली कारकीर्दी साबिका छ ६ रबिलाखर पौ छ दर साल सन समान सितैन अलफ सादर जाले तेणेप्रमाणे भोगवटा मिसेली ठाणा दर सालगु॥ छ ५ रजबू जैसे चालिले असेल तेणेप्रमाणे सन तल मजकूर अवलाद अफवाद चालवीजे (तालीक) लेहून घेऊन असल परतून दीजे मोर्तब
तेरीख ८ माहे रमजान
रमजान बार