Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १३९ १५९६ मार्गशीर्ष शुध्द २
अज दिवाण पा। वाई ताहा मोकदमानी दुदेह
मौजे खेड मौजे तडवले बु॥
सा। कोरगाउ पा। मा। सु॥ खमस सबैन अलफ दरवज बदल इनाम बो। आपदेभट बिन विस्णुभट चित्राउ जुनारदार सो। का। मा। यास इनाम जमीन चावर १ एक दर सवाद दुदेह
मौजे खेड चावर .॥. मौजे तडवले बु॥ चावर .॥.
येणेप्रमाणे दो। महसूल नखतयाती व खा। गला व तू बाजे उजुहाती कुलबाब कुलकानू बा। खु॥ वजीर मोकासाइयानी चालिलेप्रमाणे खुर्दखत हाली कारकीर्दी साबिका सादर जाहले असे तेणेप्रमाणे भोगवटा मिसेली ठाणा दर सालगुदस्ता छ ८ माहे रमजान प्रमाणे जैसे चालिले असेल तेणेप्रमाणे सन तल मजकूर अवलाद व अफवाद चालवीजे तालीक लेहून घेउन असल परतून दीजे मोर्तब सूद
तेरीख ३० माहे शाबान
शाबान
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १४९ ] श्री. १७३६.
राजश्री भगवतराव अमात्य हुकुमतपन्हा गोसावी यासी - सकलगुणालकरण अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने।। संभाजी आंगरे सरखेल रामराम विनति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन केलें पाहिजे. विशेष आपला आमचा हर्शामर्श बसला आहे. त्यास आपली आमची गोडी होऊन पूर्व स्नेहाप्रमाणें आपण आह्मी वर्तावें हेविषयी राजश्री गोविंद शेट याणीं विनति केली, त्यावरून आपणास हें पत्र लिहिले आहे. तरी प्रेमाची अभिवृद्धि होऊन दिन प्रतिदिन स्नेह चाले तो अर्थ चित्तास आला तरी करावा. चित्तास न ये तरी तसेंच उत्तर पाठवावें. श्रीकृपेनें होतां होईल तें होईल. चित्तास न ये तरी तसेच उत्तर पाठवावें. श्रीकृपेनें होता होईल तें होईल जाणिजे रा। छ २९ माहे जमादिलावल. बहुत काय लिहिणें लोभ असो देणें., हे विनंति.
मोर्तबसूद. ˜ श्री °
श्रीमत्कान्होजी
संभूतशंभोः शत्रू
ज्जिगीषतःll वर्धिष्णू
राजरेखेव मुद्रा भद्रा
विराजते ll
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १३८ १५९६ कार्तिक वद्य ३
(दोन ओळी फारसी मजकूर)
अज दिवाण पा। वाई ता। मोकदमानी कसबे वाई पा। मजकूर सु॥ खमस सबैन अलफ दरवज बदल इनाम बा। गिरमाजी त्रिबक इनामदार सो। का। मा।र यास इनाम जमीन अवल चावर १० एक सवाद का। मा।र दो। महसूल नखतयाती व खा गला वा ऊद व बाजे उजुहाती कुलबाब कुलकानु बा। खु॥ वजीर मुकासाइयानी माजी चालिले प्रमाणे खु॥ हाली कारकीर्द साबिका दर साल आज समान सितैन अलफ छ ६ माहे रबलाखर पौ। छ माहे सादर जाहाले तेणेप्रमाणे बा। भोगवटा व मिसेल ठाणा दर सालगु॥छ ८ रमजान जैसे चालिले असेली तेणेप्रमाणे सन तल मजकुरास दुमाले केले असे दुमाला कीजे तालीक लेहून घेऊन असल परताऊन दीजे मोर्तब सूद
तेरीख १७ माहे शाबान
शाबान बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १४८ ] श्री.
˜ श्री °
श्रीमत्कान्होजीसंभूत
शंभो. शत्रूज्जिगीषत. ।
वर्धिष्णू राजरेखेव मुद्रा
भद्रा विराजते ।
राजश्री नारो पंडित गोसावी यांसीः - सकलगुणालंकरण अखडितलक्ष्मी अलंकृत राजामन्य स्ने।। सभाजी आंगरे सरसुभेदार आरमार रामराम विनति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन केलें पाहिजे. विशेष स्वामीनी पत्र पाठविलें प्रविष्ट होऊन संतोष जाला बहुमानयुक्त आपला गौरव करावा आणि तसेंच सौरस्य चालवणे असेल तरी शिबिका पाठवावी ह्मणून लेख केला तरी आपला पैशारोख्याचा विषय काय आहे ? याउपरि चित्तात काहींएक न आणितां यावयाचें करणें. पालखी घोडे पाच पाठविले आहेत पत्र पावतांच स्वार होऊन यावें. अनमान न करावा. आपली आमची भेटी झालियावरी इष्टापूर्तीची भाषणें होऊन परस्पर संतोष होईल. बहुत ल्याहावें तों आपण सर्वज्ञ आहेत कृपा वर्धमान करावी हे विनंति रा। कृष्णाजी अनत पाठविले आहेत जबानी सांगतील. लौकर आलें पाहिजे हे विनति.
मोर्तबसूद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
चैत्र शु. १२ गुरुवार शके १७१५.
श्रीमंत राजश्री-------------------------------रावसाहेब
स्वामीचे सेवेसी
विनंति सेवक. गोविंदराव कृष्ण कृतानेक सा नमस्कार विनंति विज्ञापन ता छ ११ माहे घाबानपर्यंत स्वामीचे कृपेंकरून मुा बेदर येथे सेवकाचे वर्तमान ययास्थित असे विशेष. कितेक मार राजश्री गोविंदराव भगवंत यांचे पत्रांत लिा आहे. स्वामीसेवेत विनंति करतील त्याजवरून ध्यानांस येईल. अधिक उणे शब्द असतील त्याविषई क्षमा असावी. पत्रांतील मार मनन होउन उत्तराविषुषी आज्ञा जाली पाहिजे. सेवेसीं श्रुत होय है विज्ञापना.
विनंति विज्ञापना येसीजे. नवाब निजामली खान यांनी सवाई नाईक ह्मणन येक जासुदीचा नाइके पुण्यास व नाशकास पाठविला, येविर्षीची विनंति पेशजी सेवेत लिा आहे. नाईक मार तिकडे येऊन अजिमुदौला यांचा शोध लाऊन येथे आला. त्याने मुधीरुलमुलुक व नवाब यांस सांगिसलें कीं अजिमुदौला यांस श्रीमंतांनीं आश्रय दिल्हा आहे. गोविंदराव कृष्णही या कामांत आहेत. कोणी कारकुन व हुजरे गुण्याहून गेले होते. याप्री त्याने सांगितले त्याजवरुन नवाब व कारभारी मला पुसणार आहेत सणोन येक खबर यैकिली. पुस्तील असा निश्चय नाही. परंतु कदाचित पुसल्यास याविषीं काय उत्तर करावें याविषी आज्ञा जाली पाहिजे. स्वामी ह्मणतील तुम्ही या गोष्टीची समजुत नसतां सरकारांत लिहिलें याचे कारण काय ? त्यास सरकारविषई तर माझी खातरजमा. परंतु पुर्वी येक गोष्ट माझे वैकण्यांत आली की अजिमुदौला यांनी राव शिंदे यांसी साधन केले. त्याजवरून त्यांनी अंगिकार कदाचित केला असेल. राव सिंदे याचा काल जाला. त्यांनी ज्यांस आश्वासन दिले ते त्यांचे पाठीमागें सरकारांतून पाठ थोपटून पार पाडणें प्राप्त. + + + + +. ( पुढील पुठे गहाळ ) झाली आहेत. सं.) + + + + पृष्ट ३३८.
४ पापड.
२ मुगाचे
तळे १ भाजलें १.
--------
२
२ उडदाचे तळीव व भाजले.
-----
४
१ काढी ताकाची.
१ सांबारें चाकवताचे.
१ मठा.
५ भाज्या.
१ वांगी सगळी मसालेदार,
१ सुरणाची.
१ पांढरा भोंपळा.
१ मेथीची.
१ अंबाड्याची.
---------
५
११ दफे चटप्या.
१ कोथिंबिर, लमण, ३४.
१ तिळाची,
१ जवसाची.
१ कारल्याची.
१ अंबसलाची.
१ हरभरे याचे डाळीची
१ उडदाच डाळाचा.
१ आल्याची.
१ फक्त भिरच्याची लाल,
१ निवे,
१ पंच्यामृत मिरच्याचे.
-------
११
१ आंब्याचे लोणचे,
१ दूध.
१ साखर.
--------
५३
सदर प्रमाणे सरंजाम नवाबांकडे व दौलांस व आषजाउलमुलुक यांस
छ २० षाबान,
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
चैत्र शु. १३ गुरुवार शके १७१५.
विनंति विज्ञापना. तेगबंगाचा पुत्र शमसुल उमरा यांस नवाबांनी आपली नात, नक्षाबंदी बेगम मोहबतजंग यस दिल्ही तिची कन्या, देण्याची योजना केली, व तेगजंगाची कन्या ज्याहांदार ज्याहासाहेब जादे यांस करावी ऐसा बेत ठरऊन अजमनुलमुलुक सरबुलंदजंग यांस सांगितले. त्यांनी अर्ज केला की ‘ हाजरतीस शरीरसंबंध करणे आमची काय योग्यता आहे ! नवाबांनी सांगितलें "दोन्ही माझींच! चित्तास येईल तसे करीन. तुम्हांकडे काय आहे !' याप्रों होऊन दोन्हीं षाद्या कराव्या ऐसे आहे. परंतु तेगजंग यांची बायको. मुलाची मातुश्री–हें कबुल करणार नाही, असे वाटते. मग पाहावे, रा छ ११ साबान हे विज्ञापना.
दफे अलाहिदी.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १३७ १५९५ पौष शुध्द ६
(फारसी मजकूर)
अज दिवाण पा। वाई ता। मोकदमानी देहाय पा। मजकूर सु॥ अर्बा सबैन अलफ बा। खु॥ रा। छ ६ रबिलाखर पौ छ २८ मिनहू सादर जाहाले तेथे रजा जे दरीविले बो। नारायणभट बिन एकनाथभट औलियाद रामेस्वरभट बिन गोपीनाथभट चित्राउ तबीब सो। का। मा।र हुजूर येऊन मालम केले जे आपणासी इनाम व धर्मादाउ दर सवाद देसाद देहाय पा। मजकूर बि॥
इनाम जमीन चावर १॥ धर्मादाऊ तूटपटी पैकी दर साला
.॥. मौजे तलिये बा। खु॥ रणदुलाखान शाहाजादे
.॥. मौजे किणहई होनु ५
.॥. मौजे पिंपरी
----------
१॥
येणेप्रमाणे दो। माहसूल व नखतयाती व खा। गला व तूप व बेलकटी व मोहीमखर्च व तूटपटी व बाजे पिटीया कदीम व जदीद कुलबाब कुलकानु बा। खु॥ मोकासाइयानी माजी कारकीर्दी दर कारकीर्दी भोगवटा व तसरुफाती चालत आले आहे हाली कारकून ताजा खु॥चे उजूर करिताती तरी साहेबी नजर एनायत फर्माउन ताजा खु॥ मर्हामत होय बराय मालुमाती खातिरेसी आणउन सदरहू इनाम जमीन चावर १॥ देहाय ३ पा। मजकूर धर्मादाउ होन ५b पाच तूटपटीपैकी
खु॥ जैसे चालिले असेल तेणेप्रमाणे दुबाले केले असे दुबाले कीजे औलाद अफवाद चालवीजे दर हर साला ताजा खु॥चे उजूर न कीजे तालीक लेहून घेऊन असल खु॥ इनामदार मजकुरापासी परतून दीजे ह्मणउन रजा तरी बा। रजा सदरहू इनाम व धर्मादाउ पैकी आलाहिदा मिसेली सदरहू इनाम जमीन चावर १॥. दीड बाकी धर्मादाउ होन ५ पाच बिता।
मौजे किणई होन २ मौजे भाडले होन २ मौजे खेड १
एकून होन पाच ५ ऐवज तूटपटीपैकी बा। भोगवटा व तसरुफाती सालाबाद ता। सालगु॥ बा। मिसेली ठाणा दर सालगु॥ छ ७ माहे शाबान चालिलेप्रमाणे सन तल मजकुरास दुमाले केले असे दुमाला कीजे तालीक लेहून घेउन असल मिसेली इनामदार मजकुरास परतून दीजे मोर्तब सूद
तेरीख ४
शौवाल
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
चैत्र शु. १३ गुरुवार शके १७१५.
विनंति विज्ञापना. लस्करांत धारण माहाग सा पेशजी नवाबांनी दौलांस ताकीद केल्यावरून सांप्रत दौलांनी नुरमहंमदखान करोडगिरी देऊन महसुल व पंचत्रा मुकरर करून दिल्हा. बेपारी बणजारे यांस कौल देऊन गल्याची अमदनी करणे याची तजवीज केली आहे. पंनास हजार बैल सरकारची कोठी आसपास वीस कोसपर्यत तालुकियांतील गला किफायत वारं खरेदी करून वैलावर लस्करांत आणून कोटींत जमा व्हावा. बाजारात विकरी वेपारी उदमी यांनी काठांपैकीं खरेदी करुन करावी, यैसी तरतुद केली आहे. रा छ ११ सावान हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
चैत्र शु. १३ गुरुवार शके १७१५.
विनंति विज्ञापना. गजींद्रगड तालुकियांत घोरपडे यांचा हंगामा भारी. दखल नाहीं. सबब वलीहसनखान यांस पेशजी येथून जमियतसुधां खाना केले. त्याची पत्रे यांस आली की घोरपडे याजपास जमियत चांगले हाजुरांतून कुमक जमियतीची मजपास असल्याशिवाय तालुक्यांत दखल बोलेत नाही. त्याजवरून गजदगडीकडे फौज व गडद मिळोन येक हजार जमाव येथून मांजी रवाना केला. इंग्रजी दोन पलटणे गजदगडी सुमारे कनकगिरीचे आसपास होती ती रायचुराकडे आणविली ती येणार आहेत. राा छ ११ साबान हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १३६ १५९५ मार्गशीर्ष शुध्द १०
(फारसी मजकूर)
अज दिवाण पा। वाई ता। मोकदमानी मौजे पसर्णी सा। हवेली पा। मजकूर बिदानद सु॥ अर्बा सबैन अलफ दरवज बदल इनाम बो। नरसीहभट बिन रगभट चित्राउ सो। का। मजकूर यास इनाम जमीन चावर .॥. नीम दर सवाद मौजे मजकूर थल वाकेवाउी नजीक सिदनाथवाडी वाट माभलेस्वर सर सवाद मौजे मजकूर दो। माहासूल नखतयाती व खा। गला व तूप व बैलकटी व मोहीमखर्च ईद सु॥ व कार गुजारी व हेजीब मु॥ कुलबाब कुलकानू बा। खुर्दखते वजीन मुकासाइयानी चालिलेप्रमाणे खुर्दखत हाली दर कारकीर्दी साबिका छ ६ रबिलाखर पौ। छ दर साल सन समान सितैन अलफ सादर जाले तेणेप्रमाणे भोगवटा मिसेली ठाणा दर सालगु॥ छ ५ रजबू जैसे चालिले असेल तेणेप्रमाणे सन तल मजकूर अवलादी अफवादी चालवीजे तालीक लेहून घेउन असल परतून दीजे मोर्तब
तेरीख ८ माहे रमजान
रमजान बार