श्री.
चैत्र शु. १ शनिशर शके १७१७.
विनती विज्ञापना, गजीद्रगड तालुकियापैकी घोरपडे यांचे तशफात तालुका आहे त्यास श्रीमंताचे सरकारची व राजश्री परशरामपंतभाऊ यांचं पर्ने पेशजी दिल्हीं असतां इकडील तालुका बागुवस्त करीतात. याजकरितां अहासनखान यांस जभियत सुद्धां रवाना केले. याची इतला लिहिण्याविषई तुह्मांस सांगितल्याप्रमाणे तुम्ही लिहिले असेल. यास फार दिवस जाले. अद्याप श्रीमंतांकडुन जवाब आला नाही. हल्ली पापंगापंत अमील तो गनींद्रगड यांचे पत्र आले की पेशजी तालुक्याचे बंदोबस्तीकरितां पुणियास राय, राव ह्मणोन कारकुन पाठविला होता. दोन तीन महिने तेथे राहुन श्रीमंताचे सरकारची ताकीदपत्रे गडकरी यांस आणिलीं तीं दिल्ही असतां ठाण देण्यास दिकत. त्यावरुन सांप्रत नलिवंगल येथील किल्यास अलीहासनखान यांनी मोर्चे दिल्हे आहेत. याप्रो लिहिले आहे म्हणेन दौलाचे बोलण्यांत आले. रा छ २९ घाबीन विज्ञापना.