Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
ह्मणऊन बोलिला त्यास पादछास बोलिला की, मी मेलो तरी माघारे चालवावे ह्मणऊन माहजर करून देणे की मराठ्याचा वीर आणि मुसलमानाचा पीर आणि उजवे बाजूस मराठ्याची कदुरी आणि डावे बाजूस मुसलमानाची कदुरी आणि त्याचा निमे हक्क व कराहाडबाजेमधे निमे हक्क व बिघ्यास वराई उदबत्यास फकीरफकिराई आणि हक्क मेड्यामधे पाच चावर इनाम व मुजावर सेवेसी ठेवून ह्मणऊन ऐसा माहज करून देणे मग पादछानी माहजर करून माहालदारापासी दिल्हा मग ते वेळेस जानोजी पिसळा स्वार होऊन मेडास आला तेथे येऊन मेडा रोविला मग मेड्यास अकुर फुटले आणि उउचळा जाऊन भाडू लागला तेव्हा शिर्क्याने जमाव केला हपसी आणिले, व श्रुवे आणिले, व फिरगी आणिले, व पायदळ आणिले मग दिवसा च स्वार होऊन, जानोजी पिसळ्यावरी येऊन घातले ते वेळी तेथे बहुतच रणकदन जाहाले आणि तारेवरची जुगली जानोजी पिसळ्या लागली पोटला बाहेर निघाला आणि तैसा च पोटला धरून मेडाच्या तहल्या घेऊन बैसला आणि वरची लस्कर वाईस गेले आणि शिर्के हे फिरोन माघारे गेले मग त्याची बाईल कमळज्या मसुरास बहिणीस भेटावयासी आली होती तिस तेथे स्वप्न पडले आणि राम ठाकूर यासी स्वप्न पडले की तुह्मी गरीतोड भेटीस येणे, नाहीतर बाबाजीराऊ यास व राम ठाकूर हे दोघे जण धाडून घेऊन जाणे ह्मणऊन ऐसे दोघासी हे च स्वप्न पडले मग तेव्हा च बाबाजीराऊ व राम ठाकूर ऐसे दोघे जण दो घोडियावर बैसोन स्वार होऊन सातारावरून गेले दो प्रहरा दिवसा मेड्याच्या रानात गेले तो जानोजी पिसळ्याने हाक मारिली मग ते जवळी आले त्यास बोलिला की माझे शीर कापून नेणे मग त्यास ते बोलिले की आमच्याने शिर कापवत नाही तेव्हा राम ठाकरास बोलिला की, तू तरी माझे शीर कापून नेणे तेव्हा राम ठाकूर बोलिला की, तू आन देणार आणि मी घेणार, हे मज होत नाही ह्मणऊन बोलिला मग ते वेळेस त्यापासी कागद माहजराचा होता तो कागद बाबाजीराऊ यापार दिल्हा मज जानोजी पिसळा बोलिला की, तुमच्या आगावरील शेला खाली पसर ह्मणऊन बोलिला मग शेला खालीं पसरला आणि जानोजी पिसळाने टकरा पस हक घेऊन आपल्या हाते शिर कापून शेल्यावरी ठेविले मग बाबाजीराऊ व रा ठाकूर यानी त्याच्या धडावरील शिळा ररिल्या आणि त्यावरी तुरपती बाधली पूजानमस्कार केला मग तेथून हे दोघे जण निघत होते तो शिर्क्याची धावण आली मग ह्या दोघाची घोडी हिरोन घेतली कोण्हाचे कोण्ह ह्मणऊन विचारिले मग हे बोलिले की त्याचे बाइलेने सोधावयाची पाठविले आहे. ह्मणऊन बोलिले मग शिर्क्यानी आपल्या खवईपासी घेऊन कुडाबादेस नेले तेथे देवदरबार होत तेथे शील होती त्या शिळेवरी नेऊन त्याचे शीर ठेविले मग ते शीर त्याच्या स्वप्नामध्ये गेले की, मी भाडोन जुजाने मेलो आहे आणि ते हि जुजोन भाडो न मिळे, तरी तुह्मी माझ्या शिरास खोळबा करू नका, लाऊन देणे ह्मणऊन स्वप्न पडले मग दुसरे दिवशी त्या शिरास रजा दिल्ही मग तो तेथेच पीर जाहाला मग बाबाजीराऊ व राम ठाकूर यानी खाट्यावरी घेऊन निघाले तो ठाई ठाई पीर च होत आला आणि सातार्याच्या खिडीमधे च पीर जाहाला आणि तेथून कोणेगावच्या वाकणामधे आला तेथे हि पीर जाहाला मग त्याची बाईल मसुरी होती तिज कळले मग ती पालखीमधे बैसोन शिरवड्याच्या गाडेउतरापासी आली आणि शीर तेथे च आले मग त्याचे वाइलेने शिर धुतले आणि तेथे च पीर जाहाला मग ते वेळेस त्याची बाईल बोलिली की, मसुरास घेऊन चला, तेथे सुखसोहळे होतील ह्मणऊन बोलिली मग बाबाजीराऊ यानी तिकडून च कराहाडास घेऊन गेले तेथे बहुत जन लोक मिळाले मग त्याची बाईल बोलिली की मी पतिव्रता असले तरी याचा काही चमत्कार दाखविणे ह्मणऊन बोलिली मग तेव्हा त्या शिराने डोळे उघडिले मग बहुत च आनद जाहाला.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक २
श्री
श्रीजटाशंकर कुळकथा
कराहाडचे देसाई जगदेराऊ राजगर्दल देसमुख त्याच्या बायका दोघी जणी त्याचे लेक चौघे जण वडील वाइलेचा लेक बाबाजीराऊ धागटीचे तिघे जण, वडील रामोजीराऊ, मधला विठोजीराऊ, धागटा दयाजीराऊ ऐसे चौघे जण होते तो बाप माहातारा जाहाला आणिगे झगडू लागले बाप ह्मणउन लागला की तुह्मी झगडू नका तुमचे तुह्मास वाटणी करून देतो ह्मणउन बोलिले मग वडील बाबाजीराऊ यासी मसूरीची पटेलगी व देसमुखी व गाव त्याखाले ऐसे त्यास दिल्हे मग रामोजीराऊ यासी कराड वा आउद व आणखी दोन गाव कराडाखाले ऐसे चार गाव त्यास दिल्हे मग रामोजीराऊ यानी कारभार करावयासी दोघो नाहवी आउदचे मुतालीक कराहडामधें ठेविले व कारकून दोघे रघुनाथपत व आणखी एक ऐसे ठेविले व मोकासा हि दयाजी थोरातास जाहाला होता आणि दिवाणीची रस्त व्होन च्यारसे भरले ते पैकेस दकात घालून ठेविले ते पैके मुतालीक नाहवी यानी दिवाणीच्या रस्ता चोरिल्या ते वेळेस नाहवी व कारकून व मोकासी ऐसे तिघे जण एक जाहले होते मग हे तिघे जण मिळोन रामोजीराऊ व विठोजीराऊ व दयाजीराऊ या तिघा भावास मारावे ऐसे केले मग दोघे भाऊ रामोजी व दयाजीराऊ यासि घरामधे कोडून मारिले मग एक भाऊ विठोजीराऊ मसुरास पळोन आला मग ते वेळेस बाबाजीराऊ बोलिले की तेथील गमाविलेस आणि येथील हि गमावयासि आलास ह्मणऊन बोलिला मग तेव्हा विठोजीराऊ ते वेळेस बेदरच्या पादछाकडे लाऊन दिल्हा, तो तेथे च चाकरीस लागला मग पेडगावीची पटेलकी व मोकासा घेतला तो कारकून कराहापडची मुतालकी करीत होते ते मारून काढली हणमततटीस मुशारपण करून पोटे भरू लागले मग तेव्हा तारगावीची पटेलकी ते हि आमची च आहे मग तेथे मुतालीक ब्राह्मण ठेविले मग त्या ब्राह्मणानी चाकर ठेविले, काळीगडे आणि खोचरे हे दोघे जण ठेविले, आणि ते बापलेक काशीस दोघे चालिले. मग हे वाटेस कोळीगडा व खोचरे यानी मारिले मग हे दोघे जण पटेलकीसाठी भाडू लागले तेव्हा खोचर्याने घोरपडे पाटिलासी मिळविले मग हे दोघे जण खाऊ लागले कुडलचे पाटिलाच्या दोघी लेकी होत्या, कमळज्या व कुष्णा ऐशा होत्या. मग बाबाजीराऊ यासी दिल्हे कुष्णास आणि दुसरी जानोसी पिसळा यासी कमळजा दिल्ही मग जानोजी पिसळ्या हे शार बेदरी पादछापासी चाकरीस होते तेव्हा त्यानी शिर्क्यावरी नामजात रवाना केली ते रडतोडच्या घाटापावेतो गेले मग त्यामधे एक मुसलमान होता त्याने तफावती केली मग तेथून च माघारे मुरडून पादछायापासी गेले तो हक्कमुनसाबेने जानोजी पिसळ्या मारावयासी उठला मग जानोजी पिसळ्याने कटार व तरवार उपसोन एका च कचक्याने तुरकास मारिले ते वेळेस पादछाव धावून आले सोनियाचे काठीने वारावारी केली पादछाव बोलिले कीं ऐसे कैसे केले मग जानोजी पिसळा बोलिला की, हक्कमुनसाबीने मारिला, मी हि मुसलमान होईन मग ते वेळेस पादछाने विचारिले की खरे च की काय ? ऐसे विचारिले मग ते वेळेस जानोजी पिसळा बोलिला की खरे च मग तेव्हा पादछानी कदरीस बैसविले आणि सुनता केली आणि तश्रिफा व हत्ती घोडा व पालखी दिल्ही मग जानोजी पिसळा बोलिला की मी शिर्का कापून काढितो .
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड पंधरावा (शिवकालीन घराणी)
मसूर-जगदळे
लेखांक १
माहादजी जगदळे देसमुख पा।। मसूर सा।। रायबाग सुभे विजापूर. आपली कदीम देसमुखी कराराबादेची होती. ते देसमुखी अमानत होऊन खालसा विजापुरचे वख्ती सेभरी वरसे खाली साहोती विजापुरी याणी शाहाजी भोसला यास तनखा दिल्ही. शाहाजी भोसलियाने माझा चुलता जिवे मारुन पा। मसूरची देसमुखी घेतली. माझा बाप पातशाहीमधे जाऊन देसमुखीची रदबदली करू लागला. म्हणौन शिवाजीने भोसल्याने धरुन बाप हि जिवे मारिला. मग आपण लहाण होतो. का। पटेलगी करुन होतो. शिवाजीने पातशाही मुलुक घेतला. पुंडावे करु लागला. मग आपण त्यापासी जाऊन रदबदल करुन की, आपला बाप मारिला व आपला चुलता मारिला आणि आपले वतन घेतले. ऐसी रदबदली करुन. त्तेव्हा भोसलियाणी पा। मसूरची देसमुखी आपली दुमाले केली. कराराबादेची देसमुखी दिल्ही नाही. कराराबदेची देसमुखी धना जाधव नासरदार यासी देसमुखी रामा मजकुरांनी दिल्ही. त्याने आपपले तरवारेने पदाजी यादव व पिराजी यादव याच्या हवाला देसमुखी करुन याच्या हाते देसमुखीचा कारभार करीत आहेती. पातशाही फौजेमधे फौजा येताती. धनाजीचे नाव कळो न देतां, आपली देसमुखी म्हणौन भेटताती. कराडाबादेचा देसपांडा याचा एक भाऊ रुद्राजी चंदो हा धनाजीस मिळोन पदाजी यादवास व पदमोजी यादवास घेऊन, लस्करात एऊन फिरादी करवितो. तरी ऐन जिन्नस पदाजी यादवाचे दोघे बेटे एकोजी व कसाजी गणिमाकडे आहेती. पाच पाच से स्वार बाळिगीता आहेती. आणि मुलुक लुटिताती. ते लुटीचे पैके आणून, पदाजी यादव व पदमोजी यादव हे लस्करामधे खर्च करुन मजसी वाद सांगताती. म्या तो पातशाही खजाना पेशकसी भरुन सनदी देविली ते सनद न देणे म्हणौन फिरादी होताती, आणि गोतांत पाठऊन निवाडा करावा म्हणताती. तरी त्याचा भाऊ गिरजोजी यादव हा राणियापासी आहे. हा व धनाजी जाधव याने मुलुकामधे आपले स्वार व प्यादे पाठविले होती की, कोण्ही जमीदार माहादजी देसमुख मसूरकर याची शाहादी द्याल म्हणजे मारिले जाल. म्हणौन धनाजीचा भाऊ रयतास धरुन नेऊन मुचलके घेताती. ऐसे मजवरी जुलूम करुन, माझे कराडीचे वतन घेतले व मसूरचे घेऊ ह्मणोन कराडीच्या देसपांडेयाचा भाऊ रुद्राजी चंदो यास धनाजीने बा। देऊन प्रत्यक्ष गणीम मजवरी उभा केला आहे. हे गोष्ट लटकी जाली तरी पातशा मज सजा पोहचविते माझ्या वतनाची हकीकती तो रुद्रो चिमणाजी कानगो हे विजापूर व महमद एक अमीन सरकार रायबाग वाई व हक्कसिक्काकेनीस व फौजदार ऐसी हकीकती कचेरीस मोहरनसी लेहून दिल्ही असता, धनाजीच्या बळे पैके खर्च करुन मजवरी जोरावारी होते. मी नातवाण. कोठोन खर्च करावा ? हे तहकीक केले पाहिजे माझी सनद मज देविली पाहिजे. जरी कदीम देसमुख पदाजी, पिराजी, धनाजी व गिरजोजा यासी देसमुखी कदीम ह्मणताती, काही कदीम सनद असल ते हुजूर आणून दाखवावी. त्यावरून तहकीक होईल. गनीम ऐसा कुल हालीमवालियाचे गुजारतीने खरा करून देईन.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
प्रस्तावना
१९ कान्होजी आंग्र्याच्या उदयापासून संभाजी आंग्र्याच्या मृत्यूपर्यंत म्हणजे सरासरी इसवी सन १६८० पासून १७४२ पर्यंत कोंकणपट्टींतील राजकारणाचा वृत्तांत येथपर्यंत दिला आहे. ग्रांट डफ वगैरे लेखकांनीं ह्या ६२ वर्षांचा इतिहास, व विशेषतः १७२६ पासून १७४२ पर्यंतचा इतिहास इतका अस्पष्ट व भ्रामक रचिला आहे कीं, प्रस्तुत उपलब्ध झालेल्या साधनांचा उपयोग करून घेण्याची सुसंधि ज्यांना सुदैवानें मिळाली आहे त्यांना या लेखकाचें लेख अत्यंत असमाधानकारक वाटतात. आंग्रे, सिद्दी, पेशवे, छत्रपति, इंग्रज व फिरंगी ह्यांच्या हालचालींची सालवार जंत्री प्रथम रचून ती यथावकाश आपल्या इतिहासांत ग्रांट डफनें जर गोंविली असती, तर त्याचें लिहिणे सध्यां जितके टाकावू वाटतें तितकें खचित वाटलें नसतें. सध्यां उपलब्ध झालेला ब्रह्मेंद्रस्वामीचा बहुतेक पत्रव्यवहार ग्रांट डफच्या पहाण्यात यद्यपि आलेला होता, तथापि, तो पत्रव्यवहार तारीखवार लावून त्याची सूक्ष्म छान करण्याची मेहनत त्यानें न घेतल्यामुळें, त्याचें सर्व लिहिणें आधुनिक टीकाकाराच्या आक्षेपास यथान्याय पात्र झालेलें आहे. बहुतेक अस्सल पत्रांवरून नुसता चंद्र आणि वार दिला असल्यामुळे त्यांची नक्की तारीख ठरविणे मुष्कील पडतें, हीं ग्रांट डफची तक्रार आहे. [Duff Chap, XV note.] व हेंच त्याच्या इतिहासाचें मूळ व मुख्य व्यंग आहे. नाणीं, ताम्रपट, शिलालेख ह्यांची छान जितक्या बारकाईने व काळजीने केली जाते, तितक्याच बारकाईने व काळजीनें ऐतिहासिक लेखांचीहि छान होणें अत्यंत आवश्यक आहे. ही छान कशी करावी हें डफला माहीत नसल्यामुळें, त्याच्या हातांत हा पत्रव्यवहार पडून मराठ्यांचा इतिहास जाणूं पाहाणा-या शोधक वाचकांना विशेषशी माहिती मिळण्याचा संभव राहिला नव्हता. अलीकडील दोन वर्षांत, रा. पारसनीसांनीं ब्रह्मेंद्रस्वामीचीं सुमारें ३७५ पत्रें शोधून काढून ही छान करण्याचा सुप्रसंग आणून दिला आहे. रा. पारसनीसांनी ह्या ३७५ पत्रांपैकी ब-याच पत्रांच्या तारखा ठरविल्या नसल्यामुळें, व ज्या कित्येक पत्रांच्या तारखा त्यांनीं आपल्यामतें ठरविल्या आहेत त्यांपैकीं कांहीं चुकल्या असल्यामुळें, त्यांच्या हातून कोंकणातील आंग्रे, सिद्दी वगैरेंच्या हालचालींचा वृत्तांत नीट रीतीने उतरला नाहीं. शिवाय त्यांनीं ह्या पत्रांना ज्या टीपा दिल्या आहेत, त्यांपैकीं ब-याच टीपा ऐतिहासिक माहितीला धरून नाहींत. ह्या तीन अडचणींमुळें रा. पारसनीस यांची मजल ग्रांट डफच्यापुढे फारशी गेली नाहीं. हबशी व आंग्रे ह्यांच्या राजकारणांतील गुंतागुंत आपल्याला नीट उलगडली नाहीं, असे रा. पारसनीस स्वतःच कबूल करतात (चरित्र, पृष्ठ ४५, टीप). आता त्यांना ही गुंतागुंत नीट उलगडली नाहीं इतकेच नव्हें, तर तत्कालीन वस्तुस्थितीचा विपर्यासहि यांच्या हातून सडकून झालेला आहे. हा विपर्यास होण्याला मुख्य कारण रा. पारसनीसांचे पूर्वग्रह होत. (१) मराठ्यांच्या तत्कालीन राजकारणाचा मुख्य चालक ब्रह्मेंद्र होता हा त्याचा पहिला पूर्वग्रह आहे. ह्या मुख्य पूर्वग्रहापासून त्यांनीं आणखी दोन आनुषंगिक पूर्वग्रह काढिले आहेत. ते पूर्वग्रह हेः- (अ) जंजि-याच्या मोहिमेला ब्रह्मेंद्र कारण झाला व (२) वसईच्या मोहिमेलाहि तोच कारण झाला. ब्रह्मेंद्र कारण कसा झाला व ह्या कारणीभवनाचें स्वरूप काय होतें ह्याचा मात्र उलगडा त्यांनीं कोठें केला नाहीं. ‘स्वामींनीं राजकारण सिद्धीस नेण्याकरिता कसकशीं सूत्रें फिरविलीं हें समजण्यास मार्ग नाहीं’ असें त्यांचें स्वतःचेंच मत आहे (चरित्र, पृ. ८६). सारांश, मराठ्यांच्या राजकारणाचीं मुख्य सूत्रें ब्रह्मेंद्रस्वामी फिरवीत होता; परंतु तीं कशीं फिरवीत होता हें सांगतां येत नाहीं, असा सदर लेखकाच्या लिहिण्यांतील मतितार्थ आहे. ह्या मतितार्थात कितपत तात्पर्य आहे ह्या गोष्टीची शहानिशा करणें जरूर आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
प्रस्तावना
१८. सावंत, कोल्हापूरकर, आंग्रे, हबशी, फिरंगी व इंग्रज ह्या लोकांनी आजपर्यंत कोंकणांत जो धुडगूस चालविला होता तो १७३९ त पेशव्यांनीं बंद केला. १७३९ त कोंकणांत निव्वळ पेशव्यांचें एकछत्री राज्य सुरू झालें. फिरंग्यांचा तर केवळ नायनाट होऊन गेला. हबशी पेशव्यांचा एक लहानसा मांडलिक बनून राहिला. इंग्रजांनीं मुंबईत राहून उदीम करण्याचें पत्करिलें. येणेंप्रमाणे कोंकणांत सर्वत्र सामसूम झालें. जर कांही कोठें कोकणांत गडबड होण्याचा संभव राहिला असला तर तो संभाजी व मानाजी आंग्रे ह्यांच्या घरांतील तंट्यासंबंधानेंच काय तो रहाण्यासारखा होता. संभाजी आंग्रे सरखेल ह्याच्या मनामध्ये मानाजी आंग्रे वजारतमाब ह्याच्या ताब्यांत असलेला कुलाब्याचा वडिलोपार्जित किल्ला घ्यावयाचा होता. ह्या कामीं ब्रह्मेंद्रस्वामीची वरकरणी सल्ला संभाजीला असावी असा अंदाज आहे (खंड ३, ले. २८४). शाहूमहाराजांचीहि संभाजीला फूस असावी असा संशय घेण्यास कारण आहे (कित्ता). बाजीरावाचें महत्त्व वाढत चाललेलें शाहूराजाला खपेनासें होऊन संभाजीकडून पेशव्यांच्या वतीचा जो मानाजी त्याजवर स्वारी करवावी असा शाहूचा बेत होता. त्याप्रमाणें १७४० च्या जानेवारी-फेब्रुवारींत बाजीराव व चिमाजी अप्पा औरंगाबादप्रांतीं आहेत असा समय पाहून संभाजीनें मानाजीवर चालून घेतलें. (खंड ३, ले २८४ व पा. ब्र. च. ले. ५६). अलीबाग, हिराकोट, थळचाकोट, राजकोट, सागरगड, वगैरे जागा संभाजीनें फत्ते केल्या. ह्या उत्पातांची बातमी लागतांच चिमाजी अप्पा व बाळाजी बाजीराव १७३९ च्या एप्रिलांत पालीवरून कुलाब्यास मानाजीच्या साहाय्यास आले. हिराकोटास तुळाजी आंग्र्या धरला गेला व संभाजी मोठ्या संकटानें समुद्रांतून पळून गेला. मानाजीला साहाय्य केल्याबद्दल पाल व मीरगड हे दोन किल्ले पेशव्यांनी घेतले. संभाजीचा पाडाव करण्याच्या कामीं १७३९ तील तहाप्रमाणें इंग्रजहि मानाजीच्या व पेशव्यांच्या कुमकेस पाण्यांतून आले होते १७४० तील ह्या उत्पातानंतर संभाजीनें १७४२ त मरेतोंपर्यंत फारशी हालचाल केली नाहीं. १७४० च्या नोव्हेंबरांत ब्रह्मेंद्रस्वामीच्या शिफारशीवरून तुळाजी आंग्र्याची बेडी बाळाजी बाजीरावानें काढून टाकिली (पा. ब्र. च. ले. १४० व १५४). तुळाजीची शिफारस स्वामीनें अशा करतां केली कीं संभाजीनंतर मानाजी आंग्र्याला एखादा शह देतां येण्यास आपल्या हातीं साधन असावें. १७४० च्या सप्टेंबरात बाजीरावाशीं व चिमाजी अप्पाशीं स्नेहभावानें वागत जावें असा उपदेश स्वामीनें मानाजीस केला. ह्यावर ही अद्भुत वार्ता आपण कोठून ऐकिली म्हणून मानाजीनें स्वामीस उलट प्रश्न विचारिला. लोकांच्या चित्तांत संशय उत्पन्न कसे करावे, संशय उत्पन्न झाल्यावर ते खरे कसे भासवावे, ही विद्या ब्रह्मेंद्राला उत्तम अवगत होती. मानाजीच्या मनांत भय उत्पन्न केल्यावर, बंधमुक्त तुळाजीलाहि स्वामीनें भेवडविण्याचा प्रयत्न केला. १७४२ त संभाजी वारल्यावर, आपल्याच शापाने तो मेला असे स्वामीनें जगजाहीर केलें (पा. ब्र. च. ले. ३२२). हें जगजाहीर केल्यावर सरखेली पद तुळाजीस करून देण्याचा पत्कर स्वामीनें घेतला. तुळाजीला असें अभिवचन दिल्यावर, मानाजीला सरखेलीचें पद मिळावें असेंहि बोलणें स्वामीनें सकवारबाईजवळ लाविलें. ही बातमी तुळाजीस कळल्यावर त्यानें स्वामीस ह्यासंबंधी पत्र लिहिलें व स्वामीच्या ह्या कृत्रिमपणाबद्दल बहुत खेद दर्शविला (पा. ब्र. च. ले. १००). पुढे तुळाजीला कसेंबसें आपल्या बापाचें सरखेलीचें पद मिळालें. तें मिळाल्याबरोबर तुळाजीला स्वामीनें कर्जाचा तगादा लाविला व शिव्या श्राप देण्यास आरंभ केला. आपला हत्ती नेल्यामुळे कान्होजी मेला; आपल्या आज्ञान ऐकिल्यामुळें सेखोजी आटपला; व आपला अपमान केल्यामुळें संभाजी नरकांत बुडाला, वगैरे मागींल गोष्टींचीं आठवण तुळाजीस देऊन, आपले कर्ज ताबडतोब फेडण्यास तुळाजीस स्वामीनें हुकूम केला (पा. ब्र. च. ले. ३२२). तो हुकूम अमलांत आणण्याइतकें सामर्थ्य तुळाजीच्या अंगी नव्हतें. द्रव्य, वस्तभाव वगैरे सरखेलांकडे कान्होजीच्या वेळीं आपण ठेवीत होतों, ह्याची साक्षहि स्वामीनें आंग्र्यांचा प्रसिद्ध कारकून व मुत्सद्दी रघुनाथ हरि प्रभू यांजकडून पटविली व तुळाजीस अशी भीती घातलीं कीं, आपले कर्ज उगवावयास पेशवे बळकट आहेत (खंड ३, ले ३५५). ह्याच सुमारास स्वामीनें नागोजी आंग्र्यांकडून तुळाजीवर स्वारी करविली (पा. ब्र. च. ले. ७९). ह्या धमकावणीचा परिणाम काय होतो. तें पहाण्यास स्वामी ह्यापुढें फार दिवस वाचला नाही. १७४५ च्या २६ जुलैस दरवर्षाप्रमाणे समाधीस बसला असतां स्वामी एकाएकीं ब्रह्मरूप झाला. निर्वाणसमयीं छत्रपतीकडील कोणी सरदार आपल्याकरितां पालखी घेऊन आला आहे असा स्वामीला भास झाला. स्वामीच्या लौकिकी वृत्तीला हा भास अनुरूपच होता.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
प्रस्तावना
१६. वसईच्या वेढ्यांत मराठ्यांचें ५००० माणूस ठार व जाया झालें असे चिमाजी अप्पानें ब्रह्मेंद्रस्वामीस लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. ह्या सर्व वेढ्यांत फिरंग्यांचें ८०० माणूस ठार झालें अशी कित्येकांचीं समजूत आहे व मराठ्याचें ५००० माणूस ठार झालें त्या अर्थी पोर्तुगीज लोकांनीं मराठ्यांची रग चांगलीच जिरविली असें कित्येक लोक समाधान करून घेतातं परंतु हे समाधान केवळ भ्रामक आहे. खरा प्रकार असा होता कीं, शेवटला सुरूंग उडून हल्ला केला. त्या एकाच वेळीं फिरंग्यांचें ८०० माणूस ठार व जखमीं झालें. “पोर्तुगीज लोक शेवटच्या पराभवाचे वेळच्या नुकसानीची गणती देतात.” असें पोर्तुगीज रिपोर्टावरून डफ लिहितो. ६ फेब्रुवारीपासून ५ मे पर्यंत पोर्तुगीजांचे किती लोक ठार झाले ह्याचा कोठें आंकडा पहाण्यांत आला नाहीं. परंतु एका शेवटल्या हल्ल्यांतच जर फिरंग्यांचे ८०० लोक गेले तर सबंध वेढ्यांत व मोहिमेंत किती गेले असतील ह्याचा सामान्य अंदाज होण्यासारखा आहे. प्रो. फॉरेस्ट यांनीं छापिलेल्या पत्रांवरून वसईतील फिरंग्यांची काय दशा झाली होती तें कळण्यासारखें आहे. दुर्दशेनें विपन्न झालेल्या लोकांस अंगावरील शस्त्रासह चिमाजी अप्पानें जाऊं दिलें ह्यावरून फिरंग्यांना व फिरंग्यांचा कड घेऊन बोलणा-यांना फुशारकी मारण्यास कितपत जागा राहते ह्याचा उलगडा स्पष्ट शब्दांनीं करून दाखविला पाहिजे असें नाहीं.
१७. वसई व साष्टी हीं दोन बेटें मराठ्यांच्या ताब्यांत गेलीं हे पाहून, मुंबईतील इंग्रजांचेहि धाबें दणाणून गेलें. द्वेषानें व मत्सरानें वसईच्या वेढ्यांत फिरंग्यांना इंग्रजांनीं योग्य वेळीं साहाय्य केलें नाही, त्यामुळें इंग्रजांच्या ह्या कोत्या वर्तनाला जागा ठेवण्यास पोर्तुगीज सरकारला जागा झाली. वसई घेतल्यावर मुंबईवर गदा येईल ह्या भीतीने त्यावेळच्या मुंबईच्या गव्हर्नरानें चिमाजी अप्पाकडे कप्तान इंचबर्डास नरमाईचें बोलणे करण्यास पाठवून दिलें. व्यापाराच्या सवलतीखेरीज इंग्रजांचें विशेष कांहीं मागणें नसल्यामुळे, चिमाजी अप्पानें कप्तान इचबर्डाचें म्हणणें कबूल केलें. चौल व मरोळ हीं दोन ठाणीं वसई सोडून जातांना फिरंग्यांनीं झंग्रजांना कागदोपत्रीं बहाल करून टाकिलीं व मराठ्यांकडून मिळाल्यास घ्यावी असा आशीर्वादही दिला. परंतु सबंध हत्ती गिळल्यावर ही शेपटें मराठ्यांच्या हातून सुटतील अशी खात्री नसल्यामुळें, इंग्रजांनीं ह्या दोन ठाण्याविषयीं चकार शब्दहि काढिला नाहीं. पुढें कांही दिवसांनीं ही दोन्हीं ठाणीं मराठ्यांच्या हातीं पडलीं. चेऊल शहरच्या स्थितीविषयीं येथे थोडा विस्तार करणें जरूर आहे. चेऊल शहरांत पूर्वी आंग्रे, सिद्दी व फिरंगी अशा तीन लोकांचा अंमल असे. जंजि-याच्या मोहिमेंत सिद्दी याचा चेऊल शहरांतील भाग आंग्रे यांस मिळाला व वसईतील युद्धांत फिरंग्याचाहि भाग मराठ्यांना प्राप्त झाला . येणेंप्रमाणे १७३९ त सबंध चेऊल शहर मराठ्यांच्या हातीं आलें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
प्रस्तावना
१५. १७३७ च्या जुलैंत चिमाजी अप्पा पुण्यास गेल्यावर, शंकराजीपंत, गंगाजी नाईक, मोरोजी शिंदे वगैरेनीं माहिमास मोचें लाविले. १७३७ च्या नोव्हेंबरांत माहिमच्या मोर्चांत फिरंगी व मराठे यांची लढाई होऊन, महादजी केशव, वाघोजीराव खानविलकर वगैरे मंडळी ठार झाली, व रामचंद्र हरि पटवर्धन यांस उजव्या हातावर जबर जखम झाली. माहिमास हा असा प्रकार झाल्यावर फिरंग्यांनीं ठाण्यावर चालून येण्याचा बूट काढून धारावीवर हल्ला केला. ही बातमी चिमाजी अप्पास ब-हाणपुरास कळली. तेथून निघून १७३८ च्या फेब्रुवारींत अप्पा कोंकणात उतरला व ठाण्यास मजबुती करून राहिला. धारावीजवळ मुरद्यास फिरंगी व मराठ्यांची लढाई होऊन फिरंग्यांचा पूर्ण पराभव झाला. तों इतक्यांत पाऊसकाळ आला म्हणून ठाण्याची व धारावीची बळकटी करून चिमाजी अप्पा पुण्यास १७३८ च्या जूनांत दाखल झाले. नंतर शिबंदीचा खर्च फार पडतो, याजकरितां फिरंगी समूळ पुढील वर्षी खणून काढावा असा चिमाजीनें व बाजीरावानें बेत ठरविला व १७३८ च्या अक्टोबरांत मल्हारजी होळकर, राणोजी शिंदे वगैरे मंडळीस कोंकणांत पुढे पाठवून, चिमाजीहि लवकरच त्यांना सामील झाला. फिरंगी ठाण्यावर पुनः चाल करून आला, व मल्हारजी होळकरानें पुनः त्याला मारून काढिला. माहिम, केळवें, साळासुवें, खतलवाडी, नारगोळ, डहाणू, तारापूर, अशेरी, वज्राबाई वगैरे ठाणी काबीज करण्याच्या पूर्वी मराठ्यांनीं खुद्द वसईच्या किल्ल्यास १७३९ च्या ६ फेब्रुवारीस वेढा दिला. १७३९ च्या १५ मार्चास वांद्र्याचा कोट जमीनदोस्त केला. व्यंकटराव नारायण घोरपडे यानें गोंव्याजवळ फोंड्याचा व मर्दनगडचा किल्ला ह्याच सुमारास घेतला. पुढें लवकरच मट व धारावी हीं बंदरें मराठ्यांनीं काबीज केलीं, व वसईच्या भोंवती खुषकीवरून शंकराजी नारायण यानें व पाण्याचे बाजूने मानाजी आंग्रे यानें वेढा दिला. साष्टीतील हालचालीसंबंधीं स्वतंत्र पत्रव्यवहार दुस-या एका खंडांत निराळाच छापावयाचा असल्यामुळें, ह्या वेढ्याची सविस्तर हकीकत येथे देत नाहीं. येथें इतकेंच नमूद करून ठेवितो कीं, राजश्री पारसनीस व ग्रांट डफ ह्यांनी ह्या मोहिमेची जी हकीकत दिली आहे, ती बरीच अविश्वसनीय व धरसोडीची आहे. उदाहरणार्थ, खुद्द वसईचाच किल्ला घेतल्याची ग्रांट डफ व पारसनीस यांनीं जी तारीख दिली आहे ती अजिबात चुकली आहे. पारसनीसमुद्रित ब्रह्मेंद्रस्वामीच्या पत्रव्यवहारांतील ५२ व्या लेखांकांत वैशाख शुद्ध अष्टमीस फिरंगी कौलास आले, व वैशाख शुद्ध पौर्णिमेस ते केल्ला सोडून निघून गेले असें लिहिलें आहे. वैशाख शुद्ध अष्टमी म्हणजे ५ मे १७३९ व वैशाख शुद्ध पौर्णिमा म्हणजे १२ मे १७३९. ५ मे १७३९ स फिरंगी कौलास आले व पुढे सात दिवसानीं १२ मेला ते किल्ला सोडून गेले. १६ मे १७३९ फिरगी कौलास म्हणजे Capilulation स आले व पुढें सात दिवसांनीं म्हणजे २३ मे १७३९ ते किल्ला सोडून गेले असें डफ आपल्या इतिहासाच्या १५ व्या भागांत लिहितो. ग्रांट डफनें १६ मे ही तारीख मुंबईच्या सेक्रेटेरियटांतील परेराच्या व चिमाजी अप्पाच्या तहनाम्यावरून घेतली आहे. हा तहनामा Selections from the Bombay Secretariat, Vol. 1, च्या ४१ व ४२ पृष्ठावर प्रो. फॉरेस्ट ह्यांनीं छापिला आहे व त्यावर १६ मे १७३९ ही तारीख आहे. परंतु ही तारीख नव्या पद्धतीची आहे जुन्या पद्धतीची नाहीं. पोर्तुगाल देशांत नव्या पद्धतीच्या तारखा चालत असल्यामुळें प्रो. फॉरेस्ट यानीं छापिलेलीं पोर्तुगीज सरदारांची पत्रें त्यावेळच्या इंग्रजी पत्रांच्या तारखाहून ११ दिवसांनीं पुढे आहेत. ही गोष्ट डफच्या ध्यानांत न आल्यामुळें ५ मे १७३९ ह्या तारखेच्या ऐवजी ११ आंकड्यांनीं अधिक असलेली १६ मे १७३९ ही तारीख डफने दिली आहे. डफच्या बाकीच्या सर्व तारखा जुन्या इंग्रजी पद्धतीच्या आहेत. वसईच्या कौलाची किंवा Capitulation ची पोर्तुगीज तारीख तेवढी त्यानें गैरसमजुतीने स्वीकारिली आहे, व तिची नक्कल रा. पारसनीस यांनीं, आपण स्वतः छापिलेल्या पत्रांतील तिथींकडे लक्ष न देतां, अंधपरंपरा न्यायानें केली आहे. तसेंच वसईला वेढा ६ फेब्रुवारी १७३९ स दिला म्हणजे माघ शुद्ध दशमीस दिला. रा. पारसनीस माघ शुद्ध दशमी म्हणजे ७ जानेवारी समजतात. खरें पाहिले तर माघ शुद्ध दशमी म्हणजे ६ फेब्रुवारी १७३९ आहे. ग्रांट डफ पोर्तुगीज पद्धतीची ११ दिवसांनीं अधिक जी १७ फेब्रुवारी तारीख ती देतो. तात्पर्य ग्रांट डफ व पारसनीस ह्या दोघांना कालाचें महत्त्व बिलकुल कळत नाहीं असें दिसते. वसईच्या कौलाची तारीख जर १६ मे खरी धरली, तर रा. पारसनीसानीं छापिलेल्या पत्रांतील तिथी खोटी होण्याची निश्चिती आहे व ती तिथी खोटी ठरली म्हणजे पत्राच्या खरेपणाविषयींहि संशय येतो. ह्या गोष्टी ऐतिहासिक पत्रव्यवहार छापणा-यांनीं ध्यानात ठेविल्या पाहिजेत. इंग्रज लेखक चुकला म्हणून आपणहि गचाळपणें चुकावें हें केव्हांहि फायद्याचें नाहीं.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
प्रस्तावना
१४ इकडे फिरंग्यांना पेशव्यांनीं ह्याप्रमाणें शह दिला असता, तो पेंच काढून टाकण्याच्या इच्छेनें, फिग्यांनीं संभाजी आंग्र्याला मानाजी आंग्र्यावर स्वारी करण्याची भर दिली. १७३४ त संभाजीच्या भयानें मानाजी फिरंग्यांकडे आश्रयार्थ गेला होता. त्या वेळीं कुलाब्यास आपली स्थापना झाल्यास, कांहीं प्रांत आपण तुम्हास देऊं असा करार मानाजीनें आपल्याशीं केला होता असें फिरंग्यांचें म्हणणें पडलें. पुढें १७३५ त मानाजीची स्थापना कुलाब्यास झाल्यावर फिरंगी कराराप्रमाणें मानाजीपाशीं मुलूख मागूं लागलें. तें मागणे मानाजीला विशेष आदरणीय वाटलें नाहीं. तेव्हां फिरंग्यांनीं संभाजीकडून मानाजीवर स्वारी करविण्याचा घाट घातला व तो घाट १७३७ च्या एप्रिलांत अंमलांत आणिला चिमाजी अप्पा साष्टीकडे गुंतल्यामुळें व बाजीराव हिंदुस्थानांत असल्यामुळे, मानाजी एकटा निराश्रित असा सांपडेल व त्याचा सहजासहजी चुराडा करतां येईल अशी अटकळ फिरंग्यांनीं बांधिली होती. कुलाब्यावर स्वारी केली असतां, चिमाजी अप्पाची साष्टीवरील मिठी सैल पडेल असाहि फिरंग्यांचा अंदाज होता. परंतु फिरंग्यांचे हे दोन्ही अंदाज खोटे ठरले. वोडशाच्या स्वारीहून १७३७ च्या एप्रिलांत परत येत असता मानाजीवरील संकटाची व फिरंग्यांच्या प्रतिशहाची बातमी बाजीरावास कळलीं. त्याबरोबर एका क्षणाचाही विलंब न लावतां बाजीराव कोंकणांत उतरला आणि संभाजीला व फिरंग्यांना त्यानें केवळ बाजारबुणग्याप्रमाणें हाकून लाविलें (शकावली, पृ. ७६). ह्या संभाजीच्या मानाजीवरील स्वारीसंबंधीं एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे. मानाजीवर स्वारी करण्यास संभाजीला फिरंग्यांचें साहाय्य होतें. परंतु संभाजीच्या मनांत मानाजीवर स्वारी करण्याचा विचार उत्पन्न करण्यास मुख्य कारण ब्रह्मेंद्रस्वामी होता. रा. पारसनीस यांनीं छापिलेल्या पत्रांपैकीं लेखांक ३१४ त संभाजीस स्वामी लिहितो, “तूं जमाव तारवें घेऊन येणें, कुलाबा घेऊं, त्याचा हिसाब काय आहे?” हा उपदेश करून संभाजीस स्वामी कानगोष्ट सांगतो कीं, ह्या गोष्टीसंबंधीं “कोणास ब्र कळों न देणें” एवढीच कानगोष्ट सांगून स्वामी राहिला नाहीं. मानाजीच्या पत्रांचा आपण आदर करीत नाहीं, असेंहि स्यामीनें संभुसिंगाला लिहिले संभुसिंगाला असें प्रोत्साहन दिल्यावर स्वामी मानाजीस ३२८ व्या लेखाकात लिहितो, “संभाजी आंगरे यांच्या मनामध्यें जे आम्हीं कुलाब्यास येऊन तुम्हास श्रापावें, परंतु त्याकडील माणसें व कागद आम्हीं माघारे फिरविले.” स्वामी आपल्याला साहाय्य आहे अशा श्रद्धेने संभाजीनें मानाजीवर स्वारी केली व त्या कामीं त्याची अगदीं नाचक्की झाली नाचक्की झाल्यावर स्वामीनें संभाजीस कोंकणचा स्वतंत्र राजा म्हणून बहुमानानें पत्र पाठविले आहे (खंड ३, लेख २७३). आंग्र्यांच्या कुळाचा नाश करावा, आंग्रे आपलें कर्ज फेडीत नाहींत म्हणून त्यांचा सूड उगवावा, वगैरे खुनस मनांत ठेवून स्वामीनें हे कपटनाटक चालविलें होतें हें उघड आहे.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
प्रस्तावना
१३. आंग्रे, हबशी, सावंत, कोल्हापूरकर, झंग्रज व फिरंगी इतक्या मंडळींची कोंकणातील निरनिराळ्या भागांवर सत्ता होती असें पूर्वी सांगितलेंच आहे. पेशव्यांना कोंकणांत एकछत्री राज्य करावयाचें म्हणजे ह्या सहाहि लोकांना संपुष्टांत आणणें जरूर होतें. १७३१ च्या तहांत कोल्हापूरच्या महाराजांना साळशीच्या पलीकडील प्रांत तोडून दिल्यामुळें, उत्तर कोंकणांत ढवळाढवळ करण्याला त्यांना काहीच कारण राहिलें नाहीं. कान्होजी केवळ बहुतेक स्वतंत्र राजा ह्या नात्याने कोंकणांत अंमल चालवीत असे. सेखोजी व संभाजी, संभाजी व मानाजी ह्यांच्यांतील दुहीचा फायदा घेऊन व नवदरें येथील तहांतील कलमांनीं आंग्र्यांची सत्ता दुभंग करून, आंग्र्यांचें स्वातंत्र्य पेशव्यांनीं केवळ नामशेष करून टाकिले जंजिरेकर हबशाशीं बारा वर्षे युद्ध करून व त्यांचे सर्व प्रबल सरदार मारून, सिद्दी अबदुल रहिमान ह्याला पेशव्यांनीं केवळ ताटाखालचें माजर करून सोडिलें वाडीचे सावंत इतके दुर्बल होते की, नुसत्या कागदी दपटशानेंच ते हमेषा ताळ्यावर येत असत येणेंप्रमाणें, आंग्रे, हबशी, सावंत व कोल्हापूरकर ह्या सर्वांची १७३७ पर्यंत कोंकणसंबंधाने यथास्थित व्यवस्था लाविल्यावर इंग्रज व फिरंगी ह्मा दोन परद्वीपस्थ लोकांचा परामर्ष घेण्याचा मराठ्यांनीं प्रयत्न केला. जंजिरेकर हबशाशीं युद्ध सुरूं असतां, इंग्रज व फिरंगी यांनीं शामळाला मदत करून मराठ्यांना बराच त्रास दिला होता. मुंबईच्या क्षुद्र, ओसाड व लोकग्रस्त बेटाखेरीज कोंकणात इंग्रजांची विशेष सत्ता नसल्यामुळें, इंग्रजांहून दिसण्यात तरी विशेष बलिष्ठ अशा फिरंगी लोकांची विचारपूस करणे पेशव्यांना ह्या वेळी अगत्याचें वाटलें. विशेष अगत्य वाटण्यास कारण येणेंप्रमाणे झालें. कल्याण वगैरे स्थलावरून साष्टींत पेशव्यांच्या सैन्याचा उपद्रव न व्हावा म्हणून, १७३६ त वसई येथील फिरंग्यांनीं ठाण्याच्या कोटाची मजबुती आरंभिली. मजबुती करण्यात मुख्य हेतु असा कीं, साष्टी बेटांतील सर्व हिंदु लोक ख्रिस्ती करून टाकावे. ह्या दुष्ट बेताची कुणकुण खंडोजीं माणकर वगैरे साष्टीतील पुढा-यांस कळताच ते चिमाजी अप्पाला १७३६ च्या एप्रिलांत रेवास येथे जाऊन भेटले व साष्टींतील हिंदु लोकांचें संरक्षण करण्यास चिमाजीला त्यांनीं भीड घातली. साष्टावर स्वारी करण्यास ह्या लोकांच्या भीडेचीच जरूर होती असें नाहीं. फिरंगी लोकांनीं हबशाला सहाय्य केलें होते इतकेंच नव्हे, तर आंग्र्यांच्या भांडणांतहि त्यांचे अंग असे. फिरंग्यांचा हा लुब्रेपणा मोडून काढण्याचा पेशव्यांचा पूर्वीपासूनच बेत होता. तशात साष्टीतील लोकांचाहि ह्या कामीं विशेष आग्रह दिसून आलां तेव्हां १७३७ त ठाण्यास अवश्यमेव येण्याचें अभिवचन चिमाजीनें साष्टीकरांस दिलें. पुढें १७३६ च्या पावसाळ्यात बाजीरावाचीहि मुलाखत साष्टीकरानीं घेतली व तेथेहि साष्टीवर मोहीम करण्याचे कायमचें ठरलें. १७३६ च्या हिवाळ्यांत रामचंद्र हरि पटवर्धन यास ठाण्याच्या मोहिमेस पुढे पाठवून, खुद्द चिमाजी अप्पा १७३७ च्या मार्चात कोंकणांत उतरला. रामचंद्र हरि, रामाजी महादेव व खंडोजी माणकर हे ठाण्याजवळ घोणसाळियावर जमा झाले व तेथून त्यांनीं ठाण्यावर तोफांचा मारा केला. ह्या तोफांचा आवाज बदलापुरावरून ऐकून, चिमाजी अप्पा ठाण्यावर रातोरात चालून गेला व दुस-या दिवशीं सकाळीं ठाण्याचा किल्ला मराठ्यांच्या ताब्यांत आला. ही हकीकत १७३७ च्या २७ मार्चाला घडली. रामचंद्र हरि, रामाजी महादेव व खंडोजी माणकर ह्यांनी -ठाण्याकडे ही अशी दंगल मांडिली असतां, शंकराजीपंत, गंगाजी नाईक व मोरोजी शिंदे यांणीं खुद्द वसईजवळ पापडी, माणिकपूर व बहादुरपुरा या ठिकाणी फिरंग्यांचा पराभव करून वसईच्या कोटाखालीं गोळीचे टप्प्यावर मोर्चे दिले (साष्टीची बखर, पृ १३, व पा. ब्र. च. ले ४७) “वानरें व वेसावें ह्या स्थळांस फौजा पाठवाव्या म्हणून बुगाजी नाईक मागत होते” मांडवी, तांदुळवाडी, टकमक, वेसावें, काळदुर्ग, मनोहर व बेलापूर, इतकी स्थळें ह्या पहिल्या मोहिमेत सर झालीं. नंतर लौकरच १७३७ च्या जुलैंत चिमाजी अप्पा पर्जन्यकाळानिमित्त पुण्यास गेला.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
प्रस्तावना
१२. संभाजीच्या व मानाजीच्या दुहीमुळे सिद्दी सात, सिद्दी संबूळ वगैरे हबशांचें पारिपत्य होण्याचें काम जें तहकूब झालें होतें, तें नवदरें येथील तहानें पुनः जारीनें सुरू होण्याला सवड झाली. संभाजीला व मानाजीला विवक्षित प्रांत व विवक्षित अंमल मिळाल्यामुळें आपसांत दुही होऊन इंग्रज, फिरंगी, शामळ व सावंत वगैरे शत्रूंना सवलत मिळत असे ती बंद झाली. १७३५ च्या एप्रिलांतील नवदरें येथील तहाच्या कालापासून पुढें दीड वर्ष गोवळकोटास मराठे मोर्चे लावून बसले होते. १७३५ च्या आगस्टांत सूर्याजी चव्हाण कोकणराव ह्यास गोवळपोटाच्या कामगिरीस पाठविलें होतें (रोजनिशी, रकाना ६७). १७३५ च्या जूनांत सिद्दी सातानें अगदीं मर्यादा सोडून मराठ्यांच्या प्रांताला बेसुमार उपद्रव देण्याचा उपक्रम स्वीकारला (खंड ३. ले. २७०). संभाजी आंग्र्यानें हबशाला शासनाक्रान्त करण्याचा बेत केला होता, परंतु तो त्याचा बेत मनांतल्या मनांतच राहिला असें दिसतें. मानाजीचा द्वेष व स्पर्धा करण्यांतच संभाजीचा बहुतेक हुरूप आटून गेला. हबशानें उपद्व्याप अत्यंत केला आहे असें ऐकून चिमाजी अप्पा १७३६ च्या मार्चात कोंकणांत उतरला व रेवासेजवळ चरई येथें सिद्दी साताचा उद्ध्वंस १९ एप्रिल १७३६ त करता झाला. उंदेरीचा किल्लेदार सिद्दी याकूबहि ह्या लढाईंत ठार झाला (शकावली, पृ. ७३) चिमाजी अप्पा कोंकणांतून १७३६ च्या मेंत वरघाटीं आल्यावर, १७३६ च्या आक्टोबरांत उदाजी पवारानें गोवळकोटाची मोर्चेबंदी चालविली होती (रोजनिशी, रकाना ७०). परंतु आतां हबशांच्या अंगांत विशेष जोर राहिला नव्हता. जंजि-यांत १७३३ त दोन पक्ष पडले होते हें मागें सांगितलेंच आहेः- सिद्दी अबदुल रहिमान ह्याचा एक पक्ष व सिद्दी अंबर, सिद्दी संबूल व सिद्दी सात ह्यांचा दुसरा पक्ष. पैकीं ह्या दुस-या पक्षांतील सर्व मंडळी १७३६ सालांत पार होऊन, तो पक्ष अजिबात नष्ट झाला. अर्थात मराठ्यांचा आश्रित जो सिद्दी अबदुल रहिमान तोच तेवढा एकटा राहिल्यामुळें १७३३ तील तहाचीं कलमें अमलांत येण्यास कोणताच प्रतिबंध राहिला नाहीं. १७३७ त अबदुल रहिमानानें हा तह दुस-यांदा मान्य करून, मराठ्यांच्या संमतीनें जंजि-यांचें अधिपत्य स्वीकारलें. येणेंप्रमाणें १७३६ त ज्या लढाईचा प्रारंभ झाला व जींत शाहू महाराजांना इतर सर्व युद्धांपेक्षा विशेष काळजी वाटली, ती लढाई १७३७ त कायमची बंद झाली. अबदुल रहिमानानें १७३७ पासून १७४० पर्यंत सुखासमाधानानें राज्य केले तोंपर्यंत मराठ्यांना जंजि-याच्या सिद्दयांकडून काडीमात्रहि त्रास पोहोंचला नाहीं.