Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

इतकें तुह्मांस आपण देत असें आपणास अन्न देऊनु वाचवणे ह्मणऊनु बोलिलों. तरी बोलिले कीं तुझे तकसिमे मधे तकसी घ्यावी हे गोष्टी काही मधे होत नाहीं. पा। मारचे देसक व तुझे बापभाऊ यां विदमानें त्यास राजी करून देत अससील तरी जरूर. तूं गळां पडतोस ह्मणऊनु अंकीकार करून. ह्मणऊनु बोलिले. बाजद आपण देसकास भेटोनु त्यास वर्तमान सांगितले. आपले बापभावास ही सांगितलें. देसक व आपले बापभावांनीं निरोप दिल्हा कीं आपले रक्षणार्थ आपले त मधे विकितोस तरी विकी ह्मणऊनु त्यांचा निरोप घेतला. आणि आपली तकसीम पैकी एक चावर वजा करुनु उरले

चावर ठी                       ॥ गैरमो।              वडीलपण
१॥।                              ४                       कलम १

सदरहू तकसीम वडीलपण माहादजी पाटील का। मसूर यास विकत किमती होनु २० विसास खंडून दिल्हे व याचे क्रयपत्र देसक व आपले बापभावांचे साक्षीनें करून दिल्हे असे व ठाणा राजमुद्रा व देसक व गोत यांचा महजर करून द्यावयाची शर्त आहे. ह्मणऊन साहेबसदर व देसक पा। मा। व गोत यां पाशीं आलों आहे. महजर करून द्यावयास आज्ञा केली पाहिजे. ह्मणऊनु अर्ज केला. बाजदसदर व देसक व गोत यांनीं मादजी पाटील मसूरकर यास लिहिलें कीं संताजी चव्हाण पाटील कोणेगाऊकर बोलतो तें यथार्थ आहे किंवा विपरीत आहे. मग माहादजी पटेल बोलिला कीं, संताजी पटेल बोलतो हें यथार्थ आहे. साहेबीं महजर करून दिल्हा पाहिजे. ह्मणऊनु बोलिला. बाजद संताजी चव्हाणाचे बापभाऊ व गावींचे बारा बलुते यांस विचारिलें. तेही बोलिले कीं आपले शरीरपक्षणार्थ विकितो. तरी सुखी विकीना कां ? साहेबी महजर दिल्हा पाहिजे. ह्मणऊनु बोलिले. या वरुन महजर केला असे. संता बिन भिवजी पटेल कोणेगाऊकर वडीलपण व गावाचे तिसरे तकसिमेचा पटेल

मशाती चावर                    गैर मो। ठिकणे               वडीलपण कलम पान
१४                                    ६                         मान व तश्रीफ व माहार
पैकी वजा                                                            नांगर        कलम १

मशाती चावर गैर              मो। ठि॥ वसले
२।१४                                    २
देसकुळकर्णी पा। मा। यास पहिलेच
विकत दिल्हे                                                     हाली खाशा सताजी भिव-
                                                                      जीने खाशाखाली ठेविली
मशाती चावर                     ठि॥ गैरमो।                चावर
१।१४                                      २                        १

सु॥ सलास समानीन अलफ कारणे जाहाला मजहर ऐसा जे सताजी बिन भिवजी चव्हाण पाटील मौजे कोणेगाऊ व माहादजी बिन सुलतानजी पटेल जगदळे का। मसूर हरदू जण राजमुद्रा व देसक व गोत या पासी एऊनु उभे राहिले आणि सताजी बिन भिवजी चव्हाण पटेल मौजे कोणेगाऊ बोलिला की आपण कोणे-गावीचा पटेल मिरासदार पिढी दरपिढी वडील नागराचा धणी आहे ऐसीयास गावीचे पटेलगीचे बयान गाव आज रकम

मशाती जमीन चावर १२  १४

गैर मो॥ ठिकणे ६

ऐसीयास पटेलगीस तकसीमा ३

आपण वडील                                       मालोजी व बाळोजी पाटील
आपणास तकसीम                                हसीली तकसीम
चावर               ठि॥ वरिले                    चावर ४
१४             ६                                फहिरोजी व नरसोजी
पान मान माहार नागर तश्रीफ                हसीली तकसीम
वडीलपण आपलें                                  चावर

एणेप्रमाणे तकसिमा आहेत पैकी वजा बापभाऊ तकसीमदार २ ए॥ चावर ८ बाकी आपणास खाशाखाली उरले

जमीन चावर ठी॥ पान मान तश्रीफ माहार
१४ ६ नागर वडीलपण कलम १

एणे प्रमाणे आपली वृत्ति आहे ऐसीयास या पैकी वजा देसकुलकरणी पा। मा। यास तिसरी तकसीम दिली

जमीन             ठी॥ गैरमो।
१।१४                    २

बाकी आपणा खाली उरले आहे
जमीन चावर ठी। गैरमो।                       वडीलपण पान मान महार

२॥।                      ४                           नागल कलम १

एणे प्रमाणे आपल्या खाशा खाली उरले आहे यास आपला चुलता विठोजी पाटील पटेलगी वडीलपण करीत होता तो मरोन गेला त्याचा लेक तोही दुकाळामधे मरोनु गेला आपण एकटाच उरलो आपणास खावयास नाही सेतभात करून पाढरी वरी असावे तरी बैलढोर नाही या करिता नाही उन्नादरका विणे सुजोनु फुगोनु मरो लागलो आपले तकसीमदार बापभाऊ आहेत त्यास ही आपण हटकिले ते ही आपणास काहीं अनकूह होतीना निराश्री जाहालो मग जरूर शरीररक्षणार्थ उपाये केला पाहिजे ह्मणऊनु माहादजी पटेल जगदळे का। मसूर हे थोर नाईक आहेत त्याचे मुळे आपले शरीररक्षण होईल ह्मणउनु का। मसुरास जाऊनु माहादजी पाटिलाची भेटी घेतली व आपले वर्तमान सागितले परतु त्यानी मन घातले नाही आपण कार्यवादी आपलिया कार्यानिमित्त जरूर त्याचे अनुवर्जन करावे लागले ऐसियास सातपाच येरझारा केल्या या वरून माहादजी पाटील मसूरकर यास भार जाहाला मग बोलिले की तुझे पटेलगी विणे आपणास गरज नाही तू जरूर गळा पडतापेस तरी तुझा काय मफसूद तो सागणे मग आपण बोलिलो की आपला चुलता विठोजी पाटील पाटीलगली करीत होता तो मेला त्याचा लेकही मेला आपला बापही मेला आपणास आधार नाही व खावयास नाही काळ कठीण पडिला आपण नेणता आपणास अन्न देऊनु रक्षणे आपली सदरहू मिरासी पैकी चावर एक १ एकाची पटेलगी खाशाखाली ठेऊनु उरले जमीन चावर

चावर                ठी॥               वडीलपण
१॥।                    ४                कलम १ो

                            लेखांक १० १/२
                                       १६०४

                          (पहिल्या ओळी गहाळ)

मौजे बेलवडे खुर्द
मौजे खुडोली निळेश्वर
मौजे उबरज                                              विसाजी पटेल
दत्ताजी पटेल                                         (निशाणी नांगराची)
हरी लिगोजी कुळकरणी
मौजे कोरटी
सगाजी बिन कुसाजी पा।
(निशाणी नांगराची)                               दा॥ हरी गोमाजी कुलकरणी

मौजे सिवड

रुपाजी घा। पटेल                                  रुपाजी भोसले पटेल
येडोजी घा। पटेल                                 अंतो विठ्ठल व हरी
                                                        मुगाजी कुलकरणी
मौजे वर्‍हाडे
सताजी पटेल घाटिगे
त्रिबक लिगोजी कुलकरणी
(निशाणी नांगराची)

कृष्णाजी भोसले पटेल
मौजे अतीत
लाहाजी पटेल बिन बाजी पटेल
(निशाणी नांगराची)

लखमोजी बिन भानजी पटेल
नागोजी हणमाजी कुलकरणी
मौजे इदोली
रभाजी बिन गागजी पटेल
(निशाणी नांगराची)

शिवाजी चौगला

तानजी बिन जैतोजी पटेल
परस्थळ

शिदप्पा पटेल बिन दत्ताजी पटेल
का। रहिमतपूर
(निशाणी नांगराची)

 

लेखांक १०

श्री                                                        १६०६ पौष शुध्द १०

छत्रपती + + +

स्वस्ति श्रीराज्या + + + + + + + + रक्ताक्षीनामसवत्सरे + + + + + दसमी बुधवासरे साक्षपत्र हाजीर मजालसी स्थळ किल्ले रायगड

हबीरराऊ मोहिते सेनापती

10 1

सिदोजी बिन तुकोजी पाटील पोळ मोजे
कविठे पा। वाल्हे अर्जनीस हुजराती
(निशाणी नांगराची)

शेसो बापूजी देसकुळकर्णी सेकोजी बिन मतनोजी काळे देसाई
किले सातारा निविस्ते वस्टमालकर का। कोळे
बिलालराऊ (निशाणी नांगराची)
अबाजी बिन धारोजी अताजी लक्षुमण दि॥ सबनिसी
जाधव पाटील मौजे लस्करी हुजराती
परिंचे पा। पुणे
(निशाणी नांगराची)
 
माऊजी बिन चादजी केदारजी जाधव पाटील मौजे
सोनवणी पटेल मौजे + + + पाचुद पा। कर्‍हाड
पा। पुण्हे (निशाणी नांगराची)
लिगोजी पाटील कालगे  
मौजे वर्जे पा। कर्‍हाड  
(निशाणी नांगराची)  

शालवान शक १६०६ या विदमाने सटवोजी बिन बाबाजी भोसले यानी लेहून दिल्हे साक्षपत्र ऐसे जे माहादजी बिन सुलतानजी पाटील का। मसूर याच्या बापभावाचा गाऊ मौजे सिरवडे ता। उबरज त्या गावामधे आपण सेते केली होती व मिरासीची सेते पटेलमजकुराची घेतली होती व पटेलगीस कटकट केली होती त्याबद्दल माहादजी पाटलामधे वा आम्हामधे कुसूर पडोन मौजे कोणेगावामधें माहादजी पाटिलावरी आपण चालोन जाऊन गदर केली त्याकरिता माहादजी पाटील हुजूर एउनु राजश्री साहेबापासि वर्तमान विदित केले की त्यावरून साहेबी आपणास हुजूर बोलाउनु आणून वाजीपुसी केली आणि राजश्री कविकलश छदोगामात्य व राजश्री सरकारकून ऐसे सदरेस बसोन वर हक्क मुनसफी केली तेथे निर्वाह जाहाला ऐसा जे माहादजी पाटील का। मजकूर यावरी आपण गदर केली ते निरर्थक केली त्याचे सेताचा आपण आवारा केला व त्याची वैरणी काडी नेली व त्याची माळीची लाकडे आपण केली व त्याची विसाती अगावरील नेली ह्मणाउन माहादजी पाटिलाने हुजूर विदित केले तरी आपल्यापासि तरवार १ व कोचकी १ व सेला १ ऐसे आहे ते आपण देतो वरकड माहालीच्या कारकुनाच्या विदमाने साक्षपत्र लेहून येईल ते आपण देऊन व सिरवडे तेथील पाटिलकीसि व त्याच्या सेतासि आपण कथळा नसता च केला होता तेथे पेस्तर कथळा कराव्या गरज नाही ऐसा निवाडा जाहाला याउपरि आपण जरी पेस्तर तेथील पटेलगीचा अथवा सेताभाताचा व माहादजी पाटिलासि कथळा करून तरी दिवाणीचा गुन्हेगार व गोताचा अन्याई त्यास आपण अर्थे अर्थ समध नाही हे आपले वडिलाचे इमान सही साक्षपत्र पत्र सही सही *

तेरीख ५ रबिलोवल
सु॥ खमस समानीन अलफ

                                                                                   लेखांक ९

                                                                                           १५५१ कार्तिक वद्य २

 अज रख्तखाने राजश्री आबाजी राजे घाटिगे दामदौलतहू बजानेब कारकुनानी पटेल व मोकदमानि व रयानी का। मसूर ता। मजकूर पा। कर्‍हाड बिदानद सु॥ सलासैन अलफ अर्जदास्त छ ७ माहे रबिलोवल पा। छ १४ मिनहू पा। होउनु मालूम जाहाली आहाली नफराई व मशाखती व कसबे व गावगन्ना लावणीसचणीची खबर बहुत बयानवार लिहिली एक ब एक हुजूर मालूम जाहाली व माकोजी घाटिगे तेही सदर्हूप्रमाणे बयानवार खबर लिहिली, त्या हि वरून मालूम जाले तू दिवाण न्याहाईम व हलालखोर साहेबकामास तकसीर नाही आपले कुणबिकीमधे राहात असौनु लावणी व उगवणी करणार ऐसे आह्मास मालूम आहे हाली तुवा कोण्हता बेतालुक आदेसा न करिता बेशक होउनु कसबामधे एउनु कसबा व गावगन्ना मोकदमास कौलुबोल देउनु मामुल करून लावणी उगवणी करणे एक जरी याचे शक न धरणे तुज ह्माकोजी घाटिगे जैसा कौलुबोल भाक भरवसा देतील तैसा आह्मास आहे आह्मापासि हर कोण्ही सांगेली ते गोस्टी आह्मी आईकणार नव्हो, रह रास मनास आणितो, हे हि तुज कळले आहे पुढे हि तुझे कामावरून व हालतीवरून बहुत सरफराजी होईल हाली कोण्हे गोस्टीचे गुमान न धरणे व खातीरजमा करून दिवाणकाम चालवणे कौलु असे तुझे बाबे नरसो दामोधरे हुजूर हलालखोरी बहुत वजा सागितली, त्यावरून मालूम जाले तू दाईम हलालखोर आहेसी देसगतीचे बाबे लिहिले तरी देसगतीचे सालाबाद जैसे चालले असेली तेणे प्रमाणे सरजामी होईल पाहिजे जैसे आमचे खुद खत सादर आहे, त्यासि जैसे चालिले असेली तेणे प्रमाणे सरजामी करून तुवा कोण्हे बाबे आदेसा न करिता गावास एईने ह्माकोजी घाटिगे व माहालीचे कारकून जैसे सागतील तो आमचा आहे दिल, जाब, सिरपाव, तोरण, भेटीची सिस्त व विलातीची सिस्त करून दिवाण नफराई करणे

तेरीख १५ माहे रबिलोवल
रबिलोवल

                                                                                                          7 1

पै॥ छ २८ रबिलोवल
आवर्दे + + जी दरोजी अफराद
ठाणा ता। मसूर

                                                                                    लेखांक ८

                                                                                             १५४३ माघ वद्य २

                                                                                             8 1                                           

अज रख्तखाने राजश्री अबाजी राजे घाटगे दामदौलतहू बजानबे कारकुनान्ये व मोकदमानी ता। मसूर बिदानद सु॥ सन इहिदे सलासीन अलफ बदल इनाम मौजे शहापूर तानाजी जदगळे देसमुख ता। मजकूर व पटेल का। मजकूर यानी येऊन हुजून मालूम केले की, आपली देसमुखीचा इनाम मौजे शाहापूर सालाबाद चालत असता दरम्याने माहालीच्या कारकुनानी अमानत केले, आपण मिरासदार, आपल्यावरी मेहेरबान होऊन मौजेमजकूर आपले दुमाले करविले पाहिजे, ह्मणजे आपण कुल गावगन्ना फिरोन लावणीसचणी करून ह्मणऊन अर्ज केला बराई अर्ज खातरेसी आणून मौजेमजकूर देसमुखास कुलकानू कुलबाब इनाम दिला असे तेथे कोणी दखलगिरी करावयासी गरज नाही देसमुख मजकुरापासी हरकी होन २०० दोनीसे घेऊन इनामतीचा गाऊ दुमाले केले असे तेथे कोण्ही बिलाहरकती करावयासी गरज नाही दर साला ताजा खुद्द खता उजूर न कीजे तालीक लेहून घेऊन अस्सल खुदा देसमुखापासी परतोन दीजे पा। हुजूर रा। गोपाळपडित

तेरीख १५ रबिलावल

                                                                                                        8 2

पो छ २८ रबिलोवल आवर्दे अबाजी कृष्ण
अफराद ठाणे ता। मजकूर

                                                                                   लेखांक ७

                                                                              १५४२ भाद्रपद वद्य १

                                                                                                         7

कौलनामा अज दिवापण ठाणा तपे मसूर ता। नरसोजी जगदळे देसमुख व पटेल कसबेमजकूर अज पुजा श्री सरस्वती सु॥ इहिदे असरीन अलफ कारणे दिला कौलनामा ऐसा जे बापाजी मुसनमान याने हिमातीच्या बले दरम्यान कथळा करून कसबेमजकुराचे पटेलगीस दखल जाहला यावरून तुह्मी हुजूर जाऊन दिवाण आला मलिकइनीस साहेब हुजूर याचे खिजमतीस उभे राहून आपली कुल कैफती दखल करून बापाजी मुसलमान यासी हुजरून तलब करून हुजून नेला कुल हक जवारी माहाल दर माहाल याचे गोहीसाक्षीनसी बापाजी मुसुलमान दूर जाहाला हुजरून तुह्मास कौल मर्‍हामत करून तुमची पटेलगी तुमचे दुमाला करविली व तपेमजकुरीची देसमुखीचा कारभार तुमचे हातून घेत जाणे ऐसा हुकूम ठाणियास हुजरून खुदखत सादर जाहाले तपेमजकुरीची देसमुख व कसबेमजकुरीची पटेलगी जगदळियाची गोहीशाक्षी मोझा मोकाबला रुजू करून दुमाला केली असे बरहुकूम खुद खत कसबेमजकुरीची पटेलगी व तपेमजकुरीची देसमुखी दुमाला केली असे बापाजी मुसुलमान यासी दखलगिरी करावयास गरज नाही कसबेमजकुरी पटेलगी पिढी दर पिढी चालत आली आहे तैसे चालऊन आपला खातीरजमा राखोन देसमुखीचा कारभार करून अमलप्रमाणे आपला हकलाजिमा खाऊन कीर्दी माहमुरी करून शक न धरिता आपले वतन चालविणे दरी बाब कौल असे

तेरीख छ १४ माहे सौवल

                                                                                                             7 1

हा। खुद खत पा। हुजूर
जैदी माहालदार

तेही न करिता जगदळे यानी तीन खून घेतले ऐसे धर्माधिकारी बोलले त्यावरि बापाजी मुसलमान बोलला जे आपले पैके गाव-निसबतीने यावे होते कुमाजीस धरून आणिले तेव्हा जे गाव-निसबतीने पैके राहिले असतील ते द्यावे ऐसा नेम करून कागद लेहून दिल्हा आहे त्याउपरी नरसोजी जगदाळा बोलला की माराच्या भ्याने आपल्या बापाने काय कागद दिल्हे असतील ते आपणास ठाऊके नाहीत तीन वरसे आपला बाप बदखानी होता ते समई नेबाचि पाठी करून सारा गाव नागविला ऐसे असता याचे काय देणे असेल ते रुजू करून दिल्हे ह्मणजे आपण देईन उगाच झोडाई करून गळा पडतो त्या उपरी बापाजी मुसलमान बोलला की आपण झोडाई करून गळा पडतो ह्मणतोस तरी दिव्य करणे तेथे खरा जाहलास ह्मणजे तुज व आपणास समध नाही ऐसे बोलिला त्यावरी धर्माधिकारी यानी निश्चय केला की गोही साक्ष कागद-पत्र असता दिव्य कैसे द्यावे मग सभानायकी नेम केला की थोर ग्रथ विज्ञाने-स्वर आहे तेथे पाहून निवाडा करावा मग धर्माधिकारीणीयानी विज्ञानेश्वर ग्रथ आणून पाहाता तेथे निघाले की साक्ष असता गोही असता उगेच एकाचे गळा पडेल त्यास देहात प्रायश्चित्त असे यदर्थी ग्रथीचा श्लोक ॥ यद्योकोमानुषी ब्रुयात्त दन्त्यो ब्रुयास्तदैव की ॥ मानुषी तत्र गृण्हि यान तुदैवी क्रिया नृप ॥१॥ रातेपत्रे मृते साक्षे देशाश्च प्रलयतत ॥ त्रिभि स्तत्र न विद्यते चतुर्थ दिव्य साधन ॥२॥ यावरुन जरी दिव्य द्यावे ऐसे कोण्हास हि नउमजे साक्ष उपसाक्ष असता कागद-पत्र असता गळा पडोन तुवाच नरसोजी जगदाळे याचाप बाप धरून नेऊन नागवण बाधिली आणि वतनासही भ्रष्ट केला आणि आता झोडपणे नरसोजी जगदले याचे गला पडोन त्यास कष्टी केले वतनास विक्षेप केला ऐसा तू गुन्हेगार तुज देहात प्रायश्चित्त द्यावे परतु मुसलमानाची पादशाही आणि तूही मुसलमान याकरिता क्षमा जाली मग नरसोजी जगदाळा बोलला की शास्त्री अन्यत्र ग्रथी बोलाव-यास समध नाही मग धर्माधिकारिणी यान्ही बापाजी मुसलमान यास आज्ञा केली की तुझा निवाडा जाहला तू खोटा जाहालास नरसोजी जगदाला खरा जाहला तू आपले येजीतपत्र लेहोन देणे मग बापाजी मुसलमाने नरसोजी जगदळा यासी यजीतपत्र लेहोन दिल्हे की मसूरचे पटेलगीसी आपणास बोलावयासी समध नाही व आपले देणे व खुनाचे लिगाड तुह्मासी काही नाही इतकियाउपरी तुह्मासी कथळा करून तरी दिवाणचे खोटे गोताचे अन्याई ऐसे यजित-पत्र खाने अजम दावळखान याचे हुजूर लिहून दिल्हे ऐसे जय-पत्र दिल्हे व९ सभानायकी धर्माधिकारिणी धर्मनीति-प्रमाणे नरसोजी जगदाळे देशमुख तपे मसूर व पाटील कसबे मजकूर यासी जयपत्र महजर करून दिल्हा मसूरचे वतन बापाजी मुसलमानास अर्थाअर्थी बोलावयास समध नाही हा माहजर सहि लेखन संख्यावोळी

त्याउपरी बापाजी मुसलमान पश्चम वादी याने तकरीर केली ऐसी जे आपले बडे सवगिरी करीत होते त्याचा देवघेव मसुरी होता रयतावरी कर्जवाम होते त्यास आपला बाप याकुबजी हा मागत होता ते मागो नको ह्मणऊन आपल्या बापास दटाऊ बाहेर घातले व मसूरचे पीरजादे याचे घरी आपल्या बड्याची बेटी दिल्ही होती तिचे दोघे बेटे व तिचा मर्द नरसोजीचा बाप कुमाजी याने जिवे मारिले मग आपला बाप कर्‍हाडास जावून अबदल्ल हुसेन नैब यास सागितले त्यानी तलप केली कुमाजीस धरून नेले आणि त्यास नागवण बाधिली आणि जमान देऊन पळोन गेला मग आपल्या बापाने आपले आफळादीचे खुन जाहले ह्मणऊन दिवाणात पैके कबूल करून पटेलगी सोडवीली व आपले गाव निसबतीचे देणेही देऊ दिल्हे नाही ऐसे पैके आपले द्यावे व आपल्या खुनाचा जाब करावा ऐसे हिसाबी किताबी आसता धिगायी करून थलोथल हिडवितो तरी तुह्मी गोत माय बाप आहा आपले देणे रास्तिक आहे व आपला खूनही रास्तिक आहे तुमचे थल थोर आहे धर्मता निवाडाला कराल ह्मणऊन हे स्थल मागोन घेतले हिंदू अगर मुसलमान ऐस न ह्मणावे वर हक निवडा कराल त्यास आपण राजी असे ऐसी तकरीर लेहून दिल्ही याउपरी धर्माधिकारी यानी निश्चय केला की साक्ष कागदपत्र पाहावे मग जगदियाळापासील कागद पाहिजे तपसील आबरखानाने निवाडा केला तेथेही जगदलियाची देशमुखी व पटेलगी करार करून मुसलमान दूर केला व कर्‍हाडी हि बापाजी मुसलमान दूर जाहाला ऐसी थलपत्रे मनासी आणिली बहुता दिवासाचे वतन देशमुखी व पटेलगी जगदले याची पुरातन कदिम फमानी जगदेव-राव जगदाळा ब्राह्मण कर्‍हाडीचा देसायी यामध्ये व मसूरकर यामध्ये वतनदारीचा कथळा होता त्याच्या निवाड्याचे फर्मान होते ते मनास आणिता कदीम देशमुखी पटेलगी जगदाले याची याउपरी बापाजी मुसलमान बोलला की पिर जलालदीन हा पहिले हिदु होता त्याचेच आपण होतो या करिता आपली मुजावरकी होती ऐसे असता आपला खून केला त्यावरी नरसोजी जगदाळा बोलला की आपला बाप व आपला चुलता काय निमित्त्य मारिला ऐसे गोताने विचारावे मग गोताने बापाजीस विचारले की जगदळीयाचे खून मुजावरनी काय निमित्य केले त्यावरी बापाजी बोलला की मुजावराचे वतन हिरोन घेतले याबद्दल मुजावरानी दोनी केले

जगदाली यानी मुजावर तिघेजण मारिले बेबुन्याद केली जाजति आपला एक खून द्यावा आणि आपले देणे द्यावे ऐसे नाही ह्मणेल तरी दिव्य करावे याउपरी बापाजीस धर्माधिकारी यानी विचारिले की तुझे देणे कोणी गाव निसबतीने देणे दिल्हे तेव्हा कुमाजीस पुसोन दिल्हे असेल तरी तुजपासी काही कागदपत्रक तबे असतील - ते दाखवणे तुझे काय देणे असेल ते देववू परस्परे तुवा लोकास कर्ज दिल्हे गैर-हगामी मारामारी करू लागलास ह्मणून तुज ताकीद करून सागितले त्याकरिता तू गळा पडोन थळास नरसोजी जगदळे यासी आणिले आणि आपला खुन द्यावा ह्मणतोसी तरी मुजावरानी जगदळे याचे निरपराधे दोनी खून केले एकएका खुनास आकरा आकरा खून द्यावे

मलिकइनिस मोकासाई यानी खाने अजम दावलखान हवालदारास उभयतानी पत्र आणिले मग तिही मनास आणून आपणास बोलावून निरोप दिल्हा की कसबे मसूर परगणे कर्‍हाड तेथील वेव्हार आहे, विज्यापुरीहून पत्रे घेऊनल आले आहेत तरी तुह्मी धर्मत निवाडा करणे ह्मणऊन निरोपन दिल्हा यावरून मग यास धर्मचौथरियावरी नेऊन सभा करून उभयताची उत्तरे मनास आणिता अग्रवादी नरसोजी बिन कुमाजी जगदळे यानी तकरीर केली की आपला वडील आजा बाबाजी तपे मसूरची देसमुखी व कसबाची पटेलकी करीत असता आपला अजा यास दोघे पुत्र वडील विठोजी धाकटा कुमाजी निपट लहान होता ऐसे आपल्या वतनावरी असता कसबे मजकूरी पीर जलालुद्दीन आहे याचा किताब की मुसुलमानाचा परि आणि हिंदूचा वरि तेथे उजवे बाजूस हिंदूनी खैरात करावी, डावे बाजूस मुसलमानानी कदोरी करावी ऐसा दडक पुरातन चालिला आहे व इनामती व बाजे जे मिळकत ते दो ठाई घेऊन हिदूनी अतीत-अभ्यागतास खर्च करावा, मुसुलमानानी फकीरफकराना खर्च करावा. ऐसे असता, तपाचे मुसुलमान मिळोन मुजावरास बळ देऊन ते पध्दति मोडिली मग आपल्या अज्याने मुजावरास दटावून सागितले की महत् कदम जे चालिले आहे ते चालो देणे ऐसी ताकीद केली तो च कुसूर धरून दोघ चौघ मारेकरी मेळवून आपला अजा व आपला चुलता यास मुजावरानी जिवे मारिले आपला बाप कुमाजी हा धाकटा होता मग आपले अजीने माहेरास नेऊन वाढविला तनास मुतालीक देऊन आपला बाप आपल्या अजीने माहेरी च ठेविला पोरका होऊन वतनास आला मुजावरानी आपले वडील दोघे जण बाजगुन्हाई मारिले ते तिघे मुजावर आपल्या बापाने मारून सूड घेतला त्यावरी अबदल हुसेन याने तलब केली आपला बाप भेटला नाही बापाजी मुसुलमान याचा बाप याकूब हा कर्‍हाडचा बागवान बख्तवार असे आपले गावी देवघेव करीत असे गैरहगामी रयतास पैसे लावून मारामारी करू लागला मग आपल्या बापाने त्यास ताकीद केली की काय तुझे देणे असेल ते हगामसीर घेणे ऐसी दोघासी बोलाबोली जाहाली रयतास निरोप दिल्हा कर्‍हाडिचा नेब याच्या लेकास याकुबाची लेकी दिल्ही होती त्याची पाठी करून, आपल्या बापाची पाळती करून, धरून कर्‍हाडास नेले आपले घरदार वस्तभाव लुटिली व मुजावरास मारिले तो हि कथळा माथा ठेविला देशमुखी व पटेलगी अमानत केली आपला बाप तीन वरसे बदखानी होती मग चरेगावीचा महादाजी पाटील याने कर्‍हाडास जाऊन रदबदली केली मग नेबाने आपल्या बापाचे माथा खड होन साडेच्यार हजार करार ठेविला तीन हजार होन द्यावे पटेलकी सोडवावी, ऐसा तह करून, जमान घेऊन, याकुबास बराबरी देऊन मसुरास रवाना केले मग आपला बाप वाटेहून पळोन गेला त्यावरी देसमुखी व पटेलकी अमानत केली होती तिचे कमावीस याकुबाचे हवाली केली त्यावरी याकुबाने कुफराना केला की आपले समधी मुजावर मारिसे व आपले देणे होते ते देऊ दिल्हश्े नाही ह्मणऊन नेबापासून पटेलकी दुमाला करून घेतली. देशमुखी अमानत राहिली ऐसे सख्तीने बख्तवारीच्या बळे जोरावरी केली त्यावरी आपला बाप वृध जाहाला होता तो मरोन गेला मग आपण जगद्गुरु पातशाहापासी उभे राहिलो पातशाहाने अबरखानापासी मुनसीफी दिल्ही त्यानी निवाडा केला की, साडेच्यार हजार होन दिवाणात खड बाधला, तुज काय समध, ऐसा निवाडा करून दूर केला मग आपल्या बापास रजा फर्माविली की, दिवाणात खडकतबे पडिले ते सुटत नाहीत, खडाचे पैके देऊन आपली वतने दुमाला करून घेणे, याकुबास समध नाही ऐसा निर्वाह जाहाला मग आपण खडाचे पैके कबूल करून, अर्धी पटेलगी दुसरियास विकत दिल्ही, आणि दीड हजार तीन वरसानी होन दिवाणात द्यावे आणि पटेलकी सोडवावी ऐसे केले त्यावरी सातपाच मुसुलमान हुजूरचे अकारीब याची पाठी करून आपल्यावरी जुलूम केला मग मलिकइनीस मोकासाई यानी कर्‍हाडचे थळ दिल्हे तेथे हि मुसुलमान खोटा जाहाला ते हि मुनसफी मनास आणून निर्वाह करावा त्यावरी बापाजी बोलिला की, कर्‍हाडीची मुनसफी पाठी राखोन केली त्यास आपण कबूल नाही, आपल्यास दूर थळ द्यावे त्याजवरून साहेबाच्या थळायस पाठविले आहे नागवण बाधोन दोनी वतनास खलेल केले आणि मज च वेव्हारास हिंडवितो तरी देवाचे ठाई गोत माय बाप आहा जो निवाडा तुह्मी कराल त्यास आपण राजी असे ऐसी तकरीर लेहून दिल्ही