[३७३] श्री. ८ जानेवारी १७५१.
पे॥ पौष वद्य ८ मंगळवार
शके १६७२, नायकजी व कान्होजी.
जासूद, जमात मुकुंदजी नाईक.
जाब रवाना, पौष वद्य १० गुरुवार,
चार घटका दिवस.
वेदमूर्ति राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान सा॥ नमस्कार विनंति. अलाहिदा विस्तारें पत्र पाठविलें आहे, हें बनाजीपंत तुह्मी बसून उत्तम प्रकारें तीनदा वाचून,अर्थ ध्यानांत आणून, खानास सविस्तर अक्षरश: समजावणें. येसमयीं आमचें कार्य त्यांनी करावें, त्यांचे आह्मी करावें. ऐसा समय येणार नाहीं. सांप्रत महादोबास बरें वाटत नाही व कांही रुसवाहि करून घरास गेले. आह्मीं, भाऊ, रामचंद्रबावा नवे मनसब्यास निघालों आहों. आमचे महत्तर कार्य स्वामीचे आशीर्वादावर व्हावें, हे इच्छा आहे. विस्तार लिहिणें उपरोध आहे. सर्व मोगल व मराठे (एक होऊन सत्ता त्याचे) हातास जाऊं न द्यावी. उत्तम पक्ष, फेरोजंगास स्थापावें. तो नामर्द, न येई, तर नासरजंगाचा लेक स्थापावा. तेंहि न होय, तर आमचेंच कार्य मातबर करावें. खानास दोष नाहीं. यांत तिळमात्र निमकहरामी येणार नाहीं. बहुतांची राजकारणें, चंदाकडे हिदायत मोहिदीनखानाकडे होतीं. दोन एकनिष्ठ. हे त्यांजकडे नसले तर ते यांस तिळमात्र चहाणार नाहींत. कदाचित् कांही हिरायत मोहिदीखानानें चाहिले तर पठाण मातले. त्यांजपुढें काय चालणार ? तेथेहि बहुनायकी आहे. या काळी पाया पडल्यास पुसत नाहीं. हरएक गोष्ट वक्तानें आह्मीं त्यांनी मिळून करावीं. त्यांतच ऊर्जित आहे. खानाचें मतें मनसबा आह्मीं त्यांनी मिळून करावी. त्यांतच ऊर्जित आहे. खानाचे मतें मनसबा आह्मी लिहिला. त्याप्रमाणेंच करावा असें आहे. +++++++