Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[५४२] श्री.
मुषफक मेहेरबानी दोस्तान सलामत :-
कालरोजी भालू खिजमतगार यास आपणास माहीत आहे त्या कामाकरितां बाबूजी नाईक यांजकडे पाठविण्यांत येत आहे. तर आपण त्यास एक पत्र बाबूजी नाईक यांस ताकिदीचें लिहून द्यावें व लवकर काम करून खिसमतगार मजकूर यास रवाना करावें. बहुत काय लिहिणें. मेहेरबानी असो द्यावी. *
[५४३] श्री.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री दीक्षित बावा स्वामीचे सेवेसी :-
आज्ञांकित स्नेहपूर्वक अंबिकाबाई जाधव दंडवत विनंति उपरि. ऐकिलें कीं तुह्मी शहरास आलें होतेत आणि आमची भेट घेतली नाहीं ! अपूर्व असे ! बरें ! इच्छेस आलें तें खरें ! किल्लियाचा मजकूर काय झाला ? शहरच रसद बंद झाली आहे. शहरचे बाहेरील पुरे उज्याड होतात, बाहीर वाटेंत लूट लबाड होते, याचा विचार काय आहे तो लिहून पाठवणें. आमचा हेत पुडळवाडीस जायाचा आहे. राजश्री पंतप्रधान शिंदखेडावर आहेत. चिरंजीव बाबाजीस भेटी द्यावयाबद्दल लिहिलें असे. भेटीचें वर्तमान अद्याप आलें नाहीं. आलियावर लेहूं. सातारियास माणूस पाठविलें होतें. ह्मणो लागले की मागती लष्करास गेलें. यास्तव लिहिलें असे. तरी तुह्मांकडील सविस्तर वर्तमान लिहून पाठवणें. आतां आह्मांस सर्व प्रकारें भरवसा तुमचा आहे. सुज्ञाप्रति विशेष काय लिहिणें. लोभ असो दीजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[५४०] श्री.
वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत जावें. यानंतर पत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहालें. तुमच्या लिहिल्याप्रमाणें नवाबास व खानास पत्रें पाठविली आहेत. व राजश्री बगाजी यादवासही सांगितलें असे. तेथें गेलियावरी काय करितील. कुशलार्थ लिहीत असावा. तेथें कालगतीनें दु:शकुनादिक एक दोन जाहाली. पुढें ईश्वरइच्छा प्रमाण! तथापि आपले आशीर्वादें श्रीकृपेनें सर्व विघ्नें परिहार होतील. कळावें ह्मणून लिहिलें असें. हे विनंति.
[५४१] श्री.
स्वामीचे सेवेसी. विद्यार्थी अंताजी अप्पाजी कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति येथील क्षेम जाणून स्वकीय लेखन केलें पाहिजे. विशेष. श्रीमंत राजश्री सुभेदार याणी आह्मांस पत्र नगरच्या मुकामीहून लिहिलें तें शुक्रवारी संध्याकाळीं पावलें. पुण्यांतील वर्तमान लिहिलें होतें. पत्रीही लिहिलें होतें की साताऱ्यास वर्तमान आपणापाशीं पावतें करणें. त्यास, गुरुवारी वर्तमान शहराकडून संध्याकाळी आह्मांस आलें. शुक्रवारी तर चहूंकडे जालें. आपणांस साकल्य कळलेंच असेल, ह्मणून ल्याहावयास अनमान केला. त्यामध्यें वर्तमान हर्षाचें कोणतें तें कळलें असेल, ह्मणून लिहिलें नाहीं. श्रुत व्हावें. हे विज्ञापना.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[५३८] श्री.
वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जावें. विशेष. यानंतर सांप्रत तुमचें पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. तरी सविस्तर अर्थ श्रीकडील वगैरे लेहून पाठवणें. येथील अर्थ कांही विशेष लिहिजेसा नाहीं. काशीकडील वर्तमान कांही आलें असेल तर ल्याहावें. चित्त उद्विग्न आहे. बहुत काय लिहिणें. हे विनंति.
[५३९] श्री.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहिणें. विशेष. का पैठणी व वडवाळी येथें श्रीची देवालयें पुरातन आहेत. तेथील देव भूमिगत होते ते सांपडले आहेत. त्यांची स्थापना देवालयांत करावयाची आज्ञा केली आहे. त्यास, देवालयाजवळ मुसुलमान लोक राहतात ते दूर होऊन व देवालयास व ब्राह्मणास कोण्हेविशी उपसर्ग न लागे ते गोष्ट करणें. येविशीं महानगरचे अधिपत्यास सांगोन देवाब्राह्मणास किमपि उपद्रव न लागे ते करणें. जाणिजे. छ २ साबान. बहुत काय लिहिणें. मोगलांची पत्रें पैठणचे फौजदारास घेऊन पाठवणें. छ मजकूर. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[५३६] श्री.
वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री वासुदेव दीक्षित स्वामी गोसावी यांसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहिणें. विशेष. पत्र पाठविलें तें पावलें. नाजूक कार्याचें पत्रें रवाना केली ह्मणून लिहिलें तें कळलें. जाणिजे. छ ९ रबिलावल. हे विनंति.
[५३७] श्री.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत असिलें पाहिजे. विशेष. पत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहालें. महमद गुलाम हुसेन बेग हे पालक पुत्र मोहसना बेगम गाजुदीखानाची बहीण यांचा आहे. यांणी राजश्री शामजी गोविंद यांचें विद्यमानें आपली पत्रें पावतीं करून उत्तरें घेतली आहेत. यांच्या चित्तांत आपली चाकरी करावी. हे थोर घराणदाज आहेत. यांचे चालवावें योग्य आहे ह्मणोन लिहिलें तें कळलें. यंदा नवे लोक ठेवीत नाहींत. पुढें यांचा विचार लिहिला जाईल. रा छ २५ सफर. बहुत काय लिहिणें. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[५३५] श्री.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लेखन करणें. विशेष. पत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहालें. नवाबाचे सान्निधवासी गृहस्थ आपले कामाचा जाबसाल करी असा आहे. त्यास पत्र पाठवावें. आपले जबानी घालावें; ह्मणोन विस्तारें लिहिलें तें कळलें. ऐशियास, तुह्मी वर्तमान कळावयास त्या गृहस्थाची भेट घेतली. उत्तम केलें. त्यास सांप्रत पत्र पाठवितां येत नाहीं. आमचे जाबसाल नवाबासी जें बोलणें तें प्रसिध्दच आहेत. कितेक त्यांचे कामाचे याणी आपले हित जाणून करणें तें करावें. आमचेंच काम आहे ऐसें नाहीं. केवळ आमचाच जाबसाल असतां आणि हरप्रकारें करून घेणें असें असतें, तरी पत्र पाठवितों. सध्या तातड न करणें. आह्मी त्या प्रांती येतों. तुमची आमची भेट होईल. सर्व अर्थ चित्तांस आणून मग पत्र देणें तरी दिल्हे जाईल. सत्वरच भेटीनंतर विस्तरें बोलूं. मग पत्र देणें तें देऊं. बहुत काय लिहिणें. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[५३४] श्री.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :- मार्च अखेर सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत जावें. यानंतर आपण पत्र पाठविलें तें पावलें. वर्तमान कळलें. याचप्रकारें निरंतर पत्र पाठवून वर्तमान लिहीत जावें. इकडील वर्तमान तर मोंगलाकडील तह उरकून दरमजल भंडार कवठियानजीक आलों. पुढें गायकवाड याचे पारिपत्यास जलद जाऊन पोहोंचावें ऐसें आहे. ईश्वर कृपाच करील. सर्व कार्ये स्वामीचे आशीर्वादें उत्तम होतील. खानानी वरात सातांची मागून पाठवितों, तो ऐवज सत्वर रवानगीचे समयीं यावा ऐसा पाठवावा. न पाठविल्यास उचित नाहीं. कृपा केली पाहिजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[५३२] श्री.
राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विनंति उपरि दरगाहकूलीखानाचें पत्र पावलें. उत्तर मागाहून पाठवून देऊं. वरकड मुख्य पत्रावरून कळेल. हे विनंति.
[५३३] श्री. ६ अक्टोबर १७५७.
वेदमूर्ति राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान साष्टांग नमस्कार विनंति. निजामअल्लीचे मनांत परिछिन्न बिघाड कर्तव्य आहे. आपण सावधता करावी; ह्मणून सूचना केली. तेणेकरून संतोष जाहला. बिघाड केलिया स्वामीचे आशीर्वादें नफाच होईल. आह्मीही दसरियास कुच करून येत आहों. वरचेवर चिरंजीवास जें लिहिणे तें लिहीत जावें. छ २२ मोहरम. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[५३१] श्री.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लिहीत असिलें पाहिजे. विशेष. तुमची आमची भेट जाहाली ते समयीं तुह्मांस खानाजवळ सांगण्याचे निरोप सांगितले होते. ते तुह्मी त्यांस सांगितलेच असतील. त्याचे सालजाब कसकसे जालें तें तुह्मी लिहिलें नाहीं. ते लिहिणें. यथार्थ सत्वर अंतरबाह्य भाव लिहून पाठवावे. हे विनंति.*
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[५३०] श्री.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता छ २३ साबान जाणून स्वकीय कुशल लिहीत गेलें पाहिजे. विशेष आपण पत्र पाठविलें तेतें लिहिलें कीं +++++++++++ यास्तव मुख्याची भेट जाहालि ++++ बहुत मजकूर सांगितला. तेणेंकरून संतोष पावून बोलले कीं त्यांचे चित्तांत काय काय पर्याय आहेत ते लिहून सत्वर आपण आणवावे. वरकडही कितेक स्नेहाचा अर्थ व तेथील वर्तमान लिहिलें तें सविस्तर अवगत जाहालें. ऐशियास आह्मीं तीन प्रकार आपणाशी बोललों ते आपण खानाशी बोलले असतीलच. त्याचा विस्तार कांही लिहिला. येथूनही वरचेवर बगाजीपंत यांस लिहितों. ते खानास अर्ज करीत असतीलच. आमचा सारांश हाच कीं, आपलें तर्फेनें स्नेहांत अंतर मागें पडूं दिल्हें नाहीं, पुढें आपण होऊन अंतर न करावें, त्यांनी मागें बहुत अंतरें केली, पुढें तरी न करावीं. +++++++++++++ मजकुरावरून दिसतें. की स्नेह करावा. बाहेरील घरांतील पेच पडले आहेत यास्तव. ऐशियास, जेव्हां जसें करतील तेव्हां त्याप्रकारें वर्तावें उत्तम. परंतु तूर्त स्नेह इच्छितात. कोणेंप्रकारें तें सर्व बगाजीपंतासमागमें सांगून आह्माकडे पाठवावें. ज्यांत उभयपक्षी निभावे, स्नेह चाले, ते गोष्ट सांगून पाठवूं. तेथील भाव कळल्यावांचून आह्मी काय लिहावें. स्नेहाविशीं तो अंतर नाहीं हे मुख्य गोष्ट आहे. वरकड मनसब्याचे मजकूर आपणहून मागें बोललों ते सर्व नासले. आतां ते जें जें सांगून पाठवितील त्याचें उत्तर प्रत्योत्तर स्नेहाचे रीतीनें करूं. *
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[५२९] श्री.
वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लिहीत असिलें पाहिजे. विशेष आपण दोन तीन पत्रें खानाचे साहित्याविशीं पाठविली. कित्येक साधन प्रकार लिहिले; विठ्ठल सुंदर आले याणी निवेदन केले; त्यावरून कळलें. ऐशास, खानाचा आमचा स्नेह. त्याच्या साहित्यापेक्षा दुसरें विशेष काय आहे ? खानाचे साहित्यास पहिले आह्मी अंतर न केलें. व पुढेंही न करूं. वरकड जें जें साह्य आहेत थोरले कामाची उभारणी करतील, ह्मणोन सांगोन येथील साहित्य ++++ जो जाला तो आपण ++++++++++ त्याजवरून कळलें. अत:परही साहित्य जें होईल तें करूं. वराडचा सुभा खानाकडे आहे. तेथील बंदोबस्त नाहीं. तर खानास सांगून तेथील बंदोबस्त होय ते करावें. ह्मणजे अन्यत्र कोणी शब्द ठेवूं पावणार नाहीं. हे विनंति.§