Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै ।। छ २६ जिल्काद. लेखांक ५. १७०१ कार्तिक व।। ४.
सन समानीन, रविवार. श्री. २७ नोव्हेंबर १७७९.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री तात्या जोसी यांसीः-
प्रति गोविंदभट निदसुरे आसीर्वाद विनंति. येथील कुशल त॥ छ १८ माहे जिल्कादपावेतों वर्तमान यथास्थित असे. विशेषः- आपण पत्रें पाठविलीं तीं पावलीं. पत्रार्थ श्रीमंत यजमानांस निवेदन करून, उत्तरें घेऊन, राजश्री आपाजवळ दिलीं आहे, ते आपणाकडे पाठवितील; व म॥रनिलेही तुह्मांस लिहितील, त्यावरून सविस्तर कळेल. सदैव लोभ करावा. तिकडील सविस्तर लिहीत जावें. बहुत काय लिहावें ? लोभवृद्धी व्हावी. हे आसीर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ४.
१७०१ कार्तिक शु।। ७ (५१) श्री. १३ नोव्हेंबर १७७९.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं :-
पो। बाळाजी जनार्दन सं॥ नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जावें. विशेषः- राजश्री पाटीलबावा यांचे तरफेनें हैदरखान यांजकडे. जावयास राजश्री त्रिंबकराव आपाजी आले आहेत. लौकरच तुह्मांपासीं पावतील. याउपरी सत्वर निघोन दरमजल जावें. तुह्मी व मशारनिले व रास्ते यांजकडील गोविंदराव त्रिवर्गाची एकवाक्यता, एक बोलणें असावें. हें सर्व मशारनिले यांसीं बोलण्यांत आलें. *सारांष, तिघांचें बोलणें एक घडत असावें. दरज आंत बाहेर न पडावी. र॥ छ ४ जिल्काद. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे. हे विनंति.
पै॥ छ २२ जिल्काद, सन समानीन.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ३.
१७०१ आश्विन वद्य ७ श्री. ३१ आक्टोबर १७७९.
राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेंसीः-
विनंति उपरी. तुम्हांस जातेसमंई सर्व मजकूर सांगितलाच आहे. राजश्री नरसिंगराव व गोविंदराव नारायण सांगतील. त्याप्र॥ नवाबबहादर यांची खातरजमा करावी. करार जाल्याप्र॥ इकडील किमपि गुंता नाहीं. र॥ छ २० सवाल. हे विनंति. पौ। छ २७ जिल्काद, सन समानीन.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक २.
१७०१ आश्विन शु॥ १२ श्री. २२ आक्टोबर १७७९.
दस्तक सरकार राजश्री पंतप्रधान त॥ कमाविसदारान व चौकीदारान व बाजेलोकान व मोकदमान व नावाडे व ठोकरेकरी. सु॥ समानीन मया व अलफ. राजश्री कृष्णराव नारायण जोशी सरकारांतून हैदरखानाकडे रवाना केले असेत. बरोबर पालखी व घोडीं व उंटें व माणसें गाडदी व राउत भारबारदारी आहे. तरी जातां येतां मार्गीं मुजाहीम न होणें. रात्रीस चौकी पाहारा करून नदी नाले पार करणें. जाणिजे. छ ११ सवाल. आज्ञा प्रमाण. लेखनसीमा.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
हैदर व टिपू ह्यांच्या दरबारांतील पेशव्यांचे वकील
कृष्णराव नारायण जोशी ह्यांचीं पत्रें.
लेखांक १.
१७०१ आश्विन शुद्ध १२. श्री. २० आक्टोबर १७७९.
राजश्री तात्या स्वामींचे सेवेसीं:-
विनंति विशेष. गाडदी दि॥ खैरुलाबेग याजकडील असामी पंचवीस आपणाबरोबर चाकरीस आहेत. त्यास, त्यांची चाकरी चुकरी सकरुलाबेग व सैख जमालुदिन या दोघांपासून सांगोन घेत जावी. लोकांस खर्चास देणें तें यांजवळ देत जावें. चांगले माणूस आहेत. यांस वागऊन घ्यावें. र।॥ छ ११ सवाल. हे विनंति. दारुगोळीचा बंदोबस्त करून दिल्हा आहे. पेशजी पंचवीस माणूस नेमून नांवनिसीवार याद आपणाजवळ आहे, त्यापो दोन असामी येथें राहिल्या, त्यांचे मोबदला जयालहानखान व शेख मोहीदिन दोन असामी गेले आहेत. कळावें हे
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
१. | कान्होजी आंग्रे, (१६०२- १६५१), स्त्रिया २ (लक्ष्मीबाई व गहिनाबाई), लक्ष्मीबाईचे पुत्र २ (१ सेखोजी व २ संभाजी), गहिनाबाईचे पुत्र ४ (१ मानाजी, २ एसाजी, ३ संभाजी, ४ धोंडजी). |
२. | सेखोजी आंग्रे (१६५१-१६५५) |
३. | संभाजी आंग्रे (१६५५-१६५७) |
४. | मानाजी आंग्रे (१६५७ - १६८०), स्त्रिया २ (राधिकाबाई व भागीरथीबाई), पुत्र १४ ( दहा औरस व चार खर्च) |
५. | राघोजी आंग्रे (१६८०-१७१५), पुत्र ३ (मानाजी, कान्होजी, जयसिंग) |
६. | मानाजी आंग्रे (१७१५-१७२१) पुत्र १ (राघोजी) |
७. | बाबूराव आंग्रे (१७२१-१७३५) |
८. | मानाजी आंग्रे पुन: (१७३५-१७३९) |
९. | राघोजी आंग्रे (१७३९-१७६०) |
**** समाप्त ***
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
जयसिंगरावाचा मुलगा मुऱ्हारराव याणें मुंबईहून बच्याशेट सोनार यांस सेनापति करून लष्करसुध्दां १७२८ च्या माघमासीं कुलाब्यावर लढाई दिली. बाबूराव आंग्रे यांचे तर्फेचे लोक शेट मजकुरास फितूर झाले. दौलतराव बिन चिमाजी आंग्रे व महिमानजी बिन तुकोजी आंग्रे. हिराकोट व सागरगड दोन्ही किल्ले शेटजीनें घेतले. दोन चार लढाया झाल्या. परंतु शेटाचा मोड झाला नाहीं. तेव्हां मुत्सद्दी नरोत्तम शेट गुजर, बाबा घाटगे व बाबूराव शिरधर चेऊलकर असे होते. शेट आपले लोकांनिशी हिराकोटांत होता. त्यापैकी फतू जमादार सोरटी यांस एक लक्ष रुपये देऊं करून फितूर केला, आणि शेट यास धरून बाबूराव आंग्रे यांचे स्वाधीन केला. शके १७२९ वैशाख शु॥ ६ शेट, दौलतराव आंग्रे व महिमानजी आंग्रे यांस चेंढरें येथें डोंगरी आहे तेथें नेऊन जिवें मारिलें. रायाजी आंग्रे यांस सागरगडच्या तटावरून लोटून मारिले. रामाजी कोशा व बेंड वर्तक यांचें बंड झालें. त्यांस धरून त्यापैकी वर्तक यास खांदेरीत नेऊन जिवें मारिलें. मानाजी आंग्रे व कान्होजी आंग्रे हे बाबूराव आंग्रे यांचे अटकेस होते. बाबूराव आंग्रे यांचे तर्फेचा विनायक परशराम बिवलकर ऊर्फ बाबाजी यानें फितूर केला. त्यास जिवें मारावा, परंतु त्याचा बाप बाबूराव श्रीधर याच्या भिडेस्तव सोडिला. बाबूराव घाटावर शिंद्यांच्या लष्कराकडे जात असतां, भगेंद्र पडून शके १७३५ श्रावण वद्य ५ स वारले, जामगांवी. मानाजी आंग्रे समागमें होते त्यांनी क्रिया केली. मानाजी शके १७३६ श्रावण वद्य ५ पासून १७३९ पर्यंत राज्यासनी होता विनायक परशराम बिवलकर कारभारी. आमचा आह्मीं कारभार करूं कारभारी नको, असें पत्र आंग्रे यांनी पेशव्यांस लिहिल्यावरून, पेशव्यांनी विश्राम भाटकर पाठवून दिला. पांडुरंग शिवा व गटा सरदार हे भाटकरांस जाऊन पुढें भेटले. भाटकरांचा जोर समजला. भाटकरास कैद करून १७३७ चे ज्येष्ठ मासीं जिवे मारिलें. बिवलकर व मानाजी आंग्रे सरखेल यांची अति चुरस लागली. शेवटी मानाजी १७३९ च्या कार्तिक माशीं वारले. यांचे पुत्र राघोजी. यांचा अंमल १७३९ मार्गशीर्ष शुध्द १० पासून १७६० पौष शुध्द १० पर्यंत.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
तेव्हां दौलतराव शिंदे यांनीं स्वार व फौज देऊन हरिपंत भावे, हिंमत बाबूराव आंग्रे, यांची रवानगी केली. शके १७१९ मार्गशीर्ष मासीं कुलाब्यास दाखल जाले. तें लष्कर मौजे अशवी तर्फ खंडाळें येथें राहिले. जयसिंगराव आंग्रे हे लष्कर घेऊन हिराकोटांत येऊन राहिले. नागोजी आंग्रे हिंमतराव हा हरिपंत भावे यास फितूर जाला असें समजलें. त्यावरून नागोजीस ठार मारलें. पौषमासी हरिपंत याचा वेढा हीराकोटास पडला. कोटावर फार मारा चालविला. मनुष्यांस अन्नपाणी मिळणें बंद जालें. राव आंग्रे लष्करचा वेढा असतां राषी लोक घेऊन साखरेची खाडी उतरून कुलाब्यांत गेले. दुसरे दिवशीं हरिपंत भावे लष्कर घेऊन चेंऊलास आले. उभयतांची लढाई होऊन पंताचा मोड जाला. ही खबर ग्वालेरीस समजतांच शिंदे यांजकडून दुसरी फौज मदतीस आली. मानाजी व हरिपंत यांची लढाई जाली. मानाजी पळाले. राव आंग्रे रेवदंडयास गेले. पंतांच्या हस्तगत जाले नाहींत. बाबूराव आंग्रे यांनी यशवंतराव शिंदे सुभेदार किल्ले रेवदंडा यास फितूर करून, पाच हजारांचा गांव इनाम देऊन, मानाजीस धरिलें. बाबूराव आंग्रे यांस राज्याभिषेक शके १७२१ मार्गशीर्ष वद्य ८ स जाला. जयसिंगराव आंग्रे लष्कर ग्वालेर येथें अटकेंत राहिले. इकडे त्यांची बायको सकवारबाई खांदेरी किल्ला देईना. तेव्हां जयसिंगराव आंग्रे यांस परत आणतो अशी भाषा क्रिया करून बाबूरावांनी बाईपासून किल्ला युक्तीनें घेतला, शके १७२२ कार्तिक शु. ७ जयसिंगराव आंग्रे यांस घाटावरून आणून मार्गशीर्ष शु. ६ स सागरगडास जिवें मारिलें. मुऱ्हारराव आंग्रे मुंबईस पळून गेले. इकडे संस्थानचें काम हरिपंत भावे करूं लागले. ते हिशेब देतना. ह्मणून कैदेंत ठेविले. पुढे खंड घेऊन सोडून दिले, शके १७२३ चैत्र वद्य ६. बाबूराव आंग्रे पुण्यास गेले, तेव्हां यशवंतराव होळकर यांचा दंगा झाला. आंग्रे यांस लुटून फस्त केलें. तेथून पळून माणिकगढींत आले. तेथून कुलाब्यास कार्तिक शु. ५ स आले.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
तेथें उभयतांची लढाई होऊन, त्यांत जेर होऊन जयसिंगराव भाद्रपदमासी रेवदंडयास आले, व तेथून पुण्यास गेले. मानाजी आंग्रे यांस पेशवे यांजकडून आश्विन शुध्द १० स वस्त्रें जालीं. जयसिंगराव आंग्रे पुण्यास गेले सबब त्यांची मुलेंमाणसें सागरगडावर अटकेंत होती तीं राज्यांतून काढून बाहेर लावून दिली. ती माणसें व राव आंग्रे यांची बायको सकवारबाई नागोठणें येथें जाऊन सरखेल यांची गढी काबीज करून तेथें राहिलीं. त्यांवर मानाजी आंग्रे यांनी लष्कर पाठवून लढाई जाली. मानाजी आंग्रे लढाई हरले. मानाजीचे लोक मौजे वरवठणें येथें मोर्चे धरून राहिले. शके १७१८ ज्येष्ठमासीं नागोजी आंग्रे दिवाण याजवर जयसिंग आंग्रे यांनी छापा घालून, मानाजीचा मोर्चा मारून, दोन तोफा व कांही दारूगोळा घेऊन गेले. शके मजकुरीं आषाढमासी जयसिंगराव आंग्रे पुण्याहून नागोठण्याचे गढीत दाखल जाले. मुलामाणसांच्या भेटी जाल्या. मानाजी आंग्रे यांचे चार पांचशे लोक मौजे सावरखिंड तर्फ शिरगांव येथें होते. त्यांजवर जयसिंगराव यांनी छापा घालून लोक पिटाळून लाविले. मानाजीचे लोक पोयनाडास मुक्काम करून राहिले. कांही कुलाब्यास आले. जयसिंगराव आंग्रे नागोठण्याच्या गढींतून श्रावणमासीं निघून श्रीएकवीरा भवानी महाल चेऊल येथें लष्करसुध्दां राहिले. मानाजी लष्कर घेऊन चेंऊलास आले. लढाई जाली. तींत देवळाचे ओटीवरून माणसांचे रक्ताचे पूर वाहिले. त्यांत मानाजीचा पराभव जाला. राव आंग्रे यांचीं मुलेंबाळें नागोठण्याहून चेंऊलास आलीं. भाद्रपदमासीं जयसिंगरावानें कुलाब्यास जाऊन हिराकोट घेतला, आणि प्रांताची वसूलबाकी करूं लागले. राव आंग्रे यांनी चढाव करून सागरगड घेतला. सुभेदार, सरनौबत, हसबनीस, सर्व लोक येऊन आंग्रे यांस कोट मजकुरी भेटून नजराणा केला. दुसरे दिवशी खांदेरी येथे राव यांचे निशाण चढलें. मुलें माणसें होती तीं हिराकोटांत नेलीं. प्रांतांत स्वस्थता नव्हती. शके मजकुरीं मार्गशीर्षमासीं आनंदीबाई आंग्रीण ईस देवाज्ञा जाली. नंतर अजबा डबीर, दिवाण मानाजी आंग्रे, लष्कर घेऊन रेवदंडयास आले. तेथून दिवीपारंगी तर्फ उगटें या बंदरीं उतरून रात्रीं चेउलास श्री भगवती येथे राव आंग्रे यांचे लोकांवर छापा घातला. राव आंग्रे यांचे लोक हुशार असल्यामुळें डबीर यांचे लोक कोंडले गेले व मारले. बाकीचे पळून महाराजांचे राज्यांत गेले. राव यांनी बाहेरून फौज मदतीस आणिली. मानाजी आंग्रे यांचा बचाव होईना. आपली आई आनंदीबाई मृत्यु पावली, कोणाचा आश्रय नाहीं, असे पाहून जयसिंगराव आंग्रे यांशी मानाजी फाल्गुनमासी भेटले. सोरटी लोकांस रजा दिली. बाबूराव आंग्रे यांचे लोक मदतीस आणिले होते त्यांसहि रजा दिली. कांही रोजमुरा द्यावा तो राव आंग्रे यांनी दिला नाहीं. ह्मणून शिंदे सरकारच्या लोकांची व यांची लढाई जाली. त्यांत बाबूराव आंग्रे यांचा मोड जाला. ही खबर लष्कर ग्वालेर येथें समजली.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
त्यांस पुत्र ३ :- १ मानाजी, २ कान्होजी, ३ जयसिंग. ह्या तीन पुत्रांपैकी मानाजी हे राज्यासनी बैसले. ह्यांचा अंमल शके १७१५ पासून शके १७२१ पर्यंत होता. त्रिवर्ग बंधू समयिक असतां जयसिंगराव आंग्रे हे दिवाणगिरीचे काम करीत होते. राघोजी आंग्रे यांची धाकटी स्त्री आनंदीबाई, भोसले यांची कन्या; मानाजी आंग्रे यांची खुद्द आई, इचा व जयसिंगराव आंग्रे यांचा आपसांत कलह उत्पन्न जाहाला. बाईसाहेब यांनीं विचार केला कीं, जयसिंगराव यास धरून जिवें मारावें. ते समयीं जयसिंगराव आंग्रे यांस सूचना जाल्यावरून किल्लेमजकूरचा बंदोबस्त करून फितुर असामी यांस धरिलें. दौलतराव हरी व रघुनाथराव हरी चिटणीस, दिवाण सरखेल या दोन असामींस जिवें मारिलें. धोंडभट शैव, भास्कर गोविंद फडणवीस, धाक सारंगवर, हरजी हिदळेंकर, भंडारी व रघुनाथराव भोसले सातारकर ह्या असामींस कैदेंत ठेविलें. भोसले यांचे लोकांस प्रांतातून लुटून लाविले. राव आंग्रे यांनीं आपले दोन मुलांस राज्यावर बसवून कारभार करूं लागले. ही बातमी पेशवे सरकारांत समजून, माधवराव हरी फडके व जिवाजी बल्लाळ असे लष्कर देऊन कुलाब्यास दोघा भावांची समजी करावयास आले. ते रेवदंडयास उतरले. आणंदीबाई आंग्रे यांणीं धोंडभट भाऊ दिवाण, फडके यांचा कारभारी, यांस एक लक्ष रुपये देऊं करून जयसिंगराव आंग्रे यांस धरून यावें असा करार केला. धोंडभटभाऊ यांनी कांही लष्कर घेऊन मुकाम संगम तर्फ खंडाळे येथें गेले. तेथें जयसिंगराव आंग्रे यांनी भटजींचा पराभव केला. साखरेस आंग्रे यांची गलबतें छावणीस होती त्यांस आग लावली. जयसिंगराव लष्कर घेऊन रेवदंड्यास आले. शके १७१६ त हरिपंत फडके अजारी होऊन शुध्द ११ स मृत्यु पावले. माधवराव यांचे लष्कराची व आंग्रे यांची भेटी मौजे चेढरें तर्फ खंडाळे येथे होऊन खुशालीचे पोषाक जाले. तेथून रेवदंड्यास आले. नंतर मानाजी आंग्रे व जयसिंग आंग्रे लष्करसुध्दां रेवदंड्यास येऊन भेटी जाहाल्या. फडके यांनीं आंग्रे मंडळीस कारभाऱ्यासुध्दां वस्त्रें दिली. माधवराव फडके पुण्यास गेले. शके १७१७ चे चैत्रमासीं मानाजी व जयसिंगराव एकत्र असतां, आणंदीबाई आंग्रे यांनी सोरटी लोक फितूर करून, किल्ले मजकुरीं गर्दी करून जयसिंगराव आंग्रे, धर्मा सारंग, बाळाजी पांडुरंग, धोंड सारंग, कान्होजीराव देशमुख, आपाजी चव्हाण व गोपाळ पाटील या सात असामींस कैद करून, बिड्या घालून, कोणास सागरगडावर, कोणास खांदेरीवर, अटकेंत ठेविलें. बाळाजी पांडुरंग यास जिवें मारला. नंतर चार महिन्यांनीं जयसिंगराव आंग्रे यांनी फितूर करून श्रावणमासी हिराकोटांत येऊन राहिले.