Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
१७०१ मार्गशीर्ष व॥ ६. लेखांक १५.
र॥ छ १९ जिल्हेज, समानीन श्री. २८ डिसेंबर १७७९.
श्रीमंत खुदावंत न्यामंत राव पंतप्रधान यांचा व आंमेहरबांचा पक्का सलूख व दोस्ती होऊन सरकारचे मातबर व आपणांकडील वकील एकलासदस्तगाहा नरसिंगराव यांस आहादशर्तीचे कागदपत्र देऊन पट्टनास रवाना केले. ते येऊन पोंचले असतील, अगर पोंहचतील. इंग्रेजाचा इरादा अदवानीकडे येण्याचा ही शकल नामुनासब जाणून, आंसाहेबीं अदवानीतालुक्यांत फौज पाठऊन हांगामा करविला. त्यास, तो तालुका नवाबनिजामअल्लीखांबहादूर यांचा. नवाब मवसूफ व रावपंतप्रधान यांची कदीमापासोन दोस्ती व एकरंगी; जुदागी नाहीं. दोन्ही दौलती एक. इंग्रेजाचे तंबीचे मसलतीस नवाब शरीक. टोपीवाले यांणीं बहुत बेअदबी केली व बेबाहां जाले. त्यांची चाल खुशकींत नीट नाहीं. याची तदबीर दक्षणचे रयासतवाले यांणीं करावी; तरीच काय हाली व काय पेस्तर, सर्वा दौलतीस नेक ऐसें दूरंदेशीनें समजोन, आंमेहरबांची व सरकारची दोस्ती जाली, हें सलाह दौलत ऐसें जाणोन, नवाबमवसूफ बहुत खुश जाले. दरींसुरत नवाब व रावपंतप्रधान व आंसाहेब तिन्ही दौलती एक सलाह व तदबीर एक; दुसरा विचार राहिला नाहीं. सर्वत्रांची नजर मोठे मसलतीवर. तेव्हां घरांतले घरांत आपआपणांत नाखुसी येणें, हें सलाह नाहीं. अजीं सबब अदवानीचा हंगामा मना करवावा. आपण चेनापट्टणाकडे जमीयत सुधां गेल्यानंतर अदवानीस इंग्रेज येऊन मुलकांत सिरोन बखेडा करून मोठे मसलतीस पायबंद होईल, ऐसें आपले दिलांत आलें असेल. त्यास, नवाब अव्वल अदवानीचा बंदोबस्त राखून, तसेंच सिकाकोल राजबंदरीकडे जातील. याविसीं पेशजीं आमेहरबांस पत्रें पाठविलीं, ते पोहचून हांगामा मना जालाच असेल. इंग्रेजास तंबी करणें, ही मोहीम मोठी. आरसा न्याहायत कम राहिला, सबब आंमेहरबांचें निघणें चेनापट्टणाकडे जलद व्हावें. अदवानीचे बंदोबस्तास फौज रवाना केली. व इंग्रेजांचीं पलटणें तुमचे फौजेनें माघारीं हटविलीं, तीं कृष्णा उतरून उत्तर तीरानें अदवानीकडे जावयास येत होतीं, त्यांजवर नवाबांनीं फौज रवाना केली. त्यांणीं जाऊन घांटाची बंदी करून ठांसून राखिलें. त्यांच्यानें इकडे येवत नाहीं. खासा नवाबही तयार आहेत. सिकाकोल राजबंदरीकडे जाणार.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक १४.
१७०१ मार्गशीर्ष व॥ ६. श्री. २८ डिसेंबर १७७९.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पो। बाळाजी जनार्दन सं॥ नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जावें. विशेषः- तुह्मीं इतके दिवसांत पट्टणास जाऊन पोहचलां असाल. नवाब हैदरअलीखां बहादूर यांचे पुत्राची शादी आहे याविसीं नवाब बहादर यांचीं पत्रें सरकारांत श्रीमंतांस व आह्मांस आलीं. त्यावरून सरकारचा व आमचा ख॥ आहेर वस्त्रें व जवाहीर रकमा पाठविल्या, त्याची याददास्त अलाहिदा आहे. त्याप्रमाणें समजोन नवाब बहादर यांस आहेर करावा. इकडील कितेक मजकूर अलाहिदा पुरवणीपत्रीं लिहिला त्यावरून कळेल. र ॥ छ १९ जिल्हेज. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे हे विनंति. पै॥ छ ११ मोहरम, सन समानीन. पौषमास, मुक्काम पट्टण.
श्री.
यादी अजम हैदरआलीखां बहादर यांसः -
आहेर राजश्री नाना फडणीस यांजकडील
जवाहीर सिरपेंच कापड सनगें सु॥
दागीना सु॥ १ चिरा बादली
१ १ गोशेपेच बादली
२ जामेवारे बादली
१ पटका बादली
१ शाल जोडी केशरी
१ किनखाप
--------------------
७
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै।। छ. ११ मोहरम. लेखांक १३. १७०१ मार्गशीर्ष शु॥ १०.
सन समानीन. श्री. १८ दिसेंबर १७७९.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव तात्या यांसीः-
प्रति गोविंदभट निदसुरे आसीर्वाद विनंति. येथील कुशल जाणोन स्वकीय कुशललेखन करीत असिलें पाहिजे. विशेषः- तुह्मीं पत्रें पाठविलीं तीं पावलीं. लि।। मजकूर कळला. पुरवणीपत्राचा मजकूर यजमानांस निवेदन केला. *त्याची तर्तूद होऊन आहेर वगैरे रवाना जाहाले आहेत. आपणाकडेसचे सनगें येतील त्याप्रों।। त्यांस द्यावीं. वरकड सविस्तर रा. आपांनीं लिहिलें आहे त्यावरून कळेल. तळेगांवचा मजकूर यजमानांस विनंति केलाच आहे. मागाहून उत्तर घेऊन आपणांस पत्र लेहूं. बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे. हे आसीर्वाद. रा। छ ९ जिल्हेज हे आसीर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक १२.
पो। छ १८ जिल्हेज. श्री. मु।। नेगळूर प्रां। सावनूर.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव तात्या स्वामींचे सेवेसीं:-
पो। हरि बल्लाळ साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित असिलें पाहिजे. विशेषः- तुह्मी पत्र पा। तें पाऊन संतोष जाहाला. लिहिलें वर्तमान सविस्तर कळलें. सर्व मंडळी एकत्र होऊन बहादराकडे गेला. उत्तम गोष्ट केली. आनंदरायांनीं सविस्तर सांगितलें. तुह्मीं बहुत सावधपणें राहून वर्तमान वरचेवर लिहीत जावें. सर्व मंडळी एकरूप असावें. रा। छ ७ जिल्हेज बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ११.
१७०१ मार्गशीर्ष शु॥ ७. श्री. १५ डिसेंबर १७०९.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री
कृष्णराव स्वामींचे सेवेसीं :-
पोष्य बाळाजी जनार्दन साष्टांग नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जावें. विशेषः- तुह्मीं पत्र पाठविलें तें प्रविष्ट जालें. नवाब हैदरअलीखान बहादूर यांचे पुत्र करीमखान यांचें लग्न छ २५ जिल्कादीं करावयाचा निश्चय होऊन, सरकारांत व आपल्यास व राजश्री महादजी सिंदे यांस वगैरे कुंकुमपत्रे पाठविलीं आहेत. याजकरितां त्यांस बहुमान आहेर पाठवावयाचा मजकूर व अदवानीचे मजकुराविसीं नरसिंगराव यांजपासून पत्र नवाबबहादर यांस पत्र पाठविलें होतें त्याचें उत्तर आलें त्याचा मजकूर, राजश्री गोविंद नारायण यांचे पत्रावरून कळेल, ह्मणोन लिहिलें तें कळलें. व गोविंद नारायण यांचें पत्रावरून अदवानीचा महसरा उठऊन नवाबबहादर नेण्हार, तो अर्थ समजला. ऐशांस नवाबबहादर यांजकडे शादी होणार हें श्रवण होऊन संतोष जाला. मागाहून यथापद्धत बहुमान आहेर र॥ होईल. नवाब निजामअलीखान यांचा व सरकारचा स्नेह जाणोन, अदवानीचा महसरा नवाबबहादर उठऊन नेण्हार उचित आहे. लौकर फौज उठऊन नेऊन, चेनापट्टणाकडे योजिल्या मसलतीस र॥ करीत, तें नरसिंगराव यांस सांगोन आधीं करवावें. नवाब निजामअलीखान बहादर यांची फौज कृष्णेपर्यंत गेली. लौकरच अदवानीस जाऊन ते आपला तेथील बंदोबस्त करितील. महसरा अदवानीचा लौकरच उठऊन नेत, असें आधीं करवावें. र॥ छ ६ जिल्हेज. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे हे विनंति. पै॥ छ १८ जिल्हेज. मार्गेश्वर मास, स॥ समानीन. मुक्काम नेगळूर प्रां॥ सावनूर.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक १०.
१७०१ मार्गशीर्ष शु॥ ७. श्री. १५ डिसेंबर १७७९.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री
कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पो॥ बाळाजी जनार्दन सां। नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जावें. विशेष. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावोन लिहिलें वर्तमान कळलें. सर्व मंडळी एकत्र होऊन बहादरांकडे गेलों ह्मणून लिहिलें, तें कळलें. जलदीनें जाऊन पोहचून योजिल्याप्रों। मसलत नमूदांत ये ती गोष्ट करावी. र॥ छ ६ जिल्हेज. बहुत काय लिहिणें ? लोभ असो दीजे. हे विनंति. पै॥ छ १८ जिल्हेज, मार्गेश्वर मास. मु॥ नेगळूर, प्रां॥ सवनूर.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पै॥ छ. १ जिल्हेज लेखांक ९.
१७०१ मार्ग [१] २३३ श्री. ११ डिसेंबर १७७९.
सेवेसीं विनंति ऐसीजे. आपण छ १९ जिल्कादचें पत्र पाठविलें, तें छ २६ जिल्कादीं मु।। कुसगांव प्रां। मिरज येथें पावलें. पत्रीं लिहिलें जें, सिंदे यांजकडील राजश्री त्रिंबकराव आपाजी येथें आले. त्यांची रवानगी वांईस केली. राजश्री नरसिंगराव माहुलीस गेल्याचें वर्तमान आलें. राजश्री गोविंदराव पंचमीस रविवारीं निघणार. याउपरि तुह्मीं व ते लांब लांब मजली करून सत्वर जाऊन पोहंचावें. सिंद्याकडील कारकुनास सिंद्यांनीं व आह्मीं चांगले रीतीनें सांगितलें आहे. तुह्मी व रास्त्याकडील गोविंदराव व त्रिंबकराव त्रिवर्गांचें बोलणें एक पडावें. आंत बाहेर दरज दिसूं नये ह्मणून आज्ञा. ऐसियास, सर्वत्र मंडळी माहुलीस एकत्र होऊन, मजल दरमजल मु॥ मजकुरास आलों. नवाबबहादुर यांजकडून लग्नपत्रिकेच्या थैल्या आल्या, त्या राजश्री आनंदराव वकील यासमागमें राजश्री नरसिंगराव यांणीं पाठविल्याचा मजकूर लेहून, धामणेर याचे मुकामींहून पत्र पाठविलें, तें प्रविष्ट जालेंच असेल. आज्ञेप्रो। सर्वत्रांची एकवाक्यताच आहे. तेथें गेलियावर बोलण्यांत व वर्तणुकेंत आंतबाहेर दरज दिसूं येणार नाहीं. कळावें. काल राजश्री गंगाधरराव नाना यांची भेट मौजे अनंतपूरनजीक आथणी येथें जाहाली. समागमें स्वार घ्यावयाचे ते त्याजपासून घेऊन येथें आलों. उदईक येथून कूच करून लांब लांब मजलीनें पुढें जात असों.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ८.
१७०१ कार्तिक वद्य ३०. श्री. ७ डिसेंबर १७७९.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री
कृष्णराव तात्या स्वामींचे सेवेसीं:-
पो। कृष्णराव बल्लाळ सं॥ नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जावें. विशेषः- राजश्री आपा यांस तुह्मीं पत्र पाठविलें, त्यांत लिहिलें कीं, नबाब हैदर अलीखां यांचे घरीं शादी आहे. त्यांचींही पत्रें शादीचीं आलीं, तें राजश्री आनंदराव नरसिंह देतील. त्यास, लग्नास आहेर सरकारचा असावा, त्यावरून आह्मी राजश्री नाना यांसीं बोलिलों. वस्त्रें वगैरे पाठवावयाचा निश्चय जाला. राजश्री आनंदराव आदियाप वांईहून आले नाहींत. ते आल्यावर सांडणीस्वाराबराबर सनगें रवाना आपणाकडे होतील. तुह्मीं लांब लांब मजली करून जावें. दिवस कांहीं राहिले नाहींत. राजश्री नरसिंगराव सावनुरांत घर आहे ह्मणोन गुंततील, आएश आरामांत पडतील. त्यास, ऐसें न व्हावें. * निकड करून लौकर जावें. र॥ छ २८ जिल्काद बहुत काय लिहिणें, लोभ असों दीजे. हे विनंति. मै॥ छ १८ जिल्हेज. मार्गेश्वर मास. मु॥ नेगलूर प्रां। सावनूर.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ७.
१७०१ कार्तिक वद्य ५. श्री. २८ नोव्हेंबर १७७९.
राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. तुम्हीं पत्र पाठविलें तें पावलें. आम्हीं राजश्री नरसिंगराव व गोविंदराव यांस पत्रें पाठविलीं, त्याचें उत्तर आलें कीं, सिंदे यांजकडील कारकून अद्याप आले नाहींत, ते आलियानंतर आमचा गुंता नाहीं, ऐसें आलें. म्हणोन लिहिलें. ऐसियास, सिंदे यांजकडील राजश्री त्रिंबक आपाजी येथें आले, त्यांची रवानगी वांईस केली. राजश्री नरसिंगराव माहुलीस गेल्याचें वर्तमान आलें. राजश्री गोविंदराव पंचमी रविवारीं निघणार, ऐसें वर्तमान आलें. याउपरी तुह्मीं व ते मिळोन लांब लांब मजली करून, सत्वर जाऊन पोहोंचावे. *सिंद्याकडील कारकुनास सिंद्यांनीं व आह्मीं चांगले रीतीनें सांगितलें आहे कीं, तुम्हीं व रास्त्याकडील गोविंदराव व तात्या सरकारचे त्रिवर्गाचें बोलणें एक पडावें. कोठें दरज आंत बाहेर दिसूं देऊं नये. याप्रों।च त्रिवर्गानीं करावें. र॥ छ १९ जिल्काद, हे विनंति. पौ। छ २६ जिल्काद, रविवार सन समानीन.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ६.
१७०१ कार्तिक वद्य ५. श्री. २८ नोव्हेंबर १७७९.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव तात्या स्वामींचे सेवेसीं:-
पो।।. हरी बल्लाळ साष्टांग नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल त॥ छ १९ जिल्काद जाणून स्वकीय कुशल लिहित जावें. विशेषः- तुह्मीं पत्र पो। तें पावोन लिहिलें वर्तमान सविस्तर कळलें. मुहूर्तेंकरून निघालों, राजश्री नरसिंगराव व गोविंदराव यांची वाट पाहातों, आले ह्मणजे निघोन जाऊं, ह्मणोन लि॥ तें कळलें. त्यास, तुह्मीं गेल्यावर नरसिंगराव व गोविंदराव व राजश्री पाटीलबावाकडील कारकून यांची रवानगी जाली. त्यास, श्रीमंत राजश्री नानांनीं समक्ष सांगितलें कीं, सरकारचे मातबर कृष्णराव दिल्हे आहेत, हे व तुह्मीं मिळोन जाबस्वाल करीत जाणें. कोठें दरज न दिसे, असें करावें. याप्रों। सांगितलें आहे. तुह्मीं सर्वांस मेळऊन घेऊन, जाब स्वाल करीत जावें. आजपर्यंत नरसिंगराव आदिकरून सर्व मंडळीची गांठ पडली असेल. याउपरी दीसगत न लावितां लौकर जाऊन पोहोंचावें. बहुत काय लिहिणें? लोभ असों दीजे. हे विनंति.
पो। छ २६ जिलकाद, सन समानीन.