[५३०] श्री.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता छ २३ साबान जाणून स्वकीय कुशल लिहीत गेलें पाहिजे. विशेष आपण पत्र पाठविलें तेतें लिहिलें कीं +++++++++++ यास्तव मुख्याची भेट जाहालि ++++ बहुत मजकूर सांगितला. तेणेंकरून संतोष पावून बोलले कीं त्यांचे चित्तांत काय काय पर्याय आहेत ते लिहून सत्वर आपण आणवावे. वरकडही कितेक स्नेहाचा अर्थ व तेथील वर्तमान लिहिलें तें सविस्तर अवगत जाहालें. ऐशियास आह्मीं तीन प्रकार आपणाशी बोललों ते आपण खानाशी बोलले असतीलच. त्याचा विस्तार कांही लिहिला. येथूनही वरचेवर बगाजीपंत यांस लिहितों. ते खानास अर्ज करीत असतीलच. आमचा सारांश हाच कीं, आपलें तर्फेनें स्नेहांत अंतर मागें पडूं दिल्हें नाहीं, पुढें आपण होऊन अंतर न करावें, त्यांनी मागें बहुत अंतरें केली, पुढें तरी न करावीं. +++++++++++++ मजकुरावरून दिसतें. की स्नेह करावा. बाहेरील घरांतील पेच पडले आहेत यास्तव. ऐशियास, जेव्हां जसें करतील तेव्हां त्याप्रकारें वर्तावें उत्तम. परंतु तूर्त स्नेह इच्छितात. कोणेंप्रकारें तें सर्व बगाजीपंतासमागमें सांगून आह्माकडे पाठवावें. ज्यांत उभयपक्षी निभावे, स्नेह चाले, ते गोष्ट सांगून पाठवूं. तेथील भाव कळल्यावांचून आह्मी काय लिहावें. स्नेहाविशीं तो अंतर नाहीं हे मुख्य गोष्ट आहे. वरकड मनसब्याचे मजकूर आपणहून मागें बोललों ते सर्व नासले. आतां ते जें जें सांगून पाठवितील त्याचें उत्तर प्रत्योत्तर स्नेहाचे रीतीनें करूं. *