[५३२] श्री.
राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विनंति उपरि दरगाहकूलीखानाचें पत्र पावलें. उत्तर मागाहून पाठवून देऊं. वरकड मुख्य पत्रावरून कळेल. हे विनंति.
[५३३] श्री. ६ अक्टोबर १७५७.
वेदमूर्ति राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान साष्टांग नमस्कार विनंति. निजामअल्लीचे मनांत परिछिन्न बिघाड कर्तव्य आहे. आपण सावधता करावी; ह्मणून सूचना केली. तेणेकरून संतोष जाहला. बिघाड केलिया स्वामीचे आशीर्वादें नफाच होईल. आह्मीही दसरियास कुच करून येत आहों. वरचेवर चिरंजीवास जें लिहिणे तें लिहीत जावें. छ २२ मोहरम. हे विनंति.