Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[५६६] श्रीगुरुसमर्थ २० डिसेंबर १७२१.
श्रीमन्महानाईक नडगोट नुगजूरी बदरद होनरी राजाधिराजश्री सिदप्पानाईक खेपा देसाई नाडगौडा प्रांत गोकाक व सरदेसाई सर नाडगोंडा सरकार रायेबाग व प्रांत तेरदाल व पादशापूर व नाडगौंडा तो आजरें व चांदगड महालानिहाय ता सिदण्णा वल्लद बोलाणा चाकरी दि॥ सरकार देसगत प्रा मजकूर. सु इसने आशरेन मया आलफ. कारणें करून दिल्हे इनामखत ऐसाजे. सन तिसा आशर मया आलफमध्यें श्रीमंत राजश्री पाराशरवासी यांनीं वडगांवावरी मोकाम केला असतां श्रीमंत राजश्री स्वामी सातारवासी याचे फौज येऊन युध्य प्रसंग जाले. तेसमयीं तुवां साहेबाबरोबर खस्त केली. चिरंजीव राजश्री शिवलिंगाप्पा पाडाव होऊन त्यांचे हातास लागून गेला. त्याबरोबरी दोन्ही वरीस हाताखालीं खस्तीनें चाकरी करून टिकून राहिलेस. याउपरि साहेब तुजवर संतोषी होऊन आपले खासगत नाईकी इनाम मौजे कलहोला जमीनपैकी रुके + बारा आरा रकम होन ७॥ साडेसाताचें शेत इनाम आजरामऱ्हामत करून दिला असे. सदरहू जमीन चंद्रसूर्य ऐसिजेत व पुत्रपौत्र लेकराचे लेकर पावतों भोगवटा करून घेऊन साहेबसेवेवरी जन्मोजन्म सादर होऊन राहणें. हें करून दिल्हें इनामती कोणी दिक हरकत करणें निसवत नाहीं. खातरजमा राखोन इनामती जमीन भोगवटा करून घेऊन सुखरूप असणें. जाणिजे. छ १५ माहे रबिलावल. मोर्तबसुद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[५६५] श्री. २२ मार्च १७५७.
वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी.
विद्यार्थी शिवभट साठे कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति, उपरि येथील कुशल ता चैत्र शुध्द ३ मुक्काम नागलवाडी जाणून स्वकीय लेखन कीजे. विशेष. आज्ञा घेऊन स्वार जालो ते छ मजकुरीं मु मजकुरास येऊन दाखल जालों. श्रीमंतही येथून पांच कोसांवर सेनेसह वर्तमान येऊन प्रविष्ट जाले. दर्शनास मुहूर्त नवता. उदयीक अथवा परवा भेट होईल. अनंतर सविस्तर लिहिलें जाईल. तरी भेटी जालियावरी श्रीमंतांचीं पत्रें आपणांस येतील. तरी भेटीस यावें. शहरींचे अधिकारी यांचीही भेटी व यजमानाचीही भेटी मनोदय असे. पुढें रा. कान्होजी भोसले आपणाकडे आले. त्यास श्रीमंत भेटीस पांच सात कोस येणार त्यांस मना केलें कीं दिवस उत्तम नवता. यामुळे तेथें त्यांनीं मुक्काम केले. आपणांस कानोजी भोसले यांणीं मेजवानीस रहाविलें. त्यांचाही गांव फौजेसन्निध तीन कोस असे त्यामुळे गुरुवारी प्रात:काळीं भेटी जाहालियावरी करंजीचा घाट उतरोन तीसगांवास येतों. कळले पाहिजे. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[५६४] श्री. २६ मार्च १७५७.
वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी.
विद्यार्थी शिवभट साठे कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल तागाईत चैत्र शुध्द ७ मुक्काम नजीक अंबडापूर श्रीमंत सेनेसहवर्तमान यथास्थित असे. विशेष. दर्शन जालियावर येथील प्रसंग अवलोकन करितां 'बालो राजा निरक्षरो मंत्री' याप्रकारें असे. ऐसियास, उदयीक मुक्काम प्रतिष्ठानीं प्रविष्ट जालियावर वर्तणूक वर्तमान अवलोकन करून तुह्मास लेखन करिजेल. प्रस्तुत सैन्य अधिकारी सहवर्तमान बुभुक्षित दिसतात, ऐसा विचार असे. विशेष. तपोनिधि हंसपुरी महंत सातारियास गेले असत, व रा. बाबूराव कोन्हेर चिरंजीवाचे व्रतबंधास्तव घरास गेले असत. उभयता मशार्निले आलिया वितरिक्त कांहीं कामकाज विलेस लावावयाचें श्रीमंतांचे मनोदयीं नाहीं, व कितेक गोष्टीस महंत मध्यवर्ती असत, यास्तव आह्मींही कांहीं उपक्रम करीत नाहीं. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[५६३] श्री. ८ एप्रिल १७५७.
पौ चैत्र वद्य १२ शुक्रवार
शके १६७९ ईश्वरनाम.
वेदमूर्ती राजश्री दीक्षित स्वामीचे सेवेसी.
सेवक शामराव सा नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता चैत्र वद्य ५ जाणून स्वकीय कुशल लेखनाज्ञा केली पाहिजे. विशेष. स्वार जालों ते चैत्र वद्य ३ स अंबडापुरींहून पुढें पंधरा कोस लष्कर होतें तेथें पावलों. आपलीं पत्रें राजश्री शिवभटजीपाशीं दिधलीं. दुसरे दिवशीं व्यतिपातानिमित्य श्रीमंत आमचे येथें न आले. काल बृहस्पतीवारीं आले होते. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[५६२] श्री. २१ जून १७५७.
पुरा आशीर्वाद उपरि. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें. राजश्री बापू कोल्हटकर यांनीं मजकूर सांगितला तो लिहिला. त्यांस श्रीमंत राजश्री भाऊकडे जावें तर उगेंच गेलें असतां ठीक नव्हे, याकरितां जाणेचा अनमान केला. कांही विना निमित्य झाल्याशिवाय जाता येत नाहीं. कांहीं संध पाहून जातों. त्यास केवळ आपण होऊन जबानी सारा मजकूर सांगावा तर प्रमाणांत येईल न येईल; कसा प्रसंग पडेल नकळे. त्यास राजश्री भिकाजी नाईक बावाचें पत्र आमचे नांवें घेऊन पाठवावें. त्यांत मागील कृतही थोडकीशी लिहावी व पुढें मनसब कोणत्या रीतीनें करावयाचा हें लिहावें. या कामांत संधानें आहेत त्यांचीही एका दोघा गृहस्थांचीं नांवें लिहावी. ह्मणजे तेथें जाऊन या कामाकरितां महिनापंधरा दिवस राहून, युक्तीनें खुलासा घेऊन, मग हें पत्र त्यास दाखवून, ठीक करून श्रीमंत राजश्री भाऊचें पत्र घेऊन, राजश्री बावास पाठवून देऊं. ह्मणजे पुढें कार्यभागास ठीक पडेल. त्यास तुह्मी राजश्री भिकाजी नाईक बावाचे घरीं जाऊन, त्याचें पत्र घेऊन, पाठवावें ह्मणजे आह्मांस भाऊंशीं बोलणें ठीक पडेल. र॥ छ ३ सवाल. लोभ करावा हे आशीर्वाद.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[५६१] श्री. १७ जानेवारी १६९४.
स्वस्ति श्री राज्याभिषेक शके २० श्रीमुखनामसंवत्सरे माघ बहुल दशमी भृगुवासर क्षत्रियकुलावतंस श्री राजाराम छत्रपति यांणीं देशाधिकारी व लेखक वर्तमान व भावी प्रांत सातारा यांसी आज्ञा केली ऐसी जे:- रा धनाजी बिन संभाजी जाधवराऊ पुरातन सेवक स्वामीसेवा एकनिष्ठपणें करीत आहेत. यास्तव यांजवरी स्वामी कृपाळू होऊन इनाम भूमि चावर ता सातारा प्रांत पैकीं
मौजे मानगांवपैकी चावर मौजे बोरगांवपैकीं चार
२ ३
एकूण पांच चावर जिराईत रास कुलबाब कुलकानू हक्कदार करून इनाम दिल्हा असे. इ.इ. इ. निदेश समक्ष मर्यादेयं
विराजते.
श्री राजाराम नरपति हर्षनिधान प्रतिनिधीचा
मोरेश्वरसुत नीलकंठ मुख्यप्रधान शिक्का.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[५६०] श्री. २४ नोव्हेंबर १६८६.
॥सौजन्यसागर महामेरू राजश्री धनाजी जाधव तथा राजश्री शिवाजी जाधव पटेल मौजे माजीगाऊ गोसावी यांसी. प्रति सेवक अनाजी बिन हरजी व जानोजी बिन तुकोजी व सोनजी बिन रेवजी पटेल मौजे बोरगाऊ दोनी कर जोडून विनंति, सबा समानीन अलफ, लेहून दिल्हा कागद ऐसाजे:- सालमजकुरीं मुलकांत दुकाळ पडला. ऐसियासी आपणास एक दिवसाचें खावयास नाहीं. ह्मणवून आह्मीं तुह्मापाशीं येऊन आपल्या आत्मसंतोषें आपले खासा तकशीम पैकीं तकशीम घेऊन आपणांस वांचविलें पाहिजे. ऐसियासी तुह्मी उत्तर दिल्हें जे तुमचे वतनभाऊ व बारा बलुते यांच्या विद्यमानें पैके देऊं. त्यासारखी तकशीम घेऊं. इ. इ. इ. छ १७ मोहरम इ. इ. इ.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[५५९] श्री. २३ जुलै १७२१.
स्वस्ति श्री राज्याभिषेक शके ४८ प्लवनामसंवत्सरे श्रावण शुध्द दशमी रविवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शंभु छत्रपति स्वामी यांणीं राजमान्य राजश्री रायाजी मल्हार व मल्हारराव रायाजी यांसी आज्ञा केली ऐसीजे- हालीं राजश्री जयसिंगराव जाधवराव यांणीं हुजूर कितेक अर्थ लेहून व सांगोन पाठविला त्याचें उत्तर त्यांस पाठविलें आहे, त्यावरून तुह्मांसही कळेल. तुह्मीं शहाणे लोक आहां. स्वामीच्या पायाशी निष्ठा बहुत धरितां.जाधवराव यांस स्वामीचे मनसुब्याचें यश येतें. ते तुमचे ठायीं बहुत ममता धरतात. ये गोष्टीचें निदर्शन समयविशेष तुमच्या प्रत्ययास येईलच. स्वामीच्या कार्यभागाविषयी बहुत सादर असत जाणें. जाणिजे. बहुत काय लिहिणें.
मर्यादेयं
विराजते.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[५५८] श्री. १६ नोव्हेंबर १७११.
* स्वस्ति श्री राज्याभिषेक शके ३८ खर संवत्सरे कार्तिक बहुलद्वादशी इंदुवासरे क्षत्रियकुलावतंस श्रीशाहू छत्रपति स्वामी याणीं समस्त राजकार्यधुरंधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री नारो पंडित सचिव यांसी आज्ञा केली ऐसीजे:- रायाजी जाधव भोईंजकर याजपासून एकनिष्ठतेस अंतर जालें. ह्मणून त्यापासून रुपये ६००० घेतले. त्यास सावोत्रियाचा तगादा केला आहे ह्मणून विदित जालें. तरी रायाजीपासून कुलबाब कुलकानू देखील हल्लीपटी व पेस्तरपेटी व सावोत्रा सदरहू सहा हजार रुपये घेतले असत. सावोत्रियाच्या कमाविसदारानें रायाजीस तगादा केला असे. त्यास ताकीद करून मना करवणें. सावोत्रियाचा तकादा लागो न देणें. बहुत लिहिणें तरी तुह्मीं सुज्ञ असा. मर्यादेयं विराजते.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)
[५५७] श्री. ४ जानेवारी १७५९.
वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्रिया विराजित वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
सेवक चरणरज शिवभट साठे चरणावरीं मस्तक ठेवून शिरसाष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील वर्तमान ता छ ५ माहे जमादिलाखर रोज आदितवार पर्यंत सुखरूप असे. उपर. आपलें वर्तमान तर वसंतपंचमीस बंगाल्याचे सुभेदारीचा शिरपाव जाला. बहुमान जाला. दुसरें, पहिले रा हंसपुरी गोसावी यांची व श्रीमंतांची बहुत चित्तशुध्द नाहीं. श्रीनें ऐसें केलें जे तुमचे आशीर्वादें तो पराभव जाला. आजी रा जानोजीबावाशीं व कुल मुत्सद्दीयांशीं व गोसावी मजकुराशीं चित्तशुध्द नाहीं; आणि आपले तैनात रा तुळजोराम या बराबर व आपले बराबर चार पांच हजार स्वार व पहिले आपले स्वार हजार ऐसा जमाव घेऊन जातो. आपला पहिला हेत होता जे स्वामीजीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा. ऐसा फार हेत होता. परंतु येथें प्रसंग बंगालियाचे मामलियाचा योजून आला, आणि त्या प्रांतांत आपला दहा पाचा लाखांचा गुंता ऐवज मुबदला आहे ह्मणून कबूल केलें. नबाब निजाम अल्ली व रा जानोजीबावा यांचा बिघाड जाला होता. त्यावर सोलापूरचे मैदानांत सलूख जाला. आजी भेटीचा प्रसंग योजिला होता. त्यावर हिशोबामुळें उभयतां दोघामध्यें बिघाड जाला. रा मुधोजी भोसले माहूर प्रांतें आले. शिकस्त होईलसें दिसतें. बहुत काय लिहिणें हे विनंति.