[५४२] श्री.
मुषफक मेहेरबानी दोस्तान सलामत :-
कालरोजी भालू खिजमतगार यास आपणास माहीत आहे त्या कामाकरितां बाबूजी नाईक यांजकडे पाठविण्यांत येत आहे. तर आपण त्यास एक पत्र बाबूजी नाईक यांस ताकिदीचें लिहून द्यावें व लवकर काम करून खिसमतगार मजकूर यास रवाना करावें. बहुत काय लिहिणें. मेहेरबानी असो द्यावी. *
[५४३] श्री.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री दीक्षित बावा स्वामीचे सेवेसी :-
आज्ञांकित स्नेहपूर्वक अंबिकाबाई जाधव दंडवत विनंति उपरि. ऐकिलें कीं तुह्मी शहरास आलें होतेत आणि आमची भेट घेतली नाहीं ! अपूर्व असे ! बरें ! इच्छेस आलें तें खरें ! किल्लियाचा मजकूर काय झाला ? शहरच रसद बंद झाली आहे. शहरचे बाहेरील पुरे उज्याड होतात, बाहीर वाटेंत लूट लबाड होते, याचा विचार काय आहे तो लिहून पाठवणें. आमचा हेत पुडळवाडीस जायाचा आहे. राजश्री पंतप्रधान शिंदखेडावर आहेत. चिरंजीव बाबाजीस भेटी द्यावयाबद्दल लिहिलें असे. भेटीचें वर्तमान अद्याप आलें नाहीं. आलियावर लेहूं. सातारियास माणूस पाठविलें होतें. ह्मणो लागले की मागती लष्करास गेलें. यास्तव लिहिलें असे. तरी तुह्मांकडील सविस्तर वर्तमान लिहून पाठवणें. आतां आह्मांस सर्व प्रकारें भरवसा तुमचा आहे. सुज्ञाप्रति विशेष काय लिहिणें. लोभ असो दीजे. हे विनंति.