[५३४] श्री.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :- मार्च अखेर सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत जावें. यानंतर आपण पत्र पाठविलें तें पावलें. वर्तमान कळलें. याचप्रकारें निरंतर पत्र पाठवून वर्तमान लिहीत जावें. इकडील वर्तमान तर मोंगलाकडील तह उरकून दरमजल भंडार कवठियानजीक आलों. पुढें गायकवाड याचे पारिपत्यास जलद जाऊन पोहोंचावें ऐसें आहे. ईश्वर कृपाच करील. सर्व कार्ये स्वामीचे आशीर्वादें उत्तम होतील. खानानी वरात सातांची मागून पाठवितों, तो ऐवज सत्वर रवानगीचे समयीं यावा ऐसा पाठवावा. न पाठविल्यास उचित नाहीं. कृपा केली पाहिजे. हे विनंति.